Jan 27, 2021
प्रेम

तुही मेरा... (भाग ११)

Read Later
तुही मेरा... (भाग ११)

© शुभांगी शिंदे 

तुही मेरा...

भाग ११

 

नयना हतबल होऊन फक्त बघत राहिली.. मनातल्या मनात “राघव सॉरी ना.. ” म्हणत स्वतःलाच दोष देत होती.. पण येवढ्यात हार मानणारी नयना नव्हती.. आपले पाणावलेले डोळे पुसत गाडीत बसली आणि अभयला फोन केला…

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

इथे राघव आणि मीनल घरी येतात.. घरी येताच मीनल राघववर प्रश्नांचा भडीमार सुरू करते..

मीनल : what happened राघव?? नयना मला sorry बोलली आहे.. तु का रागवतोस इतका तिच्यावर??? Just chill after all we are friends…

इतक्यात आई पण हॉलमध्ये येते.. आणि मीनलच बोलन अर्धवटच राहत…

आई : अग मीनल हे काय झालं?? हे डोक्याला बँडेज कस काय?? राघव??

राघव काहीच उत्तर देत नाही… तो मनात हाच विचार करत असतो की मी अती राग नाही ना केला.. बिचारी किती हर्ट झाली असेल… मी आज रात्रीच तिच्याशी बोलतो.. तो पर्यंत जरा तिलाही कळू देत.. मला किती त्रास झाला असेल ते..

आई : अरे बोला काहीतरी?? मी काय विचारतेय??

मीनल : nothing to worry Aunty.. ते झाल अस की मी… (राघवने तिला परत मध्येच अडवल)

राघव : आई तुमच चालू देत मी निघतो…

आणि मग मीनलची परत नेहमीप्रमाणे बडबड सुरु होते.. आईला पण कधी कधी अस वाटत उगाच प्रश्न विचारला… ‍

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

रात्री आठच्या सुमारास सगळे ढाब्यावर जेवायला एकत्र येतात…ढाबा छान एका तलावाकाठी होता.. रात्रीच्या वेळी तलावाच्या काठावर बसून त्या पाण्यात पडलेल्या चंद्राच प्रतिबिंब पाहणे, तलावाच्या पाण्याला स्पर्शून गार होणार्‍या वार्याचे झुळूक अंगावर धावून येणे म्हणजे एक सुखद अनुभव..

अभय, दिप्ती, राघव, मीनल, नयना आणि अजून दोन एक मित्र.. सगळे एकच मोठा टेबल बुक करून छान जेवणाची आॅर्डर देतात.. तोपर्यंत सर्वांच्या गप्पा टप्पा सुरू असतात.. नयना सुद्धा परत एकदा मीनलची माफी मागते..

नयना : मीनल I am extremely sorry… मला खरच लक्षात नाही आलं.. 

मीनल : It’s okay 

नयना : राघव मी तुझी पण माफी मागते.. Please मला माफ कर…

वेटर : (एक गुलाबाच फूल देउन) सर ये आपके लिए दिया है| 

राघव : thank you… पण कोणी दिल??

अभय : किसी चाहने वालेने दिया होगा… (आणि डोळा मारतो) 

मीनल : म्हणजे?? 

राघव : काही नाही ग… Complementary असेल..

थोड्यावेळाने जेवण येताच सगळे जेवण करून घेतात.. जेवताना राघव आणि नयना च लक्ष मात्र एकमेकांकडे होत.. राघव मुद्दाम अकडून दाखवत होता.. आणि नयना मात्र त्याची नजर भेट होण्यासाठी झूरत होती.. नयनाला चिडवण्यासाठी राघवने आपल्याकडच गुलाबाच फूल मीनल ला दिल.. हे बघून नयनाला राग आला पण आज काहिही झाल तरी राघवला मनवायच हे तिने ठरवल होत..

सर्वांच जेवण झाल्यावर सगळे तलावाकाठी जाऊन आपापल्या सोईनुसार बसले.. मीनल, राघव आणि त्याचे मित्र एकत्र बसले.. पाण्यात दगड काय मारतायत, मस्ती काय करतात मीनल सगळच इन्जॉय करत होती.. राघव आणि नयना मात्र शांत होते.. रात्रीचा बराच गारवा पडला होता.. नयनाने स्लिव्हलेस रेयॉन टॉप घातला होता.. त्यामुळे तीला गारवा जरा जास्त लागत होता.. हातावर हात चोळत तोंडाने फुंकर घालत ती ऊब निर्माण करत होती..

नयनाला मागचा गार्डनचा किस्सा आठवला की कशाप्रकारे अभयने आपल जॅकेट दिप्तीला दिल होत.. आणि आपण त्यावर हसलो होतो.. आता राघव आणि मी एकत्र कसतो तर त्याने नक्की आपली अवस्था ओळखून आपल जॅकेट दिल असत पण… 

राघवने नयनाची स्थिती ओळखली आणि आपल जॅकेट तिला काढून देणार इतक्यात काही कळायच्या आत मीनल ने खेचून घेत स्वतः पांघरल.. राघव परत नयनाला चिडवायच म्हणून मुद्दाम मीनलला बोलला.. मीनल अग तुलाच देत होतो जॅकेट, तुला थंडी वाजतेय ना म्हणुन… नाहितरी ईथे काही unromantic लोकांना हा फक्त मूर्खपणा वाटतो..

आता तर नयना अजूनच चिडते आणि परत ढाब्याच्या दिशेने चालू लागते.. ती जातच असते की राघव मागून येऊन तिला आडोशाला खेचून घेतो.. म्हणजे ढाब्याच्या मागच्या बाजूला.. मागच्या बाजूला जास्त प्रकाश नव्हता.. पण छान चांदण पडल होत.. आणि त्या चांदण्या प्रकाशात नयनाचा चिडलेला चेहरा त्याला अजूनच मोहक वाटत होता..

राघवमात्र एकटक तिलाच न्याहाळत होता.. नयना आपली खाली मान घालून उभी होती..

राघव : राग आला का तुला… ?? 

नयना : नजरेनेच हो म्हणून सांगत होती… 

राघव : पण मूर्खपणाच्या गोष्टी तुला आवडत नाही ना.. 

नयना : पण आता आवडायला लागल्या.. (नजर चोरून)

राघव : हो का?? मग मीच येतो ना जवळ जॅकेट कशाला हव?? (तिच्या आणखी जवळ जात)

तशी नयना हसली आणि राघवला मागे ढकलून पळू लागली… राघवने पटकन तिचा हात धरून स्वतःकडे लिफ्ट केले.. नयना धाडकन राघवर धडकली.. राघवने आपले दोन्ही हात तिच्या कमरेला विळखा घातले आणि तिला अजून आपल्या जवळ ओढले.. नयना आता फक्त त्याच्या नजरेत पाहत होती.. तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर होते.. अशीच नजरभेट घेत राघवने अलगद तिला अजून आपल्या जवळ घेत तिच्या ओठांवर आपले ओठ क्रश केले.. 

नयनाचे हात आता अलगदपणे त्याच्या मानेभोवती गेले.. डोळे आपोआप मिटले आणि दोघेही बराच वेळ त्या क्षणात हरवून गेले.. 

इतक्यात नॅनीने नयनाला स्वप्नातून जागे केले… नयनाच्या लक्षात आले की ती इतका वेळ स्वप्न बघत होती.. नयना तयार होऊन गाडी घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोहचली.. ब्लॅक शाइनी जंपसुट, कानात गोल रिंगा, ओठांवर फिकट लिपस्टिक, हातात क्लच आणि पायात सँडल.. ती सर्वांच्या आधी पोहचली होती..

आज ढाबा नेहमीपेक्षा जास्त आकर्षक वाटत होता.. रंगीबेरंगी मंद प्रकाश देणारी लाईट.. सुंदर रित्या सजवलेले फ्लॉवर पॉट.. आज अगदी कँडल लाईट डिनरला जशी सोय असते अगदी तशीच छबी ढाब्याची होती.. खूपच मनमोहक… 

थोड्यावेळाने सगळेच जमा झाले.. आज जास्त गर्दीही नव्हती… नयनाने स्पेशली सांगुन फक्त त्यांच्यासाठी राखीव ठेवला होता ढाबा.. तस सर्वांना अशी सुट नसते पण अभयच्या ओळखीने मॅनेज झाल.. सगळे छान गप्पा मारत बसले होते.. सोबतीला म्युझिक सुरू होतच मंद अस.. मीनलने मॅनेजरला सांगून गाण्याची थीम चेंज करवली.. आणि सर्वांना नाचण्यासाठी घेऊन गेली..

नयनाचे हात आता अलगदपणे त्याच्या मानेभोवती गेले.. डोळे आपोआप मिटले आणि दोघेही बराच वेळ त्या क्षणात हरवून गेले.. 

इतक्यात नॅनीने नयनाला स्वप्नातून जागे केले… नयनाच्या लक्षात आले की ती इतका वेळ स्वप्न बघत होती.. नयना तयार होऊन गाडी घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोहचली.. ब्लॅक शाइनी जंपसुट, कानात गोल रिंगा, ओठांवर फिकट लिपस्टिक, हातात क्लच आणि पायात सँडल.. ती सर्वांच्या आधी पोहचली होती..

आज ढाबा नेहमीपेक्षा जास्त आकर्षक वाटत होता.. रंगीबेरंगी मंद प्रकाश देणारी लाईट.. सुंदर रित्या सजवलेले फ्लॉवर पॉट.. आज अगदी कँडल लाईट डिनरला जशी सोय असते अगदी तशीच छबी ढाब्याची होती.. खूपच मनमोहक… 

थोड्यावेळाने सगळेच जमा झाले.. आज जास्त गर्दीही नव्हती… नयनाने स्पेशली सांगुन फक्त त्यांच्यासाठी राखीव ठेवला होता ढाबा.. तस सर्वांना अशी सुट नसते पण अभयच्या ओळखीने मॅनेज झाल.. सगळे छान गप्पा मारत बसले होते.. सोबतीला म्युझिक सुरू होतच मंद अस.. मीनलने मॅनेजरला सांगून गाण्याची थीम चेंज करवली.. आणि सर्वांना नाचण्यासाठी घेऊन गेली..

नयना फक्त राघवला मनवण्याची वाटच बघत होती.. ती नाचत तर होतीच पण लक्ष राघववर होत.. दिप्ती आणि अभय आपल्यातच गुंतलेले होते.. मीनल आणि राघव एकत्र डान्स करत होते… मीनल काहीतरी आठवत जरा बाहेर पडते.. राघव आपला आपल्याच मूडमध्ये होता.. नयना राघव जवळ गेली आणि बोलण्यासाठी त्याचा हात पकडून बाहेर पडत होती.. राघवने तिला तसच हात पकडून आपल्या जवळ ओढले… इतक्यात गाण चेंज झाल..

 प्यार की ये कहानी सुनो

इक लड़का था, इक लड़की थी

होती क्या है जवानी सुनो

इक लड़का था, इक लड़की थी

वो भी एक दौर था, वक़्त ही और था

जब वो थे अजनबी

दोनों तन्हाँ से थे, पर वो कहते किसे

बात जो दिल में थी

प्यार की ये कहानी… 

राघवचा राग निवळला होता हे नयनाला आता कळाल होत.. ती पण त्याच्यात रंगून त्याला छान साथ देत होती.. दोघांमधली दरी संपली होती.. दोघे आपल्याच धुंदीत गुंग होते… पण थोडी गडबड झाली.. एका टर्नला राघव जेव्हा नयनाला डाव्या हातापासून उजव्या हाताला रोल करतो तस तिच्या जागी मीनल राघवला जॉइन करते.. राघव क्षणभर गोंधळतो पण मीनल त्याला व्यवस्थित साथ देत होती..

 गुमसुम-गुमसुम रहते थे दोनों

फिर भी दिल में कहते थे दोनों

कोई सपना हम भी तो पायें

एक दिन टूटे ग़म के वो घेरे

झिलमिल-झिलमिल आये सवेरे

मौसम बदला जागी फ़िज़ायें

वो मिल गये, वो खिल गये

और प्यार हो ही गया

जो चाहा था, वो पाया तो

होश खो ही गया

प्यार की ये कहानी…

आता सगळ्या नजरा या तिघांवर टिपल्या होत्या.. नयना मीनलचे मुव्ह बघून आश्चर्यचकित झाली पण मीनललाही उत्तम डान्स करता येत होता.. नयनाचा चांगलाच तिळपापड झाला होता… मीनलला राघवच्या इतक्या जवळ बघून..

परत एका मुव्ह नंतर नयनाने राघवला जॉइन केल.. राघव तर अक्षरशः अडकून पडला होता..त्या दोघींची कॅट फाईट आता खऱ्या अर्थाने सुरू झाली..

 हौले-हौले अब वो दीवाने

गुनगुन गाये दिल के तराने

सुन-सुन झूमें सारी हवायें

धड़कन-धड़कन है बहकी-बहकी

तन-मन तन-मन चाहत है महकी

सपनें अपने जादू चलायें

फिर देखोगे, तो जानोगे

क्या है नशा प्यार का

यही सोचोगे, यही चाहोगे

संग रहेंगे सदा

प्यार की ये कहानी… 

अभयने तर डोक्यावर हात मारला की राघव गेला कामातून.. इतक्यात तिथे लाइट जाते.. राघव त्या संधीचा फायदा घेत नयनाला गालावर किस करतो.. सगळीकडे गोंधळ सुरू असतो पण जनरेटरच्या मदतीने लाइट परत सुरू होते.. लाईट येताच राघव चमकतो कारण त्याच्या बाजूला मीनल उभी असते.. लाईट जेव्हा येते तेव्हा राघवचे ओठ मीनलच्या गालावरच टेकलेले होते आणि नेमक नयनाने पाहील.. राघव पटकन मीनल पासुन दूर झाला..

मीनल : (आनंदाने उड्या मारत) Oh my god.. (आपल्या गुडघ्यावर बसून) राघव I love you… you know Dad ने मला यासाठीच इथे पाठवल होत.. की आपण एकमेकांना पसंत कराव म्हणून.. आणि तु मला आवडलास राघव… आणि अंकल आन्टींना पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे…

नयना : (रागाने जवळ येत) ए hello… राघव माझा आहे.. आणि त्याच माझ्यावरच प्रेम आहे…

मीनल : आहे नाही होत.. 

आणि अस करता करता दोघींचीही भांडण सुरू झाली.. राघव मात्र दोघींकडे बघून सुन्न झाला होता.. ‍ राघव पुरता कात्रीत सापडलेल्या अवस्थेत असतो.. . राघव मीनलला समजावण्याचा प्रयत्न करतो पण मीनलसुद्धा हट्टाला पेटली होती.. शेवटी राघव निर्णय दोघींवर सोपवतो आपसात ठरवा आणि मग मला सांगा.. नयना तर रागाने लालबुंद होते.. आणि तिथून रागातच निघून जाते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सकाळी सगळे नेहमीप्रमाणे कॉलेजला हजर होतात पण आज तिथल वातावरण एकदम वेगळ होत… पोलिसांच्या दोन गाड्या आणि एक ambulance उभी होती.. राघव आणि अभय गर्दीतून वाट काढत पुढे गेले, समोर पाहिलं तर वीरेनची डेड बॉडी पडली होती.. बाजूच्या मुलांची कुजबुज कानावर आली की वीरेनने सुसाइड केल…

समोर प्रिंसिपल सर पोलिसांसोबत बोलत होते..

पोलिस : शव विच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर नक्की काय घडल हे कळेल.. प्रत्यक्षदर्शी असच वाटतय की आत्महत्या आहे  पण त्याच्या चेहऱ्यावरचे वळ काही वेगळच सांगत आहेत..

 

क्रमशः


(वाचकांच्या आग्रहाखातर ही कथा मी परत पोस्ट करत आहे आणि म्हणूनच ही कथा ईरावर repeat होत आहे. शिवाय कथा वाचताना ती अधिक जवळची वाटावी यासाठी काही ठिकाणी मी emojis वापरले आहेत.. पण पेजवर emojis ऐवजी ???? असे प्रश्नार्थक चिन्ह दिसत आहे. तरी थोडं समजून घ्यावं. ईमोजी काढून पोस्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण server down झाल्यामुळे पोस्ट नाही झाले आणि संपूर्ण मेहनत वाया गेली. शेवटी आहे तस डायरी मधून अपलोड केला आहे.. त्यासाठी क्षमस्व.. तरी कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल ????????)