तुही मेरा.. (भाग ३)

Short and sweet love story

© शुभांगी शिंदे

तुही मेरा...

भाग ३

राघव अजूनही गर्दीच न्याहाळत होता आणि अचानक त्याची नजर एका ठिकाणी स्थिरावली... तिच ती नेहमी वाली पिंक स्कार्फ संपूर्ण चेहरा झाकलेला फक्त तिचे डोळेच दिसायचे... ती नेहमी राघवला चीअर करायला गर्दीत असायची पण जेव्हा जेव्हा राघवने तिला भेटण्याचा प्रयत्न केला ती तोपर्यंत गायब व्हायची...

त्या पिंक स्कार्फवालीला बघुन राघवला आता नवीन स्फूर्ती आली होती आणि तो नव्या जोशाने खेळायला लागला... आणि फायनली राघवची टीम जिंकली... सर्वजण जल्लोष साजरा करत होते पण राघवला आज त्या पिंक स्कार्फवालीला गाठायचेच होते.... तो तिच्या दिशेने स्टेडियमवर पळाला... राघवला आपल्या जवळ येताना पाहून तिने तिथुन पळ काढला... जाताना तिचा पाय अडखळला पण ती तिथून निघून जाण्यास सफल झाली...

गर्दीतून वाट काढेपर्यंत राघवला तिच्या पर्यंत पोहचण्यास विलंब झाला आणि नेहमीप्रमाणे यावेळेसही त्याचा अपेक्षा भंग झाला....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

इथे डान्स कॉम्पिटिशनचे निकाल सुरू झाले... सगळी टीम फिंगर क्रॉस करून उत्सुकतेने वाट पाहत होती... आणि प्रथम पारितोषिक विजेते नयना, राघवची जोडी ठरली... नयनाला स्टेजवर जाण थोड कठिण होत पण राघवने तिला आधार देत स्टेजवर नेले चालताना त्याच लक्ष तिच्या त्या सूज चढलेल्या पायावर गेल.. आता तिच्या पायावर बँडेज नव्हत... त्याने एक नजर नयनावर टाकली... तिने खुणेनेच काय झाले विचारले पण राघवने नकारार्थी मान डोलावली... दोघांनीही पहिल्यांदा हसतमुखाने शेअरिंग पारितोषिक स्विकारल...

कारण यापूर्वी त्यांची आपसातच स्पर्धा असायची आज पहिल्यांदाच दोघांनी मिळून स्पर्धा जिंकली होती... सगळे खूप खुश होते... ते दोघेही स्टेजवरून उतरनारच होते की इतक्यात परीक्षकांनी त्यांना थांबवून घेतले आणि सोलो डान्स चे पारितोषिक पण जाहीर केले त्यातही बाजी नयनानेच मारली... सगळीकडे परत टाळ्यांचा कडकडाट झाला....

सगळेजण परत हॉटेलवर जायला निघाले... सगळे फोटो काढण्यात बिझी होते... पाय दुखत असल्याने नयनाला त्यांच्यासोबत जास्तवेळ उभे राहण्यास त्रास होत होता म्हणून ती दोन तीन फोटो काढून दिप्तीला घेऊन बसमध्ये बसायला गेली....

नयनाला बसची स्टेअरकेस ऊंच असल्याने चढण्यास त्रास होत होता... राघवने ते लांबूनच ते पाहिले... आणि तिथे मदत करण्यासाठी गेला...

राघव : दिप्ती!! ! तुला सर बोलावत आहेत.... (तिला तिथून कलटवण्यासाठी) ????

दिप्ती : अरे पण.. . नयनाला बसमध्ये....

राघव : (तिच बोलन मध्येच तोडून) मी आहे इथे तु जा ना ..

नयना जरा आश्चर्यानेच बघते.... दिप्ती निघून जाते... आजूबाजूला कुणीच नाही हे बघून राघव बोलायला सुरुवात करतो...

राघव : नयना!!! जरा स्पष्टच विचारतो... (तिचा हात खांद्यावर घेऊन तिला बसमध्ये चढण्यासाठी आधार देत)

नयना : (थोडी दचकून) हममम ... काय विचारायच आहे...

राघव : मला माहीत नव्हतं की माझी जादु आधीपासूनच तुझ्यावर झाली आहे... तुच त्या गर्दीत मला चिअर करायला येतेस ना?? ????

नयना : (चमकून तिथेच थांबते) काहीही काय?? ???? मी कशाला ते नसते उद्योग करू?? (परत नाक मुरडत)

राघव : ???? मग मला सांग तुझ्या पायाच बँडेज कुठेय???

नयना : (आपली जीभ चावत) ????‍♂ अरे ते मी मगाशी काढुन ठेवल.... ( आपली बाजू सावरत)

राघव : (स्वतःच्या खिशातून बँडेज काढून)???? हे मला स्टेडियमवर मिळाल.. जिथे तू पळताना अडखळलीस... .????

आतामात्र नयनाने नजर चोरली... ???? राघवने तिच संधी साधून पटकन तिला उचलून बसमध्ये चढवले..???? आणि तीला सीटवर बसवले... नयना चक्क लाजली होती... आणि राघव तिला बघून मनात हसत होता...

इतक्यात बाकीचे सगळे पण बसमध्ये येऊन बसले... राघव नयनाच्या बाजूच्या रांगेत दोन सीट पुढे बसला... सगळे बसमध्ये धमाल मस्ती करू लागले... गाण्यांच्या भेंड्या खेळू लागले... नयना मात्र गालातल्या गालात हसत होती.. ???? राघवही आज जाम खुश होता...

???????? बन के तितली दिल उड़ा उड़ा उड़ा है कहीं दूर..

बन के तितली दिल उड़ा उड़ा उड़ा है कहीं दूर..

चाल के ख़ुशबू से जुड़ा जुड़ा जुड़ा है कहीं दूर

हादसे ये कैसे अनसुने से जैसे चूमे अंधेरों को कोई नूर

बन के तितली दिल उड़ा उड़ा उड़ा है कहीं दूर..

सिर्फ कह जाऊं या आसमान पे लिख दूं

तेरी तारीफों में चश्में बाद्दूर

बन के तितली दिल उड़ा उड़ा उड़ा है कहीं दूर..

चाल के ख़ुशबू से जुड़ा जुड़ा जुड़ा है दूर ????????

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

बस एकदाची हॉटेलवर थांबली... सगळे आराम करण्यासाठी आपापल्या रूममध्ये निघून जातात... राघव आज खूप खुश होता..

अभय : Wow dude... आज जाम खुशीत आहेस..? ????

राघव : हो आज सगळीकडेच आपण बाजी मारली.. ????

अभय : हमम्... तुझी स्कार्फवाली भेटली का?? ????

राघव : (हलकेच हसून ) हो...

अभय : मग कोण आहे ती आणि कशी दिसते?? By the way तु मला सांग तुझ नक्की काय चाललंय??

राघव : म्हणजे ??? (बेडवर आडव होत)

अभय : इथे नयना तिथे स्कार्फवाली... ???? नयनाचा डान्स तु रोज चोरून बघायचास माहित आहे मला... ???? इथे तर पटत नाही अस लोकांना दाखवतो... और दिल मे कुछ कुछ नहीं बहुत कुछ है... ????

राघव : (आश्चर्याने) ???? जासूस!!! तु काय माझी जासूसी करतो?? (आणि त्याला उशी फेकून मारतो)

अभय : यार का इतना खयाल तो रखना पडेगा...

राघव : she's "नयना" अभय.... ???? पण अजून कबुल नाही झाली....

अभय : Really? ???? याने आग दोनो तरफ बराबर लगी है |

थोड्यावेळाने सगळे खाली रात्रीच्या जेवणासाठी जमा होतात... राघवची नजर नयनाला शोधत असते... इतक्यात भिंतीच्या आडोशाला कोणीतरी राघवला खेचून घेत... राघव दचकून बघतो तर एक अनोळखी मुलगी त्याला आपल्या जवळ खेचते आणि लगट करायला लागते....

ती जरा जास्तच बोल्ड होती... ???? अगदीच मिनी स्कर्ट brown checks मध्ये, काळा रंगाचा अॉफ शोल्डर फूल स्लीव टॉप, कानात सिल्वर कलरचे गोल रिंगस् , मोकळे सोडलेले केस, पायात high heels चे काळे बुट, डार्क आयलायनर, आणि ओठांवर न्यूड कलरची लिपस्टिक... खरंतर तिला पाहून कोणाचीही विकेट उडेल... पण राघवला पाहिल्या पासुन तिचीच विकेट उडाली होती..????

ती : (अतिशय मोहक पद्धतीने ) Hiiii... मी रेणू ....

राघव : hiii .... (जरा अंतर राखून)

ती : you are very handsome ????

राघव थोड अंतर ठेवूनच होता पण तिच जरा अंगलट येऊ पाहात होती... त्यादोघांमध्ये एक इंचाचच अंतर होत आणि त्याच वेळेस नयनाने त्या दोघांना अस एकत्र पाहिल.. ????‍♂

आता काय रागाने लालबुंद झाली ना नयना ???? पण मनातले भाव आवरत टेबल जवळ येऊन बसली... राघवने नयनाला पाहिल आणि त्या बोल्ड बयेपासून सुटका करून तोही नयनाच्या समोरच्या टेबलवर येऊन बसला...

रेणूही राघवच्या बाजूला बसण्याच्या उद्देशाने त्याच्याच टेबलजवळ येत असते... तस आधीच्या टेबलवर बसलेली नयना मध्ये पाय अडवते... रेणू अडखळते आणि त्या अडखळण्यातच बाजूलाच असलेल्या स्लाइडरवर ???? तिचा पाय पडतो... आणि ती स्लाईड करत पडणारच असते की राघव तिला सावरतो... तिला अस अचानक सावरताना तो एका टेबलवर पडतो... त्याच्यावर रेणू पडते... रेणू आता त्याच्या मिठीत असते.. ????

रेणू आणि राघव आता तर एकमेकांना चिकटून असतात ???? हे बघून नयना अजून चिडते.. ???? राघव पटकन रेणूला दूर करतो... बाकिचे सगळे आवाचून बघत असतात... ???? रेणू यातही त्याच्या परत अंगलट येऊन थँक्स म्हणत निघून जाते... ???? राघव नयनाकडे बघतो ???? पण ती नाक मुरडून राघवला angry look देते... ????तिला अस पाहून राघव मनोमनी खूश होतो.. कारण ती कबूल जरी झाली नसली तरी तीची नजर खुपकाही सांगत होती... ????

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दुसऱ्या रात्रीची परतीची ट्रेन असते... म्हणून दिवसभर मजामस्ती आणि फिरण्याचा प्लॅन ठरतो... सकाळी सगळे बसमधून फिरायला निघतात... राघवने मस्त लाल रंगाचा टी शर्ट, ब्लू जीन्स आणि ब्लॅक कलरचा हूडी जॅकेट घातला होता... आणि तो विंडो सीटवर बसून हेडफोन लावून गाणे ऐकत होता... त्याच्या शेजारी अभय बसुन होता...

दिप्तीला अभयकडे काम होत, म्हणून तिने नयनाला विनंती केली की तिने जाउन अभयच्या सीटवर बसावे... पण नयना नाही म्हणाली.. मग दिप्तीच उठुन अभयकडे गेली... अभयने संधीचा फायदा घेत राघवला दिप्तीच्या सीटवर बसायला पाठवले... राघवला बाजुला बसलेल बघून नयना थोडी मनोमन लाजली... ????

दोघेही शांतच होते... राघवला तर कळले होते... की नयना त्याला पसंत करते पण नयनाला अजून राघवच्या मनातल कळण बाकी होत... आता दोघांनाही जरा जास्तच attitude ???? असल्यामुळे एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली कोण आणि कशी देणार हाच मोठा प्रश्न आहे..????

राघव : (हेडफोन बाजुला करत) पाय कसा आहे आता...

नयना : काल पेक्षा बरा आहे... ???? (रात्रीचा राग अजून गेला नाही)

राघव : (बराच विचार केल्या नंतर) बराच राग आलेला दिसतोय ????

नयना : मला कशाला राग आला पाहिजे.. ????

राघव : ???? छान दिसतेस आज...

नयना : I am always ????

राघव बाजूला बसल्यामुळे मनात तर लाडू फुटत आहेत पण चेहर्‍यावर भाव मात्र काहिच नसल्यासारखे... तिचा रागवलेला चेहरा पाहून राघव मनातच हसतो.... तसा बस ड्रायव्हर बसमधल्या टेप रेकॉर्डर मध्ये गाण लावतो...

????????दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके

सबको हो रही है, खबर चुपके चुपके

साँसों में बड़ी बेक़रारी, आँखों में कई रत जगे

कभी कहीं लग जये दिल तो, कहीं फिर दिल न लगे

अपन दिल मैं ज़रा थम लूँ

जादु का मैं इसे नाम दूँ

जादु कर रहा है, असर चुपके चुपके

दो दिल मिल रहे हैं ...????????

अभय नयना आणि राघवला बघून ड्रायव्हरला दाद देतो..." वाहह!! भय्याजी क्या टाइम पे गाना लगाया हे| बहौत खूब... ???? आणि राघवला बघून डोळा मारतो ????

????????ऐसे भोले बन कर हैं बैठे, जैसे कोई बात नहीं

सब कुच नज़र आ रहा है, दिन है ये रात नहीं

क्या है, कुछ भी नहीं है अगर

होंठों पे है खामोशी मगर

बातें कर रहीं हैं

नज़र चुपके चुपके

दो दिल मिल रहे हैं ...

कहीं आग लगने से पहले, उठता है ऐसा धुआँ

जैसा है इधर का नज़ारा, वैसा ही उधर का समाँ

दिल में कैसी कसक सी जगी

दोनों जानिब बराबर लगी

देखो तो इधर से

उधर चुपके चुपके

दो दिल मिल रहे हैं ...????????

थोड्यावेळाने बस लाल किल्ल्याजवळ थांबते... सगळे आपले खाली उतरवून एक एक गट बनवून फिरायला लागतात... काही सेल्फी काढत बसतात तर काही अभ्यासाच्या दृष्टीने माहिती घेत असतात...

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल ????????)

🎭 Series Post

View all