तुम देना साथ मेरा--भाग 8
( मागील भागात--
हे सगळे रंग आता चित्रांत उतरवण्याची राजला घाई झाली होती.
"दोन दिवस झालेत रंग आणि ब्रशला हात लावला नाही, देवळाचे चित्र पण काढता आले नाही, पण आता आजची ही संधी मात्र मी सोडणार नाही," राजने ठरवले.
मोठ्या हिमतीने त्याने गेट उघडलं आणि फार्महाऊस कडे निघाला.)
आता पुढे---
फार्महाऊस समोर अंगणात एक छोटीशी बाग होती.
तिथे एक मध्यमवयीन स्त्री पूजेसाठी फुलं वेचत होती.
राजने घसा खाकरून बोलायला सुरुवात केली.
"नमस्ते काकू", राज त्यांना नमस्कार करीत म्हणाला.
त्या स्त्रीने मागे वळून बघितले.
" थोडं बोलायचं होतं, खरंतर परवानगी हवी होती"
तो म्हणाला.
तो म्हणाला.
"कोण आपण? आणि कशाची परवानगी?"
" मी एक चित्रकार आहे काकू.
निसर्गभ्रमण करतो आणि निसर्गाच्या छटा रेखाटण्याचा प्रयत्न करतो.
तुमचं हे शेत, टुमदार फार्महाऊस, मोठाले वृक्षे, पक्षी सगळंच मनाला भावून गेलाय आणि तुमच्या शेतातलं हे सुंदर दृश्य, हे सप्तरंग मला माझ्या कॅनव्हासवर उतरवायचे आहेत.
मी इथेच बाहेर एखाद्या झाडाच्या सावलीत बसलो चित्र काढायला तर चालेल का?" इति राज.

खरेतर काही ठराविक लोकं सोडले तर त्यांच्या फार्महाऊसमध्ये असे आगंतुकपणे कधी कुणी येत नव्हते त्यामुळे त्या राजला अचानक आत बघून आश्चर्यचकित झाल्या होत्या आणि साशंकपणे बघत होत्या.
त्यातही मग त्याने चित्रकार आणि चित्र म्हणताच त्यांचा चेहरा थोडा विचारमग्न झाला.
"तुम्ही आत या ना, शेताचे मालक म्हणजे माझे मिस्टर आत आहेत, त्यांच्याशीच बोला काय ते. या, आत या." आणि त्या काकू भराभर पायऱ्या चढून आत निघाल्या.
राजसुद्धा त्यांच्या मागोमाग गेला.
फार्महाऊस असले तरी बंगलीवजा होते, प्रशस्त होते.
दरवाज्यातूनच राज निरीक्षण करू लागला.
दरवाज्यातूनच राज निरीक्षण करू लागला.
छोट्याश्या दिवाणखान्याला सुंदर सजवले होते.
छोटेखानी भारतीय बैठक, मोजक्याच पण अभिरुची संपन्न वस्तू, कमालीची स्वच्छता, टापटीपपणा, फुलदाणीत बागेतले ताजे पांढरे गुलाब एकप्रकारचा भारदस्तपणा वाढवत होते.
आणि शेताचे मालक बंगळीवर बसून पेपर वाचण्यात गढले होते.

"अहो, हे कुणी चित्रकार आले आहेत, चित्र काढण्याची परवानगी मागत आहेत."
मालकांनी पेपरमधून डोकं वर काढत प्रश्नार्थक नजरेने समोर बघितले.
"नमस्ते सर," राजने त्यांना नमस्कार केला.
"दारातच काय उभं केलं तुम्ही त्यांना, या, या आतमध्ये या. बसा, " त्यांनी त्यांच्या बायकोला उद्देशून म्हणत राजला आत बोलावले.
"नमस्ते सर, मी राज देशमुख. चित्रकार आहे,
मुंबईला असतो पण 2 महिन्यांसाठी तुमच्या शिरपूरमध्ये आलोय.
तुमच्या परिसरात थांबून या परिसराची, शेताची चित्रं काढण्याची परवानगी हवी होती सर," राजने त्याच्या बोलघेवड्या स्वभावला अनुसरून त्याची ओळखही सांगितली.

बोलता बोलता राजने बॅग मधून त्याची काही चित्रे काढून त्यांना दाखवली.
चित्रं सुंदर होतीच पण त्यांनी एकवार फक्त नजर टाकली आणि चित्रांबद्दल काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
चित्रं त्याला वापस केली.
चित्रं त्याला वापस केली.
राज आश्चर्यचकित झाला. पहिल्यांदा असे काही त्याच्यासोबत घडले होते.
नाहीतर त्याची चित्रं पाहिल्यानंतर कौतुकास्पद शब्द आपसुकच सगळ्यांच्या तोंडून निघायचे.
नाहीतर त्याची चित्रं पाहिल्यानंतर कौतुकास्पद शब्द आपसुकच सगळ्यांच्या तोंडून निघायचे.
तो तेवढ्या ताकदीचा आणि कमालीचा कलाकार होताच.
आपल्या कलेचा अहंकार त्याला नव्हता पण अभिमान नक्कीच होता आणि म्हणूनच बंगल्याचे मालक चित्रांबद्दल काहीही बोलले नाहीत हे जरा अचंबित करणारे होते.
"मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, नसतील आवडले त्यांना चित्रं.
परवानगी देतील की नाही?," असे विचार राजच्या मनात घोळत असतानाच मालक म्हणाले,
परवानगी देतील की नाही?," असे विचार राजच्या मनात घोळत असतानाच मालक म्हणाले,
"ठीक आहे राजसाहेब, काढा तुम्ही इथली चित्रं. तसंही ही सगळी निसर्गाची देण आहे, आमचं काही नाही त्यात, परवानगीची गरज नव्हती. हा, पण आमच्या या घराचं चित्रं काढायचं असेल तर त्याची परवानगी इतक्या सहज नाही देणार आम्ही."
राजला काय बोलावे ते सुचत नव्हते.
"अरे तुम्ही तर फारच विचारात गढले. अहो, आधी चहापाणी घ्या आणि मग परवानगी घ्या," ते मालक हसायला लागले.
राजबद्दल त्यांच्या कानावर आलेलं होतं.
गावाबाहेर रहात असले तरी गावाची खबर ते ठेवून होते.
आणि राजबद्दल, त्याचा स्वभाव आणि वागणुकीबाबत चांगल्याच गोष्टी त्यांच्या कानावर आल्या होत्या.
त्यामुळे त्यांनी निश्चिंतपणे त्याला परवानगी दिली होती.
गावाबाहेर रहात असले तरी गावाची खबर ते ठेवून होते.
आणि राजबद्दल, त्याचा स्वभाव आणि वागणुकीबाबत चांगल्याच गोष्टी त्यांच्या कानावर आल्या होत्या.
त्यामुळे त्यांनी निश्चिंतपणे त्याला परवानगी दिली होती.
तसेही त्याची चित्रं बघून ते जरी काही बोलले नसले तरी तो एक प्रामाणिक व्यक्ती आणि हाडाचा कलाकार आहे हे त्यांनी ओळखले होते.
"नको सर, परवानगी दिलीत तेच खूप झाले, बाकी काही नको, खरंच."
राज बोलत असतानाच त्यांची मुलगी तेथे आली.
"आई, अगं हा पाला कुटलाय तुझ्या गुढघ्याला लेप लावण्यासाठी. चल बरं आधी लावुन घे," ती तिच्या आईला म्हणजेच सुमनताईना म्हणत असतानाच तिचं लक्ष राजकडे गेलं.
"तुम्ही?" दोघंही एकदमच म्हणाले.
तिला बघताच राज उठून उभा राहिला होता.
क्रमशः
© डॉ समृद्धी रायबागकर, अमरावती
#अष्टपैलूस्पर्धा2025
"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा