तुला पाहताना....भाग ७

This story written by me.

दोघांची भांडण चालूच होती तेवढ्यात आकाशची आई बाळाला घेऊन आतमध्ये आली.इथं तरी भांडू नका रे हॉस्पिटल आहे हे अस म्हणत बाळाला आकाश आणि ईशाच्या हातात दिलं... तस एवढ्या छोट्या बाळाला आकाशने पहिल्यांदाच हातात घेतल होत...पण त्याला हातात घेतल्यावर झालेला आनंद इतर सगळ्या सुखांपेक्षा वेगळा.....

आकाश : ईशा...

ईशा :हा...बोल ना

आकाश : मी शब्दात नाही सांगू शकत ग एवढा आनंद झालाय मला????????????

ईशा आकाश कडे पाहून smile krte....

ईशाला जेव्हा घरी परत आणल ना तेव्हा तिचं स्वागत ती पहिल्यांदा घरी आल्यावर झालेलं तसच झालं...अंगणात मोठी रांगोळी....
फुलांनी सजलेला रस्ता....घरात पाऊस टाकताच music आणि दारात फटाक्यांची आतिषबाजी.....किती भारावून टाकणार होत हे सगळ...अगदी स्वप्नातल्या दूनियेसारख....ईशाला समजतच नव्हत स्वप्न आहे की सत्य...तोंडात मिठाईचा घास.सगळ्यांनी केलेला लाड तिला अगदी स्वप्नातल्या दुनियेसारख वाटत होत...

ईशा,आकाश,त्याचे आई बाबा सगळे बाळाची खूप काळजी करायचे... दिवसभर बाळाला हातावर घेऊन असायचे सगळे झोपतील  तेवढीच त्या बाळाला शांती....

पुढच्या दोन दिवसात ईशाच्या बाळाचं नामकरण करायचं ठरल...आकाशच्या लग्नानंतर  घरात पाहिलं मोठं कार्य होत...लग्न गडबडीत झाल्यामुळे आकाशच्या आईची हौस राहिलेली.आता तर सगळ्या पाहुण्यांना बोलवायचं मला काही माहीत नाही असा हट्ट आईचा...मग काय आकाश सगळ्यांना निमंत्रण द्यायला निघाला आणि ईशाच्या इच्छेसाठी ईशाच्या आई बाबांना पण बोलवायचं ठरवलं...

आकाश ईशाच्या घरी गेला तेव्हा ईशाचे बाबा आणि भाऊ दोघंही घरी नव्हते.त्यामुळं आई काहीच नाही बोलली.आकाश घरी जाताच एका स्मितहास्य|ने त्याच स्वागत झालं...आकाश बोलू लागला

आकाश : माफ करा काकी आमचं काही चुकल असेल तर पण त्यावेळी आमच्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता ओ...ईशा खूप मिस करते तुम्हाला. गेल्या दोन वर्षात असा एकही दिवस नसेल ज्या दिवशी ईशाने तुमचं नाव काढल नसेल...

ईशाच्या आईच्या डोळ्यात पाणी आल तिला तर काहीच बोलायचं सुचेना....ईशा कशी आहे एवढच विचारून शांत झाल्या त्या...

आकाश : हो छान आहे ती...मुलगा झाला आम्हाला.नामकरण आहे निमंत्रण द्यायला आलो होतो..

ईशाची आई : हो...समजल ते.शेजारी सांगतात ईशाबद्दल सगळ...

आकाश : या सगळ्यांनी नक्की,काकांना पण सांगा मी येऊन गेलो म्हणून.ईशा खूप आठवण काढते सगळ्यांची...

ईशाची आई : हो सांगेन.

आकाश : येतील ना ते?

ईशाची आई : काय माहित... सांगितल्यावर काय बोलतात
काय माहित.बाळाची न्यूज ऐकुन येतील पण त्यांचं काय सांगता येत नाही.राग आहे अजून तिच्यावर.

आकाश : हो राग तर असणारच...पण आता ईशासाठी सगळ विसरा तुम्ही...

ईशाची आई :हो...

आकाश : येतो मग मी...अजुंन बाहेर जायचं आहे निमंत्रण द्यायला...
आकाशने निमंत्रण दिलं आणि तो निघाला....

घरी ईशा पण वाट बघत होती काय बोलतील वैगरे डोक्यात विचार चालू...पण आकाश मात्र हसत घरी आला

आकाश : सासरवडीला जाऊन आलो आज????

ईशा : काय झालं???कोण कोण होते घरी?? पप्पा काही बोलले का???आणि मम्मी ...माझ्याबद्दल विचारल का तिने????

आकाश : अग हो हो...सांगतो सगळ किती प्रश्न हे....

ईशा : सांग ना पटकन काय झालं???

आकाश : अग घरी फक्त तुझी आई होती...मग त्या काहीच नाही बोलल्या.मीच त्यांना सॉरी म्हटल आणि सांगितल मुलगा झाला आम्हाला नामकरण आहे.या सगळ्यांनी...

ईशा : मग????

आकाश :हो बोलल्या...तुझे पप्पा आले की सांगेन अस बोलल्या बाळाची न्यूज ऐकुन येतील ते...

ईशा :????

ईशा आणि आकाश दोघंही खूप खुश होते...आकाश ने सगळ्या पाहुण्यांना निमंत्रण दिलं....

आज नामकरणाचा दिवस होता...सकाळी  सहा पासून घरी सगळ्यांचा किलबिलाट चालू होता....जेवणाची तयारी...अंगणात मोठी रांगोळी...सगळ्यांनी नवीन नवीन कपडे घातलेले...प्रत्येकजण काही ना काही काम करत होते....ईशा आणि आकाश पण खूप खुश....हळू हळू पाहुणे यायला सुरुवात झाली...सगळ्या पाहुण्यांना चहा,नाश्ता....आणि पाळण्याच डेकोरेशन तर अगदी स्वप्नातल्या सारखं होत...सगळ्यांनी गडबड हे करा ते करा...कुणाचा कुणाला ताळमेळ नाही... नुस्ता दंगा त्यात त्या music चा आवाज ...बापरे कोण काय बोलत हे पण समजत नव्हत तिथं...बाळाचं नाव ठेवायची गडबड चालू झाली...

पण ईशा मात्र तिच्या आई बाबांची वाट बघत होती...ते येतील या आशेवर...पण खूप वेळ झाला तरी आई बाबा आले नव्हते मग शेवटी काही पर्याय उरला नाही...नंतर येतील अशी मनाची समजुन काढून ती ही नाव ठेवायला तयार झाली...बाळाचं नाव ईशा आणि आकाशच्या नावावरून आयुष ठेवल.....खूप वेळ झाला नामकरण झाल्यानंतर सगळे पाहुणे जेवले...अजूनही आई बाबा आले नव्हते...ईशाला वाटल रात्री येतील....रात्री पण तिने खूप वाट बघितली पण ते आलेच नाहीत....ईशा तर रडूच लागली...
आकाशने मग ईशा ची समजुन घातली...

आकाश: अग काहीतरी काम असेल म्हणून नसतील आले तू नको नाराज होऊ.

ईशा : अजून पण राग असेल माझ्याबद्दल त्यांच्या मनात?

आकाश : नाही ग...राग असता तर मी घरी गेल्यावर आई पण बोलल्या नसत्या माझ्याशी.

ईशा :मग का आले नसतील रे ते????

आकाश : अग काहीतरी काम आल असेल म्हणून नसतील आले...तू नको विचार करू.

ईशा : हो

कितीही नाही म्हटले तरी ईशाच्या मनात विचार येतच होते...शेवटी स्वतःची स्वतः समजुन काढून मग ती ही विसरून गेली सगळ....

बाळासोबत ईशाचा अख्खा दिवस कसा जायचा तिला पण समजायचं नाही...तिचं बाळ आता थोड मोठं झालं होत....ती बोलली की तिच्या बोलण्याला प्रतिक्रिया द्यायचं...ती हसली की तिच्याकडे बघून हसायचं...मध्येच रडायचं...घरी तर सगळ्यांना बाळाशिवाय करमत पण नव्हत...बाळाला साधं हॉस्पिटल मध्ये दाखवायला नेल तर ते घरी येईपर्यंत सगळे हातातली काम बाजूला ठेऊन वाट बघत बसायचे....

आपल्या बोलण्याला बाळ प्रतिक्रिया देत हे बघून सगळे खूप खुश व्हायचे....

आज खूप दिवसांनी ईशाला काहीतरी वेगळं फिलिंग येत होत काहीतरी चांगलं घडेल आज अस....का कुणास ठाऊक पण सकाळपासून ती खूपच खुश होती....

*****************************************

क्रमशः

ऐश्वर्या धामोडकर.

हा भाग आवडल्यास नक्की कमेंट्स करा????????????????