Aug 09, 2022
कथामालिका

तुझीच रे ...

Read Later
तुझीच रे ...
तुझीच रे...
“ चिकू उठं बाळा तुला हॉस्पिटलला ला जायच आहे ना...”
राजनंद यांची सकाळ अशीच व्हायची... दररोज न चुकता पहिल्यांदा तिचा चेहरा बघितल्या शिवाय त्यांची दिवसाची सुरूवात होत नसे आणि रात्रीही तिचा चेहरा पाहिल्या शिवाय झोपतं नसत...
चिकू डोळे किलकिले करून तिच्या बाबांना म्हणते...
“झोपू द्या न बाबा फक्त पाच मिनिटं... बाबा आज माझी सुट्टी आहे. आज माझी अपाँइंटमेंट पण नाही तर मग मी हॉस्पिटला जात नाहियं... मी थोड्या वेळाने आनंद मध्ये जाणार आहे चेकअप साठी.. पण बाबा तुम्ही कुठे निघालात आज तर संडे आहे...”
राजनंद, “अरे हो, माझ्या लक्षातच नाही की आज संडे आहे आणि माझी महत्त्वाची मिटिंग आहे.."
चिकू, “पण बाबा तुम्ही संडेलाही जात आहेत मला तुमच्या सोबत वेळ घालवयाचा होता, खूप गप्पा मारायच्या होत्या आणि तुम्ही जातायं ऑफिसला... तुम्ही असेच करतात संडेलाही कोणी काम करतं का? संडे हा फक्त तुमचा माझ्यासाठीचं असतो, तोही तुम्ही मला नाही दिला . दिस इज नॉट फेअर बाबा.." चिकू थोडी तक्रारीच्या सुरात बोलते.
राजनंद, “सॉरी चिकू मी नेक्स्ट टाईम असं नाही करणार माय प्रिन्सेस..” असं बोलून बाबा चिकूच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तिला कुशीत घेतात. मग त्यांच्या लक्षात येते की, अरे ही कुठे नेहमी घरात असते.
 राजनंद, “ आणि संडे असूनही तू कुठे घरी असते?.. हॉस्पिटल, आनंद नाहितर मग इकडे तिकडे कॅम्पसाठी गावोगावी जाऊन लोकांचं चेकअप करायचं हे तर तुझा नित्यक्रम ठरलेला असतो ना चिकु आणि आज तुला माझ्या सोबत वेळ घालावयचा होता हो नं..”
बाबा बारिक डोळे करून तीच्याकडे बघतात. चिकु ने जीभ बाहेर काढून दाताखाली ठेवली आणि क्यूटसा चेहरा करून बाबांच्या पुढे दोन्ही हातांनी कान पकडून उभी राहिली.
 राजनंद, “ मी कितीवेळ तुझी अशी वाट पाहत असतो तेव्हा तुला तुझ्या बाबांची आठवण येत नाही.”
चिकू,“सॉरी!!.. बाबा तुम्हाला तर माहिती आहे ना, मी पुन्हा असे नाही करणारं, घरी आल्यावर पूर्ण वेळ तुमचा..”
राजनंद, “चिकु तुला माहिती आहे मला तुझ्या शिवाय करमत नाही.. आणि मी खरचं विसरलो बच्चा, सॉरी!...”
बाबाही कान पकडून सॉरी बोलतात. आणि तीला मस्त झप्पी देतात.
 चिकू, “ओके बाबा, मी लवकर येईल, पण तुम्हाला ही लवकर यावं लागेल. आणि पुढच्या वेळेपासून संडेला तरी घरीच राहावं लागेल, नाही तर ऑफिस बंद... कळलं का!! तब्येतीची ची काळजी घ्यायला हवी आणि हे फायनल आहे..."
चिकू तिच्या बाबाला समजावण्याच्या कमी आणि जास्त धमकीच्या सुरात बोलते. कारण बाबाची काळजी तिच्या शिवाय कोणीच करू शकत नाही.. वेळप्रसंगी ती त्यांची आई ही बनते..
राजनंद, “बरं चल, आवर लवकर आणि खाली ये, मी तुझ्यासाठी पोहे बनवले आहेत. तुला आवडतात तसे..
चिकू, “बाबा तुम्ही का बनवलेत? शांता आक्का आहे नं आणि बाबा तुम्हाला कसं कळले की मला पोहे खायचे आहेत ते ही तुम्ही बनवलेले..."
 राजनंद, “ गोलू मी फक्त तुझा बाबा नाही तर तुझी आईपण आहे. आणि खरचं, मला माझ्या गोलू साठी आवडतं हे सर्व करायला.. आणि असा रोज टाईम नाही मिळत मला.. आता वेळ असल्याने म्हटलं माझ्या लेकीकरता तिच्या आवडीचे पोहे बनवावे.
चिकू, “वॉव थॅक्यू बाबा!! पण मला गोलू नका म्हणत जाऊ बाबा, मी आता का गोलू दिसते." चिकू बाबाच्या गळ्यात पडली.
राजनंद, “लाडाने म्हणतो ना पिल्लू तुला... जा आवर लवकर!!”
 चिकू, “ पंधरा मिनिटात येते बाबा”
चिकू बाथरूम मध्ये पळाली, लवकर तयार होऊन आली आणि शांताआक्का ने पोह्यांच्या प्लेट आणून दिल्या. दोघही बाप लेकींनी मस्त ताव मारला...
चिकू, “बाबा मला आज शॉपिंग करायची आहे.
राजनंद “हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि तुला हवी तितकी शॉपिंग कर”...
चिकू, “नाही... बाबा मला नकोय कार्ड, माझ्याजवळ आहेत पैसे. मी गाडी घेऊन जाते आणि माझ्या सोबत आशुही आहे. तर मला..”
राजनंद , “ दिनूकाकाला घेऊन जा सोबत!” पुढे बोलायच्या आत बाबांनी बोलायला सुरुवात केली म्हणजे ऑर्डर च सोडली.
चिकू, “नको बाबा त्यांना तुमच्या सोबत राहू द्या. मी गाडी ड्राईव्ह करणार आहे आणि डोन्ट वरी व्यवस्थित चालवेल आणि सोबत आशुही आहेच की.. मी लवकर घरी येईल नं, प्लिज बाबा, से येसssss...”
राजनंद , “ओके चिकू पण..” बाबा स्मित करून...
चिकू, “ हो बाबा गाडी व्यवस्थित ड्राईव्ह करेल. तिथे गेल्यावर तुम्हाला फोन किंवा मॅसेज करेल माझ्या लक्षात आहे.”
बाबा काही बोलतील त्याच्या आधीच चिकु बोलली. बाबांची काळजी माहिती आहे तिला... चिकू आणि बाबा दोघंही हसले...
चिकू, “ओके बाबा येते मी म्हणून ती गाडीची चावी घेऊन निघाली....
तर ही आहे डॉ. इवा राजनंद कुमार ही कार्डिओलॉजिस्ट आहे. अमेरिकेहून शिकून आलेली, बाबा तिचं विश्वं आणि बाबांचा जीव इवा .. इवा लहान असतांनाच आईच्या मायेला पोरकी झाली पण बाबांनी तिला कधीच आईची कमी भासली नाही . इवासाठी तिचे आयडल हिरो, आई, बाबा, भाऊ , बहिण आणि मित्र ही म्हणजे इवा चे सर्वस्व तिचे बाबा राजनंद कुमार आहेत . हॉस्पिटल आणि आनंद आश्रम आणि गरिबांचा मोफत इलाज व्हावा म्हणून तिला पुण्यात हॉस्पिटल सुरु करायचं आहे. दिसायला गोरीगोमटी गोल चेहरा , धारधार नाक , कमनीय बांधा , ग्रे कलरचे डोळे , लांब ब्राऊनी रेशमी केस आणि त्यात भर म्हणजे दोन्ही गालांवरच्या दोन खळी आणि दातावर दात नुसती स्माईल जरी केली तर समोरचा व्यकती तिथेच खल्लास sss दिसायला नाजुक पण नाजूक नाही दिसेलच ते पुढे आणि बोलणं तर एवढं छान की पेशंट तर बोलण्यामुळेच चांगले होऊन जायचे, बाबा मि. राजनंद कुमार यांचा हॉटेलचा बिझनेस ... इवा म्हणजे त्यांचा जीव की प्राण ... राजनंद यांची बायको इच्छा यांचा एक्सीडेंट झाला आणि त्यात ते दोघांना सोडून गेले. इवासाठी त्यांनी दुसरे लग्नही केले नाही. इवासाठी खूप पझेसिव बाबा आहेत. तिच्या लग्नाचा विषय निघाला की म्हणायचे मला घरजावाई हवा आहे. .. असे हे तिचे बाबा राजनंद कुमार
**********
इवा गाडी घेऊन एका सोसायटी जवळ आली तीने फोन लावला आणि पलीकडून फक्त आवाज आला आले गं sss .. तर ही आहे डॉ.अश्विनी राणे डेंटिस्ट आहे . इवाची एकलुती एक मैत्रिणी आणि सोबत एकाच मोठ्या ‘हेल्थ केअर हॉस्पिटल’ मध्ये आहेत.
 इवा , “इतका वेळ लावतात का गं आशु”..
आशु, “ आलेन गं चल आता बडबड नको करूस ...”
इवा, “ काय झालं मुड ऑफ का झाला आहे? बघ माझ्या पर्समध्ये तुझ्यासाठी काहीतरी आहे की तुझा मूड लगेच चेंज होईल ...”
आशु, “ आईने परत लग्नाचा विषय काढला ..” बोल बोलता तीने पर्समध्ये हात घातला तर तिथे डेरीमिल्क ची मोठी चॉकलेट काढली सुदधा आणि बोल बोला पूर्ण चॉकलेट फस्त केलं ही ...
इवा , “ ये खादाड पूर्ण खाल्लं ही का ? निदान खोटं खोटं म्हणायचं तरी होत खाशील का म्हणून..”
आशु, “ चॉकलेट कशासाठी असत . . खाण्यासाठी नं की नुसत पाहायचं असते. आणि तू कुठे खातेस गं .. मला आजपर्यंत दिसली नाही चॉकलेट खातांना तुला तर आवडत नाही चॉकलेट मग नाही विचारलं .. तू जगातील पहिली मुलगी आहेस की तीला चॉकलेट आवडतं नाही आणि चॉकलेट माझे ते फेवरेट आहेत गं ...”
 इवा, “ म्हणून तर आणले बाई मी .. जास्त नको खात जाऊस गं डेनिंस्टचे दात किडलेत तर कोण येईल तुझ्याकडे..?”
आशू, “ व्हेरी फनी इवा”
 इवा, “ फनीच दिसशील आशु
 दोघीही जोरजोरात हसायला लागल्या, आणि हसतांना इवा एवढी सुंदर दिसत होती की आशु तीला बोललीच
आशु, “ एखाद्याचं ह्दय बंद पडेल तुझ्या हसण्याच्या अदाने हाय ss ...” हदयावर हात ठेवून एकदम फिल्मी स्टाइलने बोलत होती. आणि आशुच्या बोलण्यावर इवा ला जास्तच खळखळून हसू यायला लागले . एका मॉल मध्ये गेले दोघीनी भरपूर शॉपिंग केली . ... इवा ने तिच्या पप्पांसाठी आणि आनंद मधल्या मुलांसाठी कपडे , बुक , नोटबुक, ड्रॉईंग पेटिंगचे सामान असे भरपूर सामान घेतले पण स्वतःसाठी काहीही घेतले नाही . तोवर राजनंदचा फोन आला ..
राजनंद , “ हॅलो चिकू कुठे आहेस बाळा झाली का शॉपिंग ?
इवा, “ झाली बाबा शॉपिंग मी आता आनंदमध्ये जात आहे. तिथे थोडा वेळ थांबवून दोन तासात निघेल. .. काळजी करू नका बाबा मी येतेच तोपर्यत तुम्ही ही लवकर या ... संध्याकाळचं जेवण आपण सोबत करूया ओके बाबा
राजनंद , “ ओके चिकू पण गाडी हळू चालवं बाळा ...”
इवा, “ हो बाबा नका काळजी करू ..” फोन ठेवताच
आशु , “तुझे बाबा किती फोन करतात गं, किती काळजी करतात तुझी जशी लहानच आहे त्यांची चिकू , कोणतेच आईवडिल ही इतके फोन करत नसतील तितके तुझे बाबा करतात , मुलगा ही त्याच्या गर्लफ्रेंडला इतके कॉल लावत नसणार ...”
इवा हसून उत्तर देते .
इवा, “ माझे बाबा माझे बॉयफ्रेंडच आहेत गं, मी त्यांच्यासाठी छोटी त्यांची प्रिन्सेस चिकू , गोलु आहे ... आई गेल्यानंतर त्यांनी मला कशाचीही कमी पडू दिली नाही .. माझ्यासाठी त्यांनी लग्न ही केले नाही .. मीच त्यांची प्रायोरिटी आहे आणि ते माझे ..आशुला सांगताना इवा थोडी इमोशनल झाली आणि लगेच तिच्या डोळ्यांत पाणी आले ..”
आशु, “ सॉरी इवा मला तुला दुःखी करायचं नव्हतं गं .. धन्य!, तुझे बाबा .. खूप पझेसिव आहेत गं तुझ्या बाबतीत तुझं लग्न झाल्यावर कसं करतील ते ... पण एक आहे की त्यांची गोलू इतकी गोड आहे की यार मी मुलगा पाहिजे होता तुला तर पळवूनच लग्न केलं असतं . मग तुझ्या बाबांच काय झाल असत. आणि त्यांनी काय काय केले असते बापरे ! जाऊ दे पळून जाऊन लग्न करण्याच प्लॅन कँसल .” हसून तीचे गाल दोन बोटांमध्ये ओढून बोलते.
 इवा , “ आशु काही काय बोलते गं आणि असं ही मला त्यांना सोडून कुठेच जायचा विचार नाही करायचा आहे ..”
आशु, “ तुला कोणासोबत प्रेम झालं तर?. ती तिसरी व्यकती आली तर ? मग काय करशील..?”
इवा, “ शटअप आशु अश्या फालतू गोष्टींकरता माझ्याकडे टाइम नाहिय सो चील कर”
आशु, “ हो बरोबर टाइम करता असणार तु सगळ बिझी शेड्युल करून ठेवलं आहेस आणि सपोझ कुणी असा भेटला तर.. ? मला तर भीती वाटते की जो तुझ्या प्रेमात पडेल त्याने पहिले अकल ला इम्प्रेस केले म्हणजे झाले .. पोरीचा बाप पटला की पोरगी पटवायला वेळ लागणार नाही ..”
इवा, “आतापर्यंत भेटला का ? नाही नं पुढे ही भेटणार नाही आणि या भानगडीत मला पडायचं सुद्धा नाही ... ओके कळले का माता !! आणखी काही बोलायचं बाकी आहे ..”
दोघही आनंद आश्रमात जातात तिथे लहान मुलं मुली आणि आजी आजोबां पण असतात. त्यांना आणलेले बुक गिफ्ट आणि खाण्याचे पदार्थ देतात त्या सर्वांच चेकअप करून त्या लहान मुलांसोबत गप्पा गोष्टी आणि खेळत असते .. त्यांच्या चेहर्यावरच हास्य इवाला खूप आनंद समाधान देत असत . ह्याच समाधानाने तीला पुढे काम करण्याचा उत्साह येई ..सगळीकडे इवा दीदी हाक ऐकू येत होती . सगळ्यांची लाडकी आहे इवा आणि आशु ... तिथल्या दाम्पत्य रमेश दावे आणि शारदा दावे हे आजी आजोबा हे तिथले प्रमुख असतात त्यांच सर्वांना लहान मोठ्यांना ऐकवचं लागते . ते सर्वांना डिसिप्लीन शिकवत असतात . त्यांना सर्व आप्पा म्हणत . ते आजी आजोबा एकमेकांसोबत बोलतात .. इरा जेव्हा ही येते तेव्हा सर्व किती आनंदी खुश असतात. ... जिथं जाते ही पोरगी तिथे सर्वांना आनंदच आनंद देते.
 इवा, “ चला आजोबा येते मी सगळ्यांना वेळेवर औषध घेण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि काळजी घ्या तुम्हीही तुमचा बीपी थोडा वाढला आहे यावेळेस काय आणि हे चिंटू मुळे झाले आहे नं .. आजोबांना आजींना भरपूर त्रास देतोय .. किती धावपळ करायला लावतो . जेव्हा येईल तेव्हा सर्व व्यवस्थित हवं कळलं नं ... नाहीतर मी बोलणारच नाही आणि येणार पण नाही .” चिंटू छोटा पाच वर्षांचा सर्वांचा लाडका आणि लहान आहे. अत्यंत खोडकर, नटखट सतत धावपळ इकडून तिकडे सतत सर्वांना त्याच्या मागे मागे फिरवत असतो.
चिंटू आणि सर्व मंडळी एकसाथ बोलता सॉरी सॉरी इवा दीदी अस नको म्हणू आम्ही सर्व व्यवस्थित राहू .आजोबांची काळजी घेऊ त्यांनाच काय कोणालाच आम्ही त्रास देणार नाही . आणि तू लवकर येशील बरं ..
 इवा, “ ठिक आहे , लक्षात असु द्या ! (चिंटू ला जवळ घेऊन गालावर किशी करते आणि चिंटू ही इवा दिदीला किशी करतो) .. चला येते मी ...काळजी घ्या सर्वांची ... बाय बाळांनो !!”
आशु, “ ऐ मला कोणीच झप्पी आणि पप्पी नाही दिली..” नाटकीचेहरा करून बोलते . तोपर्यत सर्वच मुले मुली एक एक करून पप्पी आणि झप्पी देतात.
पुन्हा एकदा बाय करून तिथून इवा आणि आशु निघतात. मुले आजी आजोबा सर्व आनंदातच असतात कारण आज इवा आणि आशु आले होते त्यांना भेटायला .. ज्या दिवशी येतात त्या दिवशी सर्व एकदम आंनदी असतात. त्यांच्या निरागस हास्य त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद दाखवताती . गाडी पुसटशी दिसे पर्यंत मुलेमुली आणि आजोबा आजीं त्या गाडिच्या दिशेने बाय करतात ..
 आशुला घरी पोहचवून ती तीच्या घरी आली
*******
क्रमश ...
नमस्कार वाचकमंडळी,
हा माझा कथा लिहण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. ... कथा वाचता वाचता मी ही लिहू शकते असे सांगणाऱ्या माझी गुरु मैत्रिणी माझी प्राणप्रिय मेघामॅम आणि निशामॅम, संजनामॅम यांना प्रेरणा मानून लिहण्याचा प्रयत्न केला आहे. इथे सर्वच माझ्यासाठी माझे गुरु आहेत त्यां सर्वांना नमन सारंग सर , मयुरेश सर, नामदेव सर, ईश्वर सर, प्रियंका मॅम, अपूर्वा मॅम यांच्या प्रोत्साहनामुळे मी आज लेखनाला सुरवात केली आहे.
असाच वाचक मंडळीचा सपोर्ट मिळावा हीच सदिच्छा
व्याकरणांच्या चुकांसाठी क्षमस्व
Thank you Era
Thank you very much everyone. Supported me ..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

@* धनदिपा*@

Housewife

"Simplicity is the true beauty".