तुला पाहते रे - भाग 6

Love story

तुला पाहते रे - भाग 6 

मिहिरने बाजूला पाहिलं तर सई बसली होती तिथेच आडवी झाली होती. तिला कधी झोप लागली तिचं तिलाही कळलं नाही. मिहिरने तिच्या डोक्यावरून हळुवार हात फिरवला आणि तिला उचलून बेडवर नीट झोपवलं. तोही मग चेंज करून तिच्या बाजूला येऊन झोपला.. त्या दोघांना जाग आली तेव्हा जवळजवळ संध्याकाळ झाली होती. सईला जाग आली. ती सकाळपासून असलेल्या ड्रेसवरच झोपली होती. तिने पाहिलं तर मिहीर तिच्यावर हात टाकून झोपला होता. तिने हलकेच त्याला जाग येऊ नये म्हणून त्याचा हात बाजूला केला आणि ती उठली. ' झोपेतही किती छान दिसतोय हा ' असं म्हणून तिने त्याच्या गालावर किस केलं आणि ती आवरायला गेली. थोड्या वेळाने मिहिरही जागा झाला तोपर्यंत सई फ्रेश होऊन आली. तिने यलो कलरचा लॉंग टॉप आणि ब्लॅक कलरची प्लाझो घातली होती. केस छोटी क्लिप लावून मोकळे सोडले होते. तिच्याकडे बघत मिहीर तसाच बेडवरती लोळत होता. ती त्याच्या जवळ येऊन बसली. त्याच्या केसातून तिने हात फिरवला. 

" उठायचं नाही का ? " तिनं विचारलं.

" नाही ....उठवसचं वाटतं नाहीये.." असं म्हणून त्याने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. 

तीही त्याला थोपटत थोडा वेळ तशीच बसून राहिली. दोघांनाही आता सपाटून भूक लागली होती. मिहीर मग उठला आणि फ्रेश होऊन आला. त्याने फोन करून डिनर मागवलं. रात्र झाली होती आणि मेन्यू बघायचे कष्ट त्यांच्यात नव्हते म्हणून त्याने रेग्युलर डाळ खिचडी, रोटी आणि एक भाजी ऑर्डर केली. थोड्या वेळाने रूम सर्व्हिस देणारा माणूस त्यांच्यासाठी एका ट्रॉलीतून डिनर घेऊन आला. त्यांना ते सर्व्ह करून तो ट्रॉली तिथेच ठेऊन निघून गेला. दोघांनीही जेवणावर ताव मारला. जेवण खूप छान होतं. मिहीरने मग रूम सर्व्हिसला फोन करून ट्रॉली घेऊन जायला सांगितलं. तो माणूस येऊन गेल्यानंतर बाहेर जायचं ठरवलं. बाहेर चांगलीच थंडी पडली होती. दोघांनीही जॅकेट चढवलं , डोक्यावर मऊ टोपी घालून ती कानापर्यंत ओढली आणि दोघेही पाय मोकळे करायला बाहेर आले.  गार वातावरणात मधूनच येणारी वाऱ्याची झुळूक अंगावर शहारे आणत होती. दोघेही तिथे जाऊन एका बाकावर बसले. थंडीचा आनंद घेत शांत बसले होते. सईला खूप छान वाटतं होतं. तिने हळूच मिहिरच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तसं त्याने मागून हात टाकून तिला अधिकच जवळ ओढलं. थंडीचा जोर वाढू लागला तसे ते दोघे तिथून उठले. रेस्टॉरंट मधून त्यांनी तिथेच त्यांच्यासाठी थोडा चहा मागवला आणि चहा पित तिथेच उभे राहिले. 

" मला या अशा वातावरणात आणि पावसात चहा घ्यायला फार आवडतो.." मिहीर म्हणाला. 

" मलाही....." ती थंडीने कुडकुडत होती. 

मिहिरच्या ते लक्षात आलं. त्याने मग चहा लवकर संपवला. तिचा चहा संपल्यावर कप त्यांनी वेटरकडे दिले आणि ते दोघेही रूमवर आले. मिहिरने दार लावून घेतलं आणि सईला घट्ट मिठी मारली. तिला दोन क्षण कळेचना. मग तीही त्याच्या मिठीत शिरली. मिहिरने तिच्या कपाळावर किस केलं तसं ती शहारली. छान गुलाबी थंडी पडली होती. बराच उशीर झाला होता त्यामुळे दोघेही झोपी गेले...

............................

दुसऱ्या दिवशी दोघेही फ्लावर गार्डन बघायला जाणार होते. सकाळी सई लवकरच तयार झाली. ती मग मिहिरला उठवायला हळूच त्याच्या कानावर फुंकर मारत होती. त्यामुळे त्याची झोप चाळवली. तो जागा झाला. त्याने सईकडे पाहिलं तर रेड कलरची शिफॉनची साडी, त्यावर ब्लॅक कलरचा सिवलेस ब्लाउज ...गळ्यात डायमंडचं छोटं मंगळसुत्र....धुतलेले ओले केस....सई खूपच हॉट दिसत होती.  तो जागा झालेला बघून  सई उठून जात होती तसा त्याने तिचा हात पकडला आणि पुन्हा त्याच्या जवळ ओढलं. 

" तू अशी येणारेस का बाहेर...य? " तो म्हणाला.

" हो ....काही प्रॉब्लेम आहे का...?? " ती न कळून म्हणाली. 

" हो मग काय.....अग तुला बाहेर घेऊन गेलो तर तुझ्याकडेच बघत राहतील सगळे....कसली भारी दिसतेयस तू....." तो डोळे मिचकावत म्हणाला. त्यावर ती छानसं लाजली. 

" मिहीर सोड ना प्लिज......आपल्याला बाहेर जायला मग उशीर होईल..." ती त्याचे हात सोडवत म्हणाली.

" नको ना जाऊया......राहू दे मला असंच तुझ्याजवळ...." तो तिला अजूनच घट्ट मिठीत घेत म्हणाला. 

" आपण फिरायला आलोय ना....उठ ना मला जायचंय बाहेर चल उठ लवकर....." सई म्हणाली. 

" फक्त फिरायला आलोय....??? " त्याने तिला डोळा मारला आणि विचारलं 

" गप रे.....उठ आता नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी..." ती जरा गाल फुगवून म्हणाली. 

" ओके बाबा उठतो....पण मला काहीतरी हवं आहे त्याशिवाय मी नाही उठणार...." तो गाल पुढे करत म्हणाला.

" काहीही मिळणार नाही .....उठ आणि पटकन आवर उशीर होईल.....उठ रे..." ती चिडली होती.

नाईलाजाने तो उठला. पण त्याची तिच्यावरून नजरच हटत नव्हती. तो तसाच तिच्याकडे बघत पुढे चालला होता. आणि जाऊन वॉशरूमच्या भिंतीवर जाऊन आपटला. ते बघून तिला हसू आलं. थोड्या वेळात मिहीर तयार होऊन आला. तोपर्यंत तिने आपले ओले केस सुकवले आणि केसांना एक छोटी पिन लावून ते केस बांधले. मिहिर तिच्याकडे एकटक बघत होता. त्याने मग हळूच जाऊन तिला मागुन मिठी मारली आणि तिने केसांना लावलेली पिन काढून टाकली. तसे तिचे केस वाऱ्यावर उडू लागले. त्याने तिच्याकडे बघून छातीवर 'मार डाला ' अशी ऍक्शन केली. त्यावर ती छान लाजली. दोघेही मग रूम लॉक करून बाहेर आले. हॉटेलच्या गाडीतून ते आज फ्लॉवर्स गार्डन बघायला गेले. मुन्नार मधलं ते प्रसिध्द फ्लॉवर्स गार्डन होतं. दोघेही गाडीतून खाली उतरले.गार्डनच्या मेन गेटमधून ते आत आले. हॉटेलची गाडी त्यांना सोडून पुन्हा हॉटेलच्या दिशेने निघून गेली. ते फ्लॉवर्स गार्डन कमालीचं छान होतं...!!!! तिथे विविध प्रकारची फुलं उमलली होती. सई हे सगळं बघून खूप हरखली. एकेक बाजू बघत ते पुढे पुढे जाऊ लागले. प्रत्येक फुलांजवल त्या त्या फुलांची माहिती लिहिली होती...इंद्रधनुष्याचे रंग उधळावे तशी रंगीबेरंगी फुलं तिथे होती. गार्डनची रचना अतिशय आकर्षक पद्धतीने केली होती. सई आणि मिहीर प्रमाणेच इतरही हनिमून कपल्स ते गार्डन बघायला आले होते. पण तरीही ती सगळी आपल्याच विश्वात होती..त्यांच्याकडे पाहून मिहिरने सईला आपला खांदा मारून हलकेच धक्का दिला. तशी ती लाजली. ती अशीच सगळी फ़ुलं बघत हळूहुळू पुढे जाऊ लागली. थोड्या वेळाने तिनं पाहिलं तर तिला मिहीर कुठेच दिसेना. ती थोडीशी घाबरली. कारण त्या अनोळखी शहरात मिहीर शिवाय तिला कोणीच ओळखीचं नव्हतं. ती पुन्हा आली त्याच रस्त्याने मागे गेली आणि मिहिरला हाका मारू लागली. पण तिला तो कुठेच दिसेना. आता तिला टेंशन आलं होतं. ती मिहिरला कॉल करू लागली पण तो फोनही उचलत नव्हता. काय करायचं तिला सुचेना. तिथली माणसं आपल्याकडेच बघत आहेत असं तिला उगीचच वाटलं..ती तिथून भरभर चालू लागली. मिहीर कुठे दिसतोय का यासाठी भांबावल्या सारखी तिची नजर चोफेर फिरत होती. 

" सरप्राईज.......!!!! " मागून एक ओळखीचा आवाज आला तशी ती दचकली आणि जागेवरच थांबली. तिने मागे वळून पाहिलं. तर मिहीर हातात मोठा फुलांचा बुके घेऊन उभा होता. ती धावतच त्याच्या जवळ आली आणि तिने त्याला मिठी मारली. 

" कुठे....कुठे गेला होतास तू....??? किती शोधलं मी तुला....?? मला ......मला काहीच माहीत नाहीये इथलं..." ती आता घाबरून रडू लागली होती. 

" अग इथेच होतो.....तुझ्यासाठी हा बुके तयार करून आणलाय स्पेशल.बघ वेगवेगळी फुलं आहेत त्यात..." तो तिला बाजूला करून बुके दाखवत म्हणाला. ती अजूनही रडत होती.

" ए वेडाबाई..... अग कुठे जात नाही मी तुला सोडून....आहे इथेच...." त्याने तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि पुन्हा तिला जवळ घेतलं. 

ती तशीच त्याला मिठी मारून उभी होती. दोघेही मग तसेच चालत थोडे पुढे आले. मिहिरने खाली गुढघ्यावर बसून तिला तो बुके दिला तिला खूप भारी वाटलं...!!! त्यांनी मग त्या गार्डनमध्ये खूप फोटोज काढले.. तिथल्याच एका माणसाकडे कॅमेरा देऊन त्या दोघांनी वेगवेगळ्या पोजेस मधले आपले फोटो काढून घेतले. आणि नंतर सिंगल सिंगल ही फोटो काढले. सईची प्रत्येक पोज मिहिरला घायाळ करत होती..त्याला वाटतं होतं तिला तिथेच मिठीत घ्यावं पण त्याने तसं दाखवलं नाही..थोड्या वेळाने  दोघेही मग तिथून बाहेर पडले. त्यांच्या पोटात आता कावळे ओरडत होते. सकाळी ते काहीच न खाता बाहेर पडले होते त्यामुळे मग खाण्यासाठी शोधमोहीम सुरू झाली. मुन्नारच स्ट्रीट फूड खूप फेमस आहे त्यामुळे मग मिहीर आणि सईने तिकडे आपला मोर्चा वळवला. तिथल्या लोकांशी थोडं इंग्लिश आणि हिंदी बोलत त्यांनी तिथली फेमस डिश विचारली. त्यावर त्यांनी सारवना भवनला अप्पम आणि स्टयु बद्दल त्यांना सांगितलं. नावं ऐकून दोघांनाही ते खावंसं वाटलं. मग ते दोघेही टॅक्सीने सारवना भवनला पोहचले. तिथे त्यांनी अप्पम आणि व्हेजिटेबल स्टयुची ऑर्डर दिली. थोड्याच वेळात दोघांसमोर गरमागरम अप्पम आणि व्हेजिटेबल स्टयू आलं. त्याचा वासही खूप सुरेख होता. बराच वेळ लांबुन एक व्यक्ती त्या दोघांच निरीक्षण करत होती. थोड्या वेळाने ती व्यक्ती त्या दोघांजवळ आली. त्यांच्या सोबत अजून एक व्यक्ती होती. 

" आम्ही इथे बसलो तर चालेल का....? " मराठी भाषेतलं बोलणं ऐकून सई आणि मिहिरने वरती पाहिलं. एक चाळीस ते पंचेचाळीस वर्षाची व्यक्ती त्यांना विचारत होती. 

सई आणि मिहीर दोघांनाही काही कळेना पण त्यांच्या वयाचा विचार करता त्यांनी त्यांना बसायला जागा दिली. त्या व्यक्ती सोबत एक बाई होती. बहुधा ती त्यांची पत्नी असावी असा सईने अंदाज बांधला. 

" हॅलो.... मी शेखर कारखानीस.." त्या व्यक्तीने मिहीरकडे हात करत आपली ओळख करून दिली. " आणि ही माझी मिसेस..... सुजाता..." त्यांनी सांगितलं तसं त्या काकूंनीही नमस्कार म्हटलं. 

मिहिरने देखील हात मिळवत त्याची आणि सईची ओळख करून दिली. 

" आम्ही तुमच्याच हॉटेलला राहतोय ....सेकंड फ्लोअरला.... काल तुम्हाला बघितलं.. इथे खूप टुरिस्ट येत असतात....पण तुम्ही दोघेही नवीन वाटलात सो आलो ओळख करून घ्यायला...मला फार आवडतात माणसं जोडायला...." मि. शेखर हसत म्हणाले आणि त्यांनी दोघांसाठी अप्पम आणि व्हेजिटेबल स्टयूची ऑर्डर दिली. 

" फारच छान....आम्हालाही इथे सगळं नवीनच आहे..." मिहिरने सांगितलं.

" हो.....तुमच्या चेहऱ्यांवरून वाटतं ते."  ते हसत म्हणाले..... " मी मुन्नारला आत्ता  पाचव्यांदा येतोय.....खूप छान वाटतं इथे आल्यावर...एकदम शांत आणि रिलॅक्स...." ते म्हणाले.

" यांना सवयच आहे भेटेल त्याची मस्करी करायची....तुम्ही प्लिज काही वाटून घेऊ नका...आम्हीही दोघेच होतो ....इथे सगळेच अनोळखी...तुम्हाला बघून जरा बरं वाटलं सो आलो तुमच्याशी बोलायला...." सुजाता ताई म्हणाल्या. 

" अहो काकू त्यात काय.....उलट आम्हालाही कंपनी मिळाली..." सई म्हणाली. तोपर्यंत मि शेखरनी दिलेली ऑर्डर आली. 

" तुम्हाला माहितेय या अप्पम नि स्टयुची एक गंमत आहे..." त्यांनी अप्पमचा एक घास तोंडात टाकत म्हटलं. 

" काय....? " मिहीर आणि सई उत्सुकतेने ऐकू लागले. 

" असं म्हणतात की या अप्पमने दोन लग्न केली आहेत. एक व्हेजिटेबल स्टयु सोबत आणि दुसरं नारळी दुधासोबत.... इथल्या लोकांच्या मते या दोन्ही बायका आहेत. त्यामुळे व्हेजिटेबल स्टयू हे व्हेजिटेबल्स आणि नारळाच्या दुधापासून तयार करतात....आणि अप्पम सोबत खातात..." काकांनी हसत सांगितलं. 

" वा भारीच...." मिहीर म्हणाला. 

थोडा वेळ मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारून सगळे उठले. सई आणि मिहिरचा पुढचा प्लॅन काही ठरलेला नव्हता त्यामुळे ते पुन्हा हॉटेल वर जाणार होते. कारखानीस काका काकू मात्र बाकीचे पॉईंट बघायला जाणार होते. चौघांनीही एकमेकांना बाय केलं आणि आपापल्या मार्गे निघून गेले. 

.....................................

दोघेही रूमचं दार उघडून आत आले. मिहिरने दार लावून घेतलं आणि पटकन सईला मिठीत घेतलं. 

" मिहीर सोड ना...." सई त्याची मिठी सोडवत म्हणाली. 

" गप तू.....एकतर तू आधीच माझी विकेट पाडली आहेस....आता मी तुला सोडणार नाही....कोणी सांगितलं होतं इतकं छान दिसायला..." तो तिला अधिकच बिलगत म्हणाला. 

" हो का....." सई गोड लाजून म्हणाली. 

" हो मग......" त्याने हळूच तिला आपल्यापासून लांब करत म्हणाला. " तुझ्यासाठी एक गंमत आहे....थांब हा..." असं म्हणून त्याने तिथलं वोर्डरोब उघडून तिच्या हातात एक बॉक्स दिला. 

" काय आहे यात...." बघ तरी उघडून तो म्हणाला.

तिने तो बॉक्स उघडला. त्यात खूप सारी छोटी छोटी ग्रिटींग्स होती. त्यावर लिहलं होतं

' थॅंक्यू ....माझ्या आयुष्यात आल्याबद्दल..!!!...'

'थॅंक्यू....माझ्यावर प्रेम केल्याबद्दल....!!!' 

' थॅंक्यू.....माझ्यावर विश्वास ठेवल्या बद्दल..!!! '

पुढच्या एका कार्डवर लिहलं होतं

' मला कधी सोडून जाणार नाहीस ना....?? ' त्यावर ती मानेनंच नाही म्हणाली. 

शेवटच्या कार्डवर लिहलं होतं

' मी कधी चुकलो तर मला सांभाळून घेशील ना...?? ' ती त्यावर फक्त हसली आणि तिने मिहिरला मिठी मारली. 

" मिहीर...खरंतर मी तुला थॅंक्यू म्हणायला हवं होतं...लग्न झाल्यापासून तूच तर मला समजून घेतलंयस... मला माझा असा वेळ दिलास... नवरा म्हणून तू माझ्यावर कोणताच हक्क गाजवला नाहीस...माझ्या मनाचा , माझ्या भावनांचा तू विचार केलास... यापेक्षा अजून काय हवं असतं रे नव्याने लग्न झालेल्या मुलीला...खरंच मिहीर खूप खूप थॅंक्यू... मी तुला सोडून कधीही जाणार नाही...!!! " एवढं म्हणून सई रडू लागली. 

" तुला रडवायला नाही केलं हे मी सगळं...आणि आम्हालाही कळतं तुमची अवस्था कशी असते ते.... प्रत्येकवेळी प्रेम दाखवायलाच हवं असं नाही ... आपल्या वागण्या बोलण्यातूनही ते जाणवत....आता डोळे पूस बघू त्या कार्ड्सच्या खाली एक गिफ्ट आहे तुझ्यासाठी बघ..." मिहीर म्हणाला. 

म्हणून तिने त्या बॉक्स मध्ये पाहिलं त्यामध्ये अजून एक छोटा बॉक्स होता. तिने तो उघडला त्यात एक नाजूक डिझाईनची अंगठी होती. मिहिरने ती अंगठी तिच्या बोटात घातली...मग काय सईबाई फारचं खुश झाल्या..

" मला याचं रिटर्न गिफ्ट हवं आहे..." तो पुढे पुढे येत म्हणाला... ती तशीच मागे मागे जात राहिली आणि भिंतीला आपटली...पुढे काय होईल या भीतीने तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले..

क्रमशः......

@ सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथा आवडल्यास नावसाहित शेअर करावी. 

🎭 Series Post

View all