तुला नक्की हवं तरी काय? ... भाग 6

तेच ना त्यांना त्यांच्या बाजूने माझ्याशी कोणतही नात नको आहे, मीच बळजबरी बोलते त्याच उत्तर देतात ते फक्त, एकदाही स्वतःहून माझ्या जवळ आले नाहीत


तुला नक्की हवं तरी काय? ... भाग 6
........

राज्यस्तरीय करंडक कथा मालिका स्पर्धा

विषय.. कौटुंबिक कथा

उपविषय.. तुला नक्की हवं तरी काय?

©️®️शिल्पा सुतार

नाशिक टीम
...

राधा वरती खोलीत गेली, बाबा आई वर्षाकडे बघत होते,

"काय करतोय हा विकास असं काय माहिती? जेवतांना बघितलं ना कसा वागला, आपण किती म्हटलं तेव्हा बोलला की भाजी छान झाली आहे, मला तर काळजी वाटते आहे राधाची, तुटक वागतो हा",... वर्षा

" मलाही खूप काळजी वाटते आहे, चुकलंच की काय माझं विकासला लग्नाची बळजबरी करून, आता तीसचा होईल हा, म्हणून आपल मी बोलत होते लग्न करून घे ",.. आई

"नाही आई काही चुकलं नाही तुझ, विकासने ही होकार दिला होता ना लग्नासाठी, तू उगीच मनाला लावून घेऊ नकोस ",.. वर्षा

" हे असं लग्न केल्यानंतर मुलं सुधारत नसतात, उलट त्यांच्या अश्या वागण्याने बायकोच आयुष्य खराब होत" ,.. बाबा

" हे तुम्ही आता बोलता आहात? तेव्हा मी किती म्हणत होती तुम्हाला की विकासला दोन शब्द सांगा तर नाही ऐकल, तेव्हा त्याला दाबल असत, तुमच लक्ष् नसत घरात",.. आई

" लहान आहे का तो? त्याला तेव्हा मी काही बोलाल असत तर ऐकल असत का त्याने लगेच माझ? नीट वागला असता का तो? काय बोलते आहेस तू? आजही ओरडलो मी त्याला, पण काय झाल,जस वागायच तस वागतो तो ",.. बाबा

" आई बाबा शांत व्हा, आता तुम्ही दोघं सुरू करू नका, मला पण उद्या जावा लागेल माझ्या घरी, मी किती दिवस अस इथे तुमच्या सोबत राहणार? , विकास आणि राधा बघून घेतील त्यांचा संसार आहे, मला वाटत आहे ठीक होईल सगळ",.. वर्षा

ठीक आहे..

विकास काहीतरी लॅपटॉप वर काम करत होता, त्याने मधे दोन-तीनदा प्रियाला फोन लावून बघितला होता, प्रियाने फोन उचलला नाही, कशी आहे तिची तब्येत काय माहिती? संध्याकाळी हॉस्पिटल मधून गेल्यापासून काहीही बोलणं झालेल नाही, काय करत असेल प्रिया ?

प्रियाचे मिस्टर विशाल संध्याकाळी आले होते, नवीन लग्न झालेल्या बायको साठी त्यांनी साडी आणली होती, तिच्या हाताची पट्टी बघून ते घाबरून गेले होते,.. "काय झालं हे प्रिया ?, जास्त आहे का?",

"अहो ठीक आहे मी तुम्ही उगीच एवढी काळजी करता आहात",.. प्रिया

"या पुढे स्वयंपाक करताना काळजी घेत जा प्रिया, नाही तर सरळ कुक लावून घे",.. विशाल

प्रियाची आई बहीण सगळा कौतुक सोहळा बघत होत्या, खूपच छान आहेत जावई, त्यांनी प्रियाच्या बहिणीसाठी स्थळही आणलं होतं, तो मुलगा एक दोन दिवसात तिला बघायला येणार होता, त्यांचा मावस भाऊच होता तो, यांच सारख श्रीमंत स्थळ होत, मुलाचा घटस्फोट झाला होता, प्रियाच्या बहिणीच ही हे दुसर लग्न होत, हे लग्न लवकर होईल अशी आशा प्रियाच्या आईला होती

खूप मोठा स्वयंपाक केला होता प्रियाच्या आईने, सगळे जेवण करायला बसले,.. "आज तुमच्या आवडीची पनीरची भाजी खास प्रियाने केलेली आहे जावईबापू" ,..

विशाल खुश होते आवडीने प्रशंसा करत जेवले, रात्री झोपण्याआधी घर खर्चाला त्यांनी प्रियाच्या आईला पैसे दिले, खूप खुश होती प्रिया,
.....

राधा रूम मधे आली, ती विकास जवळ येऊन बसली, विकासने तिच्याकडे लक्ष दिलं नाही, तो त्याचं त्याचं काम करत होता, काय करू बोलून बघु का यांच्याशी ?, मला सारखा पुढाकार घ्यावा लागतो आहे, ,.. "तुम्ही जाणार आहात का उद्यापासून ऑफिसला? , मी सुद्धा जॉईन होणार आहे उद्यापासून",..

"तो काही बोलला नाही",..

"आपण जॉईन व्हायचं आहे ना की कुठे जायचं आहे बाहेर",.. राधा

"नाही मला नाही जमणार कुठे बाहेर यायला, तू तुझं ऑफिसला जायला सुरुवात कर",.. विकास

जेवढं राधा बोलली तेवढेच उत्तर विकासने दिले, त्याने त्याच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न केला नाही, की तिच्या कडे बघितल नाही

" पुरे झालं काम आता झोपा जरा वेळ",.. राधाने स्वतःहून विचारल, खरं तर या गोष्टी विकासने बोलायला हव्या माझ्याशी, मीच पुढे पुढे करते आहे, कसतरी वाटत अस बोलायला पण काय करणार हे बोलत नाही काही

विकासने तिच्या कडे लक्ष दिलं नाही, तो त्याचं कामच करत राहिला, जरा वेळ तिथे बसून राधा उठली तिने झोपून घेतलं

नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे, उद्या मी विचारणार आहे वर्षा ताईला, मला नाही राहायच इथे, तिने तिच्या बहिणीला मेसेज करून सगळ सांगितल,.. "उद्या मी ऑफिसला जाते आहे, लवकर निघते इथून, मला भेटायला ये सकाळी ज्योती ताई",

"हो येते मी",..

राधा सकाळी लवकर उठली ती स्वयंपाक करायला खाली गेली, वर्षाताई उठलेली होती

" वर्षाताई खरं सांगा मला यांचा काय प्रॉब्लेम आहे? , जर मी आवडतच नव्हती आधीपासून तर कशाला केलं माझ्याशी लग्न? ",.. राधा चिडली होती

"काय झालं काही बोलला का विकास? ",.. वर्षा

" नाही,.. ते काही बोलतच नाही हाच प्रॉब्लेम आहे",.. राधा

"नवीन आहे ग सगळं जरा वेळ दे त्याला",.. वर्षा

"हे उलट मी म्हणायला पाहिजे होतं ना, तर मी स्वतःहून त्यांच्याशी बोलते आहे, ते माझ्याशी बोलतच नाहीत, लग्नाच्या आधी सगळं व्यवस्थित होतं मग असं अचानक काय झालं ",.. राधा

"असेल काही कामाचं प्रेशर, मी बोलते आज त्याच्याशी, मी थोड्या वेळाने माझ्या घरी जाते आहे राधा ",.. वर्षा

" ताई तुम्ही थांबा ना तुमचा आधार आहे मला ",.. राधा

" एवढे दिवस नाही ग थांबता येणार, मी येते ना पुढच्या आठवड्यात तू नीट रहा, धीर धर होईल ग नीट सगळ",.. वर्षा

" ठीक आहे ताई ",.. राधा

आता मलाच बघाव लागेल काय आहे हे प्रकरण, मी शोधून काढेल, तयारी करून राधा ऑफिसला निघून गेली, वेळ होता तिच ऑफिस सुरू व्हायला, पण तिला घरात थांबावस वाटत नव्हतं, ऑफिस जवळच तिला तिची बहीण भेटली, ज्योतीताई दिसल्याबरोबर राधा रडायला लागली

"काय झालं आहे राधा? का रडते आहेस? ",.. ज्योती

"ताई माझी फसवणूक झाली आहे, यांना मी आवडत नाही ते माझ्याशी बोलत नाही",.. राधा

"अग पण आत्ताशी तर चार-पाच दिवस झाले तुमच्या लग्नाला वेळ हवा असेल त्यांना",.. ज्योती

"वेळ हवा असेल तर व्यवस्थित तर वागता येतं ना, ते माझ्याशी खूप फटकून वागतात, माझ्याशी बोलत नाही, माझ्या कडे बघत नाही, उगीच तिथे रहाते मी अस वाटत आहे मला, काही व्यवस्थित नाही",.. राधा

" काय झालं नीट सांग",.. ज्योती

राधा सगळं सांगत होती

" विचित्रपणाच वाटतो आहे हा ",.. ज्योती

" हो ना काय करू मी? घरी पण सांगू शकत नाही, तुला घरची परिस्थिती माहिती आहे, आई बाबा त्यांचं त्यांचं कसं तरी करून खात आहेत ते, आताच लग्न झाल, किती खर्च झाला आणि मी अशी एक आठवड्यात परत माहेरी गेली तर कसं होईल? काय करू ताई मी ",.. राधा

"तुला काय वाटत आहे तुला राहायचं आहे का विकास कडे",.. ज्योती

" हो मला राहायचं आहे त्यांच्याकडे, मला सुखी संसार हवा आहे, पण मी काय करू आणि त्यांचं मन माझ्याकडे कस वळवू ",.. राधा

" काही करू नको तू, त्यांच्याशी काही बोलू नको, घरात व्यवस्थित रहा, भरपूर काम कर, दिसेल त्यांना एक दिवस तरी तू व्यवस्थित वागते आहे ते",.. ज्योती

" तेच करावं लागणार आहे ताई, मला माहेरी वापस जाता येणार नाही, आई-बाबांना धक्का बसेल, मी खुश आहे असच दाखवावं लागेल त्यांना, पण किती दिवस असं",.. राधा

" बघ थोडं महिना पंधरा दिवस, तेवढ्या वेळ पुरे आहे विकास साठी नाॅर्मल व्हायला, घरचे कसे आहेत बाकीचे सासू-सासरे नणंद ",.. ज्योती

" ते चांगले आहेत खूप, पण हे विकासच का असे करत आहे? मला तर माझीच काळजी वाटते आहे जर हे माझ्याशी कधीच नाही बोलले तर ",.. राधा

"असं काही नाही होणार राधा, एवढी काळजी करू नको, माझ्याकडे येते का? नाही तर निघून ये इकडे सगळं सामान घेऊन, आपण सावकाश सांगू आई-बाबांना",.. ज्योती

"नको ताई मला माहिती आहे तू माझ्या काळजीपोटी करते आहेस हे सगळं, मी राहील तिकडेच माझ्या सासरी, तुझा ही संसार आहे, जिजु काय म्हणतील? ",.. राधा

" काही प्रॉब्लेम नाही ग यांचा, तुला माहिती आहे सपोर्ट करतात हे ",.. ज्योती

" हो जिजु खूप चांगले आहेत",.. राधा

"काहीच बोलले नाही का तुझ्याशी विकास? ",.. ज्योती

" नाही ना,.. एकदा दोनदा ओरडले फक्त, खूप तुटक वागतात ",.. राधा

" कशावरनं? ",.. ज्योती

" घर कामावरून आणि त्यांना त्यांच्या घरचे काहीतरी बोलले असतील तर त्यांना वाटलं की मी त्यांच नाव घरच्यांना सांगितलं",.. राधा

" चिडका आहे का स्वभाव? ",.. ज्योती

" काहीच समजलं नाही, मी जेव्हा पासून घरी आली ते घरातच नाहीत, जेव्हा बोलतात तेव्हा फक्त मला ओरडतात, अस असतो का नवीन जोडप्यांचा संसार? ",.. राधा

"नाही असा नसतो, तुम्ही सोबत नाही रहात का?",.. ज्योती

"एकाच खोलीत आहोत पण ते सोफ्यावर झोपतात, मी कॉटवर ",..राधा

" बापरे कठीण सुरू आहे",.. ज्योती

" तेच ना त्यांना त्यांच्या बाजूने माझ्याशी कोणतही नात नको आहे, मीच बळजबरी बोलते त्याच उत्तर देतात ते फक्त, एकदाही स्वतःहून माझ्या जवळ आले नाहीत ते की कसल कौतुक नाही त्यांना माझ ",.. राधा

" काही प्रेम प्रकरण आहे का त्यांच बाहेर ",. ज्योती

"हो बहुतेक, नाही तर का अस करतील ते मला ",.. राधा

दोघींनी चहा घेतला

" हे बघ राधा अजिबात काळजी करू नको, अगदी उद्या जरी तुला माझ्याकडे यायचं असेल तर निघून ये, आपण बघू आई-बाबांचं काय आहे ते, मी सांगते तुझ्या जिजाजींना, उद्या करते मी तुला फोन",.. ज्योती

" ताई होईल ना ग नीट सगळ, मला विकास सोबत रहायच आहे ",.. राधा

"हो होईल राधा",.. ज्योती ताईच्या डोळ्यात पाणी होत

राधा ऑफिस मध्ये आली, तिचं कामांमध्ये मन लागत नव्हतं, मैत्रिणी खूप चिडवत होत्या, राधा रिस्पॉन्स देत नव्हती, त्यावरून त्यांना समजलं की काहीतरी गडबड आहे, त्या गप्प बसल्या, सर आले, ऑफिस कामात त्या बिझी झाल्या...

🎭 Series Post

View all