तुही मेरा... (भाग ६)

Short and sweet love story

© शुभांगी शिंदे 

तुही मेरा...

भाग ६


घरी पोहचेपर्यंत ती लाजतच असते... गालातल्या गालात हसत असते.. ????

नयना घरी येते... नॅनीला सोबत घेऊन नाचायला लागते.. इतक्यात तिची नजर सोफ्यावर बसलेल्या आपल्या आईकडे जाते.. नयनाचा डान्सचा मूड खराब होतो.. 

न.  आई : (हलकेच हसून) Happy birthday बेटा... ????

नयना : (थोडी रागात) नॅनीने सांगितल तेव्हा आठवल असेल ना??? ????

नॅनी : (समजवण्याच्या सुरात) No dear.. I didn't say anything... ????

नयना : मला माहीत आहे नॅनी... पण आई म्हणून यांना लक्षात हवा ना आजचा दिवस?? ????

न आई : नयना बेटा.... तस नाही.. तु गैरसमज करुन घेऊ नकोस..????

नयना काही न ऐकता बेडरुममध्ये निघून जाते... शांतपणे बेडवर बसून असते.. नॅनी तिच्यासाठी जेवण घेऊन येते.. पण तिला भूक नसल्याने ती जेवणासाठी नकार देते.. आज दिवसभराच्या सगळ्या गोष्टी ती नॅनीला सांगते... नॅनी प्रेमाने तिच्या डोक्यावरुन हात फिरवते आणि तिचे लाड करते...


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


सकाळी नेहमीप्रमाणे नयना कॉलेजला जाते.. गालातल्या गालात हसत असते.. कालचा वाढदिवस खूपच छान झाला होता.. तिला आपल्या वाढदिवसाचा इतका आनंद कधिच झाला नव्हता... 

नयना आपल्याच तंद्रीत चालत असताना तिचा जिन्यावरून पाय घसरला पण क्षणात तिला राघवने सावरले.. 

राघव : अग लक्ष कुठे आहे तुझ ???  ????

नयना : (थोडी दचकून) sorry... कळलच नाही मला... ????

राघव : ओके..  चल आता... 

नयना : नाही... तु जा.. मला प्रॅक्टिस करायची आहे.. पुढच्या आठवड्यात जयपूरला स्पर्धा आहे.. ????

राघव : काय?? ???? हमम... पण तु मला उत्तर नाही दिलस अजून... 

नयना : बघु .. ????

राघव आणि नयना दोघेही आपापल्या दिशेने निघुन जातात.. नयना आज उशिरा पर्यंत सराव करत असते.. राघव बास्केटबॉल कोर्टमध्ये मित्रांसोबत खेळत असतो.. सराव करून त्याचे मित्र निघून जातात..  आता राघव एकटाच तिथे असतो.. तो सुद्धा निघण्याच्या तयारीत असतो.. 

इतक्यात नयना तिथे येते आणि राघवला मागून बास्केटबॉल मारते.. आणि त्याला खेळायला बोलवते. राघवला वाटल नयनाला खेळ जमणार नाही पण ती नयना होती हार थोडी मानणार आहे. दोघांनीही दोन दोन ची बरोबरी केली.. आता अजून एक डाव आणि या वेळेस बॉल राघवच्या हाती आला पण बॅक लिफ्ट होताच राघवने नयनाला आपल्या मिठीत पकडले..दोन हातात बॉल आणि मध्ये नयना.. त्याच्या स्पर्शाने ती थोडी चलबिचल झाली.. ????

राघव : कधी बोलणार तु..  ते तीन मॅजीकल वर्डस... 

नयना : बघू... ???? (स्वतःला सोडवण्याचा वायफळ प्रयत्न करत )

राघव : बघ हा... (तिच्या कानात हळूच) 

नयना : आधी नीट प्रपोज तर कर... माझ युनिव्हर्सिटी च लेटर येण्या आगोदर तर विचार करेन...

राघव : ओके... चॅलेंज एक्सेप्टेड. .. ????

आणि राघव तसाच नयना सोबत बॉल पास करतो... 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नयना जयपूर ला पोहचते... त्यांच्या कॉलेजतर्फे अजून चार मुली रिप्रेसेंट करत होत्या.. पहिल्या दिवशी आराम करून दुसर्‍या दिवशी स्पर्धा होती.. 

नयनाचा नाव अनाऊंस झाल.. ती स्टेजवर पोझिशन घेऊन उभी राहिली आणि गाण सुरू झाले... 

 ???????? प्रीत की लत मोहे ऐसी लागी
हो गई मैं मतवारी
बल-बल जाऊँ अपने पिया को
हे मैं जाऊँ वारी-वारी
मोहे सुध बुध ना रही तन मन की
ये तो जाने दुनिया सारी
बेबस और लाचार फिरूँ मैं
हारी मैं दिल हारी
हारी मैं दिल हारी

तेरे नाम से जी लूँ
तेरे नाम से मर जाऊँ
तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊँ
तूने क्या कर डाला, मर गयी मैं, मिट गयी मैं
हो जी हाँ जी
हो गयी मैं
तेरी दीवानी ????????

गाण संपल.. सगळे खूप खुश होते... डान्स खूपच छान झाला. आता सगळे निकालाची वाट पाहत होते.. यावेळेस पाच पैकी तीन पारितोषिक कॉलेजला मिळाले.. अर्थात नयनाने तर बाजी मारलीच नेहमीप्रमाणे.. सगळा कार्यक्रम संपताच नयना आणि तिच्या मैत्रिणी कँपसमधून बाहेर पडल्या.. अचानक कोणीतरी नयनाचा हात धरून तिला गाडीच्या आडोशाला खेचले.. तिच्या मैत्रिणी गप्पांच्या नादात पुढे गेल्या.. नयनाने त्याच्याकडे पाहिले आणि ती शॉकच झाली...

नयना : राघव तु इथे??? ????

राघव : (हातातल फुलांचा गुच्छ देत) अभिनंदन... ????

नयना : ते सोड...  तू  इथे काय करतोयस???

राघव : मी इथे तुझ्यासाठी इतक लांब आलोय... त्याच तुला काही नाही... ????

नयना : ओके..  Thank you for beautiful flowers...???? आता मी जाउ सगळ्या वाट बघत असतील माझी... 

आणि नयना जायला निघते.. तस राघव तिचा हात धरतो.. 

राघव : एका अटीवर...  उद्या तुझ्यासाठी सरप्राईज आहे... सो उद्या संपूर्ण दिवस आपण जयपूर फिरणार आहोत....????

नयाना होकार देऊन निघून जाते.. 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजताच राघव बाईक घेऊन हॉटेल बाहेर उभा असतो.. आणि तिथून नयनाला फोन करुन  लवकर तयार होऊन खाली येण्यास सांगतो... ती घाईगडबडीत तयार होऊन बाहेर येते.. 

छान रेड कलरचा शॉर्ट टॉप, डार्क ब्लू कलरची अँकल लेन्थ जीन्स, कानात सिल्वर रिंगचे कानातले, ओठांवर फिकट रंगाची लिपस्टिक, खांद्यावर स्लींग बॅग आणि पायात व्हाईट कलरचे स्निकरस् एकदम स्टनींग लुक... ????

राघव पण काही कमी नव्हता... ग्रे शेडचा टी शर्ट, ब्लॅक कलरची कार्गो, त्यावर डार्क नेव्ही ब्लू कलरच जॅकेट, डाव्या मनगटावर स्पोर्टी घड्याळ, पायात बूट आणि ब्राउन रंगाचा क्लासी गाॅगल... ???? आणि फुल आॅन अटीट्युडमध्ये बाइकवर वाट बघत बसला होता..

नयना : (जांभळी देत)  ???? उगाच झोप मोड केलीस.. 

राघव : आधी गाडीवर बस मग बोलू..  उशीर होतोय.. 

येवढ बोलून राघवने हेल्मेट डोक्यावर चढवला आणि बाईक स्टार्ट करून निघाला.. आज पहिल्यांदाच ती त्याच्या बाईकवर बसली होती..

नयना!!!  बाइकवर boyfriend सोबत बसली आहेस.. So be comfortable.. ???? मला पकडून बसलीस तरी काही हरकत नाही.. (राघव नयनाला ताठ बसलेल बघून म्हणाला) ????

नयना : गाडी चालवण्यावर लक्ष दे तू ???? 

राघव कचकन ब्रेक दाबुन बाईक थांबवतो.. तशी नयना त्याच्या पाठिवर आदळते.. काय करतोयस..?? 

राघव : अग बाई कमीत कमी मित्र तरी समज..  तु अशी बसलीस तर लोक काय म्हणतील..आणि ????‍♂मी नाही म्हटलं की मला मिठी मारून बस पण हवेने उडून गेलीस तर माझ काय होईल हा तरी विचार कर ????

नयना : very funny.. चल आता ( नाक उडवून) ????

त्याने बाईक स्टार्ट केली.. नयना मागे बसली त्याच्या खांद्यावर हात ठेवून..आणि ते पुढे निघाले..


कनक व्रिंदावनच्या आधी , जोहरी बाजारापासून जवळपास चार ते साडे चार किलोमीटर अंतर पार करून ते जलमहाल ला पोहचले. 


 सकाळी सहा - साडे सहाच्या सुमारास होणारा सुर्योदय जलमहालावरून खूपच सुंदर दिसतो... नाहरफोर्ट आणि जलमहाल हे सकाळच्या सूर्योदयाच्या निसर्ग रम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.. राघव नयनाला सांगु लागला... 

सुर्योदयला सुरुवात झाली तस तस निसर्गाच सौंदर्य अधिकच खुलून दिसत होत.. गडद तांबडा रंग आता पिवळ्या रंघात घोळायला लागला होता.. लाल तांबूस रंगाचा सूर्य त्या जलमहालाच्या तलावात जणू स्वतःहालाच निरखत , आपलच प्रतिबिंब बघुन जसा उजळून निघाला होता.. नयना तो सुंदर नजारा डोळ्यांत साठवत होती. या क्षणी राघवला घट्ट मिठी मारुन त्याला क्षणांसाठी थँक्यू म्हणाव असा विचार नयनाच्या मनात आला पण ती मनातच हसली... 

त्यानंतर दोघेही हवामहल, बिर्ला मंदिर, अलबर्ट हॉल म्युझियम, आमेर फोर्ट अशा बर्‍याच ठिकाणी फिरले... जोहरी बाजार,  नेहरू बाजार आणि  तिथल्या लोकल बाजारात शॉपिंग पण केली.. 

त्रिपोलीया बाजार बांगड्यांच्या खरीदारी साठी खूप प्रसिद्ध आहे.. तिथे राघवने छान रंगीबेरंगी बांगड्या निवडल्या आणि तिथेच स्वतः तिच्या हातात भरल्या पण नयनाने हात वर करताच त्या सरळ हाताच्या कोपरातून पार झाल्या.. ???? दुकानदार पण बघून हसायला लागला.. नयना त्याची गंमत बघून गालातच हसत होती... ☺ 

राघवने डोक्यावर हात मारला.. ????‍♂ त्याचा उतरलेला चेहरा पाहून नयनाने स्वतःच्या मापाच्या बांगड्या निवडल्या आणि राघवला दिल्या... सोबत आपला हातही पुढे केला.. सोने पे सुहागा ????.. 

तिच्या हातात बांगड्या चढवल्यावर तिला तो बघतच बसला.. नयना त्या क्षणाला खुपच गोड दिसत होती.. ????


???????? सजदे में यूँ ही झुकता हूँ
तुमपे ही आ के रुकता हूँ
क्या ये सबको होता है
हमको क्या लेना है सबसे
तुमसे ही सब बातें अब से
बन गए हो तुम मेरी दुआ

खुदा जाने के मैं फ़िदा हूँ
खुदा जाने मैं मिट गया
खुदा जाने ये क्यूँ हुआ है
के बन गए हो तुम मेरे खुदा

दिल कहे के आज तो छुपा लो तुम पनाहों में
के डर है तुमको खो दूंगा
दिल कहे संभल ज़रा ख़ुशी को ना नज़र लगा
के डर है मैं तो रो दूंगा
करती हूँ सौ वादे तुमसे
बांधे दिल के धागे तुमसे
ये तुम्हें न जाने क्या हुआ
खुदा जाने के... ????????


शॉपिंग करुन राघव नयनाला स्काय वाल्टस हवेलीला घेऊन आला... तोपर्यंत संध्याकाळ होत आली होती.. खर सरप्राईज तर अजून बाकीच होत... 


क्रमशः

(वाचकांच्या आग्रहाखातर ही कथा मी परत पोस्ट करत आहे आणि म्हणूनच ही कथा ईरावर repeat होत आहे. शिवाय कथा वाचताना ती अधिक जवळची वाटावी यासाठी काही ठिकाणी मी emojis वापरले आहेत.. पण पेजवर emojis ऐवजी ???? असे प्रश्नार्थक चिन्ह दिसत आहे. तरी थोडं समजून घ्यावं. ईमोजी काढून पोस्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण server down झाल्यामुळे पोस्ट नाही झाले आणि संपूर्ण मेहनत वाया गेली. शेवटी आहे तस डायरी मधून अपलोड केला आहे.. त्यासाठी क्षमस्व.. तरी कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल ????????)

🎭 Series Post

View all