Jan 26, 2022
स्पर्धा

तुला कळणार नाही

Read Later
तुला कळणार नाही

अमर आणि मीराचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच पाहुणे मंडळी गेली आणि नव्याची नवलाई संपली.. त्यांच्या घरी भरपूर श्रीमंती होती. अमरला चांगली नोकरी होती.. लग्नानंतर मीरा आपले पूर्ण लक्ष संसाराकडे वळवून घेतले. ती फक्त काम करत होती.. थोड्या दिवसाने मीराला दिवस गेले. आता तर ती पूर्णपणे संसारात रमून गेली.. मीरा शिकलेली होती. तिने नोकरीला महत्व न देता आपल्या मुलाबाळांकडे दिले आणि संसाराकडे लक्ष दिले. मुले आता मोठी झाली होती.

असेच एकदा अमरला एक महत्त्वाची फाइल सापडत नव्हती. मीराने त्याला विचारले, "काय हवे आहे?"

अमर, "एक महत्त्वाची फाइल सापडत नाही शोधतोय."

मीरा "कोणती फाइल?"

अमर तिच्या अंगावर एकदम ओरडला "तुला काय कळणार नाही त्यातलं? एखादी वस्तू ठेवली वेंधळ्यासारखं की ठेवून द्यायचं. व्यवस्थित ठेवायला येत नाही?"

मीराला वाईट वाटले ती काही बोलली नाही.

आणखी थोड्या दिवसानंतर अमरला कोणतेतरी टेन्शन आलं होतं? आता तो ऑफिसचं काम घरी सुद्धा करू लागला.

मीराने विचारले, "इतके काय टेन्शन आहे?"

तो पुन्हा तिला ओरडला "तुला काय कळणार आहे का त्यातलं? आणि कामाच म्हणलं तर तू काय मला सोल्यूशन देणार? तुमची जागा ही फक्त चूल आणि मूलच आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टी कळणार आहेत आणि त्यातल्या? आणि बायकांना येतं तरी काय?" असे म्हणून तो निघून गेला. असे बर्याच वेळा होत असे..

एक दिवस तिचा मुलगा लॅपटॉप वर काहीतरी प्रोजेक्ट करत होता.. त्यावेळी मीरा त्याच्याजवळ जाऊन बसली आणि "काय करतोस बाळ??" म्हणाली..

"आई तुला त्यातलं काही कळणार नाही.." असे बोलला..

आता मात्र ती पूर्णपणे कोलमडून गेली.. कारण इतके दिवस नवरा म्हणत होता आता मुलगा पण तसेच म्हणत आहे..

"खरंच मला काही कळत नाही का?? जर मला काही कळतच नसेल तर माझा काय उपयोग?? मी कोणत्याही कामाची नाही तर मला जगण्याचाही हक्क नाही.." असे एक नाही अनेक प्रश्न तिच्या मनात चालू असतात..

एक दिवस मीराची मैत्रीण आली होती.. ती पण एका टेक्नाॅलाॅजी विषयी बोलत होती.. तेव्हा मीरा काहीच बोलली नाही.. ती मैत्रीण म्हणाली "तुला त्याबद्दल काहीच माहिती नाही.."

तेव्हा मीरा शांतच शून्यात नजर लावून बसलेली असते.. मग ती मैत्रीण मीराशी आपुलकीने बोलून सगळं जाणून घेते.. मग मीरा तिच्याकडे घडलेली हकीकत शेअर करते..

त्यावेळी मीराची मैत्रीण तिला म्हणाली, "अगं त्याच ऐकून का घेतलेस? आणि तू काही करत का नाहीस?"

मीरा म्हणाली, "आता काय करणार आहे. मुले थोडी मोठी झाली आहेत. पण आता मी काय करू? कॉलेज होऊनही इतकी वर्षे झालेली आहेत आणि इतका वर्षाचा मध्ये ग्याप आहे. आता काय करू शकणार आहे?"

मीराची मैत्रीण "अग तू आधी फॅशन डिझायनिंग खूप सुंदर करायचीस. तुला कॉलेजमध्ये असताना मी पाहिले आहे. मग त्याचा काहीतरी उपयोग कर ना"

मीरा म्हणाली "आता काय करणार आहे मी?"

"एक काम कर मला पेपरवर काढून दे. एका कंपनीमध्ये बघूया काय होते ते" असे म्हणून मीराची मैत्रिणी ते सगळे पेपर्स घेऊन एका कंपनीमध्ये सबमिट करते. थोड्या दिवसांनी मीराला मेसेज येतो की तिचे डिझाइन्स कंपनीला खूप आवडलेले आहेत आणि त्यांना आणखीन डिझाईन्स हवे आहेत. त्याबद्दल ते चांगली सॅलरी सुद्धा देतो असे म्हणाले. मीरा खूप खुश झाली आणि परत कामाला लागली.

असेच काही महिने गेल्यानंतर एकदा तिचा नवरा अमर काहीतरी काम करत असताना त्याचा असिस्टंट तेथे आला. तो अमरला काहीतरी सांगू लागला आणि अमरला आता टेन्शन आलं होतं. "काय झाले आहे." मीरा.

"तुला काय कळणार आहे का त्यातल? तुला काय येते काय कधी?" असे म्हणाला. तेव्हा ती सरळ जाऊन असिस्टंट ला विचारते. असिस्टंटने सांगितले की परवाच रॉ मटेरियल घेतला आहे. त्याचा पेमेंट करून झालेला आहे आणि आता टेंडर पास करण्यासाठी दहा लाख रुपये भरायचे आहे. त्यातील थोड्या पैशांची सोय झालेली आहे. बाकी पैसे भरायचे शिल्लक आहेत आणि सरांचा स्वभाव कुणाकडे मागायचे नाही असा आहे. रविवार असल्याने सगळं बंद आहे काय करावे ते कळेना असे म्हणून तो निघून गेला.

इकडे मीरा थोडा विचार करून उरलेल्या पैशांचा एक चेक अमर समोर ठेवते. तर अमरला आश्चर्याचा धक्का बसतो हे काय आणि कुठून आले? मीराने तेव्हा सगळ्या हकीकत अमरला सांगते. तेव्हा त्याला स्वतःचीच लाज वाटू लागते.

त्याला समजले की बाईने मनात आणले की ती काहीही करू शकते.

कथा आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..