Jan 22, 2022
प्रेम

तुहिरे.. कसं जगायचं तुझ्याविना 16

Read Later
तुहिरे.. कसं जगायचं तुझ्याविना 16

भाग-16
 

माही ड्रेस डिझाईनिंग काम आटोपून सगळे अपडेट द्यायला  आजीीेीे कडे गेली..

काय करत आहात तुम्ही सगळे.......? बापरे काय सुंदर बाप्पांचे फोटो आहेत....... लॅपटॉप वरचे बाप्पांचे मूर्ती बघून माही बोलली.......

आजी, नलिनी ,अनन्या ,श्रिया सगळे लॅपटॉप मध्ये बाप्पांच्या मूर्तींचे फोटो बघत होते

अगं ये बस............ आता पुढच्या आठवड्यात बाप्पा येतील ना , त्याची तयारी करत होतो........ बरं सांग कुठले बाप्पा आवडले ?आम्ही सगळे गणपती स्थापनेसाठी मूर्ती शोधतोय.......... आजी

लॅपटॉप वर.........? माही आश्चर्यचकित होत बोलली

अगं हो दुकानात जायला या पोरांना, कोणालाच वेळ नसतो, वेळ नाही वेळ नाही करत ओरडत असतात........ आणि तसं पण आजकाल हे ऑनलाईन जास्त डिझाइन्स भेटतात म्हणून आपलं तिच्यातच बघतो आहे....... का काय झालं इतका आश्चर्यचकित व्हायला..?? तुझ्याकडे पण होत असेल ना गणेश स्थापना ??........... नलीनी

हो असते ना  .....आम्ही पण गणेश स्थापना करतो........... मी तर दरवर्षी घरीच बनवत असते गणेश मूर्ती ....... माही

काय ............? सगळे आश्चर्यचकित होत तिच्याकडे बघत होते

हो,  म्हणजे अशी इतकी सुंदर कोरीव नाही बनवता येत , तरीपण आम्ही घरीच बनवतो,  खूप आनंद मिळतो मूर्ती  बनवताना........ या सगळ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या आहेत..... या विसर्जनाच्यावेळी पाण्यात पूर्णपणे विरघळत नाहीत......... आणि यामध्ये वापरलेला रंग आणि मटेरियल मुळे पाण्याचे प्रदूषण होते ते वेगळेच......... गणपती विसर्जनानंतर आम्ही असंच एकदा तलावाजवळ गेलो होतो ....... तर तलावाच्या काठावर बऱ्याचशा मुर्त्या पडल्या होत्या , कुणाचा एक हात तुटलेला , कुणाची सोंड तुटलेली , कुणाच्या चेहऱ्याचे काहीतरी खराब झालेलं....... ते बघून आम्हाला फार वाईट वाटलं......... दहा दिवस  त्यांना आपण देवबाप्पा म्हणून त्यांची मनोभावे पूजा करतो आणि नंतर विसर्जन करतो , पण काही मुर्त्या पूर्णपणे विरघळत नाही आणि मग त्याचे असे हाल होतात,  ते बघून फार वाईट वाटले, तेव्हापासून मी ठरवलं की आपण घरीच साधी मातीची मूर्ती करुयात,  पाण्यामध्ये पूर्णतः  विरघळते आणि पाण्याचं पोलुशन सुद्धा होत नाही आणि हीच माती आपण परत नवीन झाडं लावायला वापरू शकतो....... आणि मूर्ती बनवताना खूप आनंद सुद्धा मिळतो,  मूर्ती बनवणे हेसुद्धा देवाची आराधना करण्या मधलाच एक प्रकार आहे ना...?? या प्लास्टर ऑफ पॅरिस च्या, मोठ्या मुरत्या दिसायला खूप सुंदर दिसतात म्हणून आपण त्याकडे जास्त अत्त्रॅक्ट होतो, पण देव तर आपल्या मनामध्ये असतो, डोक्यामध्ये असतो, जसा विचार केला, जसे त्याचे रूप आठवले तसा तो आपल्या डोळ्यांसमोर येतो., मनापासून प्रार्थना केली की तो आपल्या पाठीशीच असतो. मग या पाण्यात न विरघळणाऱ्या मुरत्या का वापरायच्या...??का त्याची हेळसांड करायची???....... हे फक्त माझे विचार आहेत , सगळ्यांनी आपापल्या आवडीने देवाची आराधना करावी, यात माझं काहीच म्हणन नाही........... माही बोलत होती

सगळेजण आ वासून तिच्याकडे बघत होते.......... इतकी लहान पण किती समजदारपणा आहे तिच्यामध्ये , आजीला तिचं कौतुक वाटलं.......

अगं किती छान सांगितलंस तू , आम्हाला का नाही सुचलं आधी हे सगळं ...... आणि पूजेमध्ये भाव सगळ्यात महत्वाचा आणि आपल्या हाताने बनवलेली मूर्ती खूपच उत्तम.......... आजी

आजी आपण पण घरीच बाप्पांची मूर्ती बनवूया काय........ श्रिया

हो हो....... मला तरी अगदीच पटलं आहे तिचं बोलणं,  काय म्हणता आई तुम्ही........ नलिनी

हो चालेल ...... यावर्षीची तुझी मूर्ति झाली काय बनवून???......आजी

नाही अजून, आता घरी गेली की बनवणारच होते........ माही

मग असं कर तू तुझी मूर्ति सुद्धा इथेच बनव आणि आम्हाला सुद्धा शिकव,  म्हणजे आम्ही पण घरीच बनवू मूर्ती............ आजी
 

ठीक आहे , पण माती??....... आता पाच वाजलेत मार्केट मधून माती घेऊन येईपर्यंत सहा- साडे सहा होती आणि त्यानंतर मूर्ती बनवू,  खूप रात्र होईल..........माही

अग मग आपल्या गार्डनमध्ये आहे ना माती,  ती वापरूया....... अनन्या

अहो त्यामध्ये फार खडे आहेत,  आपल्याला अशी माऊ माती लागेल......... जशी ती वरच्या टेरेस गार्डन मधल्या कुंड्यांमध्ये आहे......माही

अरे बापरे ते तर अर्जुनच गार्डन आहे,  तो तर तिथे आम्हाला कोणाला हातही नाही लावू देत.......... तिथली माती घेतली तर तो फार चिडेल......... नलिनी

आजी तुम्ही बोलाना तुम्हाला ना , नाही म्हणणार तो....... श्रेया

नाही रे बाबा , गार्डन आणि फुलझाडं म्हणजे त्याचा जीव की प्राण............ तिथे कोण हात लावेल,  विचारून पण काही फायदा नाही.... तो नाहीच बोलणार........ आजी

बरे,  आपण लपून आणि तर...... पण मग ते तर चोरी केल्यासारखं होईल........ श्रेया

चांगल्या कामासाठी घेतोय........ आणि आपल्या घरातील तर माती घेतोय , त्यात काय चोरीचं आलं??.......माही

अग पण त्याच्या रूम मधून जाऊन आणेल कोण.......??. आमची नाही बाबा हिंमत , तो फार रागवतो....... श्रेया

तो आत्ताच बाहेरून आला आहे.......... यावेळी तो वॉशरूम मध्ये असेल,  हाच काय तो आपल्या जवळ आहे,  लवकर जाऊन घेऊन या .............नलिनी

श्रेया चल पटकन आपण दोघी जाऊन घेऊन येऊया,  तू बाहेर उभी राहून लक्ष दे,  मी आत मध्ये जाऊन माती घेऊन येते....... बोलत दोघीजणी वरती अर्जुनच्या रूमच्या दरवाज्याजवळ उभ्या राहून आत मध्ये अर्जुन कुठे दिसतो काय  बघत होत्या....

माही ..,... दादू वॉशरूम मध्ये आहे,  आवाज येतोय..... जा पटकन घेऊन ये,  हे इथे टब ठेवते,  यामध्ये तू माती आणून टाक...... श्रेया

अगं पण ते आले तर मला कसं कळणार...?? तू काहीतरी खूण कर , म्हणजे मला कळेल......माही

अग पण काय करू....???. श्रेया

तू असा कुकुच्कु आवाज कर...... म्हणजे मला कळेल....माही

ओके डन.... श्रेया

माही दबकत दबकत अर्जुन चा रूम मधून बाहेर टेरेस गार्डन मध्ये गेली आणि कुंडीतली ओंजळी मध्ये माती घेऊन परत रूम मधून श्रेया जवळ ठेवलेल्या टब मध्ये टाकली.. परत गेली.... अशा तिच्या चार-पाच चक्कर झाल्या

अगं एवढ्या मातीने काय होणार ...??आपल्याला खूप माती हवी.... श्रेया

माही परत आत मध्ये माती आणायला गेली....
इतक्यात अर्जुन वॉशरूम मधून बाहेर आलाच होता की त्याला माही हळूहळू दबकत त्याच्या रूम मधून माती घेऊन जाताना दिसली आणि परत फिरून गार्डन मध्ये गेली...

हे काय करते आहे ही....???.... पण ही काहीही करू शकते....????.. मनातच विचार सुरू असताना त्याचे लक्ष दाराजवळ असलेल्या श्रेया कडे गेलं.... तशी श्रेया तिथून उठून पळाली

अर्जुन हळूच माही च्या मागे जाऊन बसला... माही कुंडीतून माती घेत होती..... माती घट्ट झाली होती तर निघत नव्हती तर ती माती काढण्यात मग्न होती...

काय करते आहे.???... अर्जुन हळुच प्रेमाने बोलला

दिसत नाही का माती घेत आहे......माही कुंडी तच बघत बोलली

कशासाठी???....अर्जुन

बाप्पांची मूर्ती बनवायची आहे.... डिस्टर्ब नका करू मला,  माझे काम करू द्या..... तो ड्रॅक्युला वॉशरूम मध्ये आहे .......बाहेर यायच्या आधी मला माती घेऊन जायची आहे.......माही

हे असं एकेक ओंजळीत किती वेळ नेशील,  तो ड्रॅक्युला बाहेर येऊन जाईल  तेवढ्या वेळात..???..अर्जुन

हो ना...... मग काय करू....???.. आणि हळू बोल ना त्या खडूस ला ऐकू जाईल........ माही हळू आवाजात बोलली

हा घे टब...... तो एक टब कुंडी जवळ ठेवत बोलला..

अरे हा छान आयडिया आहे.... ही मला का नाही सुचली आधी.... माही

ह्म्म.....डोकं वापरावं लागतं त्यासाठी .....अर्जुन

अरे एक मिनिट दाखवा घडी,  किती वाजले ते बघू द्या ..... अर्जुन तिच्या बाजूने टप ठेवत होता तेव्हा तिने त्याचा हात मध्ये घडी बघितली.....

अरे ही तर सेम  ड्रेकुला च्या घडी सारखी घडी आहे....... का घेतली ..??ती काढून ठेवत जा लगेच , नाहीतर तो खडूस ओरडायचा...... असं म्हणत तिच्या डोक्यात काही प्रकाश पडला आणि तिने वळून मागे बघितलं........

त....... त.....तुम्ही..... तुम्ही काय करता आहात इथे ....??? माही घाबरतच उभी होत बोलली, घाबरल्यामुळे तिच्या हातातली मातीचा हाथ चुकून हवेत  उडाला...

तेच मी तुला विचारायला हव  तू काय करते येथे ..???..... माझ्या परमिशन शिवाय तुझी हिम्मतच कशी झाली इथे हात लावायची...,???....माझ्या वस्तूंना मला न विचारता हात लावलेला मला अजिबात आवडत नाही..............अर्जुन थोडा ओरडतच बोलला

नकळतपणे माही तिच्या हातातून माती उडाल्यामुळे ती तिच्या डोळ्यात गेली...... आणि तिचा  डोळा  फडफडू लागली..., तिच्या हाताने डोळे पुसणार तेवढ्यात अर्जुनने तिचा हात पकडला.......

सोडा माझा हात...... हात का पकडला माझा......??? तुमच्यासारख्या सभ्य मुलाला असं एकट्यात मुलीचा हात पकडलेला शोभत नाही..... सोडा म्हणते ना मी..... माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं,  मला पुसायच आहे..... ती हात सोडवून घेत म्हणाली....

ए.. तू स्वतःला काय समजते का कुठली परी की राणी.??.... मला काही हाऊस नाहीये तुझा हात पकडायची...... आपले हात बघा आधी तेच तू डोळ्याला लावत होती.... अर्जुन चिडत बोलला........ आणि बाजूच्या टेबल वरून टिशू पेपर घेऊन तिच्या डोळ्यात जवळची माती आपल्या हाताने साफ करू लागला....... त्याची काळजी बघून ती एकटक त्याच्याकडे बघत राहिली....... नंतर त्याने आपल्या हाताने तिच्या डोळ्याची पापणी पकडून वर करून तिच्या डोळ्यांमध्ये हळुवार फुंकर करत होता.........तिच्या डोळ्यातला कचरा निघाला होता , तरी ती एकटक त्याला बघण्यात गुंग झाली होती........ आता तो पण तिच्या नजरेत कैद झाला होता......

माहिला इतका वेळ का लागते ये म्हणून श्रेया आवाज देत तिथे येत होती...... तिच्या आवाजाने दोघेही भानावर आले....... त्याने अजूनही तिच्या डोळ्यावर हात धरून ठेवला होता.... तिने इशाऱ्याने त्याच्या हाताकडे बोट दाखवलं.....तसा त्याने हात खाली केला.....

ठीक आहेस आता.....??.अर्जुन

तिने मान हलवली...... काय बोलावं तिला सुचत नव्हतं....

माती का घेतली...???.,अर्जुन

मूर्ती बनवायला...... माही

मला माहिती आहे तुमचा देवावर विश्वास नाही आहे पण आमचा सगळ्यांचा आहे,  आम्हाला मूर्ती बनवायची,  आता दुकानात जाऊन आणेपर्यंत खूप वेळ झाला असता,  म्हणून ही माती घेतली......,

हे बघा,  तुम्ही नाराज होऊ नका , मी देव बाप्पा जवळ सांगेल की तुमची माती वापरलेली , तर तुम्हाला खूप खूप खूप यश दे आकाशाएवढ........तुमचे सगळे काम होऊ दे, तुम्हाला जे पाहिजे ते भेटू दे , तुमचा खडूस स्वभाव जाऊ दे,  तुमचा राग कमी होऊ दे ,तुम्ही दुसऱ्यांना घाबरणं बंद करू दे..... तुम्हाला एका शहाणा मुलासारखं बनू दे.........माही बोलतच सुटली,  नंतर तिला कळलं आपण हे काय बोलून गेलो म्हणून तिने तोंडावर आपला हात ठेवला...... आणि भीतीने अर्जुन कडे बघत होती

अर्जुन रागाने तिच्याकडे बघत होता.....

बापरे रे आता आपली काही खैर नाही,  आपण काय बोलून गेलो , मनातच म्हणत तिने  मातीचा टप उचलला आणि तिथून धूम ठोकली.....

माही........माही....... अर्जुन आवाज देतच होता की तिथून आधीच गेलेली होती........ अर्जुन ने डोक्यावर हात मारून घेतला

हुश...... भेटली बाबा एकदा ची माती..... आनंदातच ती माती घेऊन खाली आली...

बऱ्याच वेळाने....

बापरे ही घरात असून इतके शांतता कशी आहे...?? विचार करत अर्जुन त्याच्या रुमच्या बाहेर येऊन उभा राहिला.... बघतो तर त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले

खाली सगळे गणपती मूर्ती बनवण्यात मग्न होते.., माही मूर्ती बनवत होती आणि सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स देत होती ,मूर्ती बनवण शिकवत होती...... आई आणि आजी मिळून एक मूर्ती बनवत होते ,एक मामा मामी मिळून बनवत होते.... रुही गडबड करते म्हणून अनन्या तिला वेगळी घेऊन मातीचे काही बनवत बसली होती...... श्रेया सगळ्यांना पाहिजे तशी मदत करत होती.., मामा मामीच्या मत 1 होत नव्हते त्यामुळे त्यांची मूर्ती पुढे सरकतच नव्हती,  बेस बनाऊन फक्त ठेवला होता,  वरून मामी नेलपेंट खराब होत होते तर तिची कुरबुर सुरू होती.... आई आणि आजी लक्षपूर्वक माहिचे ऐकत होते आणि मूर्ती बनवत होते......... सगळे खूप आनंदी दिसत होते घरात एक वेगळेच पॉझिटिव्ह वातावरण त्याला जाणवत होते..........

माहिला मूर्ती बनवताना बघण्यात तो दंग झाला होता , ती खूप मन लावून मूर्ती बनवत होती..... हवेमुळे वारंवार तिचे केस पुढे येत होते,  ती ते हाताने कानाच्या मागे घ्यायचा प्रयत्न करत होती , त्यामुळे तिच्या कपाळाला जवळ झाला जवळ बरीच माती लागली होती....

माही चा फोन वाजला, तिने कसाबसा आपल्या हातात फोन पकडून ती साईड पोर्चमध्ये गेली ..., कान आणि माने मध्ये फोन पकडून ती बोलत होती,  ......

हो आई मी सांगायचे विसरली मला थोडा उशीर होईल.... आम्ही इथेच बाप्पांची मूर्ती बनवत आहोत , आजींना सुद्धा बनवायची होती म्हणून मग इथेच बनवत आहे,  तर थोडा उशीर होईल,  येते मी थोड्या वेळात तुम्ही जेवून घ्या.... माही फोनवर बोलत होती तेवढ्यात तिचा फोन कोणीतरी हातात घेऊन  तिच्या कानाला लावला..... आता तिने मान सरळ करून नीट फोनवर बोलत होती तेवढ्यात समोर बघितलं तर तिची बोलतीच बंद झाली......, समोर अर्जुन उभा होता तिचा फोन तिच्या कानाजवळ पकडून...

मी येते लवकरच बोलून तिने फोन ठेवला....

त.... त.....तुम्ही ..... क........काय करताये इथे..?? मी खरंच मूर्ती बनवण्यासाठी ती माती घेतली होती,  बाकी माझा दुसरा कोणताच उद्देश नव्हता...... खरंच मी मुद्दाम तुम्हाला त्रास देण्यासाठी काही केले नाही....., आणि तेच खडूस ते चुकून माझ्या तोंडून निघून गेले....... ती घाबरतच बोलत होती....

ती बोलतच होती की त्याने त्याच्या हातातल्या बॉक्समधून टिशू पेपर काढून तिचा चेहरा पुसायला घेतला........ तो हळूवारपणे तिचा चेहरा पुसत होता....,.. त्याच्या स्पर्शाने तिला वेगळे फिलिंग जाणवलं... तिला त्याच्या काळजी करणं चांगलं पण वाटत होतं आणि भीती पण वाटत होती...... ...... आणि तो काय करतोय हे बघत बसली.....

ते मी करते .....ती त्याच्या हातातून टिशू पेपर घेत बोलली....

shhhh.......किती बोलतेस ग तू , तोंड नाही दुखत का तुझं...... म्हणत तो तिचा चेहरा साफ करत होता...

तो तिच्या खूप जवळ उभा होता,  तिची धडधड खूप वाढली होती......

हे जवळ असले की काय होतय मला....... मला आवडतात आहेत काय हे,  ......नाही मला कोणी आवडू शकत नाही मी असा कोणाबद्दल ही विचार करू शकत नाही..... ज्या गोष्टी शक्य नाही त्याचा  विचारच कशी करू शकते मी....... पण हे काय मि का ओढली जाते त्यांच्याकडे ........असं तर मला आधी कधीच नव्हते वाटले........माही ते तुझे बॉस आहे,  तुझी आणि त्यांची लेवल बघ कुठे आहे....... आणि मुळात म्हणजे तुझा काही हक्कच नाही आहे की तू असा काही विचार करावा..... हे योग्य नाही..... माहीचा मनात असे बरेच विचार सुरु होते........

तिचे केस हवेवर उडत होते तिच्या चेहऱ्यावर येत होते........ त्याने ते तिच्या कानामागे केले,  त्याच्या स्पर्शाने तिच्या मनामध्ये खूप काहूर माजलं आणि ती तिथून पळाली.......

तो तिथेच उभा हात तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत राहिला......

खूप छान बाप्पा तयार झाले...... माही तुझे खूप खूप धन्यवाद , आम्हाला  एक सुंदर गोष्ट शिकवल्या बद्दल..... आता आम्ही पण पुढे नेहमी असाच बाप्पा बनाऊ आणि त्यांची पूजा करू...... मन खूप प्रसन्न वाटते.....आजी

अरे वाह...... आज पहिल्यांदा या बावळट ने खूप छान काम केले आहे.......... अर्जुन आत मध्ये येत माही कडे बघत बोलला..

सगळे आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघत होते.....

म्हणजे दादू तू आमच्यावर रागवलास नाहीस तर , तुझ्या कुंडीतली माती आम्ही तुला न सांगता काढून घेतली..... सॉरी दादा..... श्रेया कान पकडत म्हणाली

घराचे सगळे आनंदी होत असेल तर मी अशा छोट्या गोष्टींना कधीच रागवणार नाही,  श्रेयाला कुशीत घेत अर्जुन माही कडे बघत बोलला.......

हा ........हा मला बावळट बोलला सगळ्यांसमोर.... माही... माहि डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत होती...

बरे आजी... आता खूप उशीर झाला मी निघते..... हे गणपती प्लीज पिंकी ला सांगून तुम्ही तिकडे बाहेर सुकायला ठेवाल काय..,??.. मी दोन दिवसांनी ऑफिसमधून येताना घेऊन जाईल........ माही

हो...ठीक आहे......

माही घरी जायला निघाली... चमेली जवळ येऊन गाडी स्टार्ट करणार की परत तिथे अर्जुन तिच्या समोर दिसला....

माही...... अर्जुन ने आवाज दिला

बापरे आता हे परत का आले , तिला टेन्शन आलं

आता बावळटला....... बावळट नाही म्हणणार काय म्हणणार...???.. अर्जुन तिच्याकडे मिश्कीलपणे हसत बोलला.....

तुम्ही मला हे सांगायला आला इथे??....... आणि तुमची हिम्मत कशी झाली मला बावळट म्हणायची.???......माही

जशी तुझी हिम्मत होते , मला ड्रॅक्युला आणि खडूस म्हणायची.......अर्जुन

बापरे..... माही तुझं काही खरं नाही.... माही त्याच्याकडे बघत विचार करत होती..

मला उशीर होतोय , मी चालली..... ती घाबरतच बोलली...

अग हे तर घेऊन जा , ज्यासाठी आलोय तेच तर राहिले,  बावळट कुठली....... असं म्हणत हसतच त्याने तिचा फोन तिच्या हातात दिला...

परत तेच....... असं म्हणत तिने फोन बॅगमध्ये टाकला आणि चमेली स्टार्ट करून धूम पळाली...

तो हसतच मागे वळला तर बघतो काय श्रेया अनन्या दोघे तिथे त्याच्याकडे बघत उभ्या होत्या.......

दादू,  हे काय तू हसतोय......??.. आणि आज तू आम्हाला रागवला पण नाही??.......... श्रीया

कुठे काय ...??..,तुम्हाला दुसरे काम नाही का ...??....चल हो आत मध्ये ....अभ्यास कर..... कसातरी उत्तर देऊन तो रूम मध्ये गेला..

श्रेया आणि अनन्या दोघी एकमेकांकडे बघत हसत होत्या.....

घरी माही बेडवर झोपल्या झोपल्या अर्जुन सोबत झालेले प्रसंग आठवत होती....... ते आठऊन तिच्या चेहऱ्यावर छानशी कळी उमलली...... आणि तिचं मीराकडे लक्ष केलं आणि ती स्वप्नातून वास्तवात आली.....

माही ड्रॅक्युला पासून दूर राहायचं........ आपल्या आयुष्यात राजकुमाराची कथा लिहिलेली नाही आहे..... तिच्या डोळ्यात पाणी आलं......... विचार करता करता कधीतरी ती झोपी गेली....

****

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️