
भाग ९
रोज असं च होत काय ऑफिसमध्ये ..... माही
नाही ग , सर उगाच नाही रागवत ,त्यांना कामात थोडी सुद्धा हलगर्जी पणा केलेला नाही चालत नी काम वेळेवर झालेली हवी असतात...तसे पण सर इथे रोज नाही येत, ते मेन ब्रांच ला जातात... मीटिंग किंवा महत्त्वाचं काही काम असलं तरच इथे येतात ... hardly महिन्यात २-३ दा च येतात.... जास्ती करून आकाश सर च इथलं काम बघतात.... गोपाल
आकाश सर ? ... माही
ह्म्म.. सरांचे भाऊ... गोपाल
अच्छा... चला तेवढ तरी बरं झालं रोज नसतील ते इथे .... नाहीतर माझी वाट लागली असती...... आजच यांना इथे यायचं होत........माही ची मनात च बडबड सुरू होती.
तेवढयात त्यांना अर्जुन सर बाहेर येताना दिसले ... केबिन काचेची बनली होती ..
ठाकूर सर अर्जुन सर च्या मागे येत होते ...सगळे उठून उठून उभे राहिले...
नवीन काही स्टाफ जॉईन झाला... ? बोलवा त्यांना ..
अर्जुन
ठाकूर सरांनी नवीन एम्प्लॉइज ना पुढे यायला सांगितले..
४ नवीन लोक जॉईन झाले होते त्यात माही पण होती... ते पुढे आले....
हॅलो guys ..... तुम्हाला कळलंच असेल.. पण मी परत सांगतो.. काम अगदी चोख नी वेळेवर हवे... ऑफिस अवर मध्ये शिस्तीत काम करायचं.. बाहेर तुम्ही काय करताय त्याचा माझाशी काही संबंध नाही.... बोलता बोलता अर्जुन ची नजर माही कडे गेली...
एक्स्ूज मी...... अर्जुन डोळे मोठे करून माही कडे बघत होता... नंतर ठाकूर कडे बघत होता...
ms देसाई तुम्ही अशा का उभ्या....तुम्ही ओढणी का घेतलीये डोक्यावर.....तुमचा चेहरा पण दिसत नाहीये.....ठाकूर सर...
माही हातवारे करत काही सांगायचं प्रयत्न करत होती, कोणालाच काही कळत नव्हते...
व्हॉट..... ?speak up..... Mr ठाकूर हे काय चाललंय... हे कसं ही कोणाला घेता काय ...तिला बोलता नाही येत काय?? ...अर्जुन थोडासा ओरडत बोलला...
नाही नाही सर .... ठाकूर घाबरतच बोलत होता...
ms देसाई ...हे काय चाललंय तुमचं...ठाकूर
माही आज तुझं काही खरं नाही......माही मनातच बोलत होती तेवढयात गोपाल तिथे उठून आला...
सर ती बोलणार नाही.... गोपाल
का...? अर्जुन
तीच व्रत आहे ..... मौन व्रत... गोपाल
काय..? आता पर्यंत तर नीट बोलली ती.... आता अचानक कसं काय व्रत निघालं.... ठाकूर
सर ते आताच कोणती तिथी बदलली म्हणून..... गोपाल कसा तरी बोलला... आपण पकडल्या गेलो तर....मनातच
आणि हे तुला कसं माहिती.... नी हे काय डोक्यावरून ओढणी नी ऑल....आजकाल हे असं कोण राहतं....अर्जुन डोक्यावर आठ्या पाडत बोलला...
सर तो पण व्रताचाच एक भाग आहे.... तिनी मला फोन वर मेसेज करून सांगितले... म्हणून मी आलो इथे सांगायला.... गोपाल
व्हॉट...? हे असं कोणत व्रत असतं.....? अर्जुन I don't believe ...
सर असते कोणाची श्रद्धा....इकडे गावाकडे आपल्याला माहिती नाही भरपूर वेगळ्या पद्धती असतात..... ठाकूर
mr ठाकूर ... काम कसं आहे याचं.....अर्जुन
सर ठीक आहे ... आल्यापासून जे काम दिलंय ते व्यवस्थित केलेय.... ठाकूर
ओके....hey you listen... next time पासून अस काही ऐकून घेणार नाही....म्हणत तो केबिन मध्ये जाऊन बसला...
माही ने मान हलवली...
काहीतरी गडबड आहे ... मला ती ओळखीची वाटते आहे ....मनातच..... त्याच केबिन मध्ये बसून तिच्या कडेच लक्ष होत ...
गो बॅक टू यूर वर्क...ठाकूर
चल गेले सगळे.... गोपाल
हुश करत तिने डोक्यावरून ओढणी काढली... थांक उ गोपाल , आलेच मी म्हणत ऑफिस हॉल च्या बाहेर पळत गेली ...
एका पिलर जवळ उभी राहून तिने घाम पुसला...थोड्या वेळ साठी ती घाबरली होती...
बापरे किती भारी आहेत हे .... किती संशयाने बघत होते माझ्याकडे...त्यांना डाऊट तर नसेल आला ना.....किती खडूस कसे घाबरून ठेवलंय सगळ्यांना...सतत फुसफुस करत असतात... ड्राकुला च आहेत .....ओढणी ने घाम पुसत तिची बडबड सुरू होती....
व्हॉट.....? ड्राकुला....?....अर्जुन च्या आवाजाने माही ने मागे वळून बघितले तर तिथे अर्जुन रागाने माही कडे बघत उभा होता.....
जरी बाहेरून काही दिसत नव्हते तरी आतमधून बाहेरच सगळं दिसत होत अर्जुन च्या केबिन मधून... माही ने जेव्हा ओढणी काढली तेव्हाच त्याने तिला बघतीला होत , आणि म्हणून तो तिच्या मागे आला होता ......
बापरे माही ....तू इकडे तिकडे न बघताच कशी अशी बडबड करू शकते.... आता काय करू यांनी तर आपल्याला ओळखलं..... गेली आता नोकरी.,..बाप्पा मदत कर...मनातच तिची देवाजवळ आराधना सुरू होती...
ड्राकुला...काय......काय बोलत होती तू...अर्जुन
कुठे काय....काही नाही... माही
तरी तुझ्या चप्पल कडे बघून मला डाऊट आलाच होता...अर्जुन
चप्पल........? माही पाय लपवत
हो हे अस कोण घालते आता......म्हणून लक्षात राहिले होते.... .अर्जुन.
पाच मिनिटात मला तू केबिन मध्ये पाहिजे बोलून तो रागाने निघून गेला...,.
mr ठाकूर ... कसं काय घेतले तुम्ही... काही अनुभव नाही , एज्युकेशन पण नाही जास्ती...तिचा बायोडेटा बघत अर्जुन ठाकूर ला प्रश्न विचारत होता...
सर....सर ते आकाश सरांनी रेकमेंड केले होते ..... ठाकूर
बरं तुम्ही जाऊ शकता.....ठाकूर गेल्यावर त्याने आकाश ला कॉल केला....
ती मुलगी इथे कशी काय आकाश .... अर्जुन
आकाश ला कळलं होत की भाई ला कळले आहे की ती मुलगी तिथे आहे .....
भाई भाई...काम डाऊन....मी सांगतो.... आकाश
आकाश...तू नी ती......अर्जुन पुढे बोलणार तेवढयात आकाश .... नो नो भाई.... तू समजतोय तस काही नाही...आजी नी सांगितले होते तिला जॉब द्यायला... म्हणून मी mr ठाकूर ला सांगितले....आजी ला नाही कस म्हणणार ...
काय.. आजीने... आजी ओळखते तिला ...?.. अर्जुन
I don't know bhai..... आकाश
ओके ठीक आहे म्हणत अर्जुन ने फोन कट केला..
डोर नोक झाले..... कम इन... अर्जुन
माही ला अर्जुनाच्या केबिन मध्ये जातांना पाहून रिया राग आला....... काय मुलगी आहे पहिल्याच दिवशी केबिन मध्ये....दिसते किती साधी.. काकूबाई एकदम...चलाख असतात या पोरी.....माही टिना सीमा गप्पा करत होत्या...
माही आतमध्ये आली नी अर्जुन समोर येऊन उभी राहिली...
ह्म्म ms देसाई ... असे का वागले तुम्ही....? अर्जुन
माही ला काही कळत नव्हत काय बोलावं ती शब्दांची जुळवाुळव करत चूप उभी होती...
speak up...... सकाळी तर खूप बोलत होती....अर्जुन
सर....सर...ते चुकून.....मी मुद्दाम नाही केले....तुम्ही पण तर नीट नव्हते बोलले ना....म्हणून..ते कुत्रा आला मधात म्हणून मी पडले होते...,.माही
मग.....अर्जुन
तुम्ही इथे दिसला , मला नोकरी जायची भीती वाटली म्हणून मी ... तस......मला नोकरी ची खूप गरज आहे......माही
तो गोपाल खोटं बोलला...त्याला तर बघतोच....अर्जुन
सर प्लीज त्याची चुकी नाही...प्लीज त्याला नका बोलू काही... हवं तर तुम्ही मला बोला मला जॉब वरून काढा पण त्याला नको.....मला बहीण मानतो म्हणून त्याने मला मदत केली...माही
अर्जुन ने डोक्या वर हाथ मारून घेतला ...
तुम्ही काम करायला आलात की relations बनवायला......अर्जुन ला आता थोड हसायला येत होत... हसू दाबत तो बोलला..बापरे ही मुलगी... impossible आहे... तस पण तो तिला काढणार नव्हता आजी रेकमेंड केले होते .... एक चान्स देऊन बघू...
बरं.... एक चान्स देतोय.... मला परफेक्ट पाहिजे...एक पण चूक झाली तर कामावरून काढून टाकण्यात येईल... you may go now.... अर्जुन
ती हो म्हणून वळायला गेली तर तिचा हाथ टेबल वर असलेल्या पेपरवेट ला लागला , तो तिच्या पायावर येऊन पडला.....ती कळवळली...... आsss...
ती लंगडत होती , अर्जुन ने हाथ धरून तिला खुर्चीवर बसवलं... लागल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आले होते ...
त्याच लक्ष तिच्या डोळ्यांकडे गेले....तो तिच्या डोळ्यात एकटक बघत होता..,
are you okay.... जास्ती दुखतेय काय...अर्जुन
तिने मान हलाऊन नाही म्हटले...
त्याच लक्ष पेपरवेट कडे गेले, त्याचे तुकडे तुकडे झाले होते...
माही ने पण तो जिकडे बघतोय तिकडे बघितले.....ताडकन उठून उभी राहिली....
सॉरी सर..ते मी मुद्दाम.....ना....बोलत होती की अर्जुन बोलला
I know ते तू मुद्दाम नाही केले चुकून झाले...नी आता तर तेवढे मला कळलेच आहे ....जिथे तू, तिथे तुटफुट, पडापडी तर होणारच आहे .... अर्जुन
ती त्याच्याकडे कडे बघत बघत बाहेर गेली......
********
क्रमशः