तुहिरे... कसं जगायचं तुझ्याविना 14

माही अर्जुन

भाग-14

बापरे आज कशी काय मी इतक्या उशिरा पर्यंत झोपले चला उठा लवकर लवकर नाही तो उशीर व्हायचा शांतीसदन ला जायला...... मीरा पण नाही आली अजून उठवायला... नाही तर मी इतक्या वेळ झोपले राहिले कि ती येऊन बसते डोक्याजवळ माझं डोकं खात..... माही आळस देत बडबड करत उठली......

मीरा........ मीरा...... माही मिराला आवाज देत बेड आवरत होती

माऊ मी इकडे बाहेर आहे ताई सोबत खेळते आहे.... मीराने पण ओरडून सांगितले

माही घाईघाईतच फास्ट रेडी झाली ..... नाश्ता आटोपून मिराला बाय करून ती शांतीसदन ला पोहोचली.... चमेलीला पार्क  करून धावत पळत  आत मध्ये येत दाराजवळ येउन थबकली.... नि समोर डोळे फाडून बघत होती...

हा तर नेहमी तिकडे घराच्या मागच्या साईडने असतो ना, आज कसा काय इकडे पुढे आला..?? माही डोक्यातच विचार करत होती आणि घाबरून त्याच्याकडे बघत होती...... आधीच एवढा उशीर झालाय त्यात आता हा समोर, कसं जायचं आत मध्ये........ माही एकटक त्याच्याकडे बघत होती, तो पण तिच्याकडे नजर रोखून बघत होता... तो अगदी दारात उभा......... माही घाबरत घाबरत भिंतीच्या साईड ने गेली... माही पुढे सरकली तसा तो पण पुढे सरकला...... माही आता खूप घाबरली....,.

शू..... शू....... ? माही हात झटकत बोलली

तिचे ते हावभाव बघून तो पण आता जोराने भुंकायला लागला....

त्याचे जोरजोराने भुंकणे ऐकून माहिची घाबरगुंडी उडाली... तिने कशीबशी चप्पल काढली आणि ती घरात मागे बघत बघत पुढे पळाली.... नी समोर जाऊन धडकली.....तो पण मोबाईल मध्ये डोकं खुपसून चालत येत होता , तो बेसावध होता, माही त्याला धडकल्या मुळे दोघेही खाली जमिनीवर धाडकन  पडले........ तो खाली , माहि त्याच्यावर पडली होती..... माहीने भितीमुळे डोळे मिटले होते... आणि त्याच्या कॉलरला पकडून ठेवलं होतं.... तिचे केस त्याच्या चेहऱ्यावर आले होते.....

तिचे घाबरून मिटलेले डोळे ,त्याच्या चेहऱ्यावर तिचे आलेले केस ,तिचा तो मऊशार स्पर्श ,हे सगळे त्याला वेड लावत होते,..........  त्याने हळूच तिचे केस आपल्या एका हाताने कानामागे  केले,......तो एकटक तिला बघण्यात गुंतला होता.......,

थोड्या वेळाने तिला जाणवलं कि आपण कोणाच्यातरी कुशीमध्ये पडलो आहे,  ती भानावर आली आणि तिने डोळे उघडून बघितले......... तो तिला एकटक मन लावून बघत होता, त्याच्या असल्या बघण्याने ती पण त्याच्या डोळ्यात हरवली.......

आई ग .......तो कळवळला, अचानकपणे  जमिनीवर पडल्यामुळे त्याच्या पाठीला थोडंसं लागलं होतं.....

त्याच्या आवाजाने ती भानावर आली,   मेले ......आज सगळ्याच हिंसक प्राण्यांशी गाठ दिसून राहिली....... माही मनातच बडबड करत होती.

तिच्या हालचाली नि अर्जुनची तंद्री भंगली, आता तो त्याच्या पूर्व रूपात आला....

तुझं काय सुरू असते ग...... तुला ना तुझ्या फुल बॉडी चेकअप ची गरज आहे..... असं कोणी घरात पळत येत असते का..... सतत धडपडत असते आणि दुसर्यांना पाडत असतेस...... अर्जुन चिडत बोलला

तुम्ही तर समोर बघत येत होता ना ,मग तुम्ही का नाही दिले लक्ष...... माहीने त्याला उत्तर दिलं

तुला नाही वाटत आपण हे उठून बसून पण बोलू शकतो, की ईथेच भांडणारे आता........... अर्जुन

मी.......... मी भांडते सुरुवात तुम्ही केली ना..,.... आणि मी काय मुद्दाम नाही धडकले........... ते .....तेथे दाराजवळ कुत्रा होता,.... तो मला बघून खूप भुंकायला लागला... मला भीती वाटली म्हणून मी अशी पळत आले आत मध्ये........ माही

ह्म्म.....अजब लोकांवरच भुंकतात ते....अर्जुन ला आता खूप हसू यायला लागलं...खूप कंट्रोल करूनही त्याला आपल हसू कंट्रोल करणे जमले नाही नि तो हसायला लागला........ थोड्यावेळासाठी तो त्याचा राग विसरला होता...

ती डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होती.....

याला हसता पण येतं ,किती गोड दिसतो ना ड्रॅक्युला हसतांना..... ती त्याचं हसणं डोळ्याने टिपत होती....

ही काही तुझी परमनंट जागा नाहीये, ये बाई उठा आता, खूप अवघडलो या  पोझिशन मध्ये..... अर्जुन त्रासिक सुरात म्हणाला.

अं......हो....... म्हणत एका हातावर बॅलन्स करत ती उठायचा प्रयत्न करत होती.... एक हात तिचा अर्जुन च्या पाठीमागे अडकला होता...... नी परत बॅलन्स जाऊन ती त्याच्या छातीवर धाडकन आदळली..... तिचं डोकं आता अर्जुनच्या ओठांजवळ होतं, अचानक त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या कपाळाला झाला....... तिच्या अशा स्पर्शाने त्याच्या मनात वेगळीच अशी गोड भावना येऊन गेली........ती मात्र त्याच्या अशा स्पर्शाने अवघडली होती ,एक शिरशिरी  अंगातून निघून गेल्यासारखं तिला वाटलं, ती तिचा त्याच्या पाठीमागचा हात काढायचा प्रयत्न करू लागली पण तो काही निघत नव्हता......तो तीची हात काढण्याची धडपड बघत होता.....

एक मिनिट थांब हलू नको.....,.... म्हणत त्याने तिला एक हाताने तिच्या पाठीवर घट्ट पकडून त्याने त्याची कड बदली.... दोघेजण आता एक कडा वर झाले होते...... थोड्या वेळासाठी तिला तर कळलंच नाही काय होतंय..... अर्जुन उठुन उभा राहीला, मग त्याने त्याचा एक हात तिला दिला, माहिने पण त्याचा हात पकडला आणि ती उठून उभी राहिली.......

माही हा ड्रॅक्युला ओरडायचा आधी पळ  इथून नाही तर तुझी काही खैर नाही ,.........माही मनातच बोलत आजीच्या रुमकडे धूम ठोकली

माहीने आजीला कामाबद्दल चा सगळा फॉलो अप दी, काम कुठपर्यंत आलं ,कसं चाललंय ,डिझाईन, रफ वर्क ती दाखवत होती.......

गुड, आपण तर वेळे पेक्षा पण पुढे काम करतोय.... आजी तिला शाबासकी देत बोलली..

आजीचे काम आटोपून माही खाली आली, बघते तर रुही सोफ्यावर दोन्ही गालांवर हात ठेवून सॅड फेस करून बसली होती....

अरे आमच्या राजकुमारीला काय झालं...... नाराज दिसते..... माहि तीच्या जवळ जात लहान मुलांसारखी बोलली...

कुणालाच वेळ नाही आहे माझ्यासाठी, सगळेच बिझी आहे....... रुही नाटकी सुरत बोलली

आले माझ्या शोन्या, माहि तीला मांडीवर घेत बोलली.

अगं काही नाही आता गोकुळाष्टमी आहे ना, तर शाळेमध्ये डान्स आहे, श्रीया सुद्धा घराबाहेर आहे, मला काही डान्स येत नाही तर रुसून बसली आहे....... अनन्या त्यांच्याजवळ येत बोलली

बस येवढच ,यात काय रुसायचं...... कुणाला आवडत असेल तर मी शिकवू का डांस..... थोडं थोडं येतं मला तसं करता....... माही रुहिकडे बघत बोलली.

खरंच....... रुही तिच्या मांडीवरून उठून उड्या मारत म्हणाली..

हा बघ तुला चालत असेल तर मी शिकवू शकते...... माही

अरे वा आता तर सगळा प्रॉब्लेमच मिटला.......अनन्या

एक छान से लहान मुलांचे कृष्णा वरचं गाणं निवडून माही रुहीला डान्स शिकवत होती, घरातले हळूहळू सगळे जण त्यांच्या अवतीभवती येउन बसले.. नी कौतुकाने त्या दोघींकडे बघत होते...... डान्स संपला तसे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या...

अर्जुन त्याच्या खोलीत लॅपटॉपवर काहीतरी ऑफिस च काम करत बसला होता..... राहून राहून त्याच्या डोक्यात माहीचा च विचार येत होता.....

काय होतय मला, का तिचा विचार सतत माझ्या डोक्यात आजकाल येत असतो, का तिचा स्पर्श झाला तर वेगळेच फिलिंग झालं मला ,असं कधीच नव्हतं अनुभवलं मी, मी तर कधीच कुठल्या मुलीला आपल्या आजूबाजूला सुद्धा फिरकू दिले नाही, मला तर कोणत्याच मुली आवडत नव्हत्या कधीच....... बापरे वेड लागेल मला..... अर्जुन मनातच विचार करत होता.......

जाऊदे ,ती तर आहेच  पागल , मला पण पागल करून सोडायची, चला अर्जुन साहेब कामावर लक्ष केंद्रित करा........ अर्जुन स्वतःचीच बोलला... नी कामावर फोकस करू लागला... तेवढ्यात त्याला गोंधळाचा आवाज ऐकू आला, जोराने कुठलंतरी गाणं सुरू होतं...... अर्जुन त्याच्या कामावर फोकस करू शकत नव्हता...

यार हे लोकं जरा सुद्धा शांत बसत नाही ,नुसता गोंधळ घालून ठेवतात ,कामावर कॉन्सन्ट्रेट तरी कसं करायचंय एवढ्या आवाजात...... नावासाठी नुसतं घराचं नाव शांती सदन आहे पण एक मिनिट येथे शांती भेटत नाही......त्यात हे माही नावाचं कार्टून  आल्यापासून तर जास्तीच गोंधळ सुरू झालाय.........काही विचारायची सोय नाही..... सगळं घर रुही च्या वयाच बनतं...... बडबडतच अर्जुन लॅपटॉप बाजूला ठेवून रूमच्या बाहेर आला.... समोर बघतो तर काय त्याचे डोळेच विस्फारले.... त्याने कपाळावर हात मारून घेतला...

खाली आजी ,आई ,मामी ,अनन्या ताई ,रुही नी माही सगळेजण झिंगाट गाण्यावर गोंधळ घालत नाचत होते.........

अर्जुनाला ते बघून आश्चर्य झालं आणि रागही आला, आवाजामुळे त्याचं डोकं फिरलं होतं....... तो एकटक रागाने सगळ्यांकडे बघत होता.....

नाचता नाचता माही चे लक्ष अर्जून कडे गेलं....... त्याला तसं रागाने एकटक बघताना बघून ती जागीच स्तब्ध उभी राहीली..... नी सगळ्यांना हाताने शांत व्हा शांत व्हा इशारा करत होती.... पण कोणीच ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हतं....सगळेच आपल्यातच मस्त होते 

माही आता तुझा जॉब  गेला, इतक्या रागात तर मी ड्रॅक्युला ला कधीच बघितलं नव्हतं.... कसे खाऊ कि गिळू नजरेने बघत आहे.... माहीची मनातच बडबड सुरू होती..ती घाबरतच अर्जुन कडे बघत होती ..

तो काहीतरी बोलणार तेवढ्यात त्याचे लक्ष त्याच्या आईवर गेलं ,त्याची आई खूप आनंदाने  गाण नी  डान्स एन्जॉय करत होती...... खूप वर्षांनी त्यांनी आईला इतका आनंदी बघितलं होतं...... सगळ्यांना तसं एन्जॉय करताना बघून आता त्यालासुद्धा आनंद झाला होता...,... राग विसरून आता त्याच्या चेहर्‍यावर सुद्धा हसू पसरलं होतं...... त्याने माही कडे बघितलं... तिच्याकडे बघून तो गालातल्या गालात हसत त्याच्या रूम मध्ये निघून गेला....

त्याला असं हसताना बघून आता माहि ला सुद्धा बरे वाटले..... ती सुद्धा सगळ्यांमध्ये सामील होऊन आता डान्स एन्जॉय करत होती........

********

क्रमशः

🎭 Series Post

View all