तुझी लायकी एवढीच ४

----

तुझी लायकी एवढीच ४ © आरती पाटील 

( राज सुमनसमोर त्याचं प्रेम, बाहेर राहण्याचे कारण ई. सर्व सत्य सांगून निघून जातो. )

सुमनला झालेला प्रकार, तिची झालेली फसवणूक लक्षात येते. ती सासूबाई आणि सासर्यांना जाब विचारण्यासाठी जाते. सुमन त्यांच्यासमोर जाऊन उभी राहते आणि राज व तिचा झालेला सर्व वाद सांगते. आणि विचारते, 

सुमन - आई - बाबा, तुम्हाला सर्व माहित असून माझी अशी फसवणूक का केलीत ?  जिथे नवराच मला बायको आणि हे लग्न मान्य करत नाही, तिथे मी आयुष्यभर इथे कशी आणि कोणाच्या भरवश्यावर राहणार?  आणि मुळात राहणार की मला हकलून लावणार इथून? 

सासूबाई - सुमन असं नको म्हणून. मान्य आहे आम्हाला हे सर्व माहीत होते. पण तुझी फसवणूक नाही गं केली पोरी. 

सुमन - मग कसे बोलू मी आई ?  माझी लाज वाटते त्यांना. मी त्यांना शोभत नाही असे म्हणणे आहे त्यांचे. असं असताना त्यांच लग्न जबरदस्तीने माझ्याशी लावून दिलंत तुम्ही. 

सासूबाई - अगं सुमन ज्या मुलीबद्दल तो बोलतो आहे ती मुलगी दुसऱ्या धर्माची आहे म्हणून आम्ही तिला नाकारली नाही गं. तर ती मुलगी फक्त पैशासाठी राजसोबत आहे म्हणून. 

सासरे - हो सुमन बेटा, राजने आम्हाला जेव्हा तिच्याबद्दल सांगितले आणि तिचा फोटो दाखवला तेव्हा आम्ही त्याला बघू असे सांगितले. नंतर आम्ही तिला भेटायला ही बोलावणार होतो पण दोन दिवसांनी मी बाजारात काही कामानिमित्त गेलो होतो तेव्हा तिला एका मुलाच्या बिल्डिंगमधून खाली येताना पाहिलं. तिचा मला धक्काही लागला. तिचा धक्का लागला तरी मलाच वाईट बोलत होती ती. तिला माहित नव्हते की मीच राजचा बाप आहे. वर त्या मुलाला उद्या राज कामानिमित्त बाहेर जाणार आहे तेव्हा उद्या रात्री मी येते असं देखील म्हणाली. 

सासूबाई - हो राज तिच्यावर पैसा देखील पाण्यासारखा उधळत आहे. तेव्हा फक्त पैशासाठी ती राज सोबत आहे हे आम्हाला कळले. आम्ही यावर राजशी बोललो तर तो म्हणाला, " ती दुसऱ्या धर्माची आहे म्हणून तुम्ही खोटं बोलून लग्नाला नकार देताय. " आम्ही त्याला खूप प्रयत्न केला समजवण्याचा पण काहीच नाही झालं.  त्यावेळी तुझ्याबद्दल कळलं. मग माझ्या मुलाला यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही तुमचं लग्न लावल. आम्हाला वाटल की लग्नानंतर राज तुझ्यात गुंतून तिचा विचार सोडेल. पण आता असं वाटतंय की फार मोठा गुन्हा केलाय आम्ही. 

सुमन - आई असं नका म्हणू. पण माझ्याशी लग्न लावण्याआधी तुम्ही त्यांच्या डोळ्यावर असणारी पट्टी काढायला हवी होती. आता आपण काही केले तेही त्यांना ते पटणार नाही. 

सासूबाई - तुझं खरं आहे सुमन. आमचंच चुकलं. पण सुमन काहीही झालं तरी आम्ही दोघंही तुझी साथ सोडणार नाही बेटा. मग भलेही राजशी नातं तोडावं लागलं तरीही. 

सासू - सासर्यांकडून असे आपुलकीचे बोलणे ऐकून सुमनला बरे वाटते. सुमन म्हणते, 

सुमन - आई --बाबा, तुम्ही एवढा विचार करून लग्न केलंत त्यामुळे मी पण एकदा यांचं मन वळवण्याचा प्रयत्न नक्की करेन. 

सुमनचे बोलणे ऐकून आई बाबांना एक आशा वाटू लागली. 

संध्याकाळी जेव्हा राज घरी आला तेव्हा सर्व नॉर्मल बघून त्याला आश्चर्य वाटलं. आणि सुमन रागावून घर सोडून जाईल ही अपेक्षा ही त्याची भंगली होती. कोणीही त्याला काहीही बोलले नाही. सुमन आता जास्त काही न बोलता राजची कामे वेळेवर करून ठेवायची. राजला भांडायला काही कारण मिळेल असे ती काही बाकी ठेवत नव्हती. तरीही राज सुमनकडे सर्रास दुर्लक्ष करीत होता. आज ना उद्या बदल होईल या आशेवर सुमन होती. 

एके दिवशी नणंदेच्या आग्रहासाठी सुमन थोडे केस कापते. तो बदल राजच्या लक्षात येतो. राज सुमनला म्हणतो, " तू काहीही केलंस तरी तू गावठीच राहणार आहेस. " 

हे ऐकून मात्र सुमनला फार दुःख होते. 

राजच्या under असलेल्या एका प्रोजेक्टला खूप Success मिळाल्याबद्दल पार्टी होती. ज्यात राजची ऑफिसमधली त्याची gf रिया देखील होती. काही कारणाने ती पार्टी राजच्या घरी करण्याचे ठरवले जाते. राज सुमनला स्पष्ट सांगतो., " तू माझे मित्र - मैत्रीण असेपर्यंत बाहेर यायचे नाही. " 

क्रमश..... 

तुझी लायकी एवढीच १

https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-yevdhich

तुझी लायकी एवढीच २

https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-evdhich-2

तुझी लायकी एवढीच ३

https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-evdhich-3

🎭 Series Post

View all