भाग १२
आज रविवार, ऑफिस ची सुट्टी होती, माही ला शांतिसदन मध्ये जायचं होत ....तिने सकाळचं सगळं पटापट आटोपून घेतली कामे, लवकर जाते म्हणजे लवकर येता येईल , संध्याकाळी मीरा ला पार्क मध्ये नेता येईल ....खूप दिवस झाले कुठे गेलोय नाही ...जाऊया..........माही
आई येते ग मी.....संध्याकाळी तयार रहा पार्क मध्ये जाऊयात .....माही बाहेर निघत बोलली
पार्क.....पार्क.....करत मीरा उड्या मारत टाळ्या वाजवत होती....
पार्क च नाव ऐकून मीरा खूप आनंदली...
ठीक आहे हळू जा ग.....आई
माही ने आपली चमेली काढली नी शांती सदन साठी निघाली.
वयोमानानसार आजी ची तब्बेत थोडी वरखाली असायची तर आजी नीलिमा घरूनच काम बघायचे.... माही ला काम समजून सांगायचे , तसे मग माही काम हँडल करायची , बायकांना सगळं नीट सांगून काम करून घ्यायची... नी कठीण , जास्ती कलाकुसर वाले डिझाईन माही स्वतः करायची, घरी घेऊन जायची नी ऑफिस मधून आल्यावर ते काम करायची...तीच काम बघून नलिनी सुद्धा खुश होती.
माही शंतिसदन मध्ये आली, खाली पिंकी पासून सगळ्यांना hi hello करून ती आजीच्या रूम मध्ये गेली..
आजी ला सगळे कामाचे डिटेल्स देऊन त्यावर काही चेंजेस वैगरे डिस्कस करत बसली होती... बऱ्यापैकी आज तीच लवकर आटोपले होते ...
तेवढयात लहानगी रुही रूम मध्ये आली नि आजीच्या मांडीवर जाऊन बसली....
रुही......रुही.......आवाज देत अनन्या रुहीच्या मागे रूम मध्ये आली
किती पळावल.... दमली बाबा.....रुही चल आता होमवर्क करायचा आहे आपल्याला.........अनन्या
मला नाही करायचा अभ्यास ,बोर होतो मला, खेळायचे मला......ये. मोठी आजी सांग न ग हिला......Sunday ला कोण अभ्यास करतं काय.??.......रुही लाडवत आजी ला बोलली
काय ग काय झालं , अशी का रुहीच्या मागे लागली आहे ???....आजी
अगं तिचा खूप होमवर्क पेंडींग आहे ..,..सतत डायरी मध्ये teachers चे नोट लिहून येत आहे.....अनन्या
ताई मी बघते...तिच्याकडे एक डोळा मारत माही अनन्या ला बोलली ...
रुही चल आपण खेळूया...त्या रुहीच्या खोली मध्ये गेल्या...
माही नी रुही सोबत खूप मस्ती केली, तिला गोष्ट सांगितले...गोष्टीत पण तीनी तिला अभ्यासाचं महत्त्व समजावून दिले.....तिच्यासारखं तिच्या वयाचे बनून , अभ्यासाला पण एक खेळायचे नाव देऊन पटाऊन दिले...
ये आंटी चल आपण होमवर्क करूया.... रुही
अरे वाह ....रुही तर स्मार्ट गर्ल झाली.....ये हा पण मला आंटी वैगरे नको म्हणू ग....... कसं ते म्हातारे झाल्यासारखे वाटते.....मी काय फार फार तर तुझ्यापेक्षा ३-४ वर्षाने मोठे असेल......माही गमतीत तिला बोलली
रुही खूप हसायला लागली.....मग मी काय म्हणू तुला .??.
रुही curious होत तिला विचारत होती...
उम्म्म......विचार करण्याची अक्टिंग करत .....तू मला ताई म्हण.....माही
ok done....hi fi देत रुही बोलली
माही मध्ये अजूनही खूप बालिशपणा होता......मीरा मुळे तिला मुलांसोबत कसं वागायचं चांगलच समजल होत......त्यामुळे तीच नी रुही च पण tunning मस्त झाल होत...
अनन्या दारातून सगळं बघत होती...रुही ने बुक काढून अभ्यासाला सुरुवात केली, अनन्या आत येऊन रुही जवळ बसली... दोघी रुही ला सांगत होत्या.....
तेवढयात अनन्या चा फोन वाजला....अनन्या फोन घेऊन थोडी साईड ला गेली...
ये आई माझं ते maths च बुक नाही भेटत आहे ग..रुही
अनन्या च्या लक्षात आलं , आपण रुहीच्या मागे पळत होतो तेव्हा बुक तिच्या हातात होत....ती शोधायला जाणार तेवढयात माही बोलली , मी आणते शोधून...तुम्ही बसा इथे ....
बोलता बोलता हातवारे करून अनन्या तिला बुक कुठे असेल ते सांगत होती...
माही बुक शोधायला गेली
बापरे केवाढ भूलभुलैया आहे हे घर .....नवीन माणूस तर हरवायचाच इथे....पाय नाही दुखत काय या लोकांची... आपलंच बर असते बाबा ३-४ खोल्यांचे घर ...पटकन काय ते सापडते .....हे इथे येवढे मोठे घर....खोल्या पण किती , याची खोली, त्याची खोली, पाहुण्यांची खोली... नशीब त्यात रुहीची वेगळी खोली नाही .....स्वतःशीच बडबड करत ती रस्त्यात लागणाऱ्या खोलीत बुक शोधत जात होती...
बापरे काय सुंदर रूम आहे.......माही स्वतःशीच बडबडत ती एका रूम मध्ये आली होती... तिला ही रूम सगळ्यांपेक्षा वेगळी वाटली होती....
बाकी रूम्स पेक्षा जरा ही मोठी वाटत होती...,एका साईड दार तिथे ओपन टेरेस, तिथे स्विमिंग पूल त्या आजूबाजूला मोठं पॅसाज त्यात कुंड्यांनी ,झाडांनी सजवलेले गार्डन, रूम चा दूसरा साईड ला balcony, मोठं ग्लास डोर, त्यावर लाईट कलर चे पडदे..., balcony मध्ये पण कुंड्या झाड होते ...एका साईड ला छोटा झुला ... खूप हवेशीर रूम ...ती गोल फिरत रूम बघत होती...
सगळं कसं नीटनेटक ठेवलंय...माही
तेवढयात अनन्या माही कुठे राहिली म्हणून बघायला तिच्या मागे रूम मध्ये आली...
माही ची नजर बेड वर गेली, तिथे रुही च बुक तिला सापडलं ... बुक उचलायला गेली तर समोर भिंतीवर तिची नजर गेली..
नि ती डोळे विस्फारून बघत होती...
ड्राकुला..........माही थोडी जोर्यात घाबरत च बोलली....नी तिथून पळाली...
काय...????....अनन्या....
.पण अनन्या च ऐकू जायच्या आधीच तिने तिथून धूम ठोकली होती...रूम च्या बाहेर येऊन ती सरळ खाली उतरायचं म्हणून पायाऱ्यांकडे पळाली...
माही पळ इथून ड्राकुला यायच्या आधी...कुरकुर करायचा नाही तर, आपल्याला मीरा ला घेऊन बाहेर जायचं...उगाच काम सांगून अडकवायचा आपल्याला... माही आपल्याच विचारात पळत होती....नी समोर जाऊन भारदस्त छातीवर धडकली..
माही ने समोर बघितले त अर्जुन होता ज्याला ती धडकली होतो.....
तू...? इथे.....? अर्जुन , अर्जुन काहीसा कन्फ्युज होत बोलला...
माही पळ.....माही ने त्याच्या कडे बघितले , काहीच उत्तर न देता तिथून धूम ठोकली....
मिस देसाई.??....माही... थांब...अर्जुन माही ला आवाज देत होता ....पण माही काही ऐकायच्या मूड मध्येच नव्हती.....
ही मला इग्नोर कशी करू शकते.???...मनातच अर्जुन विचार करत होता.... त्याला तील असे त्याच न ऐकता पळताना बघून राग येत होता..
थांब...... तू इग्नोर नाही करू शकत अशी....मी बॉस आहो ....म्हणतच तिच्या मागे जाणार तेवढयात........अनन्या माही चा मागे येत होती , तिला अस पळतांना बघून तिला पण आश्चर्य वाटले होते...तिला अर्जुन दिसला तिथे ती थांबली...
ही काकूबाई काय करतेय इथे...??...अर्जुन
काय माहिती , तुझ्या रूम मध्ये होती, अचानक काय झालं काय माहिती, ड्राकुला म्हणून ओरडली नी पळली....... ..थोड काही आठवल्यासारख करत अनन्या.......काकूबाई ...? मााही ला काकूबाई म्हणतो तू ???...ती प्रश्नार्थक त्याच्या कडे बघत होती...
हा म्हणजे ते सगळे ऑफिस मध्ये तसे म्हणतात ....अर्जुन akward फील करत बोलला..
ड्राकुला......? प्रश्नार्थक नजरेने अनन्या बोलली
ह....तो मीच आहे...तिला मी ड्राकुला वाटतो....अर्जुन कसनुस चेहरा करत बोलला..
अनन्या थोड्यावेळ एकटक अर्जूनंकडे बघत होती नि नंतर जोरजोरात हसायला लागली...काय मस्त नाव दिले तिने तुला एकदम परफेक्ट ........बहुतेक मग तुझाच फोटो दिसला असावा तिला तुझ्या रूम मध्ये म्हणूनच पळाली असावी..,.अनन्या मस्करी करत बोलली
काय....? माझ्या रूम मध्ये....???..म्हणत अर्जुन माहीच्या मागे गेला...
मम्मा माझं बुक....रुही बाहेर येत अनन्या जवळ आली
अरे ते तर माहीच्या हातात होते ..
अनन्या
अर्जुन , माही कडून बुक घे....अनन्या वरतूनच खाली जाणाऱ्या अर्जुन ला म्हणाली
मम्मा थांब मी पण जाते म्हणत रुही अर्जुनाच्या मागे गेली
माही ने चप्पल घातली पर्स घेतली नि ती बाहेर पळाली
समोर समोर माही, मागे अर्जुन, मागे रुही .... बाहेर गार्डन पर्यंत पोहचले
माही ताई माझं बुक...रहूने आवाज दिला तसे माही च लक्ष तिच्या हाथाकडे गेले
अरे हे त रुहीच बुक आहे ...ती परत द्यायला फिरली ...
अरे बापरे हे पण आले मागे..,... माही रुही जवळ बुक द्यायला आली
रूही नी अर्जुन एकत्र उभे होते
माही ने रुही ला बुक दिले नी तिथून धूम ठोकली
मिस देसाई ते.......तो काही बोलणार तेवढयात माही म्हणाली , सर हे तुमचं ऑफिस नाहीये, तुमचं ऐकून घ्यायला, तुम्ही मला अशी ऑर्डर देऊ नाही शकत....... म्हणत माही तिथून पळाली सुद्धा...
किती अजीब आहे ही.....अर्जुन
हो खुप्पच अजीब आहे ताई....रुही हसत
ताई.....? अर्जुन
तिला आंटी म्हटलेले नाही आवडत....ती म्हणाली ती माझ्यापेक्षा ३-४ वर्षांनी च मोठी आहे ....तर ताई च म्हण........रुही
काय...?... ह्मम वाटते लहानच..... अर्जुन
.अजीब आहे न ती.........रुही अर्जुन कडे बघत
तसे दोघंही हसायला लागले
अर्जुन ने रुही ला कडेवर उचलून घेतले नि दोघं आतमध्ये गेले.
माहीने चमेली ला स्टार्ट केले नी घराकडे जायला निघाली...तीच हृदय अजूनही धावल्यामुळे धडधडत होते ...आपण आधी कितीवेळा आलो इथे, पण कधी हे इथे दिसले नाही, आजच सापडले .... बापरे म्हणजे आपण ड्राकुला चा बिळात जाऊन काम करतोय......बाप्पा तुला हेच घर, हेच ऑफिस नी हाच ड्राकुला भेटला होता मला जॉब द्यायला.....नको म्हणता म्हणता हाच का येतो नेहमी समोर.......
पण काही पण म्हणा रूम खूप छान ठेवली होती....किती झाड होती तिकडे... येवढे निसर्ग रसिक आहेत हे ....चेहऱ्यावरून तर अजिबात वाटत नाही .... सदानकदा फुसफुस करत असतात..... नेहमीच राग असतो यांच्या चेहऱ्यावर..... हसता पण येत नाही यांना तर........मनातच बडबड करत गाडी चालवत होती
माही घरी आली....मीरा तयारच होऊन बसली होती....
माऊ ...पार्क....मीरा
हो चला जाऊया...आलेच मी फ्रेश होऊन....माही
आई ने सगळ्यांसाठी गरम चहा केला...
सगळे पार्क मध्ये फिरायला गेले........सगळ्यांनी खूप एन्जॉय केले...
ताई ही काकूबाई... स.. sorry... माही काय करतेय इथे???...अर्जुन
अरे ही एक महिन्याच्या वर झाले , आजी नी आई सोबत ड्रेस डिझाईनी g च काम करतेय...अनन्या
अच्छा तर ही तीच आहे काय ....मागे आजी मला सांगत होती, खूप कौतुक करत होती....अर्जुन
हो...पण तू कसा ओळखतो तिला ???..अनन्या
ती आपल्या बॅक ऑफिस मध्ये काम करते ....आजिनेच लावलाय तिला तिकडे...अर्जुन
खरंच काम करतेय काय.???....की नुसता गोंधळ घालते इथे????.....तिकडे ऑफिस मध्ये तर खूप गोंधळ घालत असते..... तूट फूट, पाडापाडी........अर्जुन
अरे नाही खूप sharp आहे ती .....डिझाईन्स तर खूप रेखीव नी युनिक असतात.... सिंसियारली काम करतेय खूप,. नी हो काही गोंधळ पण नाही घालत....हसतच अनन्या म्हणाली
can't believe...तिकडे माझ्यासमोर तर खूपच गोंधळ घालते ती....अर्जुन
ह्म््म , ड्राकुला पुढे असेल तर असंच होईल ना ...भुवया उडवत अनन्या म्हणालो नी हसायला लागली....मान गये यार तिला तुझं ऐकत पण नाही नि तुला घाबरत पण नाही ती ......ड्राकुला......म्हणतच अनन्य हसायला लागली...
impossible आहात तुम्ही लोकं.... ....म्हणत अर्जुन रूम मध्ये निघून गेला...
********
असेच दिवस जात होते , शंतिसदन मध्ये कधीतरी माही अर्जुन समोरासमोर यायचे पण माही तो दिसला की एकतर रस्ता बदलायची किंवा पळून तरी जयची..पण बोलणं वैगरे काही नसायचं ....
*********
आज माही ने तीच ऑफिस मधला काम लवकरच संपवले होते .....ती रिपोर्ट करायला ठाकूर चा केबिन मध्ये आली होती.
सर काम झाले, तुम्ही एकदा चेक करून घ्या , काही बदल असतील तर सांगा, करते ते.... ..माही
ओके....ठाकूर
फाईल चेक केल्यावर..
अरे वाह सगळं व्यवस्थित आह...ठाकूर
तेवढयात त्याचा फोन वाजला..
हॅलो...ठाकूर
ओके सर, लगेच पाठवतो....ठाकूर फोन वर
राजू.........आवाज दिल्यावर त्याला आठवले आज राजू सुट्टीवर आहे ...
मिस देसाई... हेड ब्रांच ला एक खूप महत्वाची फाईल नेऊन द्यायची आहे , राजू पण नाही, तुमचं काम आटोपले आहेत , तुम्ही फाईल नेऊन द्या ...तुम्हाला घर जवळ पडते तिथून, नी घरीच जा ऑफिस ला परत यायची गरज नाही ....ठाकूर
बापरे तिकडे तर अर्जुन सर असतील......मनातच....सर त..ते....माही
मिस देसाई खूप important आहे काम....जावेच लागेल तुम्हाला......ठाकूर
ठीक आहे सर..... फाईल घेत ती बाहेर पडली.....
*********
क्रमशः