तुझी लायकी एवढीच ५

-------

तुझी लायकी एवढीच ५ © आरती पाटील 

( राजने सर्व सत्य सुमनला सांगितल्यावर सुमन सासू सासर्यांना जाब विचारते. सासू सासरे तिला रिया ( राजची gf ) बद्दल सर्व सांगतात. आणि तिची माफी मागतात. सुमन सासू सासर्यांचं बोलणं ऐकल्यानंतर राजला एकदा संधी देण्यासाठी आणि मन वळ्वण्यासाठी प्रयत्न करू असे सांगते. राजच्या घरी पार्टी असते, ज्यात रियाही येणार असते. राज सुमनला पार्टी सुरु असेपर्यंत बाहेर न येण्याचं सांगतो. )

आता पुढे...... 

पार्टी सुरु होते. राजने सर्व जेवण बाहेरूनच मागवले होते. राजने त्याचे लग्न झाले ही गोष्ट ऑफिस मध्ये रिया सोडून कोणाला सांगितली नव्हती. सुमन बेडरूम मध्ये बसली होती. आई - बाबा एका ओळखीच्या व्यक्तीकडे पूजेसाठी गेले होते. रियाही पार्टी ला आली होती. रियाला सर्व गोष्टी माहित होत्या. पार्टी बऱ्याच वेळ पासून चालू होती. सुमन ला तहान लागली म्हणून ती किचनमध्ये जायला वळाली. किचनमध्ये जाण्याचा रस्ता हा हॉल मधून होता. सुमनला किचन मध्ये जाताना राजच्या मित्राने पाहिले आणि राजला या विचारलं, " राज ही कोण? " सर्वजण सुमनकडे पाहू लागतात. राजला खूप राग येतो, पण राग आवरतो आणि म्हणतो, " अरे सोडा, काही नाही गावावरून घर कामासाठी आणलं आहे तिला. तुम्ही enjoy करा. "  

 राजच्या तोंडून हे सर्व ऐकून सुमनला रडू आवरत नाही ती पळत किचनमध्ये जाते आणि रडत असते. तेवढ्यात तिथे रिया येते आणि म्हणते, " आता तरी तूला तुझी लायकी कळली असेल असं समजते मी. तेव्हा त्याला मोकळं कर आणि जा त्याच्या आयुष्यातून. " राज असं already बोलल्यामुळे सुमन रियाला काहीच बोलू शकली नाही. सुमन आतून पूर्णपणे खचली होती. राजला एक संधी देऊ पहात होती सुमन पण राजच्या मनात सुमन दूर -दूर पर्यंत कुठंही नाही याची जाणीव तिला झाली आणि तिने बॅग भरायला घेतली. 

सुमन बॅग भरून सासू सासरे येण्याची वाट पहात होती. संध्याकाळी सासू सासरे आल्यावर सुमनने त्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी राजही तेथेच होता. सुमन जायला निघाली. ते पाहून सासू सासरे राज वर खूप चिडतात. सुमन सोबत सासू सासरे ही बॅग भरून गावी जायला निघाले. राज सांगण्याचा प्रयत्न करतो., 

राज - आई बाबा का जबरदस्ती संसार करायला भाग पडताय मला ?  मी हिच्या सोबत नाही संसार करू शकत. हीच ना कर्तृत्व, ना व्यक्तिमत्व. मला शोभत ही नाही. जबरदस्ती लग्न करून दिलं पण मन मारून संसार ही कर म्हणताय. आणि त्यासाठी आता पुन्हा घर सोडण्याची धमकी देताय. 

सासरे - नाही राज ही धमकी नाही. हे प्रायश्चित आहे. आम्ही केलेल्या पापाचं. सुमनसारखी गुणी मुलीचं तुझ्याशी लग्न लावून जे पाप केलं आहे त्याचं प्रायश्चित. 

राज - म्हणजे ही माझ्यापेक्षा जास्त कर्तृत्ववान आहे असे म्हणायचं आहे का तुम्हाला ?  ही.... 

सासू - हे सर्व आता काही उपयोगी नाही. तू तुझ्या मनाला जसे वाटेल तस वाग. तुझा आणि आमचा आता काही संबंध नाही. 

सुमन - आई बाबा, माझ्यासाठी काही करायची गरज नाही. तुमचं घर माझ्यामुळे तोडू नका. माझं नशीब फुटकं त्यात कोण काय करणार. 

सासरे - असं नको म्हणूस सुमन, तूला आजचा दिवस आमच्यामुळे पहावा लागतोय. आम्हाला सर्व माहित असताना लग्न लावले. पाप केलं गं आम्ही पोरी. माफ कर गं आम्हाला. 

सासूबाई - हो सुमन, बरोबर बोलतायत ते. राज तूला बायको मानो वा न मानो पण तू आमची सून आहेस आणि राहशील. 

.......................

सुमन, सासूबाई व सासरे गावी सासरच्या घरी जातात. जिथे शेती ही भरपूर होती, शेतात विहीर होती गावात मोठा वाडा होता. हिरवंगार गाव होतं. काही दिवसात सर्वांची मने व डोके शांत होतं होती. पण सासूबाई व सासरे याचं मन मात्र अजूनही कच खात होतं. सासूबाई व सासरे यांनी काही ठरवले. सासरे काही कामानिमित्त बाहेर जातायत असं सांगून निघाले. ते शहरातल्या घरात येतात आणि राजला  सांगतात, 

बाबा - राज तू तूझ्या मनाप्रमाणे, तूला हवे ते केलेस. आता मला जे हवे ते करणार आहे. 

राज-  म्हणजे?? 

बाबा  - हे घर माझ्या नावावर आहे. तेव्हा तुझं सामान बांध आणि निघ मला घराला बंद करून निघायचं आहे. जरा लवकर कर. 

राज - बाबा असे कसे बोलता तुम्ही  ?  मी कुठे राहू मग?  

बाबा - तो तुझा प्रश्न आहे. त्याच्याशी मला कर्तव्य नाही. 

राज - बाबा का असं वागताय ?  त्या मुलींसाठी तुम्ही मला, म्हणजेच तुमच्या स्वतःच्या मुलाला त्रास देताय. 

बाबा - हो कारण, त्या मुलीच्या आयुष्याची वाट आमच्यामुळेच लागली ना. तेव्हा लवकर सामान घेवून निघ. माझी गाडी आहे रात्रीची. ती निघून जाण्याआधी मला घर बंद करून निघायचं आहे. 

राजचा नाईलाज होतो. आणि घरातून आपल सामान घेऊन राज घर सोडतो. त्याचे बाबा घराला लॉक करून गावी जातात...... 

क्रमश..... 

तुझी लायकी एवढीच १

https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-yevdhich

तुझी लायकी एवढीच २

https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-evdhich-2

तुझी लायकी एवढीच ३

https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-evdhich-3

तुझी लायकी एवढीच ४

https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-evdhich-4

🎭 Series Post

View all