तुजविण सख्या रे.. भाग २

तुजविण सख्या रे..


अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा
चौथी फेरी :- प्रेमकथा
कथेचे नाव :- तुजविण सख्या रे..
निशा थोरे (अनुप्रिया)


तुजविण सख्या रे.. भाग २

मुलाखत सुरू होती. मुलाखत घेण्यासाठी पाच सहा जणांची टीम समोर बसली होती. त्यापैकी एकाने तन्वीला तिचे सर्टिफिकेट्स मागितले तसं तन्वीने सर्टिफिकेट्सची फाईल पुढे केली. ते पुढे बोलू लागले.

“सो, टेल मी समथिंग अबाऊट युवरसेल्फ.”

“गुडमॉर्निंग एव्हरीवन, आय एम तन्वी पेडणेकर, बॉर्न अँड ब्रॉटअप इन मुंबई. आय हॅव जस्ट कंप्लीटेड माय एमबीए इन एच आर अँड ॲडमिनीस्ट्रेशन फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी. आय नो माय वे अराउंड धिस एरिया अँड हॅव हॅड मल्टीपल अपॉर्च्युनिटीज टू पुट माय नॉलेज इन्टू प्रॅक्टिस ॲज अ पर्सनल असिस्टंट.”

तन्वी शांतपणे बोलत होती. पुढचा प्रश्न आला.

हाऊ डिड यू हियर अबाऊट धीस पोजिशन?”

“आय ॲम अ बिग फॅन ऑफ युवर कंपनी. आय लव्ह द कंपनीज पॅशन फॉर क्रियेटिंग सुपर प्रॉडक्ट्स, ब्युटीफुल हार्डवेअर अँड आय वुड लव्ह टू बी अ पार्ट ऑफ इट.”

बाकीचे सिनियर्स, प्रत्येकजण एकेक करून प्रश्न विचारत होते. तन्वी शांतपणे उत्तर देत होती.

“व्हॉट आर योर स्ट्रेन्थ्स?”

“आय ट्रूली बिलीव्ह माय स्ट्रॉंग वर्क एथिक इज माय बिगेस्ट स्ट्रेन्थ. व्हेन आय कमिट टू अ डेडलाईन, आय डू व्हॉटेवर नीडस टू बी डन टू मीट इट इन अ क्वालिटी मॅनर.. सेकंडली माय विलिंगनेस टू टेक इनिशियेटीव्ह अलॉन्गविथ माय कम्युनिकेशन अँड ऑर्गनायजेशनल स्किल्स आर माय बिगेस्ट स्ट्रेन्थ्स.”

“अँड युवर विकनेस?”

या प्रश्नासरशी ती किंचित हसली आणि तिने उत्तर दिलं.

“आय एम सो मच इमोशनल, सेन्सिटिव्ह..”

“मग तो विकनेस कसा होईल?”

इतका वेळ शांत बसून ऐकणाऱ्या त्या युवकाने प्रश्न केला. एकदम मराठीत प्रश्न आल्याने जरा ती चमकली पण पुन्हा स्वतःला सावरत तिने उत्तर दिलं.

“सर मी त्या माझ्या विकनेसवर काम करतेय. लवकरच मी त्यापासून स्वतःला ओव्हरकम करेन.”

“हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. एनी वे, मिस तन्वी, आम्हाला सांगा येत्या पाच वर्षात तुम्ही स्वतःला कोणत्या पोजिशनला पाहू इच्छिता?”

“सर या येत्या पाच वर्षात मला खूप मेहनत करायची आहे. बिझनेसमधले बारकावे शिकायचंय आणि एक दिवस मला माझा छोटासा का होईना पण स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत मी स्वतःला एक छोटी उद्योजिका म्हणून पाहू इच्छिते..”

“मिस तन्वी, तुमच्या जॉब कर्व्ह पाहिला. खूपच छान आहे. पण तुम्ही तुमचं शहर सोडून इथे एका अनोळखी शहरात का आलात? आणि तुम्हाला जर उद्योजिका व्हायचंय तर मग तुम्ही नोकरीच्या मुलाखतीसाठी का आलात?”

“सर, या नवीन शहरात आले, कारण माझ्या शहरात मला शिकण्यासारखं भरपूर मिळालं पण मला अनेक मोठमोठ्या शहरात फिरून पाहायचंय. तिथे येणारे चॅलेंजेस अभ्यासायचे आहेत. एक उद्योजक म्हणून आपली ओळख बनवताना या क्षेत्रातली आव्हानं मला समजून घ्यायची आहेत. तुमच्याकडून खूप शिकायचं आहे. आपण स्वतः प्रोफेशनली वागू शकलो तरच आपल्या उद्योगात तो प्रोफेशनलिझम आणू शकू ना? आणि कोण जाणे! असा कोणी तरी इथे भेटेल की ज्याचा उद्योग त्याच्या सकट पत्नी म्हणून माझ्या नावावर होईल.”

तिच्या या मिश्किल उत्तराने तो दिलखुलासपणे हसला. थोड्याच वेळात सर्वांची प्रश्न विचारून झाली. सर्वजण हळू आवाजात चर्चा करत होते. सर्वजण एका निर्णयावर आल्यानंतर त्या युवकाने बोलायला सुरुवात केली.

“मिस तन्वी, तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा.. आमचा निर्णय झाला की तुम्हाला कळवण्यात येईल.”

“थँक्यू सर..”

तन्वी सर्वांचे आभार व्यक्त करून बाहेर येऊन बसली. थोड्याच वेळात एच आर मॅनेजरने तिच्याशी बोलून तिचं सॅलरी पॅकेज ठरवून घेतलं आणि तिला अपॉइंटमेंट लेटर तिच्या हातात देत म्हणाले,

“काँग्रॅच्युलेशन्स मिस तन्वी, हे तुमचं अपॉइंटमेंट लेटर, पर्सनल असिस्टंट पदासाठी आम्ही तुमची निवड करतोय. उद्यापासून तुम्ही ऑफिस जॉईन करू शकता..”

“ओह्ह! थँक्यू सो मच सर!“

तन्वी आनंदाने म्हणाली. त्यांना धन्यवाद देत ते लेटर हातात घेतलं आणि ती ऑफिसच्या बाहेर पडली.

पुढे काय होतं? कोण होता तो युवक? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)

🎭 Series Post

View all