तुही मेरा.. (भाग २)

Short and sweet love story

© शुभांगी शिंदे

तुही मेरा...

भाग २

सगळे स्पर्धेसाठी दिल्लीला पोहचले... तो पर्यंत पहाट झाली होती... हवेत छान गारवा पडला होता...सोबत त्यांचे चार शिक्षक पण होते... सर्वांना त्यांच्या रूमवर जाऊन आराम करण्यास सांगितले आणि नऊ वाजता नाश्ताला भेटू असे सांगून सगळे शिक्षक पण आपापल्या रूममध्ये निघून गेले...

दोघांना मिळुन एक रूम देण्यात आली होती... राघव आणि अभय एकत्र होते.... इथे नयना सोबत दिप्ती असते... सगळे नाश्ताच्या वेळेस कँटीनमध्ये भेटतात... तिथे काही इतर कॉलेजची पण मुल असतात... अशातच काही नवीन ओळखी व काही नवीन फ्रेंडस भेटतात...

अकरा वाजता सगळे सरावासाठी कँपसमध्ये जाण्यासाठी बस मध्ये बसतात..... कँपसमध्ये सगळेच आपापल्या सरावाला लागतात... नयनाने दोन स्पर्धेत भाग घेतला होता... एक सोलो डान्स कथक आणि दुसरा कपल डान्स सेमीक्लासिकल प्लस फ्री स्टाइल.... विरेन अजून आला नव्हता म्हणून ती आधी कथकची प्रॅक्टिस करत होती... थोड्यावेळाने विरेनही तिथे आला... नयनाने थोड रेस्ट घेऊन विरेन सोबत सरावाला सुरवात केली...

सगळ्यांची प्रॅक्टिस संपून आता संध्याकाळ झाली होती... सगळे परत बस मध्ये बसून हॉटेलला पोहचले... बसची स्टेअर ऊंच असल्यामुळे चढण्या उतरण्यासाठी लाकडी खोका मध्ये ठेवण्यात आला होता... सगळी मुल पटापट उड्या टाकून खाली उतरले... दोन तीन मुली उतरल्यावर दिप्ती उतरली आणि मागोमाग नयना उतरतच होती की विरेनने हळूच तो खोका पायाने गाडीच्या खाली सरकवला.. राघवने ते पाहीले पण नयनाच लक्ष नसल्यामुळे तिचा तोल जाऊन पाय मुरगळला... आणि ती "आई.... गं... " ओरडतच खाली बसली...

मैत्रिणींनी तिला हात धरून उठवले...आणि आत हॉटेलच्या हॉलमध्ये नेले... मॅनेजरने डॉक्टर उपलब्ध करुन दिले... नयनाच्या पायाला बँडेज बांधले आणि हालचाल न करण्याची ताकीद दिली... सगळ्यांचेच चेहरे पडले...उद्या एवढी मोठी स्पर्धा आणि आज हे असं घडलं...नयना तर रडायचीच बाकी होती.... शिक्षकांनी तिला आधार देत समजूत घातली... पण राघवने जाऊन विरेनला जाब विचारला तस सगळेच त्याच्याकडे आश्चर्याने पहायला लागले... राघवने घडलेला प्रकार सगळ्यांना सांगितला... त्या दिवशी नयनाने कानाखाली मारली म्हणून विरेनने अस केल हे तो कबुल झाला... शिक्षकांनी विरेनला शिक्षा आपण आपल्या कॉलेजमध्ये जाऊ तेव्हा बघू आता उद्याच्या स्पर्धेच काय ते आधी बघू...

सगळे आपापल्या खोलीत निघून जातात.... नयनाला धड चालताही येत नव्हते... दिप्ती आणि अजून एका मैत्रिणीने खांद्याचा आधार देऊन तिला खोलीत आणले...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सकाळी सगळे स्पर्धेसाठी कँपसमध्ये दाखल झाले... नयनाला बऱ्यापैकी आराम पडला होता पायाला..... पण डान्स करण थोड कठिण होत.... त्याही परिस्थितीत ती डान्स करण्यास तयार होती कारण आता कॉलेजच्या इज्जतीचा प्रश्न होता... शिक्षकांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ऐकेल ती नयना कसली???

स्पर्धा सुरू झाली... आधी कपल डान्स होते.... नयना आणि विरेनच्या जोडीचा चौथा क्रमांक होता... पण विरेन आलाच नव्हता... तरी सुद्धा तिने तो डान्स एकटीने करायच ठरवल... शेवटी प्रयत्न करून हरलो तर चालेल पण आधीच हार पत्करायची नाही अस तिच मत होत....

Announcement झाली... नयना स्टेजवर आली आणि song play झाल... तिने नाचायला सुरुवात केली....

???????? हीरे मोती मैं ना चाहूँ,

मैं तो चाहूँ संगम तेरा

मैं तो तेरी, सैयाँ, तू है मेरा

सैयाँ सैयाँ... ????????

नयनाने ताल धरायला सुरुवात केली.... चार ओळीनंतर विरेन तिला जॉईन होणार होता... पण अचानक राघव स्टेजवर आला आणि त्याने नयनासोबत ताल धरला... नयना आधी आश्चर्यचकित झाली पण ती थांबली नाही... तिनेही नाचायला सुरूवात केली....

????????तू जो छू ले प्यार से,

आराम से मर जाऊँ

आजा चंदा बाहों में,

तुझमे ही गुम हो जाऊँ में

तेरे नम में खो जाऊँ

सैयाँ सैयाँ ????????????

राघवचे मित्र आणि त्यांचे शिक्षक आश्चर्याने बघत होते पण खुशही होते.... राघवही इतका छान डान्स करू शकतो हे खरच surprising होत.... दोघेही बेभान होऊन नाचत होते.... ते एकमेकांत इतके हरवले होते की आजूबाजूचे भानच उरले नव्हते त्यांना....

???????????? मेरे दिन खुशी से झूमें, गाऐं रतें

पल पल मुझे डुबाएँ, जाते जाते,

तुझे जीत जीत हारू, ये प्राण प्राण वारूँ,

हाए ऐसे मैं निहारूँ, तेरी आरती उतारूँ,

तेरे नाम से जुड़े हैं सारे नाते सैयाँ सैयाँ

बनके माला प्रेम की, तेरे तनपे झर झर जाऊँ

बैठूँ नैया प्रीत की, संसार से तर जाऊँ मैं, तेरे

प्यार से तर जाऊँ.......सैयाँ सैयाँ ????????????????

दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून नाचत होते... ????आसपासच्या जगाचाही विसर पडला होता त्यांना... इतकच काय तर नयना पायाच दुःखणही विसरली होती....

???????????? ये नरम नरम नशा है, बढ़ता जाए,

कोई प्यार से घुंघटीया देता उठाए

अब बावरा हुआ मन,

जग हो गया है रोशन

ये नई नई सुहागन,

हो गई है तेरी जोगन

कोई प्रेम की पुजारन मंदिर सजाए

सैयाँ, सैयाँ, सैयाँ, सैयाँ ????????????????

सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या...???? अचानक लिफ्ट करताना तिच्या पायात कळ बसली... तिने ते चेहर्‍यावर जाणवू दिल नाही पण राघवने ते हेरल आणि डोळ्यांनीच तिला विश्वास दिला की मी आहे सांभाळून घ्यायला.....

????????????हीरे मोती मैं ना चाहू मैं तो चाहू संगम तेरा

मैं ना जानू, तू ही जाने, मैं तो तेरी, तू है मेरा

मैं ना जानू, तू ही जाने, मैं तो तेरी, तू है मेरा

मैं तो तेरी, तू है मेरा ???????????? ????

शेवटच्या ओळीवर त्याने तिला उचलून घेतले होते... तिने आपले दोन्ही हात वर पसरवले होते... आणि तो तिला घेऊन हळूहळू गोल फिरत होता... जसजस सुर कमी होत होता तसतस तो तिला हळूवार खाली उतरवत होता... आणि खाली उतरताच दोघेही एकमेकांच्या नजरेत परत हरवून गेले....???? पहिल्यांदा मनातल्या भावना नजरेत व्यक्त होत होत्या..... ????

शेवटी गाण संपल आणि आजुबाजूला टाळ्यांचा कडकडाट वाजायला लागला... शिट्यांवर शिट्या वाजायला लागल्या.... तसे दोघेही भानावर आले... राघवने आपली मिठी सोडली... नयना चालायला लागली पण अडखळली.... राघवने तिला बॅक स्टेज नेले आणि खुर्चीवर बसवले.....

तसे सगळेच त्यांचे मित्र, मैत्रिणी आणि शिक्षक त्यांच्या भोवती गोळा झाले...

अभय : (हात मिळवत गळा भेट करून) Great man... You did such great job... And नयना!! You're outstanding....

शिक्षक : खरच खूप छान... राघव आम्हाला माहित नव्हतं की तु यातही माहीर आहे... आणि नयना खरच अप्रतिम... पायाची दुखापत संभाळून खरच खूप छान performance दिलास....

अभय : Thank you sir. Thank you mam..

नयना : Thank you all... And special thanks to अभय....

तसा सगळा ग्रुप जोर जोरात ओरडू लागला...

ओहो हो... Woo.... oooo.....

दिप्ती : चला फायनली आता तुमची भांडण मिटणार....

नयना : (नाक उडवून) अगदीच तस नाही... ????

अभय आणि बाकीचे डोक्यावर हात मारतात ????‍♂

राघव हलकेच मान डोलावून हसतो... नयना आपल्या पुढच्या performance साठी तयार व्हायला निघून जाते... जाताना हलकेच मागे वळून राघवला क्यूटशी स्माईल देते... राघवने आपल्या डोक्यात केसांवर हात फिरवला व तो पुढे निघून गेला....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

इथे नयना तिच्या सोलो डान्स performance ची तयारी करत होती... Costume चेंज करुन एका चेअरवर बसली आणि पायात घुंगरू बांधत होती.. तेव्हा तिला जाणवल की कोणीतरी तिला चोरून बघत आहे... पण तेव्हा नेमकी दिप्ती येते... आणि ते घुंगरू पायात बांधायला मदत करते... निदान हि स्पर्धा तरी कटेंड नको करु अशी विनवणी ती नयनाला करते पण नयना तिच अजिबात ऐकत नाही... इथे स्टेजवर तिच्या नावाची announcement होते तशी नयना पुढे जाते... स्टेजवर पोझिशन घेताच गाण सुरू होत....

????????????कोई जो मिला तो मुझे ऐसा लगता था

जैसे मेरी सारी दुनिया मैं गीतों की रुत

और रंगों की बरखा है

खुशबू की आँधी है

महकी हुई सी अब सारी फिज़ायें हैं

बहकी हुई सी अब सारी हवाएँ हैं

खोयी हुई सी अब सारी दिशाएँ हैं

बदली हुई सी अब सारी अदाएँ हैं

जागी उमंगें हैं

धड़क रहा है दिल

साँसों में तूफाँ हैं, होठों पे नगमे हैं

आँखों में सपने हैं,

सपनों में बीते हुए सारे वो सारे लम्हें हैं ????????

दुखऱ्या पायावर जास्त जोर न देता... नयनाने व्यवस्थित ताल धरला होता... सर्वांना तर तिचीच काळजी लागली होती आणि तिचा अभिमान ही वाटत होता...

???????? जब कोई आया था, नज़रों पे छाया था

दिल में समाया था, कैसे मैं बताऊँ तुम्हें

कैसा उसे पाया था,

प्यारे से चेहरे पे बिखरी जो जुल्फें तो ऐसा लगता था

जैसे कोहरे के पीछे इक ओस मैं धुला हुआ फूल खिला है

जैसे बादल में एक चाँद छुपा है और झाँक रहा है

जैसे रात के परदे में एक सवेरा है रोशन-रोशन

आँखों में सपनों का सागर

जिसमें प्रेम सितारों की चादर जैसे झलक रही है

लहरों-लहरों बात करे तो जैसे मोती बरसे

जैसे कहीं चांदी की पायल गूंजे

जैसे कहीं शीशे के जाम गिरे और छन से टूटे

जैसे कोई छिप के सितार बजाये

जैसे कोई चांदनी रात में गाए

जैसे कोई हौले से पास बुलाये????????????

सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट होत होता... स्टेजवर पडदा पडला आणि नयना तिथेच कोसळून पडली... पाय बऱ्यापैकी सुजला होता... मुलींनी तिला चेअरवर बसवले आणि पाणी दिले....

दिप्ती : कमाल आहे तुझी.... किती हट्टीपणा करशील... पाय बघ किती सूज आली आहे... आता सक्तीचा आराम करायचा....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

इथे काही वेळाने बास्केटबॉल मॅच सुरू झाली... पण राघवच काही केल्या लक्ष लागत नव्हत... समोरच्या टीमचा परडा भारी पडत होता... न राहवून अभयने राघवला लक्ष केंद्रित करण्यास सांगितले... पण राघवची नजर गर्दीवर टिपली होती....

(ब्रेकच्या दरम्यान)

अभय : राघव!!! तुझी ती स्कार्फवाली इथे नाही भेटणार... ती कोणत्याच activities मध्ये नसल्याने कदाचित तिला इथे येण्याची परवानगी नाही मिळाली... ????

राघव : she's my lucky charm ????

अभय : राघव please... आता सगळे होप्स तुझ्याकडूनच आहेत...

राघव अजूनही गर्दीच न्याहाळत होता आणि अचानक त्याची नजर एका ठिकाणी स्थिरावली... तिच ती नेहमी वाली पिंक स्कार्फ संपूर्ण चेहरा झाकलेला फक्त तिचे डोळेच दिसायचे... ती नेहमी राघवला चीअर करायला गर्दीत असायची पण जेव्हा जेव्हा राघवने तिला भेटण्याचा प्रयत्न केला ती तोपर्यंत गायब व्हायची...

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल ????????)

🎭 Series Post

View all