तुम देना साथ मेरा--भाग 9
( मागील भागात--
राज बोलत असतानाच त्यांची मुलगी तेथे आली.
"आई, अगं हा पाला कुटलाय तुझ्या गुढघ्याला लेप लावण्यासाठी. चल बरं आधी लावुन घे," ती तिच्या आईला म्हणजेच सुमनताईना म्हणत असतानाच तिचं लक्ष राजकडे गेलं.
"तुम्ही?" दोघंही एकदमच म्हणाले.
तिला बघताच राज उठून उभा राहिला होता.)
आता पुढे--
"तुम्ही?" दोघंही एकदमच म्हणाले.
तिला बघताच राज उठून उभा राहिला होता.
"अरे वा, तुम्ही तर आधीपासूनच ओळखता एकमेकांना"
"पप्पा, काल मी सांगितलं होतं ना तुम्हाला, जंगलातून परत आणलेले ते व्यक्ती, ते हेच!"
"अच्छा, बरं राज, ही आमची मुलगी आभा, तशी काल ओळख झालीच आहे तुमची.
आमची लेक सुद्धा हुशार आहे बरं, एम बी ए झाली आहे."
आमची लेक सुद्धा हुशार आहे बरं, एम बी ए झाली आहे."
राजने ओळखीचे हसत आभाकडे बघितले.
"एम बी ए असली तरी तिच्या आजीचा वारसा जोपासते मनापासून.
तिच्या आजीला जडीबुटी, औषधी वनस्पती यांचं खूप ज्ञान होतं, तेच तिच्या आईत आणि आता तिच्याजवळ वारसाहक्काने पोचलं आहे.
तुम्ही ज्या जंगलात गेले होते तेथे तर औषधी वनस्पतींचं भांडार आहे. आभा बरेचदा जाते तिथे औषधी पाला आणायला."
तिच्या आजीला जडीबुटी, औषधी वनस्पती यांचं खूप ज्ञान होतं, तेच तिच्या आईत आणि आता तिच्याजवळ वारसाहक्काने पोचलं आहे.
तुम्ही ज्या जंगलात गेले होते तेथे तर औषधी वनस्पतींचं भांडार आहे. आभा बरेचदा जाते तिथे औषधी पाला आणायला."
"अहो पप्पा, उगाच काय कौतुक सांगत बसलाय," आभा संकोचून बोलली.
"आणि तुमचा पाय काय म्हणतोय राजसाहेब? ठेच लागली होती ना जोरदार, आभाने सांगितले होते आम्हाला..."
"पाय तर एकदम ठीक झाला सर. लागलं वगैरे होतं असं वाटत देखील नाही आहे. याचं सगळं श्रेय पाला बांधून देणाऱ्या डॉक्टरला," राजने असे म्हणताच आभाने चमकून त्याच्याकडे बघितले आणि मालक मनापासून हसले.
त्याचे चतुराईने बोलणे त्यांचे मन जिंकून गेले.
तर आभाची पुन्हा झालेली भेट म्हणजे राजला दैवयोगचं वाटत होता.
" आबासाहेब, बागेतली सगळी कामं झालीत बघा. अजून काही काम आहे का आता? नाहीतर गावाकडे जाऊन बाजारहाट करून येतो," मालकांचा नोकर, सदू, त्यांना विचारत होता.
"अच्छा, तर हे आबासाहेब आहेत," राजने मनात नोंद केली.
"सदू, हे राज साहेब, काही दिवस आपल्याकडे येणार आहेत. बागेत यांची बसण्याची सोय करायची आणि जे हवं असेल ते त्यांना आणून द्यायचं, " आबासाहेबांनी त्यांच्या नोकराला सांगितलं.
"आणि सुमन, आभा, यांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी तुमची बरं का. पाहुणचारात कमतरता नको," इति आबासाहेब.
"नाही सर, खरंच पाहुणचाराची वगैरे गरज नाही.
तुम्ही दिलेली परवानगी हाच खरा पाहुणचार," राज नम्रतेने बोलत होता. तो मनापासून बोलत होता.
तुम्ही दिलेली परवानगी हाच खरा पाहुणचार," राज नम्रतेने बोलत होता. तो मनापासून बोलत होता.
त्याचं वागणं, बोलणं ऐकून आबासाहेब खुश झाले.
माणसं ओळखण्याची कला त्यांच्याजवळ होती आणि म्हणूनच राज गुणी कलाकार आहे हे ओळखायला त्यांना वेळ लागला नव्हता आणि त्यांनी राजला सहज परवानगी दिली होती.
"अहो, अतिथी देवो भव: मानणारे आहोत आम्ही. पाहुणचार नाकारून आम्हाला पापाच्या खाईत का ढकलताय..."
"नाही, नाही तसं नाही सर...," राज गडबडून गेला.
आबासाहेब हसायला लागले.
"टेन्शन नका घेऊ आमच्या बोलण्याचं. जा, तुम्ही निश्चिंतपणे काम करा तुमचं आणि निःसंकोचपणे रहा इथे"
" थँक यू सर, खूप खूप आभार तुमचे," इति राज.
"राज साहेब, अजून एक गोष्ट. ते इंग्रजाळलेलं 'सर' नका म्हणू ब्वा.
सगळ्यांसारखं तुम्ही सुद्धा आबासाहेब म्हणा."
सगळ्यांसारखं तुम्ही सुद्धा आबासाहेब म्हणा."
"ठीक आहे आबासाहेब.
तुम्ही पण मला साहेब वगैरे नाही म्हणायचं फक्त राज म्हणा."
तुम्ही पण मला साहेब वगैरे नाही म्हणायचं फक्त राज म्हणा."
"बरं," आबासाहेब हसून म्हणाले.
राजच्या समयसूचकतेने, मनमोकळेपणाने, आबासाहेब भारावून गेले होते तर आबासाहेबांच्या मोकळ्या वागण्याने आणि आदरातिथ्याने राज भारावून गेला होता.
त्यांच्याबद्दल त्याच्या मनात आदर निर्माण झाला.
दोघांचेही व्यक्तिमत्त्व दिलखुलास होते, एकमेकांना पूरक होते.
आबासाहेबांनी पाहुणचार करायला सांगितले म्हणून आभा आणि सुमनताई आत गेल्या होत्या.
त्या अजूनही आतच होत्या.
राज वेळकाढूपणा करीत तिथे जास्तीत जास्त थांबू बघत होता कारण आभाचे आभार मानायचे राहिले होते.
त्या अजूनही आतच होत्या.
राज वेळकाढूपणा करीत तिथे जास्तीत जास्त थांबू बघत होता कारण आभाचे आभार मानायचे राहिले होते.
"काहीही लागले, अडचण आली, तर अगदी बिनधास्त यायचं, बोलायचं. आम्ही सगळे तुमच्या घरचेच आहोत असे समजा," राज अजूनही चुळबूळ करीत उभा आहे हे बघून आबासाहेब
त्याच्याशी बोलू लागले.
त्याच्याशी बोलू लागले.
त्याचा संकोच दूर व्हावा म्हणून ते मोकळ्या मनाने बोलत होते.
"हो, हो, नक्कीच आबासाहेब. तुमच्यासारखी देवमाणसं भेटली,अजून काय पाहिजे? सौभाग्य माझे की तुमची भेट घडली."
"अरे बापरे, ही अशी उपकाराची वगैरे भाषा बोलणार असाल तर मग मला परवानगी देण्याबाबत पुन्हा एकदा विचार करावा लागेल," असे म्हणून आबासाहेब मोठ्याने हसले.
राजही हसतच त्याचं सामान घेऊन बागेकडे निघाला.
क्रमशः
© डॉ समृद्धी रायबागकर, अमरावती
#अष्टपैलूस्पर्धा2025
"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा