तुझं घर कुठे आहे?

“किती मारलं आहे गं, त्या माणसाने एखादया जनावराला ही कोणी मारणार नाही ..” तिने सर्व घडलेली घटना सांगून दिली .आई मी जाणार नाही,ते माझं घर नाही. “ठिक आहे नको जाऊस ,मी ही जाऊ देणार नाही. मी तुझ्यासोबत आहे, ” आई ...
      तुझं घर कुठे आहे?
     
          “चालती हो, माझ्या घरातून आत्ताच !” .... राजेशने तीला हाताला पकडून दरवाज्याच्या बाहेर ढकललं ... मी जाणार नाही . हे माझं सुदधा घर आहे . ... मीरा आणि राजेश पाच वर्ष झाली यांच्या लग्नाला परिसारखी एक मुलगी श्रीशा .. राजेशचा संशयी स्वभाव , कोणासोबत बोलणं नाही , बाहेर पडणं नाही ... बाहेर जातांना राजेश गेटला कुलूप लावून जात असे .कोणत्याही गोष्टीचा राग आला की मारहाण चालू व्हायची . खूप कंटाळली ती तरीही संसार करत होती .. फोनवर बोलणे ही नाही, जर बोलायच म्हटलं की समोर असतांना बोलायचं .. कोणासोबत बोलली तर का बोलली ? हसली तर का हसली ? आज ही तेच कारण मिळालं त्याला मद्यपान करून मारहाण करत होता आणि आज तर हद्द पार केली त्याने , बेल्ट ने तीला जनावरासारखे मारले ... आज तर कहरच केला .. ती रडतच अंगणात कितीवेळ बसली ..स्वतः हाकलून देताय नं त्यांच्या घरातून , मी परत येणार नाही तिने तिच्या मनाचा पक्का निर्णय केला. ती अंगणात बसलेली उठली , सरळ घरात जाऊन तीने तिच्या बॅगमध्ये तीचे आणि श्रीशा चे कपडे भरले आवश्यक कागदपत्र घेतली आणि सरळ बस मध्ये बसून ती तिच्या माहेरी गेली .. 

घरी गेल्यावर आईच्या गळ्यात पडून रडू लागली . आई ने तिला पाहिलं तीच्या अंगावर खूप लाल अन काही जखामांचे डाग होते . कानाला दुखापत झाली होती . आणि ते व्रण जखमा पाहून आई सुद्धा रडायला लागली ..

“किती मारलं आहे गं, त्या माणसाने एखादया जनावराला ही कोणी मारणार नाही ..” तिने सर्व घडलेली घटना सांगून दिली .आई मी जाणार नाही,ते माझं घर नाही.
 

“ठिक आहे नको जाऊस ,मी ही जाऊ देणार नाही. मी तुझ्यासोबत आहे, ” आई ...


            असेच दिवस जात होते पण मीराचं रडण थांबत नव्हतं दोन ते तीन महिने होऊ गेलेत .. शरिराच्या वरच्या जखमा हळूहळू भरत होत्या पण मनाच्या जखमांच काय? .. कायमची येथे राहायला आली ही तीच्या वहिनीने नाकतोड मुरडलं .आणि हळूहळू तीच्या वहिनी ने संगीताने कुरबूर करायला सुरूवात केली .. भावाच्या कानात बहिणीविषयी काहीबाही सांगू लागली .. नेहमी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा त्याला माहित होत त्याची बहिण कशी आहे ... खूप वेळा त्याने ऐकून घेतलं पण एक दिवस त्याने तीला संतापात एक कानाखाली मारली .
 किती दुख झाले ,त्या बहिणीला माझ्यामुळे याने आज वहिनीवर हात उचलला .. ती रडत बसली इथेही माझी चूक आहे का? .... हक्काचं माहेर ही परकेपणाच घर झालं. इथे आपण परके आहे अस वाटायला लागलं येथे ही जास्त दिवस नाही राहू शकत माझ्यामुळे त्यांच्या संसारात अडचण नको ..
श्रीशा येऊन म्हणते ,”मम्मी तुझं घर कुठेयं गं? का गं काय झालं ...

 
“ दिदी म्हणते हे तुझं घर नाही. मग तुझं, माझं आपलं दोघाचं घर कुठे आहे गं ...”
काय सांगू तिला हे ही घर तीचं नाही ती विचार करू लागली ...

 लग्नाआधी सर्व म्हणायचे ,तुला दुसऱ्यांच्या घरी जायचं आहे तुझ्या घरी जे घर तुझं असेल... आणि लग्न झाल्यावर नवर्याने एक मिनिट च्या आत घरातून हाकलून दिलं .. मग माझं हक्काचं घर कुठेयं??.. कुठे आहे ? ... आज ही तिला प्रश्न पडला .. रात्रभर विचार करू लागली . माझं हक्काचं घर इथेही नाही मी कुठे जाऊ ..आणि जाण्यासाठी कधी घराबाहेर ही पडली नाही असं अचानक ... माझं शिक्षण पूर्ण झाल नाही, अर्धवट शिक्षणावर कोण नोकरी देईल? .. कधी ही घराबाहेर न पडणारी ती घराबाहेर गेल्यावर काय करू? थोडाही आत्मविश्वास नाही .. श्रीशाचं कसं होईल, तिचं शिक्षण, बाकीचा खर्च ? .. असे खूप सारे प्रश्न तीला भेडसावत होते ... त्या रात्री तीला झोप लागली नाही . विचार करून करून डोकं दुखायला लागले .. शेवटी कसा बसा तीचा डोळा लागला आणि श्रेशा च्या चुळबुळीने लवकरच जाग आली .... तिने तिचं पटकन आवरून आईजवळ श्रीशाला सोडून ती घराबाहेर पडली . घराबाहेर पडल्यावर बाहेरच्या जगाचं तिला आज दडपण आलं .. इकडे तिकडे काम शोधू लागली . पण काम मिळणे ही कठिण आणि तीला त्यात कोणत्या कामाचा अनुभव नाही . आज तीला शिक्षणाचं महत्त्वं कळाल ... ती एका ठिकाणी गेली तिथ तीला काम तर मिळालं पण फक्त पाच हजार रुपये महिना ते ही ब्युटी सलून मध्ये... आणि पाच हजार मध्येतर महिना चालवणं अशक्य आहे... त्यासोबत तीने शेजारी ओळखीच्या लोकांना मेंहदीच्या ऑर्डरबद्दल सांगितले ती काम करू लागली शिकू लागली ... मेंहीदीच्या ऑर्डर घेऊ लागली ... मेंहदीचे फार कौतुक होऊ लागले ... पार्लरचे काम ही अगदी सराईतपणे करू लागली . आत्मविश्वास वाढला त्यासोबत मेहनतही वाढली . . एक छोटी खोली भाड्याने घेतली . तीथं तीच्या आईला घेऊन तिथे तीने तीचा एकटीचा संसार उभा केला ... पण एकटी आहे न ती एकटी असल्यावर बाईकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. ... वाईट चालीची म्हणून नवर्याने सोडून दिली ... हे बोलणारी ही कोण आहेत तर ही एक स्त्रीचं आहे .. कधीकधी स्त्रीला समजण्यात एक स्त्रीच मागे पडते ... सगळ्या संकटांना तोंड देत पुढे जात होती , पडत होती , उठत होती आईची साथ आणि पूर्ण विश्वास तिच्या मुलीवर ती कुठेही चुकली नाहीय .. तीने तीचं स्वतः च पार्लर सुरु केलं. हळूहळू वस्तू घेत गेली ग्राहक वाढत गेले . छान प्रकारे तीचा जम बसला .. दुसऱ्या शहरातून ही ऑर्डर मिळू लागल्या .. श्रीशा अभ्यासात हुशार असल्यामुळे जास्त मेहनत घ्यावी लागली नाही तीची प्रगती पाहून तीला खुश पाहून मीरा चा सर्व शिणवटा निघून जात असे आनंदी होत असे .. ती श्रीशाचा भविष्याचा विचार करत होती श्रीशाला खूप शिकवायचं आहे. ..ती पुढे जात होती .. तीने सेविंग करून आणि काही लोन घेऊन स्वतःच हक्काचं घर घेतलं ... तिच्या छोट्या दुकानाचं रूपांतर मोठ्या दुकानात झालं .. सर्व छान चालू होत पण काहीतरी सुटतयं ,काहीतरी राहिलं आहे अशी खंत मनात होत होती . आणि एका दिवशी रस्त्यावरून जातांना एक महिला तिच्या छोट्या बाळाच्या सोबत रडतांना दिसली. तिला तिचा भूतकाळ आठवला तिला तीचं स्वतःह उभी आहे अस वाटू लागले , तडक तिथे गेली ...तिने तिथं जाऊन आधी त्या बाईला पाण्याची बॉटल दिली .. पर्समधून काढून त्या बाळाला चॉकलेट दिलं तो बाळ मिटक्या मारत खाऊ लागला ... बाळाला जवळ घेऊन त्याच्या गालाला हात लावून त्याचं नाव विचारलं ... त्याने त्याच नाव सांगितल ''सोहम' . खूपच गोड नाव आहे तुझं ... तोपर्यंत ती बाई शांत झाली .. काय झाले आहे ते तिने सांगितले .. तुझ्याकडे पैसे आहेत जाण्यासाठी तिने हो म्हणून सांगितले ..मीराने तीला तीच कार्ड दिलं आणि तुला कधीही गरज पडली की मला फोन कर किंवा माझ्या घरी ये अस सांगून तीला गाडीत बसवून दिले ... विचार करत घरी आली माझ्या सारख्या कितीतरी मीरा असतील त्यांना त्यांच हक्काचं घर शोधत असतील , त्यांना आता मी साथ देणार त्यांनाच त्यांच हक्काचं घर देणार . त्याप्रमाणे मीराने कामाला सुरुवात केली ... दोन वर्षामध्ये तीने हक्काचंघर पूर्ण केलं त्या घराला ‘मातोश्री’ हे नाव देण्यात आले. येणाऱ्या महिलांना शिक्षण ,प्रशिक्षण देत आहे त्यांना स्वावलंबी बनवण्यात येत आहेत. स्वाभिमाने जगायला शिकवत आहेत. 

            श्रीशा आज शिक्षण करून DCPश्रीशा मीरा इनामदार झाली. त्या ड्रेसमध्ये पाहून मीराला गहिवरून आलं . ‘शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि जो तो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही’, हे आज मीराला समजलं. स्त्रीने स्वावलंबी होणे आवश्यक आहे . तीला स्वाभिमाने जगता आले पाहिजे. आज तिला तिच्या मुलीच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेल आहे .. आणि दुसऱ्यांसाठी हक्काच्या घराचे दरवाजे आणि शिक्षणाचे दार खुले केले आहेत...

समाप्त..
 
प्रिय वाचक मंडळी प्लिज लाईक आणि कमेंट करा तुमच्या प्रतिसादावर  हुरूप येतो लिहायला 
व्याकरणांच्या चुकांसाठी क्षमस्व

धन्यवाद ...