तुहिरे... कसं जगायचं तुझ्याविना 15

माही अर्जुन

भाग-15

माही आता अर्जुनच्या कॅलेंडर प्रोजेक्ट मध्ये जॉईन झाली होती, त्यामुळे अर्जुनने तिची ट्रान्सफर मेन  हेड ऑफिसला तात्पुरती केली होती..... माही पण खुश होती तिला तिच्या आवडीचं काम मिळालं होतं आणि ऑफिस जवळ  होतं.....

पण हे ऑफिस खूप मोठे होते इथले लोकसुद्धा वेगळे होते तिच्या जुन्या ऑफिसमध्ये तिच्यासारखे साधेसुधे लोक जास्त होते त्यामुळे तिला तिथे जमवून घ्यायला वेळ लागला नाही, इथे मात्र सगळंच वेगळं होतं त्यामुळे इथे तिला जमवून घ्यायला थोडा वेळ लागत होता, इथे तिची एक मैत्रीण बनली होती ती तिच्या शेजारी डेस्कवर बसायची ......,तिच्या प्रगतीमुळे तिच्या जुन्या ऑफिसचे लोक तिच्यासाठी खुश होते......पण इकडे मात्र बरेच लोक नाराज होते दोन महिन्यात कसं काय इतका मोठा प्रोजेक्ट तिला मिळाला..... त्यात एक होती सोनिया..,

सोनिया एक मॉडर्न , टॅलेंटेड , स्मार्ट मुलगी होती..,सोनिया तिथे मॅनेजरच्या पोस्टवर होती ती दोन-तीन प्रोजेक्टचे लीड होती....त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ती अर्जुनच्या बरीच क्लोज होती.... सोनिया ही अर्जुनची कॉलेज पासून ची मैत्रीण होती त्यामुळे अर्जुनचे तिच्यासोबत बऱ्यापैकी जमत होतं, बाकी कुठल्या मुलीला तो भाव देत नव्हता..... सोनीयाला अर्जुन कॉलेज लाईफ पासूनच आवडत होता, तिने त्याला तसं प्रपोज सुद्धा केलं होतं, पण अर्जुनने तिला सुद्धा कसलंच कमिटमेंट दिलं नव्हतं.... पण नकार सुद्धा दिला नव्हता......... त्यातच सोनिया खूष होती......सोनियाला सुद्धा माहिती होतं की अर्जुन चा लग्न आणि प्रेम या गोष्टींवर विश्वास नाही....त्यामुळे तो दुसर्‍या कुठल्याच मुलीकडे बघणार नाही याची तिला गॅरेंटी होती.... ऑफिस मध्ये बऱ्याच लोकांना वाटायचं की सोनिया आणि अर्जुन गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत ....... सोनियाला वाटत होतं की अर्जून माहीला जास्तीच इम्पॉर्टन्स देत आहे त्यामुळे तिला माही आवडत नव्हती........महिला तिच्या कामात त्रास कसा द्यायचा, सतत सोनियाच्या डोक्यात हाच विचार सुरू असायचा आणि त्यानुसार ती छोटे मोठे त्रास दिला ऑफिसमध्ये देत होती ,वरून तिच्या कपड्यांबद्दल राहणीमाना बद्दल वागण्याबद्दल तिच्यावर जोक्स मारायची, इन्सलट  करायची.... इकडे सुद्धा आता सगळे तिला काकूबाई म्हणूनच बोलत होते.....

आता अर्जुन आणि माहिची रोज भेट होत असे...... माही होती तशीच होती ,तिच्या मध्ये काहीच बदल झाला नव्हता तिचं धडकने ,पडणं ,गोंधळ घालणं, अजूनच वाढलं होतं.... कधी अर्जुन ते एन्जॉय करायचा ,त्याला ते फनी वाटायचं, तिच्यावर हसायला यायचं , कधी मात्र त्याला खूप इरिटेट व्हायचं....... त्याला सुद्धा कळत नव्हतं की तो तिच्याबद्दल इतका का विचार करतोय... ही तर आपल्या कुठल्या साच्यात बसत नाही ,आपल्याला तर साध्या गरीब मुलीसुद्धा आवडत नाही, मुळात मुली मध्ये आपण कधी इंटरेस्ट च घेतला नाही..... तरीसुद्धा आपण तिच्याकडे का खेचले जातोय त्याला कळत नव्हते...... रिकामा वेळ असताना  केबीनमध्ये बसल्याबसल्या तिचं निरीक्षण करत बसने आता त्याचा हा आवडता छंद झाला होता....... माही मात्र कटाक्षाने कुठल्याही पुरुषा जवळ जाणे टाळायची,  कामाशिवाय कुठल्याच मुलाशी बोलत नसे....... माहिला अर्जुन ची सुद्धा भीती वाटायची... तरीसुद्धा काही आंतरिक ओढ तिला त्याच्याबद्दल जाणवायची पण ती प्रकर्षाने त्याच्याजवळ जाण्याचं टाळतच होती........ जेव्हापण समोरासमोर यायचे असं काही घडायचं की त्यांच्यामध्ये वादच जास्त व्हायचे , तरीसुद्धा अर्जुन तीला कसा काय ऍडजेस्ट करतोय याचंच  नवल सोनियाला वाटायचं, तिच्यासारखं  आज जर कोणी वागल असत तर अर्जुन ने कधीच त्या व्यक्तीला ऑफिसमधून हाकलून बाहेर केलं असतं.,...

माही एकदा काही कामानिमित्य अर्जुनच्या केबिनमध्ये गेली होती...... अर्जुन काहीतरी डिक्टेट करत होता आणि माहि ते लिहून घेत होती ,तेव्हा अर्जुन एकटक तिच्याकडे बघत तिच्यामध्ये हरवला होता..... सोनिया त्याच्या केबिनमध्ये येत होती तेव्हा दारातूनच तिने ते बघितलं होतं...... सोनियाला ते आवडलं नव्हतं ,त्यानंतर माहिला तिने एकटे गाठून तिला खूप सुनावलं होतं.....

स्टे अवे फ्रॉम हिम..... जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही..... तुझ्या आणि त्यांच्यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे.... डोक्यात सुद्धा त्याच्याबद्दल भलतंसलतं काही येऊ द्यायचं नाही.... तुझ्यासारख्या मुली खूप बघितल्या , चांगला हँडसम श्रीमंत बॉस दिसला की लगेच त्याला पटवण्यासाठी वाटेल ते तुम्ही लोकं करता , पण लक्षात ठेव बॉस तसे नाही ,त्यांना या वायफळ प्रेम लग्न अशा गोष्टींमध्ये काडीचाही इंटरेस्ट नाहीये आणि तुला माहिती आहे मी त्याची गर्लफ्रेंड आहे त्यामुळे तू त्यांच्यापासून दूरच राहायचं , नाही तर मग गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवायचं........ सोनिया तिच्याशी खूप उद्धटपणे बोलली होती ...तिचं तसं बोलणं ऐकून माहीच्या डोळ्यात पाणी आलं होतं ,तेव्हापासून माही अर्जुनच्या दूरच राहायची, फारच जास्त इम्पॉर्टंट काम असलं तरच ती त्याच्याशी बोलायची, नाहीतर इग्नोर करायची....  

अर्जुनच्या सुद्धा हे लक्षात आलं होतं की माहि त्याला इग्नोर करते आहे, पण त्याने ते इग्नोर केलं होतं, कदाचित कामाचं टेन्शन असेल असं त्याला वाटायचं...... ती दूर जायचा प्रयत्न करायची तितकाच अर्जुन तिच्याजवळ ओढला जात होता...

दोन-तीन दिवसापासून ऑफिसचं काम थोडं वाढलं होतं, एक नवीन प्रोजेक्ट मिळाला होता त्यामुळे अर्जुन खूप बिझी होता ,आकाश सुद्धा प्रोजेक्टच्या कामाने बंगलोरला गेला होता....

चला बाबा आटपले आजचे काम, आता या पेपरवर सरांची साईन घेतली की झालं ,घरी जायला मोकळं ... तिने एकवार घड्याळात बघितले..... बापरे आठ वाजले.... पाऊस येण्याची चिन्हे दिसत आहे..... जर पाऊस सुरू झाला तर इथेच अडकायला होईल....माहिती फास्ट, आवर.... ... माही आपलं सामान भरत बोलत होती......

ऑलमोस्ट सगळा स्टाफ घरी निघून गेला होता ,माहीच थोडं काम राहिलं होतं म्हणून ती उशिरा पर्यंत आज काम करत बसली होती.....

माही फाईल घेऊन अर्जुनच्या केबिन कडे गेली,  तिने डोअर नॉक केलं,   तिला आत मधून काही आवाज आला नाही, तिने परत डोअर नॉक केलं ,परत सेम काहीच आवाज आला नाही ,पण सर तर ऑफिस मध्येच आहेत ,लाईट पण ऑन आहे... तिने हळूच दार उघडलं..... तिने आत मध्ये बघितलं तर ती अवाक झाली ,ती लगेच आत मध्ये गेली, फाईल तिने टेबलवर ठेवली....

अर्जुन चेअर वर मागे टेकून एनर्जी नसल्यासारखा बसला होता, त्याच्या डोक्यावर खूप घाम आलेला होता, तो त्याच्या हाताने त्याचा टाय कसाबसा ढिला करण्याचा प्रयत्न करत होता... त्याला काही सुचत नव्हते...

माही लगेच अर्जुन जवळ गेली ....

सर काय होतंय ,तुम्हाला बरं वाटत नाहीये काय..???.. ती त्याला पाण्याचा ग्लास देत बोलली.....

तो अजूनही त्याचा टाय काढायचा प्रयत्न करत होता...

सर मी काही मदत करू का ..???...म्हणत माहीने त्याचा टाय  ढिला केला आणि त्याच्या शर्टच्या वरच्या दोन बटन काढल्या...... त्याला तशा अवतारात बघून तिला पण काही सुचत नव्हते...

अरे यार कोणीच नाही आहे ऑफिसमध्ये आज, आकाश सर पण नाहीये.....,. सोनिया मॅडम पर लवकरच गेल्या......... काय करू ...??माही विचार करतच होती की अर्जुनने तिला त्याच्या केबिन मधलं एका साईडचे दार दाखवलं आणि खूनेनी च तिकडे घेऊन चल बोलला.....

माहिने त्याला हाताला पकडून आधार देत त्या रूम मध्ये घेऊन गेली....ती एक त्याची सिक्रेट रूम होती ....तिथे एक बेड ,सोफा आणि थोडेफार राहायचं सामान होतं ,,,जेव्हा केव्हा अर्जुंन ला ऑफिसमध्ये खूप काम असायचं तो रात्रभर ऑफिसमध्ये थांबवायचा, तेव्हा तो त्या रूममध्ये आराम करायचा......

अर्जुन बेडवर जाऊन झोपला ...

डॉक्टर बक्षी... कॉल...... अर्जुन रेस्टलेस होत बोलला

माही ने त्याच्या टेबल वरून अड्रेस ची  डायरी घेतली, त्यात तिला डॉक्टर बक्षी यांचा नंबर सापडला ...तिने नंबर डायल करून त्यांना अर्जुन बद्दल माहिती दिली.... ते लगेचच पाच दहा मिनिटात पोहचतो बोलले......

माहीने एका नॅपकिनने  अर्जुन चा सगळा घाम पुसला....आणि तिने फोन हातात घेऊन त्याच्या घरी फोन करणार तेवढ्यात अर्जुनने तिचा हात पकडला आणि खुणेनेच नाही बोलला.....,

तेवढ्यात डॉक्टर बक्षी आले ....त्यांनी त्याला चेक केलं...

बीपी खूप लो झाला आहे, बहुतेक त्यांनी दोन-तीन दिवसापासून नीट खाल्लेल दिसत नाहीये आणि झोप सुद्धा नीट झाली नाहीये...... त्यांनी अर्जुन ला दोन इंजेक्शने दिली, आणि काही मेडिसिन्स दिले आणि माहिला सांगितलं की काहीतरी खाऊ घालून त्याला ह्या मेडिसिन्स ध्या.... थोड्या वेळ आराम झाला की त्याला बरं वाटेल आहे........ काही इन्स्ट्रक्शन्स देऊन डॉक्टर निघून गेले....

माहीने कॅन्टीन मधून ज्यूस मागवला.....  उठवत बसवून दोन महिने त्याला ज्यूस स्वतःच्या हाताने पाजला.... आणि त्याला मेडिसिन दिले......

माही त्याला ज्युस देत होती तेव्हा तो तिच्याकडे एकटक बघत होता...... मेडिसिन घेतल्यावर त्याने तिला घरी जायला सांगितले आणि त्याच्या घरी काहीही कळवू नको असे सुद्धा बजावले.....

पण का सर , घरी नको सांगू, तुम्ही इथे एकटे राहणार का..? नाहीतर चला मी तुम्हाला घरी पोहोचवते..….. माही काळजीने बोलली

मला चालायला सुद्धा त्राण नाही आहे.. मी इथेच आराम करतो........घरी सगळ्यांना उगाचच काळजी वाटेल..... अर्जुन 

तो बेडवर झोपला औषधामुळे त्याला थोडी गुंगी आली होती...

माही एकट्याच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे बघत होती,.,.अर्जुन च्या चेहऱ्यावर खूप थकवा दिसत होता... निस्तेज दिसत होता,.. त्याला तसं बघून तिला फार वाईट वाटले... तिने लगेच घरी फोन करून ऑफिसमध्ये जास्त काम असल्याने आणि बाहेर पाऊस खूप सुरू असल्याने तिला घरी यायला जमत नाही..... ती ऑफिस जवळच राहत असलेल्या मैत्रिणीकडे आज थांबते आहे असं कळवले...

मेडिसिन मुळे अर्जुनला थोडी झोप लागली होती....त्याला झोपलेला बघून ती खाली कॅन्टीनमध्ये निघून आली.....

कॅन्टीन मधल्या ऑंटी सोबत माहिची चांगली गट्टी जमली होती..... ऑफिसमधल्या मुली तिला त्रास द्यायच्या तेव्हा ती कॅन्टीनमध्ये जाऊन बसायची आणि आंटी तिला सांभाळून घ्यायची....त्यामुळे तिला हलकं हलकं वाटायचं.....

कॅन्टीन मध्ये कुठे काय सामान ठेवला आहे तिला माहिती होतं आणि तिला परमिशन सुद्धा आंटीने दिली होती , काही बनवायचं असेल तर बनवून घेत जा....

माही कॅन्टीनमध्ये जाऊन तिने साधी मूग डाळीची मऊ मऊ खिचडी बनवली.... प्लेटमध्ये घेऊन ती वरती अर्जुन चा रूम मध्ये गेली..... आता रात्रीचे जवळपास अकरा वाजत आले होते..... तिने अर्जुनला हाक मारून जागं केलं.......

अर्जुन ने डोळे उघडून बघितलं तर त्याच्यासमोर माही उभी होती........ तो खाडकन उठून बसला...

तू इथे काय करते  आहे? ....घरी का नाही गेली .....घरचे सगळे वाट बघत असतील....? अर्जुन तिच्या काळजीने बोलला...

हो बाहेर खूप पाऊस सुरू आहे त्यामुळे जाता नाही आलं, .... मी घरी फोन करून कळवलं की इथे जवळच मैत्रिणीकडे थांबली आहे.... माही 

खरंच तू पाऊस सुरू आहे म्हणून नाही गेली...???.. अर्जुन एक भुवाई उंच करत बोलला..

हा..... हा म्हणजे पाऊस पण सुरू होता आणि तुम्ही इथे एकटेच होता ,तुम्हाला परत बरं नाही वाटलं तर, इथे कोणीच नव्हतं म्हणून थांबली...... माही मान खाली घालत बोलली

अर्जुन ला तिच्या नजरेत त्याच्याबद्दलची काळजी स्पष्ट दिसली.....

बरं जे बोलायचं असेल तर नंतर बोला आधी हे घ्या खिचडी खाऊन घ्या ...... खिचडी ची प्लेट अर्जुन च्या पुढे धरत नाही बोलली....

खिचडी....? हे कुठून आणली??... अर्जुन

ते.... ते मी कॅन्टीन मधून बनवुन आणली... माही

आणि तुला कॅन्टीनमध्ये कुक करायची परमिशन कोणी दिली...???. अर्जुन

ते....... ते कॅन्टीन वाल्या ऑंटी माझ्या खूप छान फ्रेंड झाल्या आहेत..... त्यांनीच मला आधीच परमिशन देऊन ठेवली होती आणि कुठे काय ठेवला आहे ते पण मला माहिती आहे..,. तिथे बरेच  नाश्त्याचे आइटम होते, काही फ्रिजमध्ये अन्न सुद्धा होतं पण तुम्हाला आधीच बरं नाहीये ,त्यात हे असलं काही खाऊन परत तब्येत खराब होईल म्हणून मी ही खिचडी बनवून आणली...... बरं तुमच्या प्रश्नांचं समाधान झालं असेल तर प्लीज तुम्ही खिचडी थंड व्हायच्या आधी खाऊन घ्या....

अर्जुन चा चेहऱ्यावर हास्य आले...त्याला माहिती होत हिनी नक्कीच इथे..मामा..मावशी...दादा..भैय्या बनवले असणार ....जुन्या ऑफिस मधले त्याला तिचे सगळे रिलेशन्स माहिती होते.....

तू.....?.... अर्जुन

हो मी पण आणली आहे माझी प्लेट, येथे ठेवली आहे मी पण खाते..... माही  

दोघांनी पण जेवण आटोपले..... माही ने त्याला मेडिसिन्स दिल्या.. आणि तिथेच जवळ सोफ्यावर जाऊन बसली....

अर्जुन बेडवर बसला होता आणि एकटक माही कडे बघत होता..... किती काळजी आहे हिला आपली..... खोटं सुद्धा बोलता येत नाही...... सगळं तिच्या डोळ्यात दिसतं ......अर्जुन मनातच बोलत होता.... अर्जुनला तिचं त्याच्या आसपास असणं आवडत होतं..

तिला जाणवत होतं अर्जुन आपल्याकडे बघत आहे, तिला थोडं अक्वरड फील होत होतं, ती त्याला नजर द्यायचे टाळत होती.......

माही........अर्जुन

आपण आधी भेटलो आहोत का....?...मला असं वाटतं मी तुला आधी सुद्धा बघितलेले आहे.???...…तू नाशिकच्या आसपास आधी कुठे गेली आहेस का..???...अर्जुन

हे का असे विचारत आहे....?? नाशिक बद्दल यांना काही माहिती असेल काय??? ...माही मनातच बोलत होती

नाशिकचं नाव ऐकून ती थोडी घाबरली......... तिथली तिला आठवण सुद्धा काढायची नव्हती...... तिथे घडलेल्या काही गोष्टींमुळे तिचं आयुष्य पूर्णच खराब झालं होतं........ तिला कोणालाच काही कळायला नको होतं.... नाहीतर इथे सुद्धा तिला जगायला कठीण झालं असतं...

नाही .......... मी कधीच नाशिकजवळ गेले नाही......... मी इथली मुंबईचीच आहे...... माही थोडी रुक्षपणे बोलली... पण तिला सुद्धा अर्जुन चे डोळे नेहमीच ओळखीचे वाटत होते..

नसेल कदाचित.... मलाच भास झाला असेल.... थोड्याफार सारखा दिसणारे लोक पण असतातच...... अर्जुन मनातच विचार करत होता....

माही   मला केबिन मधून लॅपटॉप आणून दे... अर्जुन मोबाइल हातात घेत बोलला.

सर तुम्ही आराम करा..... डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला आता पूर्ण झोप घेणे फार गरजेचं आहे.... नाही तर तब्येत बिघडेल..... माही

आत्ताच झोपलो, आता इतक्या लवकर मला झोप यायची नाही... आता मला थोडं बरं वाटते आहे.... दे तो लॅपटॉप आणून ...थोडे मेल चेक करतो................हे काय.... तेरा मिस कॉल......? माझा फोन सायलेंटवर कोणी केला ......अर्जुन मोबाईल मध्ये बघत थोडा रागातच बोलला.... त्याच्या क्लाएंट चे  फोन येऊन गेले होते...

यांना काय झालं ......आत्ताच इतक्या प्रेमाने बोलत होते... नी आत्ताच असेल ओरडायला लागले.... तब्येतीचा असर डोक्यात वर तर नाही  झाला .????.....माही मनातच बडबडत होती....

त...... त....ते... मी केला सायलेंटवर...........तुम्ही झोपले होते आणि डॉक्टरांनी सुद्धा आराम करायला सांगितला होता

..... फोन वारंवार वाजत होता ,.. तुमची झोपमोड नाही व्हावी ........म्हणून मी तो सायलेंटवर केला.......माही भित भीतच बोलली...

अर्जुन पुढे आला होता,, त्याला घाबरून माही मागे भिंतीला जाऊन चीपकली, आता तिला मागे जायला जागा नव्हती...... अर्जुन खूप रागाने तिला बघत होता...

तुला कळतं का किती महत्त्वाचे फोन होते ते आणि तुला माझ्या फोन ला हात लावायला  कोणी सांगितलं..???.. अर्जुन तिच्याजवळ जात ओरडला आणि त्याने रागात फोन खाली आपटला.....

फोनच्या आवाजाने ती खूप घाबरली आता तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते........ अर्जुन ती तिच्या जवळ येऊन आपले दोन्ही हात तिच्या बाजूने भिंतीवर ठेवत तिच्याकडे रागाने एकटक बघत होता.....

त्याच्या अशा जवळ येण्याने तिला आता थरकाप सुटला होता..... आता तिच्या डोळ्यातून पाणी  वाहू लागले होते....

तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला आता वाईट वाटत होतं...... आपण उगाचच तिच्या वर् राग काढला ,ती तर आपली इतकी काळजी घेत होती ..... त्याला आठवले..... आता त्याला स्वतःचाच राग आलेला होता.....त्याने हाताची मुट्ठी वळली आणि भिंतीवर तिच्या बाजूने जोऱ्यात आपटली..... नि पाठी वळून केबिन मध्ये निघून गेला.....

माही खूप घाबरली होती तिथेच भिंतीजवळ टेकून खाली आपल्या दोन्ही पायांच्या गुडघ्यांमध्ये डोकं घालून रडत बसली होती बसली होती.... आता तिला खूप भीती वाटत होती.... रडत रडत ती तशीच तिथे च खाली आपले दोन्ही पाय पोटाजवळ घेऊन झोपी गेली...

लॅपटॉप वर थोडाफार मेल चेक करून, थोडं काम आटोपून तो परत रूम मध्ये आला....

माहिला तसं झोपलेलं बघून त्याच्या काळजात चर्र झालं.... तिला तसं बघून त्याला आता खूप वाईट वाटत होतं... ती बिचारी माझ्या मदतीसाठी थांबली होती आणि मी तिला हे काय केलं .....किती बोललो.....

अर्जुन तिच्या  जवळ जाऊन बसला नि तिच्या डोक्यावरून हात फिरवला ......तिला आता झोप लागली होती....

त्याने तिला आपल्या दोन्ही हातांवर मिठीत उचलून बेड वर नेऊन झोपवले...... आणि उठायला गेला तर तिने त्याची कॉलर तिच्या मुठीत पकडून ठेवली होती...... ही नेहमीच  अशी काय पकडते....??.. कुणाची हिंमत होत नाही माझ्या कॉलरला पकडायची....... ही मात्र नेहमी अशीच पकडते...... तिला भीती वाटत असेल काय कशाची...... की मी तिला तिच्या जवळचा वाटत असेल....मला सोडून जाऊ नको अस म्हणतेय....... तिचा हात त्याने हळूवार सोडवून घेतला...... आणि सोफ्यावर जाऊन झोपला..,

त्याला झोप येत नव्हती तो एकटक माहिच्या चेहऱ्याकडे बघत होता....

.नेहमी  तिच्या डोळ्यात नेहमी बघतो तर असं वाटते तिच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी खूप वाईट घडलेला आहे..,. तिच्या हसऱ्या बोलक्या धांदरट चेहर्या मागे हिने खूप काही लपवून ठेवलेले आहे..,..मला का हिच्या डोळ्यात पाणी सहन होत नाही.....मला आवडायला तर नाही लागली ही........?. नाही नाही शक्यच नाही मला कधीच कोणती मुलगी आवडलेली नाही... मी कधीच कोणावर प्रेम करणार नाहीये...…. असे अनेक विचार त्याच्या डोक्यात सुरू होते..... आणि कधीतरी त्याला झोप लागली...

सकाळी सहाच्या आसपास माहिला जाग आली....

उठून बघते तर ती तिला बेडवर दिसली...,.

मी तर तिथे भिंतीजवळ बसली होती....... मी इथे कशी काय आली....... विचार करतच ति आपले केस वरती बांधत होती... आणि तिचं लक्ष समोर सोफ्यावर झोपलेल्या अर्जुन कडे गेलं......

किती शांत निरागस दिसतात झोपेमध्ये....... जागे असले की काय होते ..... ड्रॅक्युला संचारतो अंगामध्ये... माही मनातच बोलत होती..

तिच्या हालचालीमुळे तिच्या बांगड्यांच्या आवाजामुळे अर्जुन ला जाग आली.....

त्याला उठलेले बघून ती परत दचकली ...... परत हा काही बोलणार तर नाही..???... बेडवर का झोपली वगैरे विचारणार तर नाही..???...यांच्या डोक्यात कधी काय येईल काहीच सांगता येत नाही....माही यांची खडूस आत्मा जागी व्हायच्या आधी निघ इथून ....मनातच बोलत ...... तिने पटापट आपले केस नीट केले ,ओढणी नीट केली  आणि बाहेर पाळायला जाणार तेवढयत अर्जुनने तिला आवाज दिला.....

सत्यानाश........... माही हळूच मागे वळली

तिचे ते धांदरट हावभाव बघून अर्जुन ला गालातच हसू येत होते....

आर यु ओके.???...अर्जुन

तिने हो म्हणून मान हलवली.... नी परत जायला वळली

माही...... परत अर्जुन ने आवाज दिला

आत्ताच काम सांगतो की काय.... अजून तर ऑफिसची वेळ पण नाही झाली..... स्वतःची पण तब्येत खराब करतात..... दुसऱ्यांची पण.... माहिती मनातच त्याच्याकडे बघत बडबड सुरू होती

डोन्ट वरी ........काम नाही सांगत आहे...अर्जुन

हा.......यांना कसं कळलं माझ्या मनातले......यांना मनात बोललेले पण ऐकू जाते काय...???...या कोणत्या टेक्निक्स आहेत...कुठून शिकून आलेत हे....,..???....माही मनातच बोलत होती

कुठेच काही नाही शिकलोय..... तुझे डोळे सगळं खरं सांगतात मला.....अर्जुन

यांना वेड बीड  लागले की काय.... रात्री राक्षसाचा अवतार घेतला होता .....आता हे असं वेगळच काय...... हे पण पागल आहेत , मला पण पागल करून सोडतील......... ती कन्फ्युज नजरेने त्याच्याकडे बघत होती....

अर्जुनला तिचा चेहरा बघून आता हसू कंट्रोल नाही झालं तो जोरजोराने खळखळून हसायला लागला...

त्याचं हसणं बघून नकळत तिच्या पण चेहऱ्यावर हसू उमलल.... ती आनंदी नजरेने त्याच्याकडे बघत होती..

तो पण आता तिच्या नजरेत कैद झाला होता...

त्याचा फोन वाजला..... तसे ते दोघे भानावर आले

माही तू आज सुट्टी घेऊ शकतेस..... ऑफिसमध्ये नाही आली तरी चालेल आहे , असं बोलून त्याने फोन पिकप केला आणि तो बाहेर निघून गेला.....

माही आश्चर्याच्या नजरेने त्याच्याकडे बघत होती....

*******

क्रमशः

🎭 Series Post

View all