तुम देना साथ मेरा--भाग 7
( मागील भागात--
आभा म्हणजे एक कोडं वाटू लागली.
तिच्या निरस, उदास वागण्याबोलण्याबद्दल, भावनाशून्य नजरेबाबत राज विचार करायला लागला.
तिच्या निरस, उदास वागण्याबोलण्याबद्दल, भावनाशून्य नजरेबाबत राज विचार करायला लागला.
"पुन्हा भेटली ना तर नक्की शोधून काढू तिच्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं. पण भेटेल का ती पुन्हा कधी?")
आता पुढे---
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे राजला जाग आली.
दूरवरून ऐकू येणारे मंदिरातल्या आरतीचे सूर मन प्रसन्न करत होते.
त्याचा पाय अगदी जादू झाल्यासारखा रात्रभरातून बरा झाला होता.
"आभा मॅडमच्या हातात तर जादू आहे वाटते, एकदम बरं वाटतंय. लागलं होतं की नाही असे वाटतेय. धन्यवाद आभा मॅडम, धन्यवाद!," राजने स्वतःशीच बोलत आभाचे आभार मानून टाकले.
नंतर त्याने पटापट आवरून घेतलं आणि सॅक पाठीवर टाकून तो बाहेर पडला.
नुकतंच उजाडू लागलं होतं.
तीन चार दिवसांपासून जंगलातील काही सुंदर जागांवर अंशुने त्याला नेले होते.
तिथलं सौंदर्य त्याने डोळ्यांत साठवून घेतले होते व लवकरच ते सौंदर्य तो रेखाटणार होता.
पण आज नेहमीप्रमाणे जंगलाच्या दिशेने न जाता तो विरुद्ध दिशेने निघाला होता.
आज अंशुला त्रास द्यायचा नाही, असे ठरवून तो एकटाच निघाला.
पहाटेचा मंद गार वारा त्याला सुखावत होता.
पक्ष्यांची मंजुळ किलबिल, घरांसमोर टाकलेला सडा, मातीचा मंद सुवास, सुंदर रेखाटलेल्या रांगोळ्या सगळंच त्याच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारं असंच!
पक्ष्यांची मंजुळ किलबिल, घरांसमोर टाकलेला सडा, मातीचा मंद सुवास, सुंदर रेखाटलेल्या रांगोळ्या सगळंच त्याच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारं असंच!
आज देवळात जाऊन देवाचे दर्शन घ्यायचे आणि मग ते सुंदर पुरातन देऊळ चित्रबध्द करायचे, हे मनाशी पक्के ठरवून तो देवळाकडे निघाला.
मजेत शीळ घालत, अवतीभोवतीचं वैभव डोळ्यांत साठवत चालता चालता देवळात नाही तर गावाबाहेर पोचला.
"अरेच्चा! देऊळ आणि गाव तर मागे राहिलं. वळणावरून माझा रस्ता चुकला बहुदा आणि गावाबाहेर निघालो वाटतंय," इति राज.
"आता विचारत विचारत जातो रस्ता म्हणजे मी हरवणार नाही," अश्या विचारात राज मागे फिरला.
पुन्हा वापस गावाकडे जाऊ लागला.
वळणावर तो पोहोचणार तेवढ्यात त्याला दूरवर कुणीतरी वेगाने समोर जाताना दिसले.
वळणावर तो पोहोचणार तेवढ्यात त्याला दूरवर कुणीतरी वेगाने समोर जाताना दिसले.
"आभा? येस, आभाचं होती ती. ज्या वेगाने ती चालत होती त्यावरून तर नक्कीच आभाचं असायला पाहिजे"
ती बरीच दूर होती. त्यामुळे तिला आवाज न देता राज देखील वेगाने त्या रस्त्याने निघाला.
पण त्याचा वेग कमी पडला आणि आभा आता इतकी दूर पोचली होती की दिसेनाशी झाली.
तिला गाठायच्या प्रयत्नात असलेल्या राजला आता मंदिराचे शिखर दिसू लागले होते.
"ओहह, शेवटी आभाच्या निमित्ताने का होईना पण हरवलेलं देऊळ सापडलं तर," राजच्या चेहऱ्यावर हसू होते.
देवळाच्या आवारात तो पोचला.
पण तिथे त्याला आभा कुठेच दिसली नाही.
पण तिथे त्याला आभा कुठेच दिसली नाही.
पुजारीकाकांनी त्याला बघताच आवाज दिला.
अंशुचा मित्र म्हणून राज आता बऱ्याच गावकऱ्यांच्या परिचयाचा झाला होता.
"ओ पाव्हनं, बरे झाले पहाटेच आलात, गर्दी व्हायच्या आधी. शांतपणे दर्शन करता येईल तुम्हाला, या इकडे."
गाभाऱ्याच्या अगदी जवळ जाऊन राज उभा राहिला.
गाभाऱ्याच्या अगदी जवळ जाऊन राज उभा राहिला.
अंबामातेची तेजस्वी सुहास्य वदनाची मूर्ती बघून आपसूकच त्याचे हात जोडले गेले.
अतिशय पवित्र वातावरण त्याला तिथे जाणवलं आणि भारावून तो तसाच उभा राहिला.
मातेचे रूप डोळ्यांमध्ये साठवत होता.
पुजारीकाकांच्या शुद्ध, स्पष्ट मंत्रोच्चारणाने गाभाऱ्यातले पावित्र्य ठळक होत होते.
मातेचे रूप डोळ्यांमध्ये साठवत होता.
पुजारीकाकांच्या शुद्ध, स्पष्ट मंत्रोच्चारणाने गाभाऱ्यातले पावित्र्य ठळक होत होते.
राजला दैवी अनुभूती लाभली होती.
गाभाऱ्याबाहेरच्या चौथऱ्यावर तो शांतपणे बसून राहिला.
ते वातावरण त्याला ऊर्जा तर देत होतेच पण काहीतरी वेगळेच आत्मिक समाधान त्याला जाणवत होते.
ते वातावरण त्याला ऊर्जा तर देत होतेच पण काहीतरी वेगळेच आत्मिक समाधान त्याला जाणवत होते.
आपल्याला मंदिराचे चित्र काढायचे आहे हे देखील तो विसरला होता जणू.
अगदी शांतपणे बसून तो तिथले वातावरण अनुभवत होता.
अगदी शांतपणे बसून तो तिथले वातावरण अनुभवत होता.
तेवढ्यात मुख्य गाभाऱ्यामागे असणाऱ्या कुंडाजवळ त्याला पुन्हा आभा दिसल्यासारखी झाली.
तो तडकपणे उठला.
ती तिकडून निघणाऱ्या मागच्या रस्त्याने मंदिराच्या आवाराबाहेर पडली होती.
राजने तिला गाठायचे ठरवले, तितक्यात पुजारीकाकाने त्याला आवाज दिला.
ती तिकडून निघणाऱ्या मागच्या रस्त्याने मंदिराच्या आवाराबाहेर पडली होती.
राजने तिला गाठायचे ठरवले, तितक्यात पुजारीकाकाने त्याला आवाज दिला.
"राज साहेब, प्रसाद घेऊन जा..."
राजने प्रसाद ग्रहन केला आणि बघतो तर काय तेवढ्यात आभा पुन्हा गायब झाली होती.
"खरंच आभा होती का ती? की मला भास होत आहेत? याचा छडा लावावाच लागेल" असा विचार करत तो निघाला.
ती ज्या रस्त्याने निघाली होती तो राजने बघितला होता व त्याच रस्त्याने तो निघाला.
बऱ्यापैकी चालत गेल्यावरही आभा तर कुठे दिसली नाही पण
हिरवी शिवारं डोलताना बघून खुश झाला.
हिरवी शिवारं डोलताना बघून खुश झाला.
थोडं समोर जाताच एका विस्तीर्ण, हिरव्यागार शेताजवळ तो पोचला.
आजूबाजूच्या शेतांपेक्षा ते शेत वेगळे दिसत होते.
शेतात पीक बहरून आलेलं होतं.
सकाळचा कोवळा प्रकाश गव्हाच्या ओंब्यांवर पडून त्यांना सुवर्णचकाकी लाभली होती.
सकाळचा कोवळा प्रकाश गव्हाच्या ओंब्यांवर पडून त्यांना सुवर्णचकाकी लाभली होती.
एका वेगळ्याच सोनेरी रंगात शेत न्हाऊन निघालं होतं.
पीक वाऱ्यावर छान डोलत होतं.
पक्ष्यांचे थवेच्या थवे एकदम झेपावत होते, शेतात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांची लगबग सुरू झाली होती.
पक्ष्यांचे थवेच्या थवे एकदम झेपावत होते, शेतात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांची लगबग सुरू झाली होती.
तिकडे आकाशात सूर्यनारायण सुद्धा कामाला लागले होते.
सकाळच्या प्रहरी आकाशात विविध रंगछटा दिसत होत्या.
दुरून बघताना त्या रंगछटा शेतावर पसरलेल्या दिसत होत्या आणि त्यामुळे ते शेत आणखीनच वेगळे भासत होते.
दुरून बघताना त्या रंगछटा शेतावर पसरलेल्या दिसत होत्या आणि त्यामुळे ते शेत आणखीनच वेगळे भासत होते.
त्या शेताला भक्कम पण छान रंगवलेलं कुंपण होतं. कुंपणाच्या बाहेर हिरवेगार विविध प्रकारचे वृक्ष आणि आत कौलारू पण टुमदार असं फार्महाऊस दिमाखात उभं होतं.
हे सगळे रंग आता चित्रांत उतरवण्याची राजला घाई झाली होती.
"दोन दिवस झालेत रंग आणि ब्रशला हात लावला नाही, देवळाचे चित्र पण काढता आले नाही, पण आता आजची ही संधी मात्र मी सोडणार नाही," राजने ठरवले.
मोठ्या हिमतीने त्याने गेट उघडलं आणि फार्महाऊस कडे निघाला.
क्रमशः
© डॉ समृद्धी रायबागकर, अमरावती
#अष्टपैलूस्पर्धा2025
"सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेजवर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा