Feb 23, 2024
नारीवादी

तुझे माहेर माझी जबाबदारी

Read Later
तुझे माहेर माझी जबाबदारी
राम लग्नानंतर स्वातीला खूप आदरने सांभाळत होता आणि तिला भाऊ नसल्याने तिच्या आई वडिलांची खूप काळजी घेत असत, त्यांना कोणतीच कमी पडू देत नव्हता, कोण मुलगा जशी जबाबदारी घेईल तशी तो जबाबदारी घेत होता ,स्वातीला ही ह्या मुळेच राम बद्दल खूप प्रेम आणि आदर होता. लग्नाआधी त्यांचे ठरले होते की मला भाऊ नाही आम्ही दोघी बहिणीच आहोत आमच्या आई बाबांची सर्व काही,मग एका अटीवर मी लग्नाला तयार आहे,ती म्हणजे माझ्या यावी बाबांची जबाबदारी तू ही तितकीच घ्यायची जितकी मी तुझ्या परिवाराची घेणार..... बघ मग अट मंजूर असेल तरच लग्नाला हो म्हण नाहीतर तू इतर वाटा आहेत आपल्याला.


रामच्या घरी त्याचे आई बाबा आणि एक बहीण तिचे अजून लग्न झाले नाही पण ठरले होते, त्याला स्वतःच्या लग्नाआधी त्याच्या बहिणीचे लग्न करायचे होते. त्याला त्याच्या आई वडिलांच्या इच्छे नुसार बहिणी साठी एक नौकरदार मुलगा शोधायचा होता, आणि त्याने बहिणींचे लग्न थाटामाटात करून देण्याचे कबूल केले होते.


इकडे तो स्वातीला हो ही नाही म्हणाला आणि नाही ही, त्याने विचार करायला वेळ मागितला, तो वेळ म्हणजे त्याच्या बहिणीच्या लग्नापर्यंत होता, त्याला स्वातीला घरी आणण्याच्या च्या आधी बहिणीची सगळी हौस मौज पुरवायची होती म्हणून, त्याला माहित होते की एकदा की बहिणीच्या आधी माझे लग्न झाले तर बायकोला हा केलेल्या खर्चाचे गणित पटले नाही तर वाद, मन मोटाव होईल, म्हणून आधी माझी बहिणी माझे तिच्या प्रति कर्तव्य महत्त्वाचे आहे.

बहिणींचे लग्न झाले आणि तो स्वातीला तिच्या अटी साहित स्वीकारायला आणि लग्नाला होकर द्यायला गेला, त्याच्या आईवडिलांची परवानगी घेऊन तो रीतसर मागणी घालायला गेला।

लग्न जमले आणि पार ही पडले.....


लग्नानंतर जसे ठरले तसे कधी कधी तो तिच्या आई बाबांची काळजी घेत,त्यात त्यांना ती एकवेळ जितकी काळजी घेत नसत तितकी काळजी तो घेत, त्यांना दवाखाना, औषध पाणी बऱ्याचदा हाच जावई करत, तिच्या बहिणीची परिस्थिती बेताची असल्यामुळे तो जावई काही जबाबदारी उचलत नसत.

स्वाती मात्र सासरी म्हणावी तशी जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करत,तिचे सगळे मन आणि ओढ ही फक्त माहेरीच असत, तरी राम तिला बऱ्याचदा बोलला, ज्या अटी प्रमाणे ठरले त्या अटी नुसार मी तर निभावत आहे पण तुझे ही काही सासर प्रति कर्तव्य आहेत,त्यांना तुझी ही आधाराची, प्रेमाची गरज आहे, ते मला तुला का आठवून द्यावे लागत आहे. तरी स्वातीला त्याचे बोलणे ऐकून ही ती मात्र जशी आहे तशीच.

एकदा राम ने आपल्या आई वडिलांना घरी पाठवण्यासाठी काही किराणा समान घेतले,बहिणीच्या मुलांना विविध प्रकारची biscuits घेतले,चोकॉलेट घेतले ,हे इतके सगळे समान बघून स्वाती एकदम ओरडली ,इतके खर्च करायची काय गरज होती, सगळे तूच करणार का, तुझा भाऊ काहीच जबाबदारी घरणार नाही का.

आपण का सगळा खर्च करायचा तुझ्या घरचा, एक तर आपल्याकडे पैसे नाहीत आणि तू उधळण करत आहेस.
त्याला स्वतीच्या वागण्याचा खूप राग आला होता ,दोघात वाद होणार इतक्यात तिच्या आईचा फोन आला.

स्वातीची आई म्हणत होती,स्वाती अग सकाळी मी जावई बापूला फोन केला होता,पैस्याचे अडचण आहे तर त्यांनी दहा हजार रुपये काही न बोलता पाठवून दिले आणि सोबत आमचा किराणा ही पाठवून दिला ,किती काळजी घेतात ग ते आमची ,देव माणूस आहे ग ,सोन्यासारखा जावई आहे ग अगदी.

स्वातीला स्वतःचा खुप राग आला........आपला नवरा ह्या काही अडचणी मला न कळवता परस्पर माझ्या आई वडिलांना मदत करतो .....आणि मी किती किती पायाजवळ बघते ...खरे तर त्याने त्याच्या आई वडिलांचे न करू ही नीच भावना माझ्या मनात कशी येऊ शकते ...

तो देव माणूस आहेच पण मी त्याला शोभत नाही...
माझ्या मनाला ही माझे वागणे पटत नाही.  जो इतरांची इतकी काळजी करतो त्याच्या आई वडिलांची काळजी करणे माझे ही कर्तव्यच आहे.

मी आदर्श मुलगी तर होत आहे ते ही माझ्या नवऱ्याच्या मोठेरपणावर पण मला एक आदर्श बायको आणि सून होता आले नाही, स्वार्थी तरी किती असावे ,ह्याचा विचारून तिला खजील झाल्या सारखे झाले.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Anuradha Andhale Palve

Government Job

... I Search My Identity In Being A Writer Of My Soul

//