Jan 22, 2022
प्रेम

तुहिरे... कसं जगायचं तुझ्याविना 13

Read Later
तुहिरे... कसं जगायचं तुझ्याविना 13

भाग १३

 

आज सकाळी सकाळी परत आईने अर्जुन जवळ त्याचा लग्नाचा विषय काढला होता...

अर्जुन ही काही मुलींची फोटो आहेत .... सगळ्या उच्चशिक्षित , सुंदर नि तुझ्या तोलामोलाच्या आहेत....तुला ऑफिस मध्ये पण मदत होईल.....बघ कोणी तुला आवडते काय...???.आई

आई...........हे काय आज  सकाळी सकाळी हा कोणता विषय घेऊन बसलीस.... मला काही इंटरेस्ट नाही आहे लग्न वैगरे मध्ये......अर्जुन

अरे लग्नाचं वय झालं आहे तुझं....किती दिवस असा नाही नाही करशील.????...आई

तुला माहिती आहे मला हे काही आवडत नाही, तरी का सारखी सारखी मागे लागते  माझ्या.....अर्जुन

असं एकटे किती दिवस राहणार आहेस , कुणी नको का सुख दुःख वाटून  घ्यायला .???..अस एकट्याने नाही जगता येत बाळा..???.....आई

आई हे तू संगतेयेस मला.......? अर्जुन

असं नसते रे बाळा....सगळे लोकं सारखे नसतात.... आणि एखादं लग्न असफल झालं म्हणून सगळीच लग्न मोडत नसतात........आई

आई मला हे लग्न हे प्रेम या गोष्टींवर विश्वासाचं नाहीये, लोक फक्त पैशांवर प्रेम करतात ....कोणीच दिलेलं कमिटमेंट पाळत नाही नि मला कोणालाच काहीच कमिटमेंट द्यायची नाहीये... प्रेमात फक्त त्रास होतो, किती प्रेम करायची तू तुझ्या नवर्यावर, काय भेटले तुला....फक्त फसवणूक....अर्जुन

तुझे बाबा आहेत ते....आई

माझ्यासाठी तुझा नवराच फक्त....बापाचं काय कर्तव्य केले  त्यांनी.....तूच माझा आई नी बाप झालीस......ती बाई आली नि ते तिच्यासाठी आपल्याला सोडून गेलेत.......नी ती बाई पण फक्त त्यांच्याकडे खूप पैसे होते म्हणून त्यांच्या जवळ आली.......तिची गरज संपली तर तिने त्यांना सोडून दिले..........माझा मुलींवर स्पेशली या गरीब घरच्या मुलींवर तर अजिबात विश्वास नाहीये.....अर्जुन

आई चा डोळ्यांच्या कडा पाणावल्या थोड्या...त्या पुसत, सगळ्या मुली अशा नसतात रे....एकीची शिक्षा तू स्वतः का करून घेतो आहेस......प्रेम ही खूप छान भावना असते...तुला आता नाही कळणार, जेव्हा तुला प्रेम होईल ना तेव्हा कळेल....आई

मला ऐवढ माहिती की प्रेमात नी लग्नात फक्त त्रास मिळतो....तुझं आयुष्य बघितले आहे मी...किती झुरत होती तू त्यांच्या साठी.....कसा तू बिझनेस उभा केला मामाच्या आणि आजीच्या मदतीने.....किती त्रास झाला तुला या सगळ्यांचा.....स्वतःच्या मेहनतीने हे सगळं उभ केलेस, किती थकायची तू....तुझा त्रास कळूनही मी काही करू शकत नव्हतो.......पण मला तेव्हा तुझा खूप राग आलेला जेव्हा तू त्यांना परत घरी घेऊन आली...अर्जुन

अरे तेव्हा ते बिमार होते , कॅन्सर झाला होता त्यांना,  एकटे होते, ती पण त्यांना सोडून गेली होती, त्यांना त्यांची चूक कळली होती.... कसं सगळं कळून एकटे सोडणार होती..????......आई

बघ शेवटी व्यक्ती स्वर्थीच निघतो, ते पण स्वार्थी निघाले, जेव्हा कोणी नव्हत निं गराज होती म्हणून त्यांना त्यांची चूक कळली.....प्रेम म्हणजे नुसता स्वार्थ असतो....नी मला ते नकोय..... मी कोणत्याच मुलीच्या प्रेमात कधीच पडणार नाहीये........लग्नासाठी माझ्या मागे तू पडू नको प्लीज....अर्जुन

आई वैतागली नी तिथून निघून गेली...

अर्जुन ऑफिस ला निघून गेला...
सकाळी सकाळी आईने लग्नाचा विषय काढल्यामुळे अर्जुनचा आज मूड कामांमध्ये लागत नव्हता,..आईच्या बोलण्यामुळे, बालपणीच्या सगळ्या गोष्टींची त्याला आठवण झाली होती, त्याच्यामुळे  तो अजूनच जास्ती रागात होता...ऑफिसमध्ये 2 3 एम्पलोयी वर पण त्याचे ओरडून झालं होतं......कसं काय कोणी कुणाच्या लाईफला असंच स्पॉइल करू शकतो,  असेच विचार त्याच्या मनात घोळत होते.
 

माही फाईल घेऊन ऑफिसमध्ये पोहचली... चमेलीला पार्क करून ती आत मध्ये जायला निघाली , हेड ऑफिस मध्ये पाय ठेवल्या ठेवल्या
बापरे काय मोठा  ऑफिस आहे..... आमच्या ऑफिस पेक्षा चौपट पाचपट असेल... माही ऑफिसचे निरीक्षण करत मनातच बडबडत  होती.....

गेट वर पोहोचली तसं सिक्युरिटी गार्ड ने तिला अडवलं, तिने तिच्या ऑफिसचा आय कार्ड त्याला दाखवलं, आयकार्ड बघून सिक्युरिटी ने माहिला आत मध्ये सोडलं

मॅम,  मला अर्जुन सरांना भेटायचंय,  ही फाईल त्यांना द्यायची आहे,  माही रिसेप्शनिस्ट जवळ जाऊन तिला विचारत होती

सर आता बिझी आहे,  तुम्हाला थोडा वेळ करावा लागेल...... रिसेप्शनिस्ट माहीला बोलली ..

मॅम फार महत्त्वाची फाइल आहे,  त्यांनी इथे आत्ता अर्जंट बोलवून घेतले आहे ... माही रिसेप्शनिस्ट ला म्हणाली

ओके वेट, मी कॉल करून एकदा कन्फर्म करते, रिसेप्शनिस्ट माहिला पुढे सोफ्यावर बसायला सांगून बोलत होती..

रिसेप्शनिस्ट ने  आत मध्ये कॉल करून माही आल्याचे कळवले..

माही माम, तुम्ही आत मध्ये जाऊ शकता रिसेप्शनिस्ट माहीला  म्हणाली.

मॅडम सरांच्या केबिन कुठल्या साईडला, माहीने रिसेप्शनिस्ट ला विचारले.

रिसेप्शनिस्ट ने माहीला अर्जुन सरांची मीटिंग जिथे सुरू होती तिथे पाठवले.

आज त्यांच्या कंपनीच्या कॅलेंडरच  फोटो शूट सुरू होतं,  फोटोशूटची  ब्राइडल  थीम होती.

आत मध्ये फोटोग्राफर अर्जुन आकाश असे तीन चार लोक बसले होते..... त्यानंच्यामध्ये कॅलेंडर वरून काहीतरी डिस्कशन सुरु होतं....

माहीने तेवढ्यात डोअर नॉक करून आत येण्याची परमिशन विचारले

अर्जुन ने तिला आत यायला सांगितले
अर्जुन मीटिंग मध्ये बिझी असल्यामुळे माही एका कॉर्नरला फाईल घेऊन उभी होती आणि त्यांचे बोलणे ऐकत होती... काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यांच्या बोलण्यावरून तिला कळत होतं.

How dare ,  ती अशी कशी काय कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू शकते वेळेवर  अर्जुन चिडत बोलत होता. तिच्या सोबत असलेले आपले सगळे कॉन्ट्रॅक्ट आत्ताच्या आत्ता कॅन्सल करा,  मला ती या कंपनीत नको आहे.....

सर पण ती टॉप ची मॉडेल आहे ,आपल्याला इतक्या शॉर्ट टाईम स्पेनमध्ये परत अशी मॉडेल भेटणार नाही... फोटोग्राफर अर्जुन ला म्हणाला.

आपण पोस्टपोन करू या फोटोशूट.... नेक्स्ट वीक मध्ये प्लान करू,... कॅलेंडर प्लॅनर अर्जुनाला सांगत होता.

आय डोन्ट केअर,  तिला आत्ताच्या आत्ता काढा,  तिच्या जागेवर दुसरी कोणतीही शोधून आना... अर्जुन सगळ्यांना म्हणाला

जो टाईम मॅनेज करू शकत नाही,  मला ती इथे नकोय... अर्जुन चिडतच बोलला.

माही हे सगळ्यांच्या ऐकून तिने थोडी मधात बोलायची हिंमत केली...

स.... सर  मी.... मी काही बोलू का माझ्याकडे काही आयडीया आहेत  ......माही त्या सगळ्यांना म्हणाली.

अर्जुन तिच्या असा विचारल्याने  राग आला होता,.  आता ही काही आयडिया देणार आहेत,  इतके सगळे वेल एज्युकेटेड लोक बसले आहे नि ही आता आपल्याला आयडिया देणार....

हमम...बोला मिस देसाई ....अर्जुन रागातच तिला बोलला....

सर मला काय वाटते तुम्ही हे फोटोशूट टॉपच्या मॉडेल्स घेण्यापेक्षा नॉर्मल मुलींना घेऊन केले तर ते खूप छान दिसेल.... माही त्या सगळ्यांना बोलली

oh really  ......अर्जुन तिच्याकडे बघत बोलला

वेट वेट अर्जुन हे काहीतरी न्यू आहे ......कॅलेंडर मॅनेजर अर्जुनला म्हणाला

मिस माही तुम्हाला काय बोलायचं..... तुमचा कन्सेप्ट आम्हाला विस्तृत करून सांगाल काय...??.... कॅलेंडर मॅनेजर माहीला विचारले.

हो नक्कीच सर ......माहि त्याला म्हणाले

सर आपली किती ब्राइडल थीम आहे ,आपण हे वेस्टर्न ब्राइडल आऊटफिट करण्यापेक्षा, इंडियन ट्रॅडिशनल ब्रायडल थीम करूया....हे कॅलेंडर आपण आपल्या भारतासाठी वापरतोय तर त्यात तर आपण आपल्या भारताच्या brides दाखवले तर ते अधिकाधिक लोकप्रिय होईल असं मला वाटते.... आणि यासाठी आपण नॉर्मल मुली घेऊयात, आपल्या भारतामध्ये प्रत्येक मुलीचं लग्नाचं हे मोठे स्वप्न असते, तर त्यांचे expressions, त्यांचे भाव ,त्यांचे लाज लज्जा त्यांच्या चेहऱ्यावर अगदी आतून मनापासून आलेले असतील, कुठेच दिखाऊपणा दिसणार नाही,  नॅचरल दिसेल जे की मोठ्या मॉडेल्स चेहऱ्यावर दिसणार नाही.... आणि मग ही साधीच मुलगी  खूप सुंदर दिसेल..... माहि सगळ्यांना तिचं बोलणं सांगायचा प्रयत्न करत होती.

अर्जुन न आवडलेल्या नजरेने त्यांच्याकडे बघत होता, आय डोंट थिंक थिस आयडिया विल वर्क.... अर्जुन सगळ्यांना म्हणाला

नो अर्जुन, आय थिंक थिस विल वर्क, थिस इज समथिंग न्यू कॉन्सेप्ट , मला वाटते हे खूप फेमस होईल कॅलेंडर...... मॅनेजर अर्जुनला बोलला..

खरंच ......तुला असं वाटते...?  अर्जुन त्याला म्हणाला.

हे बघ तुला डाऊट असेल तर आपण  फोटो शूट करायचे आधी एखाद्या ट्रायल घेऊया.... व्हॉट्स से.???....  कॅलेंडर मॅनेजर अर्जुनला बोलला

ठीक आहे गो अहेड...... अर्जुन सर्वांना म्हणाला

ठीक आहे पण आता नॉर्मल मुलगी कुठून आणणार.... कॅलेंडर मॅनेजर सगळ्यांकडे बघत बोलला

अर्जुन थोडा विचार करून ....माही कडे बघून .....ही आहे ना हिला घ्या.......

मी ...... मी कसं काय करू शकते हे मला नाही जमायचं..?माहित थोडीशी त्रासात आश्चर्यचकित होत बोलली

मिस देसाई तुम्हीच बोलला मध्ये, तुम्हीच दिली ही आयडिया आणि तुम्ही आमच्या कंपनीसाठी काम करता, तुम्हाला माझी ऑर्डर मानावीच लागेल ....अर्जुन तिला म्हणाला

आणि तुमच्या पेक्षा सामान्य वर्गातली  मुलगी  शोधून पण भेटायची नाही..... अर्जुन तिच्याकडे बघत म्हणाला

सर पण ........माही त्याच्याकडे बघत बोललात होती

नो एस्क्युज ,गो अंड गेट रेडी.... अर्जुन सगळ्यांना ऑर्डर देत बोलला

कॅलेंडर मॅनेजर नी इशारा केला तशी एक मुलगी पुढे येऊन माही ला ड्रेसिंग रूम मध्ये घेऊन गेली.....

माहि रूमध्ये जाता जाता मागे वळून वळून अर्जुन कडे बघत होती, जसं काही तिला सांगायचं होतं की मला नाही  करायचं हे काम...... अर्जुन सुद्धा एकटक तिच्याकडे बघत होता ....

थोड्या वेळाने माही बाहेर आली ,अर्जुन त्याच्या जागेवर उठून उभा राहिला नी डोळे विस्फारुन एकटक माही कडे बघत होता....

माहीने गडद हिरव्या रंगाची गोल्डन बॉर्डर असलेली सिल्कची साडी घातली होती त्यावर साजेसा मेकअप, हातात हिरव्या गोल्डन कलर कॉम्बिनेशन च्या बांगड्या घातल्या होत्या ,गळ्यामध्ये नाजूकसे नेकलेस त्यालाच मॅचिंग असे कानात इयरिंग्स घातले होते, कपाळावर छोटिशी हिरव्या रंगाची टिकली त्याच्याखाली चंद्रकोर असे लावलं होतं, केसांचा अंबाडा घातला होता , ती एखाद्या नवीन नवरी प्रमाणे भासत होती..... अर्जुन तिला एकटक बघत उभा होता.

माही च्या डोळ्यात पाणी साचलं होतं.......आपल्या नशिबात असं कोणाची नवरी बनायच लिहिलंच नाहीये,  हे आठवून आठवून तिला फार दुःख होतं..... आणि तिच्या पाणी भरल्या नजरेने अर्जुन कडे एकटक बघत होती.

माहिच्या डोळ्यातलं पाणी पाहून अर्जुन च्या ह्रदयातून एक कळ निघाली,  त्याला पण तिला तसं बघून फार वाईट वाटत होतं, तो तिच्या डोळ्यातले भाव वाचण्याचा प्रयत्न करत होता ...... तिच्या डोळ्यात त्याला दुःख दिसत होते, तिच्याकडे तसं बघून त्याचं मन म्हणत होतं की तिच्या जवळ जावं आणि तिला म्हणावं माही काळजी करू नकोस मी आहे ना सगळं नीट होईल...... तो तिच्याकडे एकटक बघतच तसाच पुढे तिच्याजवळ चालत-चालत हळू जात होता, त्याला असंच जवळ येत बघून माहिला धडधडायला लागलं ती त्याची नजर चोरून इकडेतिकडे बघायला लागली.....

अर्जुन अगदी तिच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि तिच्या डोळ्यात आरपार बघू लागला,  आता माहि सुद्धा त्याच्या डोळ्यात हरवली होतील,  जसे काही त्याचे डोळे तिला सांगत होते, काळजी करू नकोस, या भावनेनेच तिच्या डोळ्यातून पाणी तिच्या गालावर  वर ओघळल...थोड्या वेळासाठी त्याच्या डोळ्यात बघून तिला असं जाणवलं की अर्जुनच्या पण डोळ्यांच्या कडा पाणावल्या आहे... अर्जुन अगदी तीच्या समोरासमोर जाऊन उभा राहिला , थोडासा समोर झुकला, तो त्याचा एक हात  तिच्या खांद्याकडे नेत होता.....त्याला असं तिच्या खूप जवळ बघून ती थोडीशी शहारली आणि तिने डोळे बंद करून घेतले.... तिचे बंद डोळे पाहून अर्जुन ला गालात थोडं हसू आलं, त्याने त्याचा एक हात मागे नेऊन तिने घातलेल्या अंबाडा काढला, आणि केस मोकळे केले......

नाऊ इट्स परफेक्ट........ अर्जुन बोलला आणि मागे वळला आणि सरळ आपल्या केबिनमध्ये निघून गेला... त्याला माहीत होतं तो तिला तसं डोळ्यात पाणी आलेलं बघू शकत नव्हता....... त्याला हे असं का वाटत होतं त्याला काहीच कळत नव्हतं....

*******
क्रमशः

*********

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️