तुला नक्की हवं तरी काय? ... भाग 4

सकाळी उठून तयारी करून विकास बाहेर निघून गेला, राधा उठून त्याच्या कडे बघत होती, काहीही बोलला नाही तो तिच्याशी


तुला नक्की हवं तरी काय? ... भाग 4
........

राज्यस्तरीय करंडक कथा मालिका स्पर्धा

विषय.. कौटुंबिक कथा

उपविषय.. तुला नक्की हवं तरी काय?

©️®️शिल्पा सुतार

नाशिक टीम
...

विकासच्या फोनवर ऑफिस मधून खूप फोन येत होते त्याने फोन उचलला त्या बाजूने प्रिया होती

"तू माझा नंबर ब्लॉक केला आहे का विकास? ",. प्रिया

"कोण बोलत आहे",.. विकास

"मी प्रिया ",..

विकास फोन घेवून बाहेर गेला

"हो केला आहे तुझा नंबर ब्लॉक, आता काय काम आहे तुला माझ्याशी? झाल ना तुझ्या मना प्रमाणे तुझ लग्न श्रीमंत मोठ्या ऑफिसरशी, मग आता काय? ऑफिसच काही काम असेल तर बोल, नाहीतर आपला काही संबध नाही, काही बोलू नको तू माझ्याशी",.. विकास

तशी प्रिया रडायला लागली.. "अस का करतोस विकास किती तोडून बोलतोस ",

" काय करणार मग मी, तू वागली तशी, काय झालं आहे प्रिया?",.. विकास

"माझ्याकडून खूप मोठी चूक झाली विकास मी हे लग्न नव्हतं करायला पाहिजे",.. प्रिया

" झाल आहे ना आता तुझं लग्न प्रिया, आता कशाला त्या गोष्टीबद्दल बोलते, तुझंही लग्न झालं आहे आणि माझंही लग्न झालं आहे, आता जर शक्य असेल तर मला फोन करू नको, माझ्यापासून लांब थांब",.. विकास

"एक मिनिट विकास मला बोलायचं आहे तुझ्याशी काय झालं आहे अजून एवढं? लग्नच झालं आहे ना, ते तुझेही झालं आहे आणि माझंही झालं आहे, जसं चाललं आहे तसं चालू देऊ पण आपण, आपले संबंध नको खराब करायला",.. प्रिया

" म्हणजे? ",.. विकास

" म्हणजे मला तुझ्या सोबत राहायचं आहे विकास तुझ्यासोबत जो मला मानसिक आधार होता तो आता मला मिळत नाही, मला तुझी खूप आठवण येते ",.. प्रिया

" ते आधी समजत नव्हत का, मूर्खासारख काही बोलू नकोस, माझ्याशी बोलू नको या पुढे, तुझा माझा काहीही संबंध नाही, म्हणजे तुला तुझ्या नवर्‍या सोबत राहायच आहे, तो गावाला गेला की मी हवा आहे, शी किती घाण विचार आहेत तुझे ",.. विकास

" विकास प्लीज, माझ प्रेम आहे तुझ्यावर, अस का बोलतोस मला, माझी काही मजबुरी होती म्हणून मी लग्न केल ",.. प्रिया

" काय होती ती मजबुरी, तुला सर्वसामान्य मी नको होतो माहिती आहे मला",. विकास

" नाही अस नाहिये ",.. प्रिया

"लग्न केल ना मग नीट निभावून दाखव, माझ्या मागे येवू नकोस",.. विकास

" तू माझ्याशी बोलला नाही तर मी जिवाच काही तरी बर वाईट करून घेईन ",.. प्रिया

"काहीही कर फक्त माझ्याशी बोलू नकोस",.. विकासने फोन ठेवून दिला, तो डोक धरून बसला होता, काय आता हे प्रियाच? आधी इतके वर्ष बोलत होतो मी लग्न कर माझ्याशी तेव्हा नाही म्हणत होती, आता रडते आहे त्रासात असेल का ती? , तो खूप काळजीत होता,

दोन तास झाले असतिल परत विकासच्या फोन वर फोन आला की प्रियाने आत्महत्येचा प्रयत्न केला, तीला ऑफिस मधून डायरेक्ट हॉस्पिटल मधे नेल, तू लवकर ये, ती तुझ नाव घेते आहे सारख

विकास हॉस्पिटल मध्ये पोहोचला, प्रियाची आई बहिण बाहेर बसलेल्या होत्या, विकासला बघून त्या रडायला लागल्या,.. "बघा काय झालं आहे प्रियाला? जरा तिला आधार द्या",

"तिचा नवरा नाही का इथे?",.. विकास

" त्यांची बदली दुसऱ्या गावात असते पंधरा दिवसातुन एकदा येतात, ते सरकारी ऑफिसर आहेत त्यांच काम असंच असतं, नेहमी बदली होत रहाते",.. आई

विकास आत गेला, प्रिया झोपलेली होती तो तिच्या जवळ जाऊन बसला, प्रिया त्याला बघून खूप रडायला लागली, एकदमच गळ्यातच पडली, विकासलाही कसं तरी वाटत होतं, या आधी त्याचही खूप प्रेम होत तिच्यावर, खूप समजवत होता तो तिला,.." अस करतात का वेडे पणा, जरा विचार करून वागता येत नाही का",

"तू कसा तुटक वागतो मग माझ्याशी विकास ते मला सहन होत नाही",.. प्रिया

"या पुढे अस काहीही करणार नाहीस तू ",.. विकास

हो.

नर्स आत मध्ये आली ते दोघे बाजूला झाले, ती प्रियाला औषध देत होती, प्रिया औषध घेतच नव्हती, शेवटी विकासच्या हातून तिने औषध घेतलं.

"मी डॉक्टरांना भेटून येतो" ,.. विकास

"लवकर ये विकास ",.. प्रिया

"कशी आहे तब्येत आता प्रियाची डॉक्टर?",.. विकास

"आऊट ऑफ डेंजर आहे, हाताला थोडा कट करुन घेतला होता त्यांनी विशेष काही नव्हत झाल, पण एवढा कसला मानसिक धक्का बसला आहे त्यांना, यापुढे त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे, सुसाईड टेंडन्सी आहे वाटतं",.. डॉक्टर

" नाही प्रिया खूप बोल्ड आहे, अशी घाबरट नाही मग का केल असेल तिने अस? ",.. विकास

" सांगता येत नाही एखादी गोष्ट मिळविण्यासाठी ही कधी कधी काही पेशंट अस करतात ",.. डॉक्टर

" तुम्ही काहीच काळजी करू नका डॉक्टर मी लक्ष देईल",.. विकास

विकास विचार करत होता, प्रिया कडे लक्ष द्याव लागेल तिला काही होता कामा नये,

विकास बाहेर येऊन बसला तो प्रियाच्या आई आणि बहिणीशी व्यवस्थित बोलत होता, प्रियाची बरीच माहिती मिळाली त्याला, तिच्या नवऱ्याचा नाव वगैरे काहीही समजल नाही त्याला, करू चौकशी हळु हळु

त्याच्या फोनवर घरून खूप फोन येत होते,.. "कुठे आहे विकास तू? अरे आपल्याला राधाला घ्यायला जायचं आहे ना",

अरे बापरे मी तर विसरूनच गेलो होतो राधा बद्दल, पण मला इथून लगेच निघता येणार नाही, प्रिया कडे लक्ष द्याव लागेल,

" ताई तू आणि जिजाजी जाऊन या ना राधाकडे जर तिला तिकडे आईकडे राहायचं असेल थोडे दिवस तर राहू द्या",..

" काय बोलतो आहेस तू विकास? नक्की कुठे आहेस तू",.. वर्षा

"ताई मी ऑफिसच्या कामानिमित्त जरा बिझी आहे मला उशीर होईल घरी यायला",.. विकासने फोन कट केला

काय चाललं आहे नक्की विकासच? समजायला मार्ग नाही, वर्षा काळजी करत होती,

" कुठे आहे ग विकास? ",.. आई विचारत होती

" ऑफिस कामानिमित्त बाहेर गेला आहे असं सांगतो आहे बाकी माहिती नाही",.. वर्षा

" काय चाललं आहे याचं नेमकं? ",.. आई आणि वर्षाताई दोघींना काळजी वाटत होती

वर्षा आणि जीजू जाऊन राधाला घरी घेऊन आले, राधा सगळीकडे कडे बघत होती कुठे विकास दिसत नव्हता, कुठे गेले हे? मलाही काही फोन नाही काही नाही, लग्नाच्या दोन-तीन दिवस झाले, बायको आपली घरी आली तरी घरात नाहीत हे, कोणाला विचारणार पण

वर्षाताई आत मध्ये आली,.. "राधा तू कपडे बदलून घे आरामात रहा ड्रेस घातला तरी चालेल",

"ताई हे कुठे गेले आहेत?",.. राधा

"अगं त्याच्या ऑफिसमध्ये त्याला अर्जंट काम आलं म्हणून तो बाहेर गेलेला आहे, आता येईलच, तू तो पर्यंत छान तयार हो, येईलच विकास ",.. वर्षा

सगळ्यांच जेवण झाल, अजूनही विकास आलेला नव्हता

प्रियाच जेवण झाल,

" मी निघतो आता प्रिया, उद्या सकाळी येईन, काळजी करू नकोस ",.. विकास

ठीक आहे

तो रात्री उशिरा घरी आला

" कुठे गेला होता तू विकास? दिवसभर घरी नव्हतास, काय हे वागण? , राधा विचारते आहे तुझ्या बद्दल, तुझ्या अंगाचा असा दवाखान्यासारखा का वास येतो आहे ",.. वर्षा

" बाहेर होतो जरा एका मित्राला ॲडमिट केलं होतं तिकडे गेलो होतो",.. विकास

"चल जेवून घे आणि राधाच्या खोलीत जा वाट बघत असेल ती ",.. वर्षा

मी राधाच विसरूनच गेलो होतो, आज दिवसभर प्रिया सोबत होती तर खूप छान वाटत होतं, काय कराव? लग्नाची घाईच केली की काय?

त्याच जेवण झालं तो खोलीत गेला, साध्या पण छान सजवलेल्या खोलीत राधा तयार होऊन बसलेली होती,

अरे काय आहे हे? मला वेळ हवा आहे, राधा सोबत मी राहू शकत नाही, हिच्या अपेक्षा असतिल माझ्या कडून रोमॅन्टिक वगैरे वागण्याचा,

राधा खुश होती, चला उशिरा का होई ना आलेत हे, मी चांगली तर दिसते ना,

तो जावून राधा जवळ बसला,... "काय आहे हे राधा, मला अजिबात आवडत नाही ही सजावट, उठ आधी आवर हे फुल मेणबत्त्या",

राधा उठली, तिने सगळं खोली साफ केली, व्यवस्थित आवरत होती ती, तोपर्यंत बाजूच्या सोफ्यावर चादर आणि उशी घेऊन विकासने झोपून घेतल

अरे काय आहे हे? तिने तिचा ड्रेस कपाटातून घेतला, साडी बदलली आणि ती पण झोपून विकास कडे बघत होती..
आता तर कालपर्यंत नीट होते हे, आज काय झालं आहे? माझ्याशी थोडं सुद्धा बोलले नाहीत, त्यांना काहीही आवडलं नाही माझी तयारी वगैरे, प्रेमाचे दोन शब्दही बोलले नाहीत, ती विचार करत होती काय झालं आहे यांना? कुठे होते हे दिवसभर? , खरंच शांत आहेत हे की काही प्रॉब्लेम आहे यांचा? काय करावं?

सकाळी उठून तयारी करून विकास बाहेर निघून गेला, राधा उठून त्याच्या कडे बघत होती, काहीही बोलला नाही तो तिच्याशी

राधा काळजी करत होती,.. मी ऑफिस मधून सुट्टी घेतली आहे काय करू आता इथे बसुन, हे का अस करता आहेत? घरात सगळे बोलत होते फिरायला वगैरे जाणार तर लागतील सुट्ट्या, इथे नवरा घरात नाही, बोलत नाही माझ्याशी, काय करणार, तिच्या डोळ्यात पाणी होत

वर्षा ताई आत आली तिने बघितला राधाच तोंड उतरल होत,.. "अग त्याच्या बॉसने अर्जंट काम सांगितल त्याला, येईल बघ लवकर घरी तो, खूप काळजी करू नकोस, फिरायला कुठे जाताय तुम्ही",

"आमच अस काही बोलण झाल नाही ताई",.. राधा

"आज विकास आला की ठरवा, काळजी करू नकोस ग",.. वर्षा


🎭 Series Post

View all