तुहिरे... कसं जगायचं तुझ्याविना 8

माही अर्जुन

भाग ८

माही सकाळी लवकर उठली ..... ऑफिस ला जायची तयारी केली...

मीरा ला उठवलं...तिला दूध दिला... नी थोड्या वेळ तिच्या सोबत गप्पा मारत बसली...

आई ने नाश्ता साठी सगळ्यांना आवाज दिला... सगळे टेबलवर बसून नाश्ता करत होते ...

आता तरी डोकं ताळ्यावर ठेऊन काम करा .... परत परत नाही भेटायचे असे चान्स ..... आत्याबईंच्या सूचनांवर सूचना देणे सुरू होते ..... माही मान हलवत हो हो करत होती...

माहिने तिचा नाश्ता संपवला... नी बाय करून निघाली..

काळजी घे ग.... आई चा मागून आवाज आला....

हो ssss.... माही ने चमेली स्टार्ट केली नि निघाली...

ऑफिस थोड आउट साईड ला होत... मध्ये थोडा कच्चा रस्ता होता ... मधेच एक कुत्रं तिच्या स्कूटर समोर आला...तिचा ब्यालांस गेला... कुत्र्याला सांभाळत आडवं तिडव हॅण्डल करत ती कसाबसा तोल सांभाळायचा  प्रयत्न करत पुढे जात होती, एक गढढा आला नि ती चामेमली ला घेऊन खाली पडली....
समोरून एक मोठी गाडी येत होती.... करकचून ब्रेक चा आवाज झाला नि ती गाडी अगदी माही जवळ थांबली...

मॅडम बाजूला व्हा.....चुकीच्या साईड नी आलाय तुम्ही...अर्जुन गाडीतून उतरत तिला उठायला मदत करायला हाथ पुढे करणार तेवढयात माही वळली...

तू.......? परत.....अर्जुन हाथ मागे घेत
तू काय करतेय इथे ...कपाळावर आठ्या पाडत बोलला

मी....मी काय इथे जेवायला बसलेय... पार्टी करत ...माही रागात त्याच्या कडे बघत बोलली....दिसत नाहीये काय पडलीय ते.......हो बरोबर कसा दिसणार ना या काळया चष्म्यातून.... सगळं काळच दिसत असेल ना.....माही

तुला वाकडीच उत्तर देता येतात काय ....... अर्जुन

वाकड्या प्रश्नांची वाकडीच उत्तर असणार ना... माही

इम्पॉसिबल...डोक्यावर हात मारत... बरं बाजूला हो माझा वेळ वाया जातो... जायचं मला...

तेवढयात एक मुलगा तिथे आला नि तिला स्कूटर उचलायला मदत केली...

तिने त्याला धन्यवाद केले तो तिथून निघून गेला...

याला म्हणतात माणुसकी.....तुम्हाला कशी कळणार ना ... नी मला पण तुमच्या सोबत इथे बोलत बसायची हाऊस नाही आहे....चला सरका मला जायचं......... एक एक मिनिट....मी तुम्हाला बोलले ना परत भेटू नका.... तुम्ही माझा पाठलाग करता आहात काय.....मी काल बोलले ना ते चुकून पडलेला तुमचा शर्ट.... माही

व्हॉट.....? डोळे मोठे करत तो तिच्याकडे बघत होता...

ये बाई मला दुसरी काम नाहीत काय तुझ्यामागे फालतू फिरायला...बाजूला कर तुझी ती खटारा...अर्जुन

चमेली ला खटारा म्हणताय...तुमची हिम्मत कशी झाली.. माही

who is चमेली.?... मी तुझी स्कूटर बाजूला कर म्हणतोय.... अर्जुन

चमेली माझी स्कूटर च नाव आहे .... तिचा असा अपमान मला सहन होणार नाही हा .... माही

तुम्ही काय इथे माझ्यासोबत वाद घालत बसलाय... चला व्हा बाजूला ... पहिल्याच दिवशी ऑफिस ला उशीर व्हायचा मल, तस पण पहिलेच तुमच्यामुळे माझा जॉब गेलेला ... ... बाजूला करा तुमची गाडी...

तुला कोणी जॉब दिला?...गाढव च असेल तो...
... सगळा गोंधळ घालत असशील जेव्हा पण भेटते तेव्हा पडतच असते .....अर्जुन

माही त्याच्याकडे बघत चमेली ला स्टार्ट केले नी तिथून पाळली.....

अजब आहे ही पोरगी..... अर्जुन गाडी स्टार्ट करून गेला

*****

माही वेळेतच ऑफिस मध्ये पोहचली....आतमध्ये येऊन मॅनेजर ला भेटली...त्याने तिला तिचे काम समजाऊन सांगितले... नी तिला तिचा बसायचा डेस्क दाखवला...

मााही तिच्या जागेवर जाऊन बसली,  बाप्पाची छोटीशी मूर्ती पर्स मधून काढून तिने तिच्या डेस्क वर ठेवला , बाप्पा ला नमस्कार करून ती आपले काम करायला लागली.

5 मिनिटांनी एक लठ्ठ सा मुलगा वय २४-२५ च्या आसपास असावं,  तिच्या बाजूच्या डेस्क वर येऊन बसला.....त्याच लक्ष तिच्या कडे गेले... तो तिच्या जवळ गेला...

ओह आज जॉईन झाल्या काय....मी गोपाल... तुमचा शेजारी...म्हणत त्याने शेक ह्यांड साठी हाथ पुढे... केला

शेजारी ...? डोळे मोठे करून माही त्याला हाथ जोडून नमस्कार करत बोलली
oh pure Indian culture, I like it .... शेजारी म्हणजे तुमच्या शेजारच्या डेस्क वरचा ... हसत हाथ जोडत गोपाल म्हणाला...
माही पण हसली... अच्छा अच्छा...

काही मदत लागली तर सांगा .... गोपाल

हो हो नक्की.... माही

दोघंही काम करत बसले...

लंच ब्रेक झाला तसा गोपाल तिला कॅन्टीन मध्ये चल तुला बाकी स्टाफ सोबत ओळखी करून देतो  म्हणाला
माही पण तिचा डब्बा घेऊन त्याच्या सोबत कॅन्टीन मध्ये गेली... गोपाल तिला थोडा funny पण चांगला वाटला...

दोघे कॅन्टीन मध्ये आले , सगळे बसले होते तिथे तो तिला घेऊन गेला... सगळ्यांसोबत तिची ओळखी करून दिली , तिने पण तिच्या बोलक्या स्वभावाने सगळ्यांसोबत छान जुळाऊन घेतले...

स्टाफ मध्ये बहुतेक सगळे माणसं च होती...३ मुली होत्या ... त्यांचं ड्रेसिंग थोड मॉडर्न होत .... गोपाल ने त्यांची पण ओळख करून दिली ....रिया, टिना , सीमा...

त्या माही कडे बघत होत्या... असं कोण घालत आजकाल... किती काकूबाई दिसतीये ही....आपापसात कुजबुजत होत्या...

हाय काकूबाई....रिया
हाय....माही , माही ला तीच अस बोलणं आवडल नव्हतं, पण तिने दुर्लक्ष केले....

जाऊ दे लक्ष नको देऊ त्या तशाच आहेत.... गोपाल

लंच आटोपून सगळे आपापल्या जागेवर येऊन बसले...नी कामाला लागले... त्या तिघी नी बरेच लोकांची खुसरपुसर चालली होती...

थोड्या वेळाने मॅनेजर mr ठाकूर बाहेर आला नि त्यांना सांगितले अर्जुन सर येणार आहेत ...थोड्या वेळाने ... . मीटिंग साठी... आपापली कामं नीट आटोपून ठेवा.....तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की सरांना सगळा परफेक्ट पाहिजे .. incomplete वर्क त्यांना चालत नाही ... नाहीतर त्यांच्या रागाची लेव्हल तुम्हाला माहितीच आहे ... सो सगळं कंप्लीट करून ठेवा...
आतमध्ये निघून गेला

सगळी कडे कुजबुज सुरू झाली, बापरे सर येणार आहेत .. सगळे लोक आपापल्या कामाला लागले...

wow हॅण्डसम येणार आहे आज.. हाय रे ....रिया
सर तुमच्याकडे काही भाव पण नाही देत यार ...तरी तुम्ही मागे मागे करता... सीमा
ये जाऊ दे ग, चान्स आपला मारत राहायचा... बघितले तर मस्त च ना.... टिना

माही ला त्यांच्या गप्पा ऐकू येत होत्या...

तिकडे लक्ष नको देऊ, काम कर तुझं.... सर खूप strict आहेत ...थोडीशी ही चूक चालत नाही त्यांना ...नाही तर गेला जॉब हातातून..... गोपाल

माही ने कामावर लक्ष केंद्रित केले ...

थोड्या वेळाने एक ब्लॅक कार येऊन उभी राहिली....
ओळखीची दिसतेय गाडी.... माही विचार करत होती...तितक्यात अर्जुन आतमध्ये आला..सगळे उठून उभे राहिले ...त्याने इशाऱ्यानेच बसा म्हटले नी त्याच्या केबिन मध्ये गेला... माही उभी होऊन एकटक त्याच्याकडे बघत होती.....माहीचा डेस्क दूर होता म्हणून त्याला ती दिसली नव्हती

गेले ते आतमध्ये, तू बसू शकते आता ... गोपाल हसत माही ला बोलला....

क.....कोण आहे ते...माही अडखळत बोलली..

अगं हेच तर अर्जुन सर आहेत .... ठाकूर सरांनी सांगितले होते , तेच आहे हे...आपल्या कंपनी चे मालक आपले बॉस.... गोपाल

क....काय.... माही...हे बाप्पा ही कुठे नोकरी दिली तू मला..., माझा चेहरा बघूनच ते मला कामावरून काढून टाकतील..हे देवा आता काय करू....नोकरी पण खूप गरजेची आहे .... दुसरी कुठली जागा नव्हती भेटली का तुला बाप्पा....तिची तोंडातल्या तोंडत बडबड सुरु होती..

काय ग काय झालं अशी काय बडबडत आहेस .. गोपाल
अं.....काही नाही.....माही

तिला एक आयडिया येते... गोपाल माझी छोटीशी मदत करशील ......म्हणत तिने सकाळचा किस्सा त्याला थोडक्यात सांगितला...मला ही नोकरी खूप गरजेची आहे रे ..pls थोडी मदत कर ना....माही

गोपाल पण तयार झाला.. .. ठीक आहे घाबरु नकोस तू मला छोट्या बहिणी सारखी आहेस... dont worry ...

पिउन ने कॉफी अर्जुन च्या केबिन मध्ये नेऊन ठेवली...बाहेर आला नि एका एम्प्लॉइ ला आवाज देऊन , दीपक सर,सर तुम्हाला फाईल घेऊन आत बोलवत आहेत...

दीपक च थोड काम पेंडींग होत ,त्याला बर नव्हतं म्हणून तो २ दिवस सुट्टीवर होता ,तो घाबरत च फाईल घेऊन दोर नोक केले... may I come in ...

या....मला ती एक्सपोर्ट ची फाईल दाखवा....अर्जुन

बाहेर अर्जुन चा जोरजोराने ओरण्याचा आवाज येत होता ...

कंप्लीट इट today before leaving .... अर्जुन या
येस सर....म्हणत दीपक बाहेर आला...

त्याचा चेहरा बघून माही घाबरली...बापरे हा बॉस आहे की काय....सतत फुसफुस करत असतो.... मीरा ते बघते त्या कार्टून मध्ये आहे ना तो कोण .... ड्राकुला .......... हा....... ड्राकुलाच वाटतोय...तिला जास्तीच भीती वाटायला लागली... कसं होईल माही तुझं ... तोंडात करंगळी घालत दात खात ती मनातच बडबडत होती

***********

क्रमशः

🎭 Series Post

View all