तुला पाहताना....भाग २

This story written by me.

विचार करता करता त्याला झोप कधी लागली समजल नाही...आणि रात्री झोप नीट न झाल्यामुळे आकाश सकाळी लवकर उठला नव्हता... ईशा ची कॉलेजला जायची वेळ झाली जाता जाता ती त्याच्या घराकडे नजर टाकत गेली पण आज तो बाहेर दिसलाच नाही. ईशा ला पण काही समजत नव्हत काय करावं.ती न राहवून तिच्या मैत्रिणीला सगळ सांगू लागली.आणि आश्चर्य म्हणजे समोर तिला आकाश दिसला.तो तिच्याकडेच येत होता.

ईशा : (काहीच न बोलता त्याच्याकडे बघत राहिली)

आकाश : hiii...

ईशा : ????

आकाश : सॉरी कालसाठी...मी जरा जास्तच बोललो.मला तुझी फ्रेंडशिप ही चालेल.no problem ????

ईशा : झालं बोलून????

आकाश : काल तू अचानक निघून गेलीस मला काहीच समजल नाही.

ईशा : मग friends ????

आकाश : (आकाश हात मिळवत)????????

आकाश : by the way ईशा....तुझा कुणावर प्रेम आहे का?

ईशा : प्रेमाचं माहित नाही????पण त्याला बघितल की समोरच सगळ विसरून जाते मी.फक्त तो आणि मी????

आकाश : निःशब्द (????)

ईशा : खूप छान आहे रे तो.जास्त नाही ओळखत मी पण जेवढं ओळखलं तेवढा तर मनापासून आवडला????

आकाश : (स्मितहास्य करत????) तू हॅपी आहेस ना झालं मग....

ईशा : अरे नाव नाही विचारलास त्याच.

आकाश : हा.सांग ना काय नाव आहे त्याच?

ईशा : आकाश????

आकाश : तिच्याकडे बघतच राहिला(त्याला समजत नव्हत ही नक्की कुणाबद्दल बोलते)

ईशा : आवडल नाही का नाव???खूप छान आहे अरे तो.नेहमी मला चोरून चोरून बघत असतो,मित्रांना सांगतो वहिनी आहे तुमची म्हणून ????????????आणि माझ्याशी बोलायला खूप घाबरतो.तसे एवढे अनोळखी नाहीये आम्ही.खूप चांगलं ओळखतो एकमेकांना....

आकाश : हसायलाच लागला????????????????त्याला वाटत होत हे स्वप्न तर नाही ना ...

तेवढ्यात ईशा ने त्याचा हात पकडला आणि बोलली आयुषयभरासाठी सोबत हवा आहेस तू मला.देशील ना माझी साथ????

आकाश : ठेवलास ना विश्वास माझ्यावर मग कधीच तो कमी नाही पडणार...????

ईशा : ????

आकाश : मोबाईल नंबर देशील का आता तरी...की अजून पण मोबाईल वापरत नाही??? ????????????????

ईशा : हसत (मोबाईल नंबर देते)

मग हे दोघं रोज mseeage  वर बोलू लागतात....सकाळी दिवसाची
सुरुवात एकमेकांना mseeage करून व्हायची आणि दिवसाचा शेवट
ही असाच....खूप सवय झाली होती त्यांना एकमेकांची.त्यानंतर तर मग
रोज कॉलेज ला पण दोघं सोबत जायला लागले.दोघं सोबत घरी यायचे...हळू हळू mseeage call पर्यंत पोहचले...ईशा घरी असताना पण त्याला callvr बोलायची.खूप गप्पा चालायच्या दोघांच्या.आयुष्याची सगळी स्वप्न एकत्र बघत होते ते जस काही आयुष्य एकत्र जगत होते ते....आपण हे करायचं,आपण ते करायचं,आपण एकडे जायचं,आपण इथे फिरायच... आकाश म्हणायचा हो ग सगळ करायचं आपण...तुझी सगळी स्वप्न मी पूर्ण करेन....हळूहळू तर कॉलेज मधल्या मित्र मैत्रिणींना पण समजल ...सगळे दोघांना चिडवायचे.यांना पण ते खूप छान वाटायचं.

ईशा च्या आईला तिच्या वागण्यातला बदल जाणवत होता.एक दिवस ईशा कॉलेज वरून घरी आली आईने आवाज दिला. ....ईशा ईशा....
ईशा मात्र मोबाईल मध्ये मग्न होती.आई जोरात तिच्याजवळ येऊन ओरडली.ईशा काहीच न बोलता मोबाईल बाजूला ठेऊन आईसोबत गेली.तिने आकाश का घडलेली सगळी स्टोरी सांगितली...दुसऱ्या दिवशी चक्क आकाश ईशाच्या घरी आला होता होता. ईशाचे बाबा बाहेर बसले होते.

आकाश : ईशा आहे का काका???

ईशाची आई बाहेर आली आणि जोरात ओरडली काय काम आहे?
सारखं बघेल तेव्हा नुस्त फोन वर बोलत बसायचं.काम नाहीत का तुम्हाला काय...अभ्यासाचं बघा जरा कायतरी....नाटक नुसती????

आकाश : काका.... माझं ईशावर खूप प्रेम आहे.मला लग्न करायचं आहे तिच्याशी...

ईशाच्या बाबांनी आकाश च काहीच ऐकून न घेता गालावर एक जोरात वाजवली...मिळवायची अक्कल नाही अजून प्रेम करायला निघाले...

ईशा : बाबा ...ऐकून तरी घा ओ तो काय म्हणतोय... प्लीज बाबा????

ईशाचे बाबा : तू गप्प बस....मुर्खासारखे कायतरी बोलू नको.????

(घरी खूप दंगा चालू झाला...ईशा रडत रडत आकाशला समजवत होती )

ईशा : जा ना तू घरी आकाश... प्लीज...आपण उद्या बोलुयात????????????????????

आकाश मात्र काही ऐकतच नव्हता...ईशाच्या बाबांना सारखं विनवण्या करत होता.काका तुम्ही चुकीचं समजू नका मला...खरच मी खूप सुखात ठेवेन ईशाला.... प्लीज काका प्लीज
(ईशाचे बाबा मात्र काही ऐकायच्या मनस्थिती मध्ये नव्हते)

ईशा : आकाश प्लीज माझ्यासाठी तरी जा ना इथून प्लीज...????????????????

आकाश काहीच न बोलता भरल्या डोळ्यांनी घरी परतला....????

रात्री दोघांना पण झोप लागली नाही.एकमेकांचा विचार चालू.तेवढ्यात आकाश ने ईशा ला mseeage केला...ईशा mseeage बघते तोवर आईने फोन हिसकावून घेतला...ईशा खूप रडत होती पण तिला समजुन घेणार कुणीच नव्हत इथं...
दुसऱ्या दिवशी ईशा कॉलेजला पण गेली नाही.आकाश ला पण काही सुचत नव्हत.त्याने तिच्या मैत्रिणीला सांगितलं तिच्या घरी जाऊन बघून ये ती कशी आहे म्हणून.पण दुसऱ्या दिवशी तिच्या मैत्रिणीकडून समजल की ती तिच्या मामाकडे गेलीये...बहुतेक तिकडेच कॉलेज जॉईन करेल ती.....आकाश खूप रडायला लागला..सगळे मित्र मैत्रिणी समजावत होते????????????????

आठ दिवसांनी तिच्या मैत्रिणीने आकाशला सांगितले की ईशा च लग्न झालं आहे....आकाश ला सगळच संपल्यासारख वाटत होत.जो जोरजोरात रडत होता...????????????????कुणाशी काहीच न बोलता तो कॉलेज वरून घरी आला....स्वतःला समजावत होता नसेल झालं तिचं लग्न.घरच्यांनी मुद्दाम सांगितलं असेल असं ....अस आठ दिवसात कुणी करत का लग्न...आणि खरच लग्न झालं असेल तर???? ईशांने का केलं असेल असं माझ्यासोबत...तिला एकदा मला कॉल करता नाही का आला...खूप समजावत होता तो स्वतःला पण त्याच मन काही ऐकायला तयार नव्हत...

लग्नाच्या दहा दिवसांनंतर ईशा तिच्या बाबांच्या घरी आली होती.हे कुठून तरी आकाशला समजल...त्याने ठरवलं होत तिने अस का केलं मी तिला विचारणारच...आणि ती तिच्या घराकडे जाऊ लागला.....

 

****************************************

क्रमशः

ऐश्वर्या धमोडकर.

कथा आवडल्यास नक्की कमेंट्स करून  कळवा????????????????