Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कविता

तुझे समर्पण

Read Later
तुझे समर्पण
राज्यस्तरीय करंडक कविता 

विषय - दोन ध्रुवांवर दोघे आपण...

शीर्षक - तुझे समर्पण

उत्तर-दक्षिण... दक्षिण... उत्तर...!
आस एक अन् दोघे आपण!
ओढ कितीही गोड जरी ही,
दोन ध्रुवांवर दोघे आपण...!

क्षणिक नसावे हे आकर्षण!
मम हृदयावर तुझेच गोंदण...!
आतुरलो जरी तुज भेटाया,
दोन ध्रुवांवर दोघे आपण...!

नकोच देऊ कुठले कारण!
भेट प्रिये अन् दे आलिंगन...!
उठता काहूर... तुटेल संयम,
दोन ध्रुवांवर दोघे आपण...!

पार्वती तू अन् मी संकर्षण!
संघर्षाचा पर्वत जीवन...!
देता येते साथ कुठे पण!
दोन ध्रुवांवर दोघे आपण...!

तुझे शब्द अन् तुझीच गाणी!
कवितेमध्ये तुझी कहाणी...!
जपले तुजविन हे वेडेपण!
दोन ध्रुवांवर दोघे आपण...!

आसं टिकावी... ओढ जपावी!
अक्षय राहो हे आकर्षण...!
तुझ्या मनाचा होण्या दर्पण...
मला उमगण्या तुझे समर्पण....
पवित्र प्रीती.. जपूत बंधन...!
सदैव राहू असेच आपण...
दोन ध्रुवांवर दोघे आपण...!

©तृप्ती काळे

नागपूर टीम

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

तृप्ती काळे

सहायक कक्ष अधिकारी

हे तर एक दिवस तुम्ही लिहाल....

//