Aug 16, 2022
कथामालिका

तुझीच रे ... 2

Read Later
तुझीच रे ... 2

तुझीच रे ... 2

भाग 2

मागील भागाचा सारांश

 इवाला सुट्टी असल्याने इवा आणि आशु दोघेही मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करून तिथून ते आनंद आश्रमात जाऊन भेटवस्तू देऊन त्यांच चेकअप करून त्या लहानमुलामध्ये मनसोक्त हसून,खेळून आशुला तिच्या घरी ड्रॉप करून ती घरी येते. ...

आता पुढे

 

इवा लिविंग रूम मध्ये येत असातांना बाबांना आवाज देते.


इवा, “बाबाSS”, आणि सोफ्यावर शॉपिंग बॅग ठेवून बसते . तर शांताक्का पाणी घेऊन येते. इवा थोड पाणी पिते .

“शांतक्का बाबा कुठे आहेत” . तर शांताक्का किचनकडे बोट करून दाखवते.

इवा, “हम्म sss म्हणूनच एवढा सुंगध येतोय. ती लगेच उठून किचनकडे गेली. बाबांनी किचन एप्रन घातलेला असतो... आणि ते गुंतलेले असतात त्यांच्या कामात ... बाबांच्या मागे हळूहळू जाते आणि भो ss करते. . बाबा खोटखोटं तरी घाबरलेचे नाटक करायचं न ... बाबा तुम्हाला कसं कळलं मी आहे ...


राजनंद, “ किती सोपं आहे बच्चा हे तुझे पैंजण सर्व सांगतात मला ...”


इवा, “ काय हो बाबा !!” थोडी नाराजीच्या टोन मध्ये बोलते .बाबा !! काय मस्त वास येतोय हो .. आता तर मला तर राहवतच नाहीय . पोटात कावळे उंदिर सगळे भांडणं करताय जाम भूक लागली ”


राजनंद, “ चिकू जा लवकर फ्रेश होऊन ये बरं !”


इवा, “ आलेच मी ..!!

पळत जावून रूम मध्ये जात असतांनाच, बाबा ईवाला


राजनंद, “ धावू नको चिकू पळशील !!”

 इवाच्या पैंजणांच्या आवाजाने बाबांना समजले .

इवा , “नाही पडणार मी ! ... असं म्हणत असतांनाही धावत धावतच गेली .. गरम पाण्याचा बाथ घेतल्याने इवा रिलॅक्स आणि मस्त फ्रेश होऊन खाली येतांनाहा पळतच आली .


राजनंद, “ चिकू तू पळत असतांना जीव वर खाली होतो माझा ...”


इवा, “ बाबा मी काय लहान नाही राहिली पडायला” ...


राजनंद, “चिकू तुझ्या पायाला चाक लागलय का गं ... एका ठिकाणी राहतच नाही इकडून तिकडे ...”


इवा पायांना पाहते असते बारीक डोळे करून कमरेवर हात ठेवून बोलते जसे काही पायांना चाक आहेत असं बघते .

 

इवा, “ व्हेरी स्मार्ट बाबा !


राजनंद, “ मी तर आहेच स्मार्ट पण तू डॉक्टर कशी झालीस गं ?”

बाबा असा चेष्टेने बोलतात ... आणि हसतात ... इवा जीभ दाखवून हाताचा ठेंगा करते ... असे फनी चेहरा करते इवा की बाबा तिला पाहून जोरात हसतात .. तिला स्वतःला ही हसू येतो पण ती कंट्रोल करते आणि बाबां वर रागवली आहे असं चेहर्यावर दाखवते.

बाबा sss तुम्ही ही ... मी नाही बोलणार आता कळलं का?ती खोटं खोटं गाल फुगवून बसते ... बाबा तिच्यासमोर जाता तर ती दुसरी कडे तोंड करते .


राजनंद, "अरे बापरे ! केवढा मोठा राग आलाय माझ्या गोलूच्या नाकावर ...नाही बोलणार का ? ठिक आहे . तर मग मी हे खाऊन घेतो .. बाबां तिच्यासमोर आइसक्रिम खाऊ लागले तशी ही लगेच तीने आइसक्रिम घेतली आणि सुरु ही केले . . तीची आवडती केसरपिस्ता आइसक्रिम आहे..


राजनंद, “ सावकाश खा !! मग गेला का राग तुझा...”

 

इवा, “ हो , थॅक्यू बाबा आणि मी रागवलीच नव्हती हो .. मी तुमच्यावर राग धरून बसणार का तेही माझ्या छान आणि गोड बाबावर” .. असे बोलल्यावर बाबा हसायला लागता .


राजनंद , “ चल आधी जेवण करून घेऊ मग नंतर आईसक्रिम खा !”

दोघही जेवणाला बसतात .. बाबा तिला आधी घास भरवता मग ते खायला लागता .. तिला लगेच कळते की पूर्ण जेवण बाबांनी बनवले आहे ...


 इवा , “तुम्ही किती दगदग कराल .. हे सर्व तुम्ही बनवल आहे ... मला नाही आवडत तुम्हाला त्रास झालेला


राजनंद, “ मला कसलाच त्रास होत नाही चिकू आणि माझ्या मदतीला शांताक्का होती .. चिकू तुला माहिती आहे .. तुझ्या आईला माझ्या हातची पालकपनीर ची भाजी खूप आवडायची ... मी नेहमी करून प्रेमाने खाऊ घालायचो . आणि आता माझ्या चिकूसाठी करतो .. आईचा विषय काढल्यावर इवा थोडी भावूक होते पण लगेच मनाला सावरून विषय बदलवते.


इवा, “ ठिक आहे बाबा करत जा पण स्वतः ला जास्त त्रास नका देत जाऊ .. मी तुमच्यासाठी कपडे आणले आहेत तर तुम्ही बघून घ्या तुम्हाला आवडले का ? सांगा नाहितर चेंज करून आणते ...


राजनंद, “ मला तुझी पसंत आवडते चिकू

काही गरज नाही बदलायची ..”


इवा, “ एकदा बघून तर घ्या ..”


राजनंद , “ काही गरज नाही .”

 

इवा, “ ओके बाबा ...

जेवण संपले तसे दोघे ही बाहेरच्या गार्डन मध्ये शतपावली करून आले . इवा कोमट तेलाची वाटी घेऊन आली तीच्या बाबाच्या डोक्याची मालिश करायला .. ..


इवा, “ बाबा मी केसांना तेले लावून मालिश करू देते.”

बाबा तीच्या पुढ्यात बसले आणि ती मस्त त्यांच्या केसांना तेल लावून चम्पी करून देत होती ... बाबा रिलॅक्स झाले चम्पीने ते लवकरच बसता बसता गुंगायला लागले .. हीची बडबड चालू असते, बाबांचा काही हुंकार येत नाही म्हणून पाहते तर बाबा बसता बसता झोपलेही ... ती स्मित करते. खूप धावपळ झाली बाबांची .. बाबांना थोड उठवून सरळ झोपवते आणि अंगावर ब्लॅकेट ओढून बाबांना गुडनाईट किशी करून लाईट ऑफ करून दार लावून तिच्या रुममध्ये जाते .. ती ही फ्रेश होऊन नाइट कपडे घालून झोपी जाते ..

****

इवा आणि बाबा ब्रेकफास्ट करून बाय करून सोबतच निघतात .. इवा आणि आशु इवाच्या स्कुटीवर जातात.

आशु, “ अग काय गं हे ! स्कुटी वर येतेच छान गाडी असतांना ही कशाला जुनी स्कूटी आणते ? ..”

 इवा , “ ही माझ्या आईची स्कुटी आहे . मी यावरच आईसोबत कुठेही जायची .. जुनी आहे म्हणून काय झाले माझ्या साठी ही नवीन करकरित गाडीपेक्षा ही माझी स्कुटी मोलाची आहे . कळलं ..

आशु, “ हो .. कळलं मॅडम !!”

एक गाडी रस्ताच्या कडेला थांबलेली असते .. गाडीच्या बाजुनेच इवा जात असते तर तिला वाटले काहीतरी गडबड आहे म्हणून उतरून बघते . त्या ड्रायव्हरला विचारते आणि ड्रायव्हर कोणासोबत बोलत असतो . त्याच्या साहेबांना सांगून त्यांच्या बाईसाहेबांची तब्बेत खराब झाली म्हणून सांगतो.

 इवा, “ काय झाल हो काका ?”

ड्रायव्हर , “ आमच्या मॅडमांची तब्बेत बिघडली आहे .. त्यांना खूप त्रास होतो आणि मला समजत नाहीय ..

इवा मागे सीटवर जाऊन त्यांना बघते . ती बाई वेदनेने विव्हळत असते. पूर्ण चेहरा घामजेलेला असतो .


इवा , “ काकू तुम्हाला काय होतोय ? ..


ती बाई ,” कळ येतेय ही इथे .” अस्पष्ट आवाजात सांगतात . त्यांना बोलतांनाही दम लागत होता ..


इवा , “ आशु माझी बॅग दे लवकर”


आशु इवाची बॅग तिच्याजवळ देते . इवा त्यातून एक इंजेक्शन काढून त्यांना देते.

 

तातडीने यांना हॉस्पिटला न्याव लागेल काका लवकर गाडी हॉस्पिटल कडे वळवा घाबरू नका ..मी एक डॉकटर आहे.आशु मी यांना घेऊन जाते. तू ये ....

इवा तिला सांगून लवकर हॉस्पिटलच्या दिशेने वळायला सांगितली .. इवा ने फोनवर सांगून सर्व रेडी करायला सांगितल ...

इवा त्या महिलेला धीर देत होती ."काकू माझ्याकडे बघा डोळे नका लावू .. घाबरू नका मी काहीही होऊ देणार नाही तुम्हाला .." ... दहा मिनिटाच्या आत ते हॉस्पिटला आले ... इवाने सर्व रेडि करायला सांगितलच होते लगेच त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले .. सर्व टेस्टिंग करण्यात आले ... त्यांना मायनर अटँक आला होता . त्यांना आय सी यु मध्ये ठेवण्यात आहे. थोड्याच वेळात तिथे दोन व्यकती सुखबुटांच्या पेहरावात आले . जसे ड्रायव्हरने सांगितले की रस्तावर असताना दोन मुली मदतीला आल्या हेल्थ केअर हॉस्पिटला आलो आहेत . हॉस्पिटलच्या नाव सांगितल्यावर त्यांनी हॉस्पिटलच्या डिन डॉ. सुभाष केळकर यांना सांगितले पण त्या आधीच इवा ने त्यांना सांगून पूर्ण तयारी केली होती व उपचार देखील सुरु झाले होते .. ते दोन्हीही धावतच आले .. त्यांना भेटायला स्वतः डॉ. केळकर तेथे होते आणि तसेही ते मित्रही होते.

डॉ. केळकर , “ वहिनींना मायनर अँटक आला होता पण आता ठिक आहेत . श्रीकांत , रमाकांत वेळेवर उपचार झालेत . आणि आमची डॉक्टर वेळेवर घेऊन आली त्यांना .. हे ऐकूनच श्रीकांतला धक्का बसतो .

रमाकांत , “ डॉ.दादा .. माझी वहिनी कशी आहेस .... दादा नको काळजी करू वहिनी ठिक आहे . तू जर असा करशील तर कस होईल वीरला कस सांभाळशील आधीच तो वहिनी साठी हळवा आहे. तो निघालाय बेंगलोर वरून,दीड ते दोन तासात येथे पोहचेलच ..

रमाकांत मोठ्या भावाला समजावून सांगत असतो ..

 

इवा येते आणि त्या सर्वांना सांगते .“शी कडिंशन इज गुड नाऊ . देअर इज नो नीड टू वरी ... शी इज नाऊ ओके ..

 त्यांना कोणताही मानसिक धक्का होता कामा नये ... त्यांनी कसलं तरी टेंशन घेतले आहे ... तुम्ही त्यांना पाहू शकतात ...त्या आता  झोपल्या आहेत ...

  तर डॉक्टर केळकर तीला त्या दोघ व्यक्तींची ओळख करून देत असतात .

डॉक्टर केळकर , “ श्रीकांत आणि रमाकांत हीच ती डॉक्टर आहे . हीनेच नंदिनी वहिनींना येथे आणले . आणि इवा हे कोण आहेत माहिती आहे का? हे आहेत ...” पुढे बोलत असतांनाच श्रीकांत हात दाखवून थांबवतात . श्रीकांत बोलायला सुरवात करतात .

श्रीकांत , “ खूप उपकार आहेत डॉक्टर तुमचे तुम्ही अगदी देवासारखे आलात ... हात जोडतच बोलतात .”

 

इवा, “ प्लिज सर, असे हात नका जोडू आभार व्यक्त करण्याची गरज नाही माझ्यासमोर मी खूप लहान आहे . आणि हे माझं कर्तव्यच आहे मी तेच केले. त्या दोन ते तीन दिवसात ठणठणीत होऊन घरी येतील ... सर मी जाते मला राऊंडवर जायचं आहे. ..इवा नम्रपणे आणि हसतमुखाने बोलली ...

 किती लहान वयात मोठी डॉक्टर झाली ही मुलगी ... किती छान गोड न्रम बोलते ... कोणताही गर्विष्ठपणा नाही ..किती तेज आहे चेहर्‍यावर .. ही मुलगी माझी सुन झाली तर.. लगेच मनात भरली .. अरे हे मी काय विचार करतोय श्रीकांत मनातच विचार करत बोलले ...


श्रीकांत आणि रमाकांत आत जाऊन पाहतात .. श्रीकांत तिथे बेडजवळ स्टूलवर बसून असतात नंदिनीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवता . विचार करतात आज जर काही बरेवाईट झाल असत तर .. बरं ती मुलगी आली नाहीतर .... डोळे पाणवतात .. थोड्या वेळाने नंदिनी जागी होऊन उठण्याचा प्रयत्न करते तर ...

श्रीकांत, “ नंदिनी अजिबात उठण्याचा प्रयत्न करू नको .. .”

रमाकांत , “ कसं वाटतेय वहिनी”..

 नंदिनी , “ मी बरी आहे ..” म्हणून सांगते.

रमाकांत , “ दादा मी डॉक्टरांना बोलावून आणतो” . अस म्हणत रमाकांत निघून जातो ...

श्रीकांत , “ किती घाबरलस नंदिनी मला, माझा प्राण कंठाशी आला होता ..” श्रीकांत नंदिनीचा हात हातात घेऊन काकुळतीने येवून बोलत होते ...

 त्यांच्या डोळ्यांत पाणी पाहून तिला कसतरीच झालं ...

 

नंदिनी , “ मी बरी आहे हो !! .. वीर ला काही कळू देऊ नका उगाच काळजी करत बसेल ..”


श्रीकांत, “ नंदिनी तू जास्त बोलू नकोस , आराम कर ... कळवले आहे त्याला रमाने .. येईलच तो ... नाहितर किती रागवला असता मला ... माहिती आहे नं तुला ..

नंदिनी, “ हम्म..”

इवा आणि रमाकांत आत आले ..


इवा, “ कशा आहात काकू ..” नंदिनीच्या चेहर्‍यावर इवाला पाहून छान स्माईल आली ... काय हो काकू कसलं टेंशन करता तुम्ही .. काका त्रास देतात का ? की सुनबाई त्रास देते .. इवा मस्करीच्या सुरात बोलली तसं तिघांच्या चेहर्यावर हसू पसरलं ...


रमाकांत, “ दादा नाही देत त्रास ... राहिला प्रश्न सुनबाईचा तर तेच वाट पाहताय सुनेला छळायची .. 


बेडवर असून सुद्धा नंदिनी रमाकांत वर मोठे डोळे करून पाहत होती जस सांगत होती ... होऊ दे मला बर मग बघते तुझ्याकडे .. सगळे हसायला लागले ..हलकंफुलक आनंदाच वातावरण तयार झाले ..


इवा, “ काकू लवकर बरे व्हा ! सुनबाईला छळायच आहे नं ..” सर्वांच्या चेहर्यावर स्मित हास्य आले . ..

 

मानिनी , “ त्या करिता सुनबाई तर असायला हवी!” .. रुममध्ये येत असतांनाच मानिनी बोलली ..


रमाकांत , “अगं तू कशी काय आलीस!!’”


मानिनी , “ मग काय करू मी मला जेव्हापासून माहिती पडलं तेव्हापासून जीव लागत नव्हता त्यात तुम्ही फोन उचलत नव्हते .. आले निघून .. माझ्या तायडेला बघायला . बाबा आणि आई ही यायचे म्हणत होते ... मी म्हटलं त्यांना आपण नंतर जाऊयात .. आईनी हट्टच धरला मी येते म्हणून मग बाबांच कारण सांगून थांबवल ...

बोलता बोलता नंदिनी जवळही बसली ही डोक्यावरून हात फिरवत रडत असते  ... ताई किती घाबरलं गं आम्हा सर्वांना .. जिंजूचा चेहरा पाह नं कसा झालायं ... डॉक्टर आता माझी ताई कशी आहेस ? ...

 इवा, “ त्या आता बऱ्या आहेत .. पण त्यांना कोणतही टेंशन होता कामा नये.”

तुम्ही त्यांना हेल्थी जेवण  द्या आता सुप वगैरे देऊ शकता ... आणि गोळ्यानंतर त्यांना आराम करू द्या .. ह्या लीला मावशी आहेत हे वेळेवर तुम्हाला गोळ्या औषधी देतील .. आणि लीला मावशी यांचे पूर्ण तब्बेतीचा रिपोर्ट पाहिजे बरं का? आणि काही असेल तर लगेच कळवा ...

लीला नर्स,” हो डॉक्टर “ म्हणून सांगतात .


इवा, “ काकू काही त्रास झाला तर तुम्ही मला सांगा बरं का? .. येतेेच मी थोडयावेळाने .. असं म्हणून इवा निघाली ... बाकीचे पेंशट चेक करून कॅबिन मध्ये जरा निवांत बसली आणि पाणी पिताच तीला मोबाइल ची आठवण झाली .... मोबाइल पाहिला तर सायलेंट मोडवर बाबांचे चार ते पाच मिस कॉल आलेले . . तत्काळ तीने पहिले बाबाना कॉल केला


इवा, “ हॅलो बाबा फोन केला होता तुम्ही ...”


राजनंद, “ अगं किती फोन केले तुला फोन उचलत नव्हती तर आशुला लावला .. तरी तीने रस्त्यामध्ये काय घडलं ते सर्व सांगितल... आता ठिक आहेत का ते .. ? ...”


इवा, “ त्या ठिक आहेत बाबा काळजी करण्याच काहीच कारण नाही आता त्यांची फॅमिली त्यांच्या सोबत आहे .. बाबा मला त्यांची फॅमिली खूप छानवाटली. बाबा एक सांगू का मला अस वाटल की त्यांना कुठेतरी पाहिलं आहे ... मला आठवत नाहीय बाबा पण मी पाहिलयं त्याना ..”


राजनंद , “हो .. का .. म्हणूनच तुला आज बाबांची आठवण आली नाहिस आणि फोन पण केला नाही ...” बाबा तक्रारींच्या सुरात बोलता ...

 

इवा, “ बाबा तस काही नाही हो ! इमर्जन्सी असल्यामुळे मोबाइल सायलेंट मोडवर आणि पर्स मध्येच विसरले होते ... बरं तुम्ही जेवण केलेत का? ..


राजनंद, “ आधी तु सांग चिकू .. तू जेवण केलसं का? .. म्हणूनच तुला फोन करत होतो बच्चा ... माझ्या मिटिंगमध्येच कलाइंट सोबत जेवण केले मी ”


इवा , “ नाही बाबा ...आशू आली की जातो आम्ही कॅटिनला येईलच ती इतक्यात ..आशू आली बाबा जाते कॅन्टिनला .. ‘नाम लिया और शेताम हाजिर।” .. तोपर्यत दारावर टकटक झाली आणि ती आत आली .. इवाने फोन ठेवला ...

 

आशु, “ मी शैतान आहे का   ? इवा चल गं तुझ्या शैतानाला जाम भूक लागली यार ..” मासूम चेहरा करून बोलते


इवा, “ चला मॅडम .. असा चेहरा पाडू नको ” दोघही हसत हसत कॅन्टीनला गेले .. जेवणाला बसले आणि आशुने बाबांचा फोन आला होता म्हणून सांगितले . ..

क्रमश ...


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

@* धनदिपा*@

Housewife

"Simplicity is the true beauty".