तुझी लायकी एवढीच ३

--

तुझी लायकी एवढीच ३ © आरती पाटील 


( राज आणि सासू - सासऱ्याचे बोलणे ऐकून सुमन चक्कर येऊन पडते. )


सुमन खाली पडते आणि आवाज ऐकून सर्वजण बाहेर येतात. सुमनला खोलीत हलवतात आणि डॉक्टरांना बोलावतात. डॉक्टर येवून तपासतात आणि काही औषधं लिहून देतात. डॉक्टर गेल्यावर सुमनच्या सासूबाई म्हणतात, 

सासूबाई - " सुमनने आपले बोलणे ऐकले तर नाही ना..? " यावर राज बेफिकिरपणे म्हणतो, 

राज - " ऐकले असेल तर ऐकले असेल. मला फरक पडत नाही. "  सुमनचे सासरे राजचे असे बोलणे ऐकून चिडतात. 

सासरे - " त्या मुलीला आम्ही आमची सून करून आणली आहे. तिला असा त्रास देऊ नकोस. " यावर राज म्हणतो, 

राज - सून तुमची आहे. मी तिला बायको मानत नाही. 

यावर बराच वादविवाद होतो. राज रागाने बाहेर निघून जातो.

सुमन शुद्धीवर येते आणि विचारात गुंग असते. सासूबाई आणि सासरे येऊन तब्बेतीची विचारपूस करतात. सुमन त्यांना त्यांच्या आणि राजच्या बोलण्याविषयी विचारते. ते तिला उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यांचे ते वागणे पाहून सुमनच्या लक्षात येते की हे सर्व खोटं बोलत आहे. तरी ती जास्त वाद न घालता गप्प बसते. राजचे घराबाहेर राहणे ही वाढले होते. 

काही दिवसांनी राज phone वर बोलत असताना सुमन तिथे येते आणि ती राजच बोलणं ऐकते. राजला कोणीतरी एका कार्यक्रमाला बोलावित होते सहपरिवार. राजचं बोलणं संपत आणि सुमन राजला म्हणते, 

सुमन - कधी जायचं आहे आपल्याला ?  

राज - कुठे...?? 

सुमन - आता तुम्ही phone वर बोलत होतात ना. कोणत्यातरी कार्यक्रमाचे आमंत्रण आहे ना. त्यालाच कधी जायचं आहे. कधी जायचं आहे आताच सांगितले तर त्यानुसार तयारी करता येईल आणि दुसरे काही त्यादिवशी ठरवायला नको. 

राज - आमंत्रण आहे पण मी एकटाच जाणार आहे. त्यामुळे त्याचा विचार तू करू नकोस. 

सुमन - का ?  सहपरिवार बोलावणं आहे ना? 

राज - हो सहकुटुंब, सहपरिवार बोलावणं आहे पण तूला तिथे नेवून मला चारचौघात माझी लाज काढायची नाही. 

सुमन - तुम्हाला माझी लाज वाटते ?  ( आश्चर्यने )

राज - हो, गावठी बायको मिरवायला नेऊ का मी कार्यक्रमात?  

सुमन - तुम्हाला माझी एवढीच लाज वाटते तर तुम्ही माझ्याशी लग्न का केलंत ?  

राज - ( रागाने ) हौसेने नाही केले मी लग्न. जबरदस्तीने कराव लागलं आहे. माझं प्रेम माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीवर आहे. ती ख्रिश्चन आहे. म्हणून माझ्या घरच्यांनी लग्नाला नकार दिला. आणि आईने जीव देण्याची धमकी दिली म्हणून नाईलाजाने मला लग्नाला उभे राहावे लागले. अजून एक तूला एवढं कळलंच आहे तर सर्वच सांगतो. मी बऱ्याचदा घराबहेर असतो ते तिच्यासोबतच असतो. ती मला शोभेल अशीच आहे. माझ्यासारखा पार्टनर मिळण्याची तुझी लायकी नाही. 

राज तिथून निघून जातो. सुमन मात्र हतबल, दुःखी होवून डोळ्यात अश्रू घेवून नक्की आपल्या कोणत्या पापाची शिक्षा मिळतेय त्याचा विचार करत असते. 

क्रमश...... 

तुझी लायकी एवढीच १

https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-yevdhich

तुझी लायकी एवढीच २

https://www.irablogging.com/blog/tujhi-layki-evdhich-2

🎭 Series Post

View all