Aug 16, 2022
प्रेम

तुहिरे ... कसं जगायचं तुझ्याविना 17

Read Later
तुहिरे ... कसं जगायचं तुझ्याविना 17

भाग 17


 

अर्जुन ऑफिसमधे जायला निघाला होता की आजीने त्याला आवाज दिला.........

अर्जुन इकडे ये ........बोलायच आहे तुझ्यासोबत थोडं  .......आजी

अर्जुन आजीजवळ जाऊन बसला........ बोल आजी ,  मला उशीर होतोय......

मला माहिती मिळाली की तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे ऑफिसमध्ये.......... आणि तुम्ही बाहेर जात असता.... फिरत असता........ हे बघा आमचं काहीही म्हणन नाही आहे....... पण असं मुलींसोबत  बाहेर फिरणं हे तुम्हाला शोभत नाही , त्यापेक्षा तुम्ही लग्न करून घ्या.......आजी

गर्लफ्रेंड.... कोण गर्लफ्रेंड ....?माझी कोणी गर्लफ्रेंड नाही...... अर्जुन

मग सोनिया कोण आहे....??... आजी

आजी ती फक्त माझी फ्रेंड आहे... कॉलेज पासून आम्ही सोबत आहोत... ..  ऑफिसच्या कामाने मीटिंगसाठी वगैरेच मी बाहेर जात असतो....... फक्त बाकी मुलींपेक्षा माझं तिच्यासोबत थोडाफार पटते म्हणून ऑफिसमध्ये अशीच अफवा पसरली आहे की ती माझी गर्लफ्रेंड आहे......... .. अर्जुन

मग आता लग्न करून घ्या ......तसं पण तुमचं लग्नाचं वय झालेलं आहे........... आता आकाश आणि श्रीयाच्या पण लग्नाचं बघावं लागेल,  तुमचं लग्न झाल्याशिवाय तिचं त्यांचं लग्न करता येणार नाही........ तर तिच्यासोबत सोबत तुमचं बऱ्यापैकी पटते म्हणत आहात आणि ती शिकलेली पण आहे तर लग्न करायला काही हरकत नाही.......आजी

अरे तुम्ही हे काय सकाळी सकाळी लग्नाचं परत सुरु केलं........ मला लग्न करायचं नाही आहे,  इतक स्पष्ट बोलून सुद्धा तुम्ही का माझ्या मागे लागता??......अर्जुन

अर्जुन आजी बरोबर बोलते आहे .......... आता तुला लग्न करायलाच हवे.......... तुझ्याशिवाय आकाशचे पण लग्न होणार नाही........मामी

तुम्ही माझ्या लग्नाची वाट नका बघू............ आकाश च्या लग्नाचं बघू शकता..........अर्जुन

हे बघ,  आम्ही घरामध्ये मोठे आहोत,  तुमच्यासाठी काय चांगलं काय खराब हे आम्हाला समजते,  त्यामुळे आता काही दिवस तुम्हाला परत वेळ देते आहे,  काय ते डिसीजन आम्हाला सांगा .........आणि हो ती कोण सोनिया आता गणपती पूजेमध्ये घरी बोलवा , त्या निमित्ताने आम्हाला भेटता येईल...........आजी

मी लग्न करणार नाही.......... कोणी माझी गर्लफ्रेंड असली तरी मी लग्न करणार नाही........अर्जुन चिडत बोलला..

समाजात राहायचे आहे आपल्याला,  या समाजाचे नियम पाळावेच लागतील........ असा कुठल्याही मुलीसोबत तुम्ही कुठेही फिरू शकत नाही.....आजी

आजी आता  हे इकडे नवीन नाही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असणं.... ही खूप साधारण गोष्ट झालेली आहे ...........आता तर लोकं लग्न करता लिविंग मध्ये सुद्धा राहतात....... उगाच तू कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेत बसू नको........तसंच काही गरज वाटली तर मी एखादवेळी लिविन मध्ये राहील पण लग्न करणार नाही....... मी कोणालाही काहीही कमिटमेंट देणार नाही.........अर्जुन

अर्जुन बस आता खूप बोललास....... मोठ्या सोबत बोलायची काही पद्धत असते........ मोठा बिझनेसमॅन झाला म्हणून तू असं काहीही घरात बोलू शकत नाही........... घरातले काही नियम असतात ,  ते तुला पाळावेच लागतील......आई

आणि ती कोण सोनिया............ तिला गणपती पूजेला घरी बोलावलं आहे म्हणून सांग,  आम्हाला पण बघू देत ती काय आहे....??... कशी आहे.???. आवडली तर आपण पुढे जाऊयात.....आई

अर्जुन ने डोक्यावर हात मारून घेतला...... आता यांच्यासमोर बोलून काहीच फायदा नाही म्हणून तो ऑफिसमध्ये निघून गेला..

अर्जुनची आजी ही जुन्या मतांची खूप कडक बाई आहे हे सोनियाला माहीत झालं होतं ......जर अर्जुनच्या आजीला कळलं अर्जुन ची कोणी गर्लफ्रेंड आहे आणि तो तिच्या बऱ्याच क्लोज आहे तर आजी त्याच्या मागे लग्नासाठी लागणार...... आणि आपल्याला अर्जुन सोबत लग्न करायला मदत होणार ..... आजीच्या कानावर सोनिया त्याची गर्लफ्रेंड आहे असे  जाईल,  असा प्लॅन सोनियाने केला होता .

ज्या दिवशी लग्नाचा विषय घरात निघायचा त्यादिवशी अर्जुन चा मूड खूप खराब असायचा .....ऑफिसमध्ये सुद्धा त्याचं काही ना काही खटकत असायचं....... त्याच्या आतापर्यंत दोन मिटिंग झाल्या होत्या त्यात तो स्टाफवर बराच ओरडला होता........ सोनिया ला सुद्धा कळलं होतं की आज अर्जुनचा  मूड ठीक  नाही आहे ..... ती त्याच्या केबिनमध्ये जाऊन तिने एक प्रोजेक्ट डिस्कस केला आणि थोडाफार त्याला कूल करायचा प्रयत्न केला...... अर्जुन ने तीला गणपती पूजेसाठी निमंत्रण दिले......नी आज घरी काय झालं ते थोडक्यात सांगितलं .....सोनिया मनोमन खुश झाली तिने केलेल्या प्लॅन वर्क होत होता

अर्जुन मिटिंग रूम मधून निघून फोनवर बोलत बोलत त्याच्या कॅबिन कडे जात होता.......

निलेश कॅलेंडर प्रोजेक्ट ची फाईल घेऊन माझ्या केबिनमध्ये  ये... अर्जुन ने न बघताच आवाज दिला आणि तो सरळ जायला निघाला.....

सर..... सर...... माहीने हळू आवाजात अर्जुन ला आवाज दिला

व्हॉट.....?.. त्याने फोन साईडला करत एक कटाक्ष  तिच्याकडे टाकला.....

सर ....ते ........निलेश आज लवकर घरी गेला...... माही घाबरतच बोलली

त्याला घरी जायची परमिशन कोणी दिली....??... अर्जुन रागात बोलला

सर त्याला इमर्जन्सी आली होती .......तो तुमच्याकडे सांगायला येणारच होता पण मीच त्याला बोलले की तू जा,  मी सरांना इन्फॉर्म करेल..... माहि

हाऊ डेअर यु आर......? तुला कोणी सांगितलं हे सगळं करायला.??..... एक कारकून आहेस कारकून म्हणूनच राहा , बॉस बनायची हिंमत करू नको...... नाही तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही........ अर्जुन ओरडतच बोलला..

आता सगळा स्टाफ त्यांच्या आजूबाजूने जमा झाला होता...... सगळे लोकं ऐकत होते.... माहिला खूप इन्स्अल्ट झाल्यासारखं वाटलं,  तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं.....तिला खूप वाईट वाटत होते

सर ते मी आली होती तुमच्या केबिनमध्ये सांगायला.... पण तुम्ही आणि सोनिया मॅडम........ माही काही बोलणार तेवढ्यात अर्जुन तिच्यावर अजून ओरडला.......

जस्ट शट अप............व्हॉट द  हॅल इस गोईंग ओन हिअर..... तू काय आता मी काय करतो केबिनमध्ये त्यावर पाळत ठेवून असतेस काय...??. आय वॉन्ट यू इन माय केबिन राईट नाऊ........ ओरडत त्याने आजूबाजूला नजर फिरवली तसे सगळे आपल्या  जागेवर जाऊन काम करत बसले.... आणि तो त्याच्या केबिनमध्ये निघून गेला.....

माही कॅलेंडर प्रोजेक्ट ची फाईल घेऊन अर्जुन च्या केबिन जवळ गेली आणि  डोअर नॉक करू लागली.......

कम इन.....अर्जुन

माहि त्याच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली....तिने ती  फाईल त्याच्या समोर ठेवली.....

हे काय आहे.... कीती चुका करून ठेवले आहे यात ......काम नीट करता येत नाही आणि चालले बॉसगिरी करायला..... तुला हक्क कोणी दिला ग असे निर्णय घ्यायचा....??... समजतेस काय तू स्वतःला.....???.. अर्जुन रागात बोलत होता

सर मी ते खरंच नीलेश चा निरोप घेऊन केबिनमध्ये आले होती पण तुम्ही आणि सोनिया मॅडम........ माही अडखळत होती

व्हॉट सोनिया ...??... तू आत मध्ये येऊन सांगू शकत होती...अर्जुन

सर....... ते तुम्ही आणि सोनिया मॅडम...... ती परत अडखळत होती..

काय बोल पटकन,  इतका वेळ माझ्याजवळ नाही , नाही तिथे बडबड चालली असते तुझी...आता बोलायला जीभ अडखळते आहे ??.....अर्जुन

सर तुम्ही आणि सोनिया .......सोनिया मॅडम खूप जवळ होता..... खूप .......म्हणजे खूप...... डोअर ....... डोअर उघडच होतं..... म्हणून मी आत मध्ये नाही आली,  ती घाबरतच इकडे तिकडे बघत बोलत होती......

वॉट द हेल आर यू सेयींग....??.. तुला कळतय का तू काय बोलते आहे ते..... रागाच्या भरात त्याने तिचा हात ओढला आणि त्याच्या ऑफिसच्या सिक्रेट रूम मध्ये तिला ओढतच ढकलल ... आणि तो आत मध्ये गेला आणि डोअर बंद केलं.......

ती घाबरून एका भिंतीजवळ उभी होती......... सर आधीच रागात होते ...आता आपण हे काय बोलून गेलो , काय होणार. ..??..माही तुला ना तुझ्या तोंडावर कंट्रोल सुद्धा ठेवता येत नाही,  कुठं काय बोलावं काही कळत नाही...... काय गरज होती एवढे स्पष्ट बोलायची.??... ती मनातच स्वताहवार चिडत होती...

अर्जुन रागातच तिच्या जवळ गेला , आधीच सकाळी सोनियाच्या विषयाने त्याचं डोकं खराब होतं परत माहीने तोच विषय काढला होता......

तुम्ही समजता काय स्वतःला....... तुमच्यासारख्या िचार करणार्‍या लोकांमुळे चुकीच्या अफवा ऑफिसमध्ये पसरून ठेवले आहेत.... मनाला येईल तसं बोलायचे......

तुझ्यासारख्या छोट्या घरच्या मुलींना मी चांगला ओळखतो.... स्वतःला जमवता नाही आले म्हणून बॉस सोबत दुसऱ्या कुठल्याही मुलीचं नाव जोडायचं आणि खराब करायचं...... खूप जवळ असले म्हणजे काय होतं तुला कळतंय का...??.. काय म्हणतात त्याला माहिती का...???.. त्याला रोमान्स म्हणतात....... तुला सांगतो मी आता रोमान्स म्हणजे काय असते .???....खूप जवळ असणे म्हणजे काय असते..... ऑफिसमध्ये मला इतकेच काम आहेत ना मुलींसोबत मी रोमान्स करत फिरतो..???..तुमच्या सारख्या मुली मी रोज वापरून फेकू शकतो......मुली स्वतःहून माझेकडे येतात....लाईन असते मुलींची....समजते काय तू स्वतःला......???..... तो सकाळचा सुद्धा राग माही वर काढत होता....... म्हणत तो तिच्या अगदी जवळ गेला होता......

सर तुम्ही आता खूप रागात आहात आपण नंतर बोलू या.... माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता,  चुकून तसे शब्द माझ्या तोंडून निघाले...... मला तसं बोलायचं नव्हतं....... आपण या विषयावर बोलूया  सर....... म्हणत ती तिथून निघून जात दाराजवळ येऊन दार उघडायला लागली.......

माझं बोलणं अजून पूर्ण झालं नाही आहे मिस देसाई...... म्हणत त्याने रागाने तिचा हातचे मनगट पकडले आणि गोल फिरवत स्वतःजवळ ओढून घेतले...... ती अगदी आता त्याच्या खूप जवळ मिठीतच आली होती.... त्याचा शरीराचा स्पर्श आता तिला होत होता....... त्याने तिचा हात मागे मुरगळून धरला होता........ आणि रागाने तिच्याकडे बघत होता....

जोपर्यंत माझा बोलणं पूर्ण होत नाही तोपर्यंत तू इथून जाऊ शकत नाही..... तुझी हिम्मत कशी झाली माझं बोलणं न  ऐकता जाण्याची ....??...त्याने अजून त्याची हाताची पकड घट्ट केली.... ती त्याच्याकडे बघत होती........आता तो सुद्धा  तीच्या डोळ्यात हरवला.....
आsss...... ती हळूच कळवळली......तिच्या डोळ्यातून पाणी आले ......तरी सुद्धा तो तिला तसाच पकडून उभा होता....

अर्जुन..,............................सर...... प्लीज माझा हात सोडा....... दुखतोय खूप......माही रडक्या हळू आवाजात म्हणाली

तिच्या तोंडून त्याचं अर्जुन नाव ऐकून आवाजाने त्याचं काळीज चिरलं .....त्याने लगेच हात सोडला.....  हात सोडला तर  बघतोय काय बांगड्यांचे तुकडे खाली पडले.... तिच्या काही बांगड्या फुटल्या होत्या... आता त्याच्या लक्षात आलं काय झालं ते.....

माहीने हात पुढे केला ......तिच्या हातात मनगटाजवळ समोरच्या साईडने बांगड्याचे काच  हातात गेला होता ...त्यातून रक्त येत होते........ माहिने तिचा तो हात आपल्या दुसऱ्या हातात पकडला होता.... तिला ते खूप दुखत होतं..... ती तो काच काढायचा प्रयत्न करत होती पण तिच्या हाताने काही तो काढला जात नव्हता... खूप छोटा अस तो काच तिच्या हातात रुतून बसला होता......

अर्जुन तिची काच काढण्याची धडपड बघत होता.... त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला..... माहिला आता अर्जुन चा खूप राग येत होता.... तिने त्याच्या हातातून आपला हात काढून घेतला....... त्याने परत तिच्याकडे नजर रोखून बघत तो हात आपल्या हातात घेतला.......तिने परत तो त्याच्या हातातून झटकून घेतला....... असाच दोन-तीनदा झालं.....

शट अप...... शांत बस आता थोड्यावेळ...... मला जबरदस्ती सुद्धा करता येते....... तिच्यावर नजर रोखत तो थोडा जोरातच बोलला..... त्याच्या आवाजने  ती ती शांत झाली ...त्याने तिला बाजूला सोफ्यावर नेऊन बसवले..... कपाटातून फर्स्ट किट बॉक्स घेऊन आला...... तो तिच्यासमोर जाऊन बसला......कापसाने तिचा हाथ क्लीन केला , नंतर हाताने तो ती काच काढायचा प्रयत्न करत होता.....

ससस.........माही..
अर्जुन तिच्या हातातला काढायला गेला तेव्हा तिला थोडं दुखलं होत......

काम डाऊन....... आता जे मी करेल त्याचा भलताच अर्थ काढू नको........ तिच्या डोळ्यात बघत  त्याने त्याचे ओठ तिच्या मनगटाजवळ जिथे काच गेला होता तिथे नेले...... आणि त्यावर आपले ओठ टेकवले....... त्याच्या ओठांच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे आले .......तिने डोळे बंद करून घेतले....... अर्जुन तो काच आपल्या दातात पकडायचा प्रयत्न करत होता....... अखेर त्याने तो काय त्याच्या दातात पकडून ओढून काढला....... महिला ते इतका दुखलं की तिने तिचा दुसरा हात त्याच्या मांडीवर त्याच्या कपड्यांना घट्ट पकडला..........

आ s s ........... माही विव्हळली..

ह्म््म.... झालं निघाला तो काच ........तो तिच्या दुसऱ्या हाताकडे बघत बोलला

तिच् लक्ष तो बघत आहे तिकडे गेल,  तिने लगेच आपला हात काढून घेतला ......

सॉरी......माही

इट्स ओके......अर्जुन

काच काढल्यामुळे आता त्यातून घळघळ रक्त बाहेर येत होते...... हातात उरलेल्या बाकीच्या बांगड्या त्याने अलगद तिच्या हातातून काढून घेतल्या.....अर्जुन ने कॉटन आणि डेटॉल घेऊन ती जखम क्लीन केली..... नंतर त्यावर मेडिसिन क्रीम लावून त्यावर कॉटन ठेवले......

माही त्याच्या या कृत्याकडे एकटक बघत बसली होती...... स्वतः जखम द्यायची त्यावर स्वतः मलम सुद्धा लावायचा....... काय आहे हे,  समजायच्या पलीकडे आहे...... माही मनातच विचार करत होती.

अर्जुन ने बॉक्स मधून बँडेज काढले... तिच्याकडे बघत बँडेज तिच्या हातावर गुंडाळत होता....... त्याची नजर तिच्या कडे गेली ती एकटक त्याच्याकडे बघत असलेली त्याला दिसली.... तो गालातच हसला आणि त्याने परत बँडेज पूर्ण बांधून दिली....

ठीक आहे आता...... याला पाणी नको लागू देऊ,  उद्या परत त्याचा बंडेज चेंज करून घे...... अर्जुन तिला इन्स्ट्रक्शन स्थित होता......

माहित सोफ्या वरून उठून जाऊ लागली..

माही थांब.......... अर्जुन हँडवॉश करून आला.

सर मला निघायला हव...... खूप वेळ झाला, मी इथे आहे....माही

ह्म्म...... माझा ऑफिस आहे ,कोण कुठे किती वेळ थांबेल हे मी ठरवू शकतो...., अर्जुन मिश्कीलपणे हसत बोलला

तुमच ऑफिस असले तरी बाहेर खुप लोक आहेत..... ते काय विचार करतील..???.माही

आय डोन्ट केअर....... काहीही केलं तरी लोक काही काही विचार करतच असतात........ लिव्ह इट....अर्जुन

तुम्ही मोठे लोक आहात,  आम्हाला आमची पायरी  समजून वागावे लागते..... म्हणत ती परत बाहेर जायला निघाली

माही लग्न करण्याबद्दल तुझे काय मत आहे?? .....???.. अर्जुन तिला पाठमोरी होताना बोलला...

माहिला त्याच्या या अनपेक्षित प्रश्नाने एकदम धडकी भरली....... तिने वळून अर्जुन कडे बघितलं........ अर्जुन तिच्याकडे बघत होता.......

जरी त्याचं ऐकायला तिला चांगला वाटलं होतं तरी ते ती स्वीकारू शकत नव्हती........माही काहीच उत्तर न देता तेथून निघून गेली...

अर्जुन ती गेली त्या दिशेने बघत बसला......

******

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️