Feb 23, 2024
प्रेरणादायक

तुम अगर साथ देणे का वादा करो....

Read Later
तुम अगर साथ देणे का वादा करो....

                      !!! ... आभार.... !!!    ... दिवाळी सुरु झालीय....


दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण..!


दिव्यांच्या लखलखटप्रमाणे आपल्या सर्वांचं जीवन उजळावे ह्या शुभेच्छा देण्याचा सण...!!


प्रत्येक सणात काहीतरी देणे ही आपली भारतीय संस्कृती..!


त्यालाच स्मरून ईराने दिलीय मला सर्वांचे आभार मानन्याची संधी..!!


आभार सगळ्यांचेच...


ज्यांचे लिखाण वाचता वाचता लिहिण्याची प्रेरणा मिळाली...त्यांचे..!


आणि...


ज्यांनी माझे लेख वाचून आणखी पुढे लिहायला स्फूर्ती दिली... त्यांचेही..!!


मेघा मॅम , शीतल माने मॅम , निशा थोरे मॅम , स्वामिनी चौगुले ,डॉ. सुप्रिया, सारंग सर..... आणखीन ईरा वरचे सर्वच प्रतिभावान लेखक.. 


आणि त्याबरोबरच रात्री एक- एक वाजता मला आलेला प्रॉब्लेम सोडवणाऱ्या संजना मॅम...


साऱ्यांच वाचता वाचता आपणही काही लिहावं असं सारखं मनात यायचं.. पण तो विचार तसाच मावळायचा.


खरं तर लहानपणी शाळेत असतांना , अकरावी बारावीला कितीतरी लेखन केलेलं.


त्यानंतर मात्र कॉलेज झालं.. डॉक्टर झाले.. लग्न झाले आणि आता दोन मुलांची आईही झालेय.


बारावी नंतर आतापर्यंत वीस वर्षांच्या या काळात मी काही लिहित होते हेच विसरून गेले..


आताही लेखणी रोज हातात घेत होते.. पण फक्त पेशंटला औषधं लिहून द्यायला..!


पण मागच्या महिन्यात ईराची कथामालिका लेखनस्पर्धा सुरु झाली.. आणि मनानं म्हंटलं लिहून बघावंच.. किमान एकदातरी..


ह्या वीस वर्षानंतर पहिल्यांदा एक कथा घेतली लिहायला... आणि मग आपोआपच शब्द बाहेर येऊ लागले.. पहिला भाग जेव्हा पोस्ट केला तेव्हा रात्रीचा एक वाजलेला..!

अख्खी रात्र माझी झोपच उडाली होती.. अर्ध्या अर्ध्या तासाने मी मोबाईल बघत होते... किती लोकांनी वाचली असेल माझी कथा..??


एखादं लहान मुल जेव्हा रोपटं लावतो आणि दहादा तेच उपटून किती मोठं झालं हे कुतूहलानं बघतो... अगदी सेम माझीही तीच गत झाली होती.. "... शोध... तिच्या अस्तित्वाचा...! " ही माझी पहिली कथामालिका.. पहिल्याच भागाला तब्बल तीन हजार views मिळाले आणि आकाश ठेंगणे झाल्यासारखं वाटलं. परत एकदा माझ्या आवडीतून माझंच अस्तित्व मी शोधलं असं वाटलं मला....


स्नेहा चुनारकर...

Specially thanks to you...!! कारण माझ्या पहिल्या कथेच्या पहिल्याच भागाला पहिली कॉमेंट तुमची होती..! 

त्यानंतर मंगेश देशपांडे...

तुम्हीदेखील पहिल्या भागापासून आजपर्यंत प्रत्येक पार्टला आवर्जून कमेंट करता... त्याबद्दल आभार..!


पूजा दीक्षित , कविता सरोदे, भावना शहा , मेधा गोडबोले, वासंती पांडे, मनीषा म्हात्रे, देवयानी नेमाडे चित्रा , हर्षदा wavhal, रंजना बोरकर, सुवर्णा जोईल, कविता साखरकर, मंजुषा येडे, प्रज्ञा फिरके, कविता साखरकर, निवेदिता,

आणि सर्वांची लाडकी धनदीपा सम्राट...

शिवाय ज्यांची नावं सुटली असतील त्या सर्वांचीच मी खूप खूप खूप आभारी आहे...
 

" शोध... तिच्या अस्तिवाचा... "  मधल्या माझ्या चित्रावर तुम्ही मनापासून भरभरून प्रेम केलंत त्याबरोबरच श्रीधर सारख्या निच माणसाचा तेवढाच राग रागही केला.

अशा माणसाला चांगली अद्दल घडली पाहिजे म्हणून तुम्हीच सुचवलंत.

आपलं अस्तित्व शोधायला वयाचं बंधन नसतंच हे मला सांगायचं होतं..


कथेचा शेवट सर्वानाच भावला. तशा भरपूर प्रतिक्रिया आल्या. खरं तर ही एक रिऍलिटी बेस्ड स्टोरी होती. जी सर्वांना आवडली.. आणि मग मी " प्रीती... " लिहायला घेतली.


अकरावी बारावीला असतांना मी "प्रीती.. "  आणि " पारिजात... गन्ध प्रेमाचा...! " लिहिलं होतं. नंतर पिताश्रींच्या भीतीने (...  काय अभ्यास सोडून फालतुगिरी करतेस..! हा त्यांचा फेमस डायलॉग. ) ती वही जाळून देखील टाकली. पण त्यानंतर वीस वर्षांनंतरही सोनिया - मोहन आणि अनी - सुमी माझ्या मनात रुंजी घालत आहेत याची जाणीव आत्ता मला होतेय... मागच्या महिण्यापासून...!  शालिनीचा मोहनशी झालेला विवाह जवळपास कुणालाच नाही पटला. मोहन केवळ सोनियाचाच होऊ दे... हेच सर्वांना हवं होतं. पण कथेची गरज पाहता सध्यातरी तसं नाही घडलं. आणि तुम्ही माझ्यावर चांगलाच राग पकडलाय असं वाटतंय..


" पारिजात... गंध प्रेमाचा...! " मधील नुकताच मिसरूड फुटलेला अनी आणि नुकतीच तारुण्यात पदार्पण करणारी माझी अल्लड सुमी.. तुम्हाला आवडतेय याचा फार आनंद होतोय. सुमती आणि रावी यांच्यातील मायलेकीचं समृद्ध नातं तुम्हाला सर्वांच्या मनाला भावतेय... खूप मस्त वाटतं तेव्हा..


तुमचं हे प्रेम असेच राहू दे कायम...

आणि मग मलाही पुढे आणखी नवीन काही लिहायची स्फूर्ती मिळत राहू दे... हेच मागणे..!

" तुम अगर साथ देणे का वादा करो...


मै यु हीं मस्त कहानिया लिखती रहू...!!! "

          अ बिग.. बिग.. बिग.. थँक्यू...   टु आल ऑफ यू....!!


                         THANK YOU....


                      ...♥️♥️♥️...


        ...  Happy Diwali To All Of you  ...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//