तुझी लायकी एवढीच

-----

तुझी लायकी एवढीच १ series  © आरती पाटील 


सुमन मराठवाड्यातील एका छोट्याश्या गावात राहणारी भोळी भाबडी १९-२० वर्षांची सालस मुलगी. घरकाम, स्वयंपाक, शेतातील कामे यात तिचा हातखंड होता. १२ वी पर्यंत शिक्षण होत. दिसायला ही सुरेख. आई -वडील, २ भाऊ आणि २ बहिणी अश्या कुटुंबातील गुणी पोर. एक दिवस दूरच्या नात्यातील एका नातेवाईकाने एक स्थळ आणले. मुलगा शहरात राहणारा, नोकरी असलेला असल्यामुळे जास्त विचारपूस न करता लग्न करून दिले. 

 सुमन लग्न करून शहरात आली पण राजचे ( सुमनचा नवरा ) वागणे काही तिच्या लक्षात येतं नव्हते. कधी नीट बोलायचा तर कधी तिच्यावर उगाच चिडचिड करायचा. त्याच्या या वागण्याचा सुमनला अर्थ लागत नव्हता. चुलत नणंद ( मीरा ) एकदा त्याच्याकडे आली तेव्हा सुमन म्हणाली. 

सुमन : वन्स, हे कधी कधी फार चिडचिड करतात. कारण काय ते कळत नाही. विचारलं तरी माझ्यावर ओरडतात. कळत नाही. कस कळणार त्याच्या मनात नक्की काय चालू आहे. घरात आई - बाबांना तरी कसं बोलू मी ?  आताच लग्न करून आले या घरात. फार वेळ नाही झालेला. 

मीरा : वहिनी, पुरुषांच हे असंच असत. एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तर चिडचिड करतात. त्यात हे लग्न करायचं त्यांच्या मनात ही नव्हतं. 

( सुमनला हे ऐकून शॉक लागतो. )
सुमन : म्हणजे हे लग्न त्यांच्या मर्जी विरुद्ध झालं आहे?  

मीरा : अगदीच तस नाही पण त्याला शहरातील एखादी मुलगी करायची होती. गावाकडची नाही. पण काका - काकींना घर जपणारी आणि बांधून ठेवणारी सून हवी होती. म्हणून हे लग्न त्याने केलं. 

सुमन : मग आता मी काय करू? 

मीरा : अ गं वहिनी, तू थोडी त्याला आवडेल असं वाग आणि थोडं त्याच्या मनाप्रमाणे राहण्याचा प्रयत्न कर. बस. 

सुमन : तुम्ही बरोबर बोलताय वन्स. मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न नक्की करेन.  

मीरा सुमनला भेटून तिच्या काकीला म्हणजेच सुमनच्या सासूबाईना भेटायला त्यांच्या रूम मध्ये जाते आणि सुमन किचन मध्ये. जेवण बनवताना सुमनच्या लक्षात येत आपण काल लाडू बनवलेत ते वन्सना दिलेच नाहीत. म्हणून सुमन लाडू प्लेट मध्ये घेवून सुमनला देण्यासाठी सासूबाईंच्या रूमकडे जाते आत जात असताना तिच्या कानावर मीराचे शब्द पडतात, " मी माझ्यापरीने प्रयन्त केला, आता तुम्ही सुद्धा लक्ष द्या. नाहीतर हे जास्त दिवस लपवता येणार नाही. " मीरा आता आल्याचे पाहून दोघीही गप होतात. मीराच्या डोळ्यातील प्रश्नचिन्ह पाहून मीरा म्हणाली, " अ गं general गप्पा करत होतो. तू अचानक आलीस म्हणून थांबलो. " सुमन लाडू पुढे करते आणि मीरा आवडीने खाऊन कौतुक करून निघून जाते. पण सुमनच्या मन मात्र वन्स नक्की काय बोलत होत्या?  यातच होत. 


क्रमश..... 

तुझी लायकी एवढीच २

https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-evdhich-2

तुझी लायकी एवढीच ३

https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-evdhich-3

तुझी लायकी एवढीच ४

https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-evdhich-4

तुझी लायकी एवढीच ५

https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-evdhich-5

तुझी लायकी एवढीच ६ 

https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-evdhich-6_3344