तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार ...

तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार

विषय:- तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार....                              जीवन आहे थोडे जगून बघ नवीन काही करता आले तर करून बघ ....सोन्यासारखे आयुष्य तुझे त्याला थोडेसे वळण देऊन बघ... जसे मातीच्या भांड्याला कुंभार आकार देतो तसे तू पण तुझ्या जीवनाला आकार देऊन बघ ..... कारण तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. || 1 ||                                          मिळेल निराशा कधी... मिळेल अपयश....तर कधी मिळेल यश....एकदा तरी जीवनाची परीक्षा देऊन बघ.... काम करत जा हाक मारत जा .... मिळेल ना एकदा तरी यशाचा आनंद.... कारण तुच आहे रे तुझ्या जीवनाचा शिल्पकार....|| 2 ||                                        आहेत स्वतःमधील क्षमता एकदा तरी आजमावून बघ.... शेवटी प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी थोडी तरी धडपड करावी लागते ना रे... असतील ह्या जगात खूप स्पर्धक ....तू आयुष्याची एक परीक्षा देऊन तर बघ....कारण तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार....|| 3 ||                                                       जसे देव होण्यासाठी दगडाला घाव सोसावे लागतात तसे तुला सुद्धा मोठे होण्यासाठी काही घाव सोसावे लागणारच ना.... फुकट काही मिळत नसत कष्ट केल्याचा आनंद मिळवून तर बघ ...घामाच्या मिळालेल्या १ रुपयाची चव तर घेऊन बघ.... कारण तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार....|| 4 ||                     ©® Adv. श्रद्धा मगर...