तुला नक्की हवं तरी काय? ... भाग 9

ती सदोदित आत्महत्येची धमकी देते, ठीक आहे मी असंच करतो",.. विकासला आता जरा बरं वाटत होतं, त्याने प्रियाला फोन केला की मी येतो आहे तुला संध्याकाळी भेटायला,


तुला नक्की हवं तरी काय? ... भाग 9
........

राज्यस्तरीय करंडक कथा मालिका स्पर्धा

विषय.. कौटुंबिक कथा

उपविषय.. तुला नक्की हवं तरी काय?

©️®️शिल्पा सुतार

नाशिक टीम
...
राधा, आई बाबा, ज्योती ताई, जिजु घरी आले, राधा रडत होती, सगळे तिला समजावत होते,.. "त्या अश्या खराब माणसा साठी का रडते राधा, एवढी चांगली मुलगी आपली त्या लोकांना किम्मत नाही, नौकरी करते घरकामात हुशार आहे, साधी भोळी राधा " ,.. बाबा चिडले होते

"मला राहायच होत त्यांच्या सोबत, लग्न ठरल्यावर चांगल वागत होत ते, लग्नानंतर बदलले, माझ्या बाबतीत का अस झाल ताई?, बाकीच्यांचे संसार किती सुखात होतात ",.. राधा अजूनही रडत होती

" राधा तू काळजी करू नकोस, होईल नीट, बोलू आपण त्यांच्याशी",.. ज्योती ताई समजावत होती राधाला

"कस ताई? कस होईल ठीक? मला काही आशा वाटत नाही, त्यांना मी नाही ती मुलगी आवडते",.. राधा

" उगीच काही विचार करू नकोस राधा, शांत हो, आज समजवत होते विकास तुला, होईल नीट बघ, करतील ते काहीतरी ",.. ज्योती ताई

" पोरीच नुकसान झाल पण",... बाबा काळजीत होते

"आपण चौकशी करायला पाहिजे होती",.. जिजू

"आता काय पण पुढे? ",.. आई

" काही नाही बघू आता ते काय म्हणता आहेत",..बाबा

" मला नाही जायचं आता तिकडे, खूप चीड चीड होते माझी यांना बघितल की ",.. राधा

" तू काही काळजी करू नको राधा, शांत हो बर, रडू नको ",.. ज्योती

"आपण फसवणूक झाल्याची पोलिसात तक्रार करायला हवी",.. बाबा

" पण काय सांगणार तिकडे जावून, त्या मुलीशी थोडी त्या विकासने लग्न केल, लग्न तर राधाशी झाल आहे त्याच, मी केली चौकशी मैत्री आहे त्या विकास आणि प्रियाची फक्त, त्यांच्यात कुठलेही संबध नव्हते ",.. जिजू

"हो का मला नाही वाटत अस, अगदी प्रेमाने फिरतांना फोटो आहेत त्यांचे, ते पुरावे पुरेसे नाहीत का ",.. बाबा

" नाही अस चालत नाही",.. जिजू

" काय करू या मग? ",.. बाबा

" होईल ठीक,.. ते विकास म्हणता आहेत ना मी करतो नीट थोड थांबू या आपण, घाई घाईने निर्णय नको घ्यायला ",.. ज्योती

" हो मलाही अस वाटत ",.. जिजू

" मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाहीये, माझं खूप डोकं दुखत आहे, मी झोपते",.. राधा आत मध्ये चालली गेली

" काय होणार आहे राधाचं, मला खूप काळजी वाटते आहे ",.. आई

" बघू थोडे दिवस वाट, होईल ठीक , तू शांत हो ",.. बाबा

विकासला झोप येत नव्हती, काहीही करून हा प्रॉब्लेम सोडवायला हवा, काही तरी करायला हव, मी उद्या पोलिसात तक्रार करतो त्या प्रियाची, वाटल होत समजवून सांगू, ती ऐकत नाही, मी पण जरा राधाशी प्रेमाने बोलायला हव होत, मला येत नाही अस, खर तर मला समजल नाही कस वागू मी राधाशी, आता ती खूप चिडली आहे, लवकरात लवकर चांगल व्हायला हव

सकाळी विकास आणि सुरेश ऑफिसला जायला निघाले, विकास मेंन ब्रांचला होता, सुरेश जुन्या ऑफिस मधे,

"सुरेश आज जमलं तर काहीही करून तू प्रियाच्या नवर्‍याबद्दल माहिती मिळव, लवकरात लवकर काही तरी करायला पाहिजे मला, राधाच्या घरचे चिडलेले आहेत, त्यांनी मला डिवोर्स नोटिस दिली तर मला भिती वाटते आहे",.. विकास

" हो मी बघतो सांगतो तुला, पण हे काम लगेचच होण्यासारखं नाही, जरा धीर धर ",.. सुरेश

" हो हे अस वाटल होत मला की हळूहळू प्रियाला दूर करू मग राधा सोबत राहू, याने माझंच नुकसान झालं, आता नाही मी पटकन सोडवणार आता हा विषय ",... विकास

विकास ऑफिस मध्ये आला, त्याने राधाला फोन लावला, राधा ऑफिस मध्ये आलेली होती, ती विचार करत होती की विकास काय म्हटला काल? खरच ते प्रयत्न करत असतील का आमचं सगळं नीट करण्याचं, ती प्रिया खरच यांच्या मागे लागली आहे का? जिजाजी म्हणतात की त्यांच्यात काही संबंध नव्हते, ते एक बर झाल, आपण सत्यता पडताळायला पाहिजे, घाईघाईने निर्णय नको घ्यायला, पण एवढ्या लवकर ही मी लगेच तिकडे वापस जाणार नाही, यांना जरा धडा शिकवायचा आहे

फोन वाजत होता तिने बघितला विकासचा फोन आहे, तिने फोन उचलला

"राधा मला बोलायचं आहे तुझ्याशी एक मिनिट फोन ठेवू नको",.. विकास

"हे बघा विकास मी ऑफिसमध्ये आहे मला आता इथून काही बोलता येणार नाही, तुम्ही नंतर फोन करा",.. राधा

तिने फोन ठेवून दिला

बापरे राधा काही एवढ्या लवकर ऐकणार नाही असे दिसत आहे, त्याने परत फोन केला

"राधा एक मिनिट फक्त, मला माफ कर, मला खरच तुझ्या सोबत रहायचा आहे, मी ठीक करत होतो सगळ, आता मी प्रियाची कंप्लेंट करतो पोलिस स्टेशनमध्ये, खरच मला त्रास देते ती विश्वास ठेव",... विकास

"तुम्हाला काही माझ्या सोबत रहायच नाही, उगीच मी घर सोडून गेली म्हणून तुम्ही अस म्हणता आहात, एकदा मी परत घरी आली की अस कराल तुम्ही, पूर्वी सारख माझ्याशी बोलणार नाही तुम्ही , मला माहिती आहे, मला त्रास होतो तुम्ही असे वागले की, मी घरी येणार नाही, तुम्ही काय करायच ते करा, मला या पुढे फोन करू नका",.. राधा

" राधा प्लीज माझ चुकल मला सुचत नव्हतं काही, तुझ माझ नात नवीन आहे, काय बोलव कस वागावं तुझ्याशी हेच समजत नव्हत मला, अस करु नकोस, माझी साथ दे",.. विकास

राधाने फोन ठेवून दिला

सुरेश ऑफिसला पोहोचला, प्रिया आलेली होती ती तिच्या जागेवर काम करत होती, तसं मी प्रियाशी जास्त बोललेलं नाही आता कसं काय अचानक जाऊन बोलणार काय करू तिची मैत्रीण लीना ती सुरेशला चांगले ओळखत होती तिच्याशीच बोलून बघूया का आधी,

सुरेश तिच्याकडे बघत होता, लीनाने विचारलं काय झालं? त्याने नंतर सांगतो असं खुणावलं

ठीक आहे

लंच ब्रेक मध्ये लीना भेटली,.. "काय झालं सुरेश?",

" तुझ्या मदतीची गरज आहे पण तू प्रियाची मैत्रीण आहे",..सुरेश

"काय झालं आहे सांग ना",.. लीना

" तू प्रियाला सांगून देशील",.. सुरेश

" नाही सांगणार",.. लीना

"तुला माहिती आहे ना प्रिया आणि विकास, दोघांच वेगळ्या ठिकाणी लग्न झालं आहे त्यानंतर काय काय झालं हे सुरेश सांगत होता की कशी प्रिया त्रास देते आहे ",.

" बापरे प्रिया का अशी करते आहे तिचा नवरा तर खूप चांगला आहे",.. लीना

" हो ना तुला पटलं का हे असं, तिकडे विकासच नुकसान होत ",.. सुरेश

"नाही पटलं ",.. लीना

" विकासलाही हे मान्य असतं तर ठीक आहे पण विकासला नको आहे प्रिया सोबत राहण आणि प्रिया त्याला आत्महत्येची धमकी देते आहे म्हणजे हे एकदम चुकीचा आहे",.. सुरेश

" हो ना",..

" मग मदत करणार का थोडी, प्रियाच्या नवऱ्याबद्दल थोडी माहिती हवी होती ",.. सुरेश

" काय करणार आहात तुम्ही? प्रियाचं लग्न नको मोडायला",.. लीना

" नाही ग आम्ही कशाला प्रियाचं लग्न मोडू, ती विकासच्या संसारात ढवळाढवळ करते ते चालतंय का? त्याची बायको माहेरी निघून गेली आहे, विकासला फक्त प्रियापासून पिछा सोडवायचा आहे ",.. सुरेश

" मला तर माहिती नाही तिच्या नवऱ्याचा नंबर पण बघते मी मिळतो आहे का",.. लीना

प्रिया फोनवर तिच्या नवऱ्याशी बोलत होती, तो फोन झाल्यानंतर तिने विकासला फोन लावला,.." आज भेटणार ना मग संध्याकाळी",

विकास कामात होता,.." मी जरा वेळाने फोन करतो ",

"कोणाशी बोलते आहे प्रिया? ",..लीना

विकासला फोन केला होता,

प्रियाला आत मध्ये बोलवलं तिचा फोन तिथेच होता, ती केबिन मध्ये चालली गेली, तिच्या फोनवर विशालचा फोन येत होता, लीना अलर्ट झाली तिने त्या फोनचा नीट फोटो घेतला, बरोबर फोन नंबर मिळाला तिने तो नंबर सुरेशला देऊन टाकला,

"विकास प्रियाच्या नवऱ्याचा फोन नंबर मिळाला आहे",.. सुरेश

"पाठव मला लगेच",.. विकास

सुरेशने फोन नंबर पाठवून दिला, विशाल नाव आहे त्याचं, थोड्या वेळाने प्रियाचा मेसेज आला,.. "आज भेटणार आहे ना विकास संध्याकाळी? ",..

" मी सांगतो जरा वेळाने थोडा बिझी आहे आत्ता",.. विकास

विकास ने विशालला मेसेज केला,.. "मी मला बोलायचं आहे तुमच्याशी थोडंस ",..

"जरा वेळाने विशालचा मेसेज आला,.." कोण बोलत आहे? काय काम आहे? ",

" फोन करू का? ",.. विकास ने विचारलं

ते हो म्हटले..

विकास मी फोन केला,.. "मी प्रियाच्या ऑफिसमधला विकास बोलतो आहे आमचं दोघांची आधीपासून ओळख होती, मी प्रियाला लग्नासाठी विचारल होत, तिने तेव्हा नकार दिला होता, तिने तुमच्याही लग्न केल ",

" म्हणून तुम्ही मला फोन करून अस सांगुन बदला घेत आहात का, प्रिया अशी नाही ",.. विशाल

" नाही अस नाही, अजूनही प्रिया मला खूप त्रास देते, माझं लग्न झालं आहे, ती मला भेटायला बोलवते, मी जर तीला भेटलो नाही तर आत्महत्या करायची धमकी देते, त्यामुळे माझा संसार उध्वस्त झाला आहे, मला प्रियापासून सुटका हवी आहे, काहीही सांगितल तरी ती ऐकत नाही",.. विकास

" काय बोलतात तुम्ही? काहीही.. मला माझ्या बायकोबद्दल अस सांगू नका, मी कस काय विश्वास ठेवायचा तुमच्यावर ",.. विशाल

" दोन दिवसांपूर्वी तिने हाताची नस कापून घेतली होती त्यामुळे ती ऍडमिट होती दवाखान्यात, तिच्या हाताला पट्टी त्यासाठी होती, माझ्याकडे हॉस्पिटलच्या बिलाचा फोटो आहे, तो पण मी पाठवतो तुम्हाला, जर प्रियाला काही झालं तर पोलीस मला पकडतील, मला रिस्क वाटते आहे म्हणून मला तिचा ऐकावं लागतं",.. विकास

विशाल विचार करत होता बरोबर बोलतो आहे हा काय हे अस प्रियाच वागण

" माझ्याकडे तिच्या आणि माझ्या संभाषण पुरावे आहेत, आत्ताही दहा मिनिटांपूर्वी तिचा मला मेसेज आला होता की भेटायला येतोस का? ",..

" ठीक आहे मग आज तुम्ही तिला भेटायला जा आणि मला तिथुन तुमचा दोघांचा फोटो पाठवा आणि तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा की प्रियाच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याला मी जबाबदार नाही",.. विशाल

" ती सदोदित आत्महत्येची धमकी देते, ठीक आहे मी असंच करतो",.. विकासला आता जरा बरं वाटत होतं, त्याने प्रियाला फोन केला की मी येतो आहे तुला संध्याकाळी भेटायला, तो प्रियाला भेटायला गेला त्याने दोघांचे सोबत फोटो काढून घेतले आणि ते विशालला पाठवून दिले

विशालने लगेच प्रियाला फोन केला,.." कुठे आहेस तू?",

" मैत्रिणीबरोबर शॉपिंगला आली आहे",.. प्रिया

"काय काय घेत आहेत",.. विशाल

तिने सांगितलं, सगळ आपल्या घरासाठी घेत आहे सामान

विशालला खूप वाईट वाटलं प्रिया असं करते आहे तर

प्रियाला भेटल्यानंतर विकास रूमवर गेला, तिथून तो आणि आणि सुरेश पोलीस स्टेशनला गेले, प्रियाने काही बरं वाईट केलं तर त्याला जबाबदार मी नाही, ती मला सुद्धा धमक्या देते आहे आणि साक्षीदार म्हणून सुरेशने सही केली, मोबाईलवर आलेले मेसेज तिथे दाखवून दिले, आता एक काम तर झालं, त्याने विशालला कळवल पोलिस कंप्लेंट केली.

🎭 Series Post

View all