तुला नक्की हवं तरी काय? ... भाग 3

विकास कडे पाहुण्यांची गर्दी झाली होती वर्षाताई जीजू आई बाबा सगळेच खुशीत होते विकासही खुश होता पण त्याला मध्येच राहून राहून असं वाटत होतं



तुला नक्की हवं तरी काय? ... भाग 3
........

राज्यस्तरीय करंडक कथा मालिका स्पर्धा

विषय.. कौटुंबिक कथा

उपविषय.. तुला नक्की हवं तरी काय?

©️®️शिल्पा सुतार

नाशिक टीम
...

राधा ऑफिस मध्ये आली,.. "काय करू करून बघू का आता फोन यांना ? नको लंच ब्रेक मध्ये करते",.. ती काम करत होती

विकास ऑफिसला आला प्रियाची जागा रिकामी होती, पुढचे पंधरा दिवस ती येणार नव्हती

विकास खूपच चिडलेला होता, सगळ्या ऑफिसमध्ये समजलं होतं की प्रियाचं लग्न आहे, सगळ्यांना हे पण माहिती होतं की विकास आणि प्रियाचं प्रेम प्रकरण होत, त्यामुळे जास्तच कसतरी वाटत होतं, विकासला खूप अपमान झाल्यासारखं वाटत होतं, प्रियाने काही सांगितल नाही, असा धोका दिला.

लंच ब्रेक मध्येही त्याला त्याचे मित्र विचारत होते.. "काय भांडण झालं का तुमच?, अचानक ब्रेक अप झाल",

" मला काहीही माहिती नाही का केलं प्रियाने असं, मला बोलायच नाही या विषयावर",.. विकास नाराज होता.

जेवण झालं, त्याच्या फोनवर फोन आला, कोणाचा नंबर आहे हा? त्याने फोन उचलला नाही, परत लगेच फोन आला, डबल फोन आला म्हणजे काहीतरी काम असेल, त्याने फोन उचलला,

"मी राधा बोलते आहे",..

विकास काही बोलला नाही..

" आपल्यात अजून काहीही बोलणं झालं नाही तरी तुमच्या बाजूने होकार आला म्हणून मी आज तुमच्याशी बोलायला हा फोन केला आहे, तुम्ही काय विचार करून मला होकार दिला?",.. राधा

" मला हे लग्न करायला काहीही प्रॉब्लेम नाही, माझ्या घरच्यांनी तुला पसंत केलं म्हणून मी होकार दिला ",.. विकास

" फक्त घरच्यांनी पसंत केल्यामुळे होकार दिला का? तुमचं काय मत आहे माझ्या बद्दल आपल्याला सोबत रहायच आहे ",.. राधा

"मला तुझ्याशी लग्न करायला काही प्रॉब्लेम नाही, तुला जर काही प्रॉब्लेम असेल तर तू नकार दिला तरी माझी काही हरकत नाही",.. विकास

"नाही माझी काही हरकत नाही मलाही हे स्थळ पसंत आहे",.. राधा

तिला विकास बोलतांना प्रामाणिक वाटला, राधाने घरी जाऊन आई-वडिलांना होकार सांगितला, मनातनं तिला खूप छान वाटत होतं, चांगला वाटतो आहे मुलगा, पण खूपच शांत आहे, असतो एकेकाचा स्वभाव सांभाळून घेऊ आपण, लग्न झालं की बोलतील मोकळेपणाने,

तिला वाटलं होतं विकास तिला रात्री फोन करेल, पण विकासचा फोन आला नाही, ताईचं लग्न जमलं होतं तेव्हा जिजाजी दर दोन तासाने तिला फोन करत होते, अगदी कंटाळून गेली होती ती गप्पा मारून, जाऊदे यांचा स्वभाव शांत दिसतो आहे, आपण अगदीच कम्पॅरिझन नको करायला, प्रत्येकाचा आयुष्य वेगळं असत,

विकास विचार करत होता, आपण राधाच आयुष्य खराब करतो आहे, मला तिच्या सोबत लगेच माझ आयुष्य सुरु करता येणार नाही, अजूनही माझ्या मनात प्रिया आहे त्या जागी राधाचा विचार करायला मला जड जात आहे, काय करू? आज फोन आला तेव्हा किती छान बोलत होती राधा, तो जेवताना शांत होता,

"काय झालं आहे विकास?",.. आई

"आई एकदा तुम्ही राधाला विचारून घ्या ना लग्नाच मला चांगल वाटत नाही, मी तीच आयुष्य खराब करतोय अस वाटतय",.. विकास

"अस काही नाही विकास होईल सगळ नीट, तुला हा निर्णय घ्यायला पाहिजे, आयुष्यात पुढे जायला हव, किती दिवस अस नकार देत राहणार चांगल्या मुलींना ",.. आई

ठीक आहे आई.... या पुढे मी राधाशी प्रामाणिक राहील, मला संसार नीट सुखाने करायचा आहे ,

आज लग्नाची बोलणी करायला येणार होते मुलाकडचे विकास आला नाही, ऑफिस मधे महत्वाची मीटिंग होती, राधाचा थोडा हिरमोड झाला, ठीक आहे, असेल काहीतरी काम, तारीख काढली, ज्याने त्याने आपली खरेदी करायची होती,

एवढ्या दिवसात एकदाही विकासचा स्वतःहून फोन आला नव्हता, राधाने स्वतः एक दोनदा केला होता फोन, तेव्हा व्यवस्थित बोलला होता तो, ठीक आहे, बघू पुढे, राधा ला चांगल होईल याची आशा होती,

प्रियाच लग्न झालं ऑफिस मध्ये बातमी येवून पोहोचली विकास खूप दुःखी होता, त्या दिवशी तो खूप उशिरा पर्यंत हॉटेल मध्ये बसुन होता, खूप इमोशनल झाला होता तो त्याच्या मित्राशी बोलत बसला तो जरा वेळाने घरी आला आई बाबा काळजीत होते

"काय चाललय याच आता लग्न जवळ आल याच वागण अस, नंतर अस केल तर काय करेल ती मुलगी",..

त्या दिवशी त्याने पहिल्यांदा राधाला फोन केला, राधा झोपणार होती अगदी आश्चर्याने तिने फोन उचलला

"विकास बोलतो आहे मी",..

बोला

"थोड बोलायच होत" ,.. विकास

बोला ना

"उद्या भेटता येईल का संध्याकाळी ",.. विकास

दोघांच ऑफिस एका बाजूला होते

ठीक आहे

" संध्याकाळी कॉफीसाठी भेटू",.. विकास

राधाला खूप धडधड होत होती, आज पहिल्यांदा विकासच्या बाजूने काहीतरी बोलणं झालं होतं आणि ते पण डायरेक्ट भेटायला बोलवत होते, त्यामुळे तीला समजत नव्हतं काय कराव? खूप खुश होती ती, इतके दिवस विकास बोलत नव्हते काही, आता सगळं काही नीट होईल असं वाटत होतं तिला

आज ऑफिसला जातांना विशेष तयारी केली होती तिने, कॉटनचा गुलाबी ड्रेस नवीन होता तो घातला, आई बघत होती,.. "काय विशेष आज राधा? खुश दिसते आहेस ",

"आई आज विकास येणार आहेत मला भेटायला" ,.. राधा

"चला बर झालं",.. आई

ऑफिस मध्ये राधाच मन नव्हत केव्हा संध्याकाळ होईल मी विकास भेटेल अस झाल होत तिला, संध्याकाळी ती कॉफी शॉप मध्ये बसली होती विकास आला तो उदास दिसत होता

राधा खुश होती, विकासला बघून ति लाजली होती, विकास बघत होता आज छान दिसते आहे राधा, किती भोळी आहे ही, आज मी हिला सगळं प्रिया बद्दल सांगणार होतो, काय करू सांगू की नको? नको सांगायला आता आपल्याला राधाचं मन जपायला पाहिजे, अजून लग्न झालं नाही, तिला जास्त समजलं आणि तिने घरी सांगितलं तर आपले लग्न मोडू शकत, आई बाबांना धक्का बसेल नको अस करायला, त्यांने प्रिया बद्दल काहीही राधाला सांगितलं नाही, बराच वेळ ते दोघं बोलत होते, एकमेकांची आवड निवड विचारली

" तुम्ही मला अजिबातच फोन करत नाही",.. राधा

" थोडं ऑफिसचं काम जास्त आहे माझ्यामागे, यापुढे अशी चूक होणार नाही मी फोन करत जाईन",.. विकासने असं माघार घेतल्यानंतर राधाला खूप छान वाटत होतं, माझ्यासाठी हे बोलत आहेत असं, घरी जाताना पण विकासने राधाला घरी सोडला आणि मग तो घरी गेला

राधा खूपच खुश होती प्रत्येकाशी ती विकास बद्दलच बोलत होती तिने लगेच ज्योती ताईला फोन केला तिला सगळं सांगितलं कुठे भेटले काय बोलले

" बघ मी म्हणत होती ना राधा चांगले आहेत विकास, जरा दम धरत जा तू",.. ज्योती ताई

"हो ताई बर झाल मी तुझा ऐकलं",.. राधा

विकास घरी आला लगेच ऑफिस मधून त्यांच्या मॅनेजरचा फोन आला,.. "तुला मेन ब्रांचला ट्रान्सफर हवी आहे का? प्रमोशन देतो काम थोडं जास्त असेल",

विकासने होकार दिला

" उद्या ऑफिसमध्ये आल्यावर बोलू आपण ",..

ठीक आहे, थँक्यू सर..

" मी तुझं नाव देतो पुढे",..

विकासने ही आनंदाची बातमी घरी दिली, राधालाही मेसेज पाठवून दिला, घरचे सगळे खुश होते, विकासच लग्न जमलं त्यात प्रमोशन मेन म्हणजे प्रिया ज्या ऑफिसमध्ये होती त्या ऑफिस पासून दूर विकास ऑफिस होतं हे आता घरच्यांना फार बरं वाटत होतं, विकास दुसऱ्या ऑफिसला जॉईन झाला तिथे त्याचं काम अगदी जोरात सुरू झालं,

लग्नाची बरीचशी खरेदी झाली होती, आठ दिवसातच लग्न होतं, राधा खूप खुश होती, आता बऱ्यापैकी थोडं तरी विकास तिच्याशी बोलत होता,

विकास आज ऑफिस मध्ये आला, उद्या पासून दहा दिवसासाठी त्याने सुट्टी घेतली होती, लग्नाचे प्रोग्राम सुरु होणार होते, या ऑफिस मधे छान सुरु होत त्याच काम, त्याच्या फोन वाजत होता त्याने बघितल प्रियाचा फोन होता त्याने कट केला

थोड्या वेळाने परत फोन आला,.. काय कराव? त्याने फोन कट केला आणि प्रियाला ब्लॉक केलं आणि तो त्याचा त्याचं काम करत होता, संध्याकाळी वेळ झाली आणि तो घरी निघून आला

लग्नानंतर आठ एक दिवसातच प्रिया ऑफिसला जॉईन झाली होती, तोपर्यंत तिला माहिती तिला माहिती नव्हतं की विकासला प्रमोशन मिळाला आहे, ति त्याला ऑफिसमध्ये शोधत होती नंतर तिला समजलं की विकास मेन ब्रांच लगेच जॉईन झालेला आहे

विकास कडे पाहुण्यांची गर्दी झाली होती वर्षाताई जीजू आई बाबा सगळेच खुशीत होते विकासही खुश होता पण त्याला मध्येच राहून राहून असं वाटत होतं की प्रियाने का फोन केला असेल? आपण आज तिचा फोन उचलला नाही, जाऊदे पण आता प्रियापासून शक्य तेवढं लांब राहिलेलंच बरं राहील,

राधाकडे ही लग्नाची सगळी तयारी झाली होती ज्योतीताई मदतीला खूप पुढे होती तिच्या पण सासरचे लोक आलेले होते दोघी बाजूला लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले पार्लर वाल्या ताईकडून खूप सुंदर मेहंदी राधाने हातावर काढून घेतली होती हळद लागली त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी लग्न होतं

साध्या आणि छान पद्धतीने लग्न झालं राधाला सासरी जायची वेळ झाली तिच्या डोळ्यात पाणी होतं आई ज्योतीताई सगळे समजवत होत्या, खूप खुश रहा राधा.. विकास शांत आणि चांगले आहेत एक लक्षात ठेव की तुला त्यांना समजून घ्यायचं आहे, ते अबोल आहेत तुलाच बोलावं लागेल, छान आपल समजून संसार कर, प्रेमाने रहा घरातल्या लोकांसोबत, प्रेम दिल तर प्रेम मिळत समोरून,

राधा सासरी आली पूर्णवेळ ती वर्षाताई सोबतच होती दुसऱ्या दिवशी लगेच सत्यनारायणाची पूजा झाली नवरदेव नवरी देवाला जाऊन आले राधाच्या घरचे तिला घ्यायला आले होते राधा माहेरी गेली.

🎭 Series Post

View all