तुला पाहते रे - भाग 16

Love story

तुला पाहते रे - भाग 16 

" Good morning " असा आवाज आल्यावर सईने डोळे किलकिले करून त्याच्याकडे पाहिलं आणि ती गोड हसली. कितीतरी दिवसांनी तिची मॉर्निंग अशी छान झाली होती.

" good morning.....!! " ती म्हणाली. 

त्याने मग तिला दोन्ही हातांनी उचललं. 

" टाकू .....टाकू ...खाली......" तो तिला पाडल्यासारखं करत म्हणाला. त्यावर ती हसली.

" नको ना......ठेव खाली आधी मला..." ती म्हणाली.

त्याने मग अलगद तिला व्हीलचेअर वरती बसवलं. तिला मग ब्रश वगरे करायला सांगून तो दोघांसाठी चहा करायला किचन मध्ये गेला. ती तिचं आटपून व्हीलचेअर वरून बाहेर आली. तोपर्यंत त्याचा चहा तयार होता. तो चहा घेऊन बाहेर आला आणि एक कप तिला दिला. तिच्याच समोरच्या खुर्चीवर बसून तोही चहा पिऊ लागला. आज मिहीर अगदी निवांत बघून तिनं त्याला विचारलंच

" आज ऑफिस नाही का...? " सईने विचारलं.

" नाही सुट्टी घेतलेय दोन दिवस...." तो चहा पिता पिता म्हणाला.

" ok..........." ती एवढंच म्हणाली आणि खिडकीतून बाहेर बघू लागली.

अजूनही ती त्याच्याशी नेहमीसारखं बोलत नव्हती. कामपुरत बोलणं व्हायचं इतकंच. हेच मिहिरला नको होतं. जोपर्यंत आधी सारखा तिच्यातला उत्साह, आत्मविश्वास परत येत नाही तोपर्यंत ती कोणत्याच ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देणं शक्य नव्हतं. त्याने मग चहा पिऊन झाल्यावर दोघांचेही कप आत नेऊन ठेवले. ती अजूनही एकटक त्या खिडकीतून बाहेर बघत होती. थोड्या वेळाने नीता मावशी आत आल्या. मिहिरने त्यांना सगळी कल्पना दिली होती. त्यामुळे आता त्यांच्या कामात सईला सामावून घ्यायचं तरच ती आपल्याशी बोलू लागेल असं त्यांना वाटलं. त्या आल्यायत म्हटल्यावर मिहीर मग डॉ. जोशींना भेटायला गेला. नीता मावशींनी थोडा वेळ किचन मध्ये खुडबुड केली आणि त्या हॉल मध्ये आल्या. 

" ओ.....सई ताई......मला ना हे किचनचं सामान कुठे लावायचं कळत नाहीये...तुम्ही जरा सांगता काय..?? " त्या तिचं आपल्याकडे लक्ष वेधत म्हणाल्या. 

" आ......??? " सई आपल्या तंद्रीतून जागी झाली. नीता मावशींनी मिहीर डॉक्टरकडे गेल्याचं तिला सांगितलं आणि तिला परत एकदा किचनच्या मांडणीबद्दल विचारलं.

" अं...... मी काय सांगु.... तुम्ही लावा तुम्हाला हवं असेल तसं...." असं  म्हणून ती गप्प बसली.

" तसं नाही ताई.....आता काय आहे की घर अजून लावायचंय ना तसं. म्हणजे भांडीकुंडी आहेत ठेवलेली पण बाकीचा जिन्नस कसा ठेवायचा कळेना मला...." नीता मावशी म्हणाल्या. 

" हम्मम....... पण मी सांगून काय करू.. आत्ता तुम्ही जेवण करणार आहात त्या पद्धतीने तुमच्या हाताशी येईल असं ठेवा सगळं...." ती म्हणाली.

" हा ते झालंच...पण मी काय कायमची आहे काय... पण तुम्ही बऱ्या झाल्यावर तुम्हाला मग सगळं परत लावायला लागेल ना...त्यापेक्षा आत्ताच लावून घेऊ. म्हणजे माझ्या पण हाताला तीच सवय लागेल..." त्या तिचं मन वळवत म्हणाल्या. 

" तुम्हाला खरचं वाटतंय मी बरी होईन म्हणून......" तिने केविलावण्या नजरेने त्यांना विचारलं.

" अहो का नाही.....तुम्हाला माहितेय आमच्या इकडची एक म्हातारी.........." असं म्हणून नीता ताईंनी तिला घेऊन किचनच्या दाराजवळ गेल्या आणि त्यांनी बोलता बोलता त्या म्हातारीची गोष्ट सईला सांगितली. मग तिला ' हे कुठे ठेऊ ...ते कुठे ठेऊ ' विचारून डाळी, कडधान्य, तांदूळ, चहा पावडर ,साखर असे सगळे डबे त्यांनी ठेवले. सईला ही मग आपण एवढं बोललो आज कितीतर दिवसांनी याचं आश्चर्य वाटलं. मग नीता मावशींनी तिला भाजी निवडायला दिली आणि काय जेवण करायचं... तुम्हाला , दादांना काय  जेवण आवडतं सगळं विचारून घेतलं. तीही त्यांना सांगत होती . त्यामुळे दोघीचं अगदी चांगलं पटायला लागलं.

................................

मिहीर जोशी डॉक्टरांना भेटायला त्यांच्या हॉस्पिटलला गेला. डॉक्टर ओपीडी मध्ये होते त्यामुळे रिसेप्शन वरती असणाऱ्या बाईने मिहिरला थोडा वेळ बसायला सांगितलं होतं. तो आजूबाजूला बघत, पेशंटच निरीक्षण करत समोरच्याच चेअर वरती बसला होता. थोड्या वेळाने डॉक्टर त्यांच्या केबिनमध्ये गेले आणि त्यांनी मिहिरला आत बोलावून घेतलं. 

" हॅलो डॉक्टर......" मिहीर डॉ. जोशींशी हात मिळवत म्हणाला.

" हॅलो....Please have a sit " डॉक्टर म्हणाले. मिहीर त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसला. 

" त्या अमेरिकेच्या डॉक्टरांचा काही रिप्लाय आला का...?? " मिहिरने विचारलं.

" हो मी तुम्हाला त्यासाठीच बोलवलं होतं. ते डॉक्टर मिसेस सई यांची ट्रीटमेंट करायला तयार आहेत..." डॉक्टर म्हणाले.

" खरंच डॉक्टर....Thank you ...Thank you so much...."  मिहीर म्हणाला. 

त्या डॉक्टरांनी आत्तापर्यंत अश्या खूप केसेस हँडल केल्या आहेत..ते डॉक्टर आपल्याला तिथूनच ट्रीटमेंट सांगतील आणि  त्याप्रमाणे मी त्या इथून फॉलो करणार आहे. त्यांनी मिसेस सई यांचे सगळे रिपोर्ट्स वाचले. त्यांनी सांगितलंय की त्यांच्या एकूण परिस्थिती वरून तरी त्यांच्यात ऐंशी टक्के सुधारणा होऊ शकते. पण त्या ट्रीटमेंट साठी त्यांनी स्वतःहून खूप पॉसिटीव्ह असणं गरजेचं आहे. ते या पुढच्या दोन महिन्यात त्यांच्यासाठी ट्रीटमेंट चालू करत आहेत पण त्या आधी त्यांना मिसेस सई यांचा दर आठ दिवसांचा एक रिपोर्ट करून त्यांना पाठवणं गरजेचं आहे. " डॉक्टर म्हणाले. 

" ok.... पण त्यांना कसले रिपोर्ट्स कळवावे लागतील. म्हणजे मला काही कळलं नाही..." मिहिरने विचारलं.

" येस..... त्याच संदर्भात बोलायला मी तुम्हाला इकडे बोलावलंय. " डॉक्टर

" हो... डॉक्टर बोला ना...." मिहीर 

" कसं आहे मिस्टर मिहीर की अश्या situation मध्ये माणूस हा शरीरापेक्षाही मनाने फार थकतो. कारण अशा वेळी ती व्यक्ती त्याच्या रेग्युलर कामांसाठी कोणावर तरी अवलंबून असते. उदाहरणार्थ , स्वतःची स्वच्छता राखणं , वॉशरूमला जाणं या गोष्टींमुळे त्या व्यक्तीला वाटतं की आपल्यामुळे बाकीच्यांना त्रास होतोय. ही भावना त्यांना पोखरत असते. त्यामुळे ते अधिकच खंगत जातात. गोळ्या औषधं घेणं त्यांना नकोसं होतं. एकटेपणा , दुबळेपणा त्यांच्या मनात घर करू लागतो...." डॉक्टर म्हणाले

" हो डॉक्टर. खरं आहे तुमचं म्हणणं. सई देखील अशीच वागतेय. तासनतास ती एकटक कुठेतरी बघत बसलेली असते....नाही बघवत तिच्याकडे असं...." तो म्हणाला खरं पण डोळ्यात पाणी आलं होतं त्याच्या. डॉक्टर समोर होते म्हणून त्यानं स्वतःला सावरलं.

" I can understand.... म्हणूनच ही गोष्ट आपल्याला बदलवायची आहे. त्यांच्यापुढे सतत पॉसिटीव्ह गोष्टी घडतील यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यांना वाटणारी दुबळेपणाची भावना जाऊन त्या काहीतरी करू शकतात ही जाणीव आपण त्यांना करून द्यायला हवी. त्या inspired होतील अशा स्टोरीज त्यांना वाचायला द्या, त्यांना वेगवेगळ्या मुव्हीज दाखवा. जेणेकरून त्यांच्यातही स्वतःच्या पायावर उभं राहायची आंतरिक इच्छा निर्माण झाली पाहिजे. माणसाची आंतरिक इच्छा शक्ती ही एखाद्या मेडिसिन प्रमाणे काम करते. त्यामुळे या परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी त्या स्वतःच स्वतःला मदत करू शकतात..." डॉक्टर म्हणाले. 

" हो डॉक्टर. मी यासाठी सगळे प्रयन्त करेन. पण सई बरी झाली पाहिजे..." तो म्हणाला.

" Don't worry.....त्या नक्की बऱ्या होतील. पण त्या आधी त्यांना डिप्रेशन मधून बाहेर काढण्याची जबाबदारी तुमची आहे...त्या motivate होतील अशा गोष्गोष्टी करा. रेग्युलर त्यांना करता येतील अशी कामं त्यांना करू द्या....आपल्या प्रमाणे त्याही काम करू शकतात हा विश्वास त्यांना द्या...त्यांचं मन रमेल अशी कामं त्यांना आवर्जून करायला लावा....त्यांच्या याच त्यांच्या पॉसिटीव्ह गोष्टीचा रिपोर्ट आपल्याला त्या डॉक्टरना कळवायचा आहे.   म्हणजे त्यांनी आज काय खाल्लं..ते त्यांनी आज काय काय केलं इथपर्यंत सगळं...." डॉ. जोशी

" येस डॉक्टर.. मला लक्षात येतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते...मी यासाठी नक्की प्रयन्त करेन. Thank you so much for your cooperation... मी तुम्हाला सईचा पुढच्या आठ दिवसांचा रिपोर्ट नक्की कळवेन..." मिहिरच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. 

डॉक्टरांचा निरोप घेऊन तो तिथून बाहेर पडला. तिथून तो एका व्यक्तीला भेटायला गेला. मिहीर परत आला तेव्हा साधारण दुपारचे दोन वाजले होते. त्याने पाहिलं तर नीता मावशी आणि सईमध्ये बऱ्यापैकी बोलणं सुरू झालं होतं. ते बघून त्याला बरं वाटलं. 

....................................

चारच दिवसांनी सईसाठी कोणाचा तरी फोन आला. ती घरातही फार कोणाशी बोलत नव्हती त्यामुळे आपल्यासाठी कोणाचा फोन आला असेल याचं तिला आश्चर्य वाटलं. 

" हॅलो........कोण बोलतंय..." सईने विचारलं

" हॅलो मी मिलिंद सर बोलतोय...." पलीकडून आवाज आला.

तेव्हा कुठे सईला आठवलं अक्सिडेंट होण्यापूर्वी ती नुकतीच जॉबला लागली होती. वर्षही झालं नव्हतं आणि अक्सिडेंट नंतर तिने जॉबच्या ठिकाणी लिव्ह अँप्लिकेशन दिलं नव्हतं किंवा ती जॉब सोडणारे असंही काही सांगितलं नव्हतं. तिनं आपल्याच कोशात स्वतःला बांधून ठेवलं होतं. त्यामुळे आज अचानक मिलिंद सरांचा फोन आल्यावर तिला खडबडून जागं झाल्यासारखं वाटलं.

" हा सर बोला........" ती हळू आवाजात म्हणाली.

" मिसेस सई कशी आहे आता तुमची तब्येत...?? " त्यांनी विचारलं.

" ठीक आहे सर....." ती म्हणाली.

" ok. मिसेस सई तुम्ही कंपनीकडे कोणतंच लिव्ह अँप्लिकेशन वगरे दिलेलं नाही. कंपनीच्याही काही पॉलिसीज आहेत. आणि तुमचं कामही पेंडिंग आहे ते तुम्हाला पूर्ण करावं लागेल..." मिलिंद सर जरा ताठ स्वरात बोलले.

" पण....पण  सर.....मी.....मी आत्ता ऑफिसला नाही येऊ शकत..." ती डोळ्यात आलेलं पाणी पुसत म्हणाली.

" ok.. नो प्रॉब्लेम. परवा तुमच्याकडे लॅपटॉप घेऊन कंपनीचा माणूस येईल. तुम्ही घरून काम करून दिलंत तरी चालेल. तुमच्या वेळेनुसार तुम्ही पूर्ण करून द्या. " मिलिंद सर बोलले.

" ok सर......" एवढं बोलून सईने फोन कट केला. 

" काय म्हणत होते सर.....? " मिहीरने तिच्या बाजूला बसत विचारलं.

" काही नाही. कँपनीचं काम पेंडिंग आहे माझं. ते पूर्ण करून द्यायला सांगितलंय. माझ्या लक्षातही नव्हतं रे हे कामाचं....!!! आता काय करू मी....?? " तिला काय बोलावं सुचेना.

" हो सई..... शांत हो. सर काय म्हणाले....? " त्याने विचारलं

" काही नाही. परवा लॅपटॉप घेऊन माणूस येणारे कंपनीचा. घरून काम करून द्यायला सांगितलंय." ती उदास होत म्हणाली.

" अरे वा... चांगलं आहे की मग. " मिहीर

" पण.......पण मला जमेल का....? " ती घाबरत म्हणाली. 

" का नाही. तुला हे नक्की जमेल सई. मला विश्वास आहे. " असं म्हणून त्याने तिच्या हातांवर हलकेच थोपटलं. 

तीही मग जरा रिलॅक्स झाली. मिहिरच्या डोळ्यात तिला तिच्याबद्दलचा विश्वास तिला दिसला आणि ती सुखावली. मिहीर मग चहा आणतो सांगून तिथून बाहेर आला. बाहेर आल्यावर त्याने मिलिंद सरांना ' thank you ' म्हणून मेसेज पाठवला.

क्रमशः....

🎭 Series Post

View all