Aug 09, 2022
प्रेम

तुहिरे... कसं जगायचं तुझ्याविना 10

Read Later
तुहिरे... कसं जगायचं तुझ्याविना 10

भाग १०


 

एक महिना झाला होता माही ला जॉब सुरू करून..आता माही पण ऑफिस मध्ये छान रुळली होती तिचा सगळ्यांसोबत छान पटायचं  फक्त रिया टीना सोबत जास्ती बोलणं नाही व्हायचं....त्या तिला काकूबाई च म्हणायच्या...नी माही च सगळ्यांसोबत चांगलं जमायचं  म्हणून त्यांना जेलेस फील व्हायचं...... अर्जुन ला सुद्धा ती काकूबाई च वाटायची...आता कोणी असं असतं काय त्याला प्रश्नच पडायचा.

आतापर्यंत अर्जुन ३-४ दा ऑफिस मध्ये येऊन गेला होता... तो केबिन मध्ये बसला असला की त्याचं माही ला बघणं सुरू असायचं.....कितीही व्यवस्थित करायचं म्हटले तरी तिचा गोंधळ उडायचाच...तिची ती धांदल , गडबड बघून त्याला कधी हसू यायचं कधी इरिटेट व्हायचं....पण कुठल्या पण दिलेल्या कामाला ती कधीच नाही म्हणायची नाही, आला नाही तर ती शिकून घ्यायची .... तिची ती शिकण्याची जिद्द नी आवड बघून कधी त्याला तीच कौतुक पण वाटायचं...२-३ दा काही ना काही कामावरून अर्जुन माही आमनेसामने पण यायचे .. तुटफुट, पडापडी काही ना काहीतरी व्हायचंय ....अर्जुन इरिटेत व्हायचा  पण बाकी माहीच्या कामात त्याला कुठेही चूक सापडली नव्हती ...त्यामुळे कामावरून काढायचा प्रश्न तरी नव्हता.....माही तीच दिलेले काम अगदी मन लावून करायची....काही काही गोष्टी तिला समजायच्या नाही पण गोपाल नी बाकीचे तिला ते शिकवायचे ... गोपाल त अगदी लहान बहिनिसरखा तिला समजून सांगायचा......

माही ला तिची पहिला पगार सुद्धा भेटला होता.. खूप खुश होती ती नी तिच्या घरचे सुद्धा ..,.बापाच्या देवळात जाऊन ती बाप्पा ला धन्यवाद सुद्धा करून आली होती...घरी सगळं छान सुरू होत ....

माही ने आजींच ड्रेस डिझायनिंग पण जॉईन केले होते ...प्रत्येक रविवारी नी सुट्टीच्या दिवशी ती घरी जायची काम करायला... ड्रेस डिझायन च आजी नी नलिनी च बघायचे ... तर त्यांनी छोटंसं ऑफिस तिथे त्यांच्या बंगल्याचा तिथेच सुरू केले होते ...तिथे काही बायका काम करायच्या ...माही त्यांना समजावून सांगायची ...डिझाईन बनवणं , त्यावर कुठला वर्क करायचं वैगरे सगळं माही आजी नी नलिनी सोबत डिस्कस करायची त्यामुळे तीच कधी कधी घरात जाणं व्हायचं त्यामुळे घरात पण बरेचसे लोक तिला आता ओळखायचे.....अर्जुन ची मोठी बहीण अनन्या तिची ६ वर्षाची  मुलगी  रुही पण तिथे राहत होती.. अनन्य चा नवरा काही कामानिमित्त भारत बाहेर कामासाठी म्हणून गेला होता , रुही सोबत माही च फार छान जमायचं..अगदी  ,...मामी सोडून तिचं सगळ्यांसोबत छान जमायचे... अर्जुन चा नी तिचा कधी घरात आमना सामना झालेला नव्हता.... अर्जुन लां महिती होत कुणी माही घरातील महिला मंडळ ला जॉईन झाली आहे पण ती हीच मही आहे त्याला माहिती नव्हते ... आजी कडून त्याने खूप कौतुक ऐकले होते .....

********

ऑटो अचानक थांबला , काय झालं दादा.... माही

मॅडम ऑटो बंद पडला .,....ऑटो ड्रायव्हर

अरे अस कसं .. ऑफिस ला जायचं ना मला उशीर होतोय....माही

मॅडम इथून जवळच आहे ऑफिस ... तुम्ही चालत जावा....२ मिनिटात पोहचाल.....त्याने एक शॉर्टकट छोटा रस्ता दाखवला.....

माही ऑटो ड्रायव्हर ला पैसे देऊन त्याने सांगितलेल्या रस्त्याने निघाली .... छोटी पायवाट होती ती .....

काय चमेली आजच तुला खराब व्हायचं होत, हा ऑटो पण आताच बंद पडला होता ..... आज ताई चा वाढदिवस आहे ... घरी पण लवकर जायचं.... ठाकूर सरांकडून भेटून जाईल तशी परमिशन... काम पटापट आटोपून घेऊ म्हणजे लवकर निघायला मोकळं... स्वतःशीच बडबड करत माही जात होती , समोरच जवळ आल होत ऑफिस ...

चालता चालता पुढे बघून ती थबकली.... समोर दोन कुत्रे उभे होते .... माही ला कुत्र्यांची फार भीती वाटायची....

बापरे हे कुठून आले ....माही करंगळी तोंडत टाकून भीती ने त्यांच्या कडे बघत होती....

त्यातला एक कुत्रा तिला बघून भुंकला... तशी ती भयंकर घाबरली नी तिथून तिने धूम ठोकली...

बचाव बचाव करत ती मागे बघत पुढे धावत होती, कुत्रा पण तिच्या मागे धावत होता....

ऑफिस लहान होत त्यामुळे त्याला कंपाऊंड वैगरे नव्हती....

माही ओरडतच ऑफिस मध्ये घुसली नी घाबरतच पळत होती, रस्त्यात आलेल्यांना धडकत होती....नी समोर जाऊन एका भारदस्त छातीवर जाऊन ती  आदळली......ती पडणार की त्याने तिला सांभाळून पकडले......तिने त्याच्या कॉलर ला घट्ट पकडले .. ..तिने डोळे बंद करून घेतले...... .पण   बचाव बचाव तीच सुरूच होते......

stop.......! जोरदार तो बोलला
तशी माही चूप झाली ....आवाज ओळखीचा वाटतोय .......तिने एक डोळा उघडून बघितला  ..तशी ती दचकली तिने दोन्ही डोळे उघडले नी त्याची कॉलर सोडून नीट उभी राहत होती...

मेली मी, आज काही खरं नाही तुझं माही... मागे कुत्रा.... समोर ड्राकुला.... देवा वाचवं .,..अर्जुन कडे एकटक बघत मनातच माहीची बडबड सुरु होती...

तेवढयात सेक्युरिटी गार्ड आला

मॅडम ही तुमची ओढणी....तिच्याकडे ओढणी देत बोलला...

ती धावत असताना कुठेतरी अडकून ती ओढणी पडली होती

माही ने स्वतः कडे बघितले  मग अर्जुंकडे ... मग तिथे उभे असलेल्या सर्वांकडे बघून ओढणी नीट घेतली...

अर्जुन काही महत्वाच्या client's सोबत तिथे बोलत उभा होता...

अर्जुन ने रागानेच तिच्या कडे बघितले....नंतर ऑफिस वर नजर फिरवली..... what's this ms देसाई...? अर्जुन ओरडलाच...

माही ने सुद्धा ऑफिस वर नजर फिरवली....बापरे हे काय झालं ....मनातच माही बोलली

सगळं अस्ताव्यस्त पडलं होत , काही समान फुटलं होत..पेपर्स उडाले होते.......ती धावत आली तेव्हा टेबल  वैगरे ला धक्का देत आली होती..तेव्हा हे सगळं घडलं होत ...

ms देसाई....?.... बोला....अर्जुन

स....सर.....ते चुकून ..... मी मुद्दाम नाही.... त....ते ....कुत्रा.....ती अडखळत बोलत होती...

काय....? बरोबर बोला....अर्जुन

सर ते मी येत होते तर ते तिथे कुत्रे होते..... माझ्या मागे लागला......ती घाबरतच बारीक आवाजात बोलली

व्हॉट......? तू कुत्रा ला घाबरून ही अशी वागली..... impossible.... अर्जुन

सर किती भयंकर भुंकत होते ते ....तुमच्या मागे लागले तर कळेल तुम्हाला...तिच्या तोंडातून निघाले..... माही हे काय बोलली तू .....तिने दोन्ही हात तोंडावर ठेवले..

तिच्या वाक्याने सगळे हसायला लागले....

shut up... गेट बॅक to your work, right now .... अर्जुन ओरडला तसे सगळे सगळे आपल्या डेस्क वर जाऊन बसले... सगळी कडे शांतता पसरली

माही तशीच त्याच्या समोर उभी होती ......

तुम्हाला वेगळं सांगावं लागेल काय आता......अर्जुन

स....s....sorr..... माही

go sssss.............. Arjun ओरडला तशी माही घाबरतच पळाली,  तिच्या जागेवर जाऊन बसली.

सॉरी mr Shah..... अर्जुन

ohh..it's okay...mr Shah

okay then will fix meeting next week ...see you then .... अर्जुन

sure..... mr Shah शेक हांड करून निघून गेले...

अर्जुन केबिन मध्ये जाऊन बसला...

ऑफिस मध्ये अर्जुन दोन employee वर आतापर्यंत ओरडला होता ....
मेन ब्रांच मधून फोन आला होता त्याची महत्त्वाची मीटिंग कॅन्सल झाली होती...वरून माही नेेाा येवढा गोंधळ घातला होता .....त्यामुळे त्याचा मूड पण थोडा खराब होता .

बापरे आज काही खर दिसत नाही माही , ड्राकुला चा मूड पण खराब दिसतोय....तू पण आज गडबड करून ठेवली.......जात का नाही आहेत हे आज , इथेच का बसलेय आज... माही आपलं एक एक काम संपवत मनातच बडबड करत होती..

तिने तिचे बरेच काम संपवले होते.. थोड जे काही उरले होते ते ४ वाजेपर्यंत होऊन जाणार होते ...ती परमिशन मागायला ठाकूर सरांच्या केबिन मध्ये गेली...

मी आत येऊ.... डोर नोक करत नाही बोलली

हा या ms देसाई......ठाकूर
माही आतमध्ये आली
बोला ms देसाई ...काय काम होत...ठाकूर

सर आज मला लवकर घरी जायचं होत .... माझं बहुतेक काम झालेय, थोड राहिले ते ४ पर्यंत पूर्ण होऊन जाईल...माही

ms देसाई.. आज अर्जुन सर आहेत ऑफिस मध्ये, मला नाही वाटत मी तुला सुट्टी देऊ शकेल... त्यांचा मूड पण ठीक दिसत नाहीये....ठाकूर

सर प्लीज ... माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे ...जाऊ द्या ना ....माही

हे कारण तर ते ऐकूनच नाही घेतील..... सॉरी...तू असा कर ना त्यांनाच जाऊन विचार...ठाकूर

सर मी..?....माही

हो... जा ....ठाकूर

माही बाहेर येऊन तिच्या डेस्क वर जाऊन बसली

यार माही घरी तर सांगून आलोय आपण लवकर येऊ.... कसं करायचं.....आजच यांना इथे यायचं होत, त्यात सकाळी आपण नको ती गडबड करून ठेवली........ चला माही मॅडम एकदा प्रयत्न करून बघूया.....मनातच विचार करत ती अर्जुन च्या केबिन च्या समोर येऊन उभी राहिली...

जाऊ की नको.... मघाशी त्या दोघांवर किती ओरडलेत सर... माझ्यावर पण ओरडलेत तर..,..नाही पण मी माझं काम तर केलेय....ती करंगळी  दाताने चावत तिथेच उभी होती

अर्जुन तिच्याकडेच बघत होता... काय चाललंय हीच १० मिनिटं पासून, अशी काय इथे उभी आहे ....विचित्र च आहे .... तिचे हावभाव बघत अर्जुनाच्या डोक्यात सुरू होत

ms देसाई तिथे काय करताय , आतमध्ये या... अर्जुन थोडा जोर्याने बोलला

यांना कसं कळलं मी इथे उभी आहे ते .... जादूगार दिसतोय हा ड्राकुला....ती परत विचार करत तिथेच उभी होती

come inside ms Desai.... अर्जुन ओरडला

तशी ती दचकली नी हळूच दार उघडून आतमध्ये आली नि अर्जुन पुढे जाऊन उभी राहत एकटक त्याच्याकडे बघत होती, अजूनही तिच्या डोक्यात तेच सुरू होत , यांना कसा कळलं मी इथे उभी आहे ते ....

what......? अर्जुन
अं........तिची तंद्री भंग झाली त्याच्या आवाजाने

क..,.काय.... ? माही

बोला काय काम आहे ....? अर्जून

त.....ते..,ते तुम्हाला कसं कळलं मी बाहेर उभी आहे ते ....अडखळत माही बोलली

व्हॉट......तू मला यासाठी डिस्टर्ब केले...??अर्जुन ओरडला

स.... सॉरी.....सर...माही

हे बघ काही काम असेल तर बोल पटकन, नाही तर जा इथून...अर्जुन

स....सर ते मी आज लवकर जाऊ शकते काय....? माही

no.... अर्जुन

सर माझं काम झालेय..... ते वाढदिवस आहे .......? माही

don't argue with me ..... नी कोणी सांगितले तुझे का झाले ते ..... तिच्या कडे २-३ फाईल फेकत हे पूर्ण करा आधी....सकाळपासून फक्त गोंधळ घालून ठेवला आहे ते ......मला आजच या फाईल्स कंप्लीट पाहिजे आहेत ... समजलं ms देसाई.... अर्जुन त्याने आज दिवसभराचे फ्रस्ट्रेशन तिच्यावर काढले होते ...अर्जुन

तिने मान हलवली , नी वळणार तेच परत मागे फिरली...

आता काय....? अर्जुन तिच्या डोळ्यांकडे बघत होता .,

ते .ते.........माही त्याच्या कडे बघत...

turn and see...... अर्जुन , अर्जुन ला कळल होत तिला विचारायचं की त्याला ती बाहेर कशी दिसली ते ....

माही वळली , नी डोळे फाडत बघत होती....त्याच्या केबिन मधून सगळच दिसत होत....यांना तर सगळच कळत असेल बाहेर काय सुरू ते ....बापरे काय danger aahe ha ड्राकुला... कसं लक्ष ठेऊन आहे आमच्या सगळ्यांवर ...बापरे...म्हणत ती वळली तिने एकदा अर्जुन कडे डोळे फाडून बघितले......

go....... अर्जुन

माही फाईल घेत बाहेर पळत आली , समोरून peon येत होता त्याला जाऊन धडकली... नी हातातल्या फाईल खाली पडल्या...

अर्जुन ने डोक्यावर हात मारून घेतला .... हिला मी का सहन करतोय ....मनातच बोलला..

ऑफिस ची वेळ संपत आली होती, सगळे एक एक करून जात होते , गोपाल च पण आटोपले होते, नाही च काही पूर्ण व्हायचं नाव च घेत नव्हतं....ती तिच्या कामात मग्न होती, गोपाल तिच्यासाठी थांबला होता....

गोपाल जा तू ......माही

अगं सगळे गेलेत .... उद्या कर ना काम... गोपाल

अरे नाही आज च पूर्ण करायला सांगितले आहे ...माही
ठीक आहे थांबतो म्मी... गोपाल

अरे जा रे , peon सेक्युरोटी गार्ड आहेत की... करेल मी ... तू जा , वहिनी पण वाट बघत असेल ना माझी....माही

बरं ठीक आहे , पण काही गरज वाटली तर लगेच फोन कर....नी तू पण आटोप लवकर ....इकडे लवकरच सगळं सुमसाम होते.... गोपाल

हो....माही, माही आपल्या कामात गुंतली होती...

घड्याळी कडे बघत तीच काम सुरू होत ...
इकडे अर्जुन पण ऑफिस मधेच होता ...

तिनी काम संपवले नी सगळ्या फाईल्स सेंड केल्या ....

बापरे ९ वाजले .....घरी सगळे वाट बघत असतील, आत्याबाई काही आज सोडायच्या नाही आपल्याला...माही पर्स उचलून बाहेर आली...तिला आठवलं आज चमेली पण नाही आलीय.... अरे बापरे आता ऑटो शोधावा लागेल

ती रस्त्याच्या कडेने जाऊन थांबली....ऑटोची वाट बघत उभी होती...ऑटो काही सापडेना .... एक दोन आटो आले पण पहिलेच भरलेले होते .... आता पाऊस सुरू झाला ...विजा सुद्धा चमकत होत्या.....

अंधार खूप झाला होता, ती पावसात उभी होती, विजांच्या आवाजामुळे कापरी भरली होती...आता ती घाबरायला लागली

समोर टपरी वर दोन मुलं उभे तिला दिसले , ते तिच्याकडेच एकटक बघत असलेले तिला जाणवले .... आता तिच्या मनात खूप भीती भरली.... ते मुलं उठून तिच्या कडेच येत होते..... त्यांना बघून तिचे पाय थरथर कापायला लागले... तिला ती रात्र आठवली नी तिला आता रडु येत होते..ती रस्ता ओलांडायला जात होती, डोळ्यातल्या पाणी मुले तिला काहीच दिसत नव्हत .....एकदम तिच्या डोळ्यावर प्रकाश पडला नि तिने घाबरून तिच्या डोळ्यावर हाथ ठेवला.....

*******

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️