तुला पाहताना....भाग ५

This story written by me.

बघता बघता लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं.सगळ काही ठीक चाललं होत पण तिचे आई बाबा मात्र अजूनही तिथेच होते...

ईशा आणि आकाशच्या आयुष्यात आता नवीन कुणीतरी येणार होत.
आकाश अजून ऑफिस वरून आला नव्हता ईशा तो येण्याची वाट बघत होती...रोज संध्याकाळी ५ वाजता येणारा आकाश आज ६ वाजले तरी आला नव्हता.ईशाला पण काही सुचेना.कॉल केला तर फोन बंद.ईशा खूप घाबरली ७ वाजले तरी आकाशचा पत्ता नव्हता...ईशा ने त्याच्या मित्राला कॉल केला...

ईशा : hello....

आकाशचा मित्र रोहित ईशा चा आवाज ऐकुन विचार करू लागला यांनी मला का कॉल केला असेल.तेवढ्यात ईशा बोलू लागली...

ईशा : hello... मी ईशा बोलते आकाश ची wife.

रोहित : हा...बोला ना वहिनी.काही काम होत का?

ईशा : आकाश आहे का तिकडे???

रोहित : नाही.????का ओ???

ईशा : ????तुम्ही ऑफिसला गेला होता का आज?

रोहित : हो.पण काय झालाय सांगाल का नीट?

ईशा : आकाश सकाळी ऑफिस ला गेला होता तो अजून परत नाही आला आणि त्याचा फोन पण लागत नाहीये????

रोहित : येईल ओ. बॅटरी संपली असेल फोनची.

ईशा : ऑफिस मधल्या दुसऱ्या कुणाचा नंबर असेल तर विचारून बघता का प्लीज...

रोहित : हो.करेन मी कॉल विचारून.

ईशा : बर...ठेवते.

थोड्या वेळाने रोहित चा कॉल आला कुणालाच काहीच माहीत नव्हतं आकाश बद्दल.ईशाला खूप टेन्शन आल होत.ती रडत तिच्या बेडरूम मध्ये जाऊन बसली...

तेवढ्यात आकाश हळूच घरात येऊ लागला त्याला बघताच त्याची आई रागाने बोलणार एवढ्यात आकाशने तोंडावर बोट ठेऊन काही बोलू नको असा ईशारा केला आणि किचन मध्ये जाऊन काहीतरी करू लागला.बाहेर येऊन ईशाला आवाज दिला....

आकाश : ईशा...ईशा...

ईशा आकाशच्या आवाजाने धावतच बाहेर आली आणि काहीच न बोलता त्याच्याजवळ जाऊन रडू लागली.एकटीच पुटपुटत होती...समजत नाही का तुला किती वेळ बाहेर थांबायचं ते ...मी किती वाट पाहिली अर्धा जीव तर माझा गेलाच होता...आणि कुठे होतास तू मोबाईल का बंद आहे तुझा....

आकाश : अग हो हो...किती प्रश्न मला बोलू तर दे आदी.

ईशा : काय बोलायचं राहिलय आता?

आकाश : अग माझं थोड काम होत बाहेर आणि मोबाईल पण चार्ज करायला विसरलो होतो मी सकाळी.त्यामुळं थोडा प्रोब्लेम झाला...बाकी काही नाही मस्त आहे मी.????

ईशा : त्याच्याकडे बघत राहिली फक्त????

आकाश : अग वेडाबाई आहे मी ठीक...बर जेवायचं आहे ना?मला खूप भूक लागली आहे.काय आहे आज जेवण???

ईशा : अजून काहीच नाही बनवलं मी.थांब थोडा वेळ एकच खिचडी बनवते सगळे जेवतील...

आकाश : बर....

जेवण झाल्यानंतर ईशा आणि आकाश बाहेर फिरायला गेले.ईशाला आकाशला सांगायचं होत.पण काही विषयच सापडेना...

ईशा : आकाश...

आकाश : हा.बोल ना...

ईशा : आपण उद्या डॉक्टर कडे जाऊन येऊयात का???

आकाश : का ग???काय झालं???बर वाटत नाहीये का???आईला घेऊन जायचं ना मग आजच...तू पण ना.

ईशा : आईंना माहितीये मला काय होतय...

आकाश : काय होतय???

ईशा : ????????????

आकाश : ईशा. ...

ईशा : I am pregnant...

आकाश तिच्याकडे बघतच राहिला. ...ohhh... wow... that's great news.....मी बाबा होणार...thank you so much ईशा ????????????????दोघांनाही खूप आनंद झाला होता जस की जगातलं सगळ सुख एकीकडे आणि यांचं एकीकडे....

यांच्या गप्पांमध्ये रात्रीचे ११.३० वाजून गेले होते.दोघंही घरी गेले.आकाशच्या प्लॅन प्रमाणे सगळ झालं असेल असच त्याला वाटत होत....ईशा ने दरवाजा उघडताच सगळे जोरात ओरडायला लागले....happy birthday to you....happy birthday to you....happy birthday dear ईशा.....happy birthday to you...

ईशा साठी सगळ surprising होत...खूप खुश होती ती... आता तिला आकाशच्या उशिरा घरी येण्याचं कारण समजल...ईशा ने केक कट केला.आणि घरच्यांना पण ही न्यूज सांगितली...

आकाशच्या घरच्यांना सांगितल्यावर त्यांनी तर खूप जल्लोष केला.ईशाला आता फक्त एकच आस लागली होती की ही न्यूज ऐकून तरी आई बाबा मला घरी घेतील.

दुसऱ्या दिवशीची सकाळ तर पुन्हा ती या घरात खूप स्पेशल असल्याची जाणीव करून देत होती तिला.....स्वप्नात पण वाटलं नव्हत एवढे लाड....

पुढे पुढे तर जसे दिवस पुढे जायला लागले तस ईशा हे खा,ईशा ते खा...तुला हे आवडत का...सारखं सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे...आकाश तर आता आठवड्यातून ४ दिवस ऑफिस आणि ३ दिवस सुट्टी घ्यायचा...

ईशा च ओटिभरण वैगरे सगळ आकाशच्या आईने स्वतःच्या मुलीसारखं केलं...

आज न राहून तिला परत तिच्या आई बाबांची आठवण आली....लग्नाला आता दीड वर्ष पूर्ण झाले होते .राग थोडातरी शांत झाला असेल म्हणून ईशा ने आज आई बाबांना फोन करायचं ठरवलं...

ईशा ने फोन केला...खूप वेळा रिंग झाली पण कुणी रिसिव्ह नाही केला ..आणि जेव्हा रिसिव्ह केला तेव्हा ईशा चा आवाज ऐकुन कट झाला फोन....

आता तर ईशा ने आई बाबा बोलतील अशी आस पण सोडून दिली......

 

*****************************************

क्रमशः

ऐश्वर्या धामोडकर

हा भाग आवडल्यास नक्की कमेंट्स करा????????????????