तुला नक्की हवं तरी काय? ... भाग 7

विकास ऑफिसला जाण्यासाठी खाली आला तो बघत होता घरात राधा दिसते का? राधा लवकर उठूनच ऑफिसला निघून गेली होती, वर्षाताई चहा घेऊन आली,


तुला नक्की हवं तरी काय? ... भाग 7
........

राज्यस्तरीय करंडक कथा मालिका स्पर्धा

विषय.. कौटुंबिक कथा

उपविषय.. तुला नक्की हवं तरी काय?

©️®️शिल्पा सुतार

नाशिक टीम
...

विकास ऑफिसला जाण्यासाठी खाली आला तो बघत होता घरात राधा दिसते का? राधा लवकर उठूनच ऑफिसला निघून गेली होती, वर्षाताई चहा घेऊन आली,

"राधा कुठे आहे? ",.. विकास

"कशाला हवी आहे तुला आता राधा? ",.. वर्षा

"झाल म्हणजे तुलाही राग आला का माझा ताई ? ",.. विकास

"मग काय करणार , आम्हाला दिसत आहे ना तू कसा वागतो आहे राधाशी, घरच्यांशी, काय प्रॉब्लेम झाला आहे विकास? आई बाबा ही समोर येऊन बसले, का तू तिच्याशी नीट वागत नाही आणि दोन दिवसापासून तू कुठे होता",.. वर्षा

" सांगितलं ना मी की ऑफिस कामासाठी गेलो होतो, तुम्ही असे सगळे माझ्या मागे लागू नका",.. विकास

" तुला समजत आहे का तुझ्या अशा वागण्याचा परिणाम काय होऊ शकतो, राधा किती साधी आणि गरीब मुलगी आहे, तुझ नशीब चांगलं आहे की तुला अशी बायको मिळाली",.. वर्षा

"ताई मला तुला काहीतरी सांगायच आहे मी करतो तुला नंतर फोन ",.. विकास

ठीक आहे..

विकास ऑफिसला निघून गेला, रस्त्यातून त्याने प्रियाला फोन केला, प्रियाने फोन घेतला नाही

कशी असेल प्रियाची तब्येत काय माहिती? काल संध्याकाळपासून तिच्याशी बोलणं झालं नाही, काय करावं जाऊन बघावं का तिच्याकडे, हे अस आत्महत्या वगैरेचा प्रयत्न तिने केला तेव्हा पासून भीती वाटते आहे मला, त्याने ऑफिसमध्ये फोन केला, तिथेही प्रिया आली नव्हती, बरं नसेल तर बहुतेक येणार नाही ती, संध्याकाळी जाऊन बघू आपण तिच्याकडे, तो ऑफिसला आला त्याचा ऑफिसमध्ये मन लागत नव्हतं,

आज प्रिया आणि विशाल फिरायला निघाले, आधी शॉपिंग नंतर मुव्ही, अस मस्त ठरलं होत, संध्याकाळी घरी येणार होते ते,.. "येतांना तुझ्या ताई साठी साडी घेवू या, तिला बघायला पाहुणे येणार आहेत ना",

"किती करताय हो तुम्ही आमच्या साठी",.. प्रिया

"आपल्या साठी प्रिया",. विशाल

संध्याकाळी विकास प्रिया कडे गेला, ती घरी नव्हती, तिची आई दचकली विकासला बघून,.. "कुठे गेली प्रिया, कशी आहे ती? , पर्वा पासून ती फोन घेत नाही माझा ",

" थोड बाहेर गेली आहे ती, तुम्ही अस न सांगता का आलात ",.. आई

" प्रियाला बर नाही ना मग कुठे फिरते आहे ती? ",.. विकास

"थोड ताईच काम आहे, तुम्ही निघा आता, नंतर फोन वर बोला तिच्याशी",.. आई

" थांबतो मी थोड्या वेळ, मला घाई नाही",.. विकास

" नाही नको.. मला ही बाहेर जायच आहे",. आई

" काय झालं आहे अस?, मला टाळता आहेत हे लोक ",. विकास निघाला

संध्याकाळी राधा घरी आली, वर्षा ताई तिच्या घरी गेलेली होती, राधाने स्वयंपाक करून घेतला, सासू सासरे प्रेमाने वागत बोलत होते,

" पोळ्या करायच्या राहू दे राधा मी करते ",.. आई

"नको आई मी करून घेते, नंतर थोड ऑफिसच काम आहे मला",.. राधा

जरा वेळाने विकास आला, राधा खाली बसुन होती ती, वरती गेली नाही, जरा वेळाने जेवण झालं, आवरून झाल राधाने झोपून घेतल, ती आज अजिबात विकासशी बोलली नाही

विकासने रात्री परत एकदा प्रियाला फोन लावून बघितला, तिचा फोन स्विच ऑफ येत होता, त्याने झोपून घेतलं,

सकाळी उठून राधाने बघितले विकासचा फोन तिथेच पडलेला होता, काय करू बघू का मी पटकन हे सारखे कोणाला फोन करतात ? नको असं चांगलं नाही पण दुसऱ्याचा फोन बघण, हे नेहमी कोणाला तरी फोन लावून बघतात आणि समोरचा फोन उचलत नाही,

तिने बघितलं विकास त्या बाजूला तोंड करून झोपलेला होता, तिने फोनला हात लावला पण फोन लॉक होता, जाऊ दे, ती आवरून ऑफिसला आली, आल्या आल्या तिने आधी विकासच्या ऑफिसचं नाव कम्प्युटर मध्ये सर्च केलं, त्याच्या ऑफिसचा फोन नंबर पत्ता लिहून ठेवला, दुपारी फोन करून बघू,

विकास उठला त्याने बघितलं राधा ऑफिसला गेलेली होती , तो तयार झाला खाली आला, चहा घेतला आणि ऑफिसला निघून गेला, जाण्याआधी त्याने प्रियाला फोन लावून बघितला, नेहमीप्रमाणे तिने फोन उचलला नाही,

विशाल आज सकाळीच गावाला निघून गेला, जरा वेळाने आवरून प्रिया ऑफिसला आली, तिने ऑफिस मधून विकासला फोन केला

"कुठे आहेस तू प्रिया दोन दिवसापासून? किती फोन केले मी तुला, कशी आहे तब्येत तुझी? तू आज ऑफिसला ही आलीस का? काल मी तुझ्या घरी आलो होतो तू घरी नव्हती",.. विकास

"हो थोडं काम होतं तिकडे गेली होती",.. प्रिया

"काय काम होतं?",.. विकास

"ताई साठी स्थळ आला आहे ती चौकशी करायला गेली होती, समजलं का आता सगळं, आज संध्याकाळी मला भेटायला येणार का विकास ",.. प्रिया

"नाही प्रिया मी तेच तुला सांगायला फोन केला होता, मला असं वाटतं आहे की आपण आता हे असं भेटण बंद करावं तू दोन दिवस मला भेटते दोन दिवस फोनच उचलत नाही , मला काळजी वाटते तुझी, आपण फेंन्ड्स प्रमाणे राहू नसेल पटत तर आपण न बोललेलंच बरं, आपल दोघांच वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झालं आहे, आपण संसारात प्रामाणिक रहायला हव, मला हे तुझ्याशी लवकरात लवकर क्लीयर करायचं आहे, मला नाही आवडत आता अस चोरून भेटूण",.. विकास

" दोन दिवस बायको सोबत राहिला तर तू मला अस करतो आहेस ना विकास, मी नाही का आता चांगली तीच चांगली आहे का तुझ्या साठी ",. प्रिया

" प्रिया तेच खरं आहे ना शेवटी मला तिच्या सोबत राहायच आहे ना ",.. विकास

" मग लग्न झाल्यावर ही का आला होता तिकडे हॉस्पिटल मध्ये, होवू द्यायच माझ जे व्हायच ते तेव्हा का काळजी वाटली तुला ",.. प्रिया

" तू अ‍ॅडमिट होती म्हणून आलो होतो आपण फ्रेंड्स रहाणार आहोत पण त्या व्यतिरिक्त अस भेटण बरोबर नाही, मला माझ्या बायकोला वेळ द्यायचा आहे, तुझ्या मुळे ती रागावलेली आहे माझ्या वर",.. विकास

" काय बोलतो आहेस तू विकास? हे असं तू करू शकत नाही जर तू मला अस संध्याकाळी भेटायला आला नाही तर मी परत एकदा जीवाचं बरं वाईट करून घेईन या वेळी जास्त त्रास होईल मला अस बघेन मी ",.. प्रिया

" हे असं बोलतात का प्रिया?, तु हुशार आहेस ना, यापुढे असं बोलू नकोस, येईन मी संध्याकाळी तुला भेटायला, तू म्हणतेस तस करू",.. विकास काळजीत होता, कसा काय हिचा पिच्छा सोडवणार मी, हिच्या मुळे मी राधा कडे मुद्दाम दुर्लक्ष करत होतो वाटल हीच प्रकरण आधी पूर्ण मिटवून टाकू नंतर राधा सोबत संसार सुरू करू, आता तिकडे राधा.. घरचे चिडले आहेत, तेव्हा ही अ‍ॅडमिट होती माझ्या मुळे आत्महत्या करत होती म्हणून मी नीट वागलो, भेटायला गेलो, मला राधा सोबत रहायच आहे, ही नको मला, माझा संसार हवा आहे, पण प्रिया ऐकत नाही, कमी जास्त काही करून घेतल तर काय करू मी? संध्याकाळी भेटून समजवून सांगू हिला,

दुपारी राधाने विकासच्या ऑफिसमध्ये फोन करायचा विचार केला, नको त्यांना समजल तर अजून नुकसान होईल ते चिडतील, तिने ज्योतीताईला फोन केला,.. "मी सांगते त्या पत्त्यावर संध्याकाळी ये",

" काय आहे ते",.. ज्योती

"विकासच ऑफिस आहे, बघू आपण कोणी भेटता का, थोडीफार माहिती मिळते का, फोन करायचा विचार केला होता मी, पण काय बोलणार फोन करून",.. राधा

"ठीक आहे मी येते साडेपाच वाजेपर्यंत तिकडे",.. ज्योती

ऑफिस सुटलं विकास ऑफिस मधुन निघाला आणि तो प्रियाला घ्यायला जुन्या ऑफिसच्या बाहेर आला, आज काहीही करून प्रियाला समजून सांगू, की तुझा माझा काही संबंध नाही आता, राधा सोबत रहायच आहे मला, ती छान दिसते साडीत, खूप सुंदर, मी नीट वागणार आहे तिच्याशी, मुद्दाम तिच्या समोर शांत असतो मी, हे प्रिया प्रकरण संपवतो आज, राधा ला सगळं खर सांगेन तिची माफी मागेन, मग सुरू करेल तिच्या बरोबर संसार

इकडे ज्योतीताई राधा ही त्या ऑफिस जवळ आल्या होत्या, त्या ऑफिसच्या समोरच्या कॉफी शॉप मध्ये बसून ऑफिस कडे बघत होत्या, जरा वेळाने ज्योतीताईने राधाला दाखवलं,.. "विकास बघ" ,

" हे काय करत आहे इथे? यांची ट्रान्सफर मेन ऑफिसला झालेली आहे ना, बघ ताई तिथून इथे येतात हे ",. राधा

जरा वेळाने प्रिया बाहेर आली, ती हसून विकासला भेटली राधाने त्या दोघांचे फोटो काढून घेतले, ती विकासच्या गाडीवर मागे बसली, ते पण फोटो राधाने काढले, ते दोघं निघून गेले

आता राधा हिम्मत हरली ती रडायला लागली, ज्योतीताईला ही खूप कसंतरी वाटत होतं

" मला पाठव ते फोटो राधा",.. ज्योती

राधाने सगळे फोटो ज्योती ताईला पाठवले, तिने ते फोटो तिच्या मिस्टरांना पाठवून दिले,.. "राधा तू घरी जा मी बघते काय करायचं ते" .

" काय करणार आहेस ताई?",.. राधा

"आता ते मी आणि हे ठरवू, बघितलं का किती एकमेकाला चिटकून गाडीवर बसून गेले ते दोघं, त्यांच्या आयुष्यात तुला जागा नाही राधा, अजून काहीही झालेलं नाही तू इथून बाहेर पड",.. ज्योती

"पण मी कुठे राहणार? मी तुझ्याकडे येणार नाही ताई",..राधा

" मी बोलते आई-बाबांशी मी येते तुला घ्यायला ",.. ज्योती

राधा घरी आली, तीच डोक दुखत होत, तिने स्वयंपाक करून घेतला

ज्योती घरी आली, ती आणि तिचे मिस्टर आई-बाबांकडे गेले, त्यांना सगळं विकास बद्दल सांगितलं, आई-बाबा खूप काळजीत होते, ताबडतोब जाऊन राधाला घरी घेऊन येऊ, आम्हाला आमची मुलगी जड नाही, आम्ही काय सांभाळणार तिला उलट ती तिच्या पगाराचे पैसे आम्हाला देत होती, चला आता ते चौघ राधाकडे यायला निघाले

विकास प्रिया हॉटेलमध्ये गेले, जेवण झालं,

"प्रिया हे तू मला आत्महत्या करण्याची धमकी देते आहे ना ते धमकी देण बंद कर",.. विकास

"तुला काय वाटत आहे मी खोटं बोलते आहे का विकास, मी खरच करून दाखवेन",.. प्रिया

ही स्वतः तर जाईल मला अडकवेल यात, काय करू मी, फसलो खूप,

"काहीतरी बोलते आहेस तू कधीपासून प्रिया, हे बघ आता आपले लग्न झालं आहे हे असं भेटणं सोबत फिरणं बरोबर नाही",.. विकास

तरी प्रिया ऐकायलाच तयार नव्हती, ती विकास काही बोललं की त्याला उलट बोलत होती काहीतरी, मी नुकसान करून घेईन, मला तु आवडतो, मला तुझ्याबरोबर राहायचं आहे, हे असं आपण संध्याकाळी एक दोन तास तरी भेटू शकतो ना, बरीच गळ घालत होती ती त्याला

विकासला काही सूचत नव्हत, काय आहे हे, काहीतरी आयडिया करावीच लागणार आहे, प्रियापासून सुटका करून घेण्यासाठी, सध्या तरी गप्प राहिलेल बरं राहील

🎭 Series Post

View all