Oct 21, 2020
स्पर्धा

तूच तुझा रक्षक

Read Later
तूच तुझा रक्षक

                                                           तूच तुझा रक्षक 

 

"रोज रोज च्या त्रासातून मुक्ती  मिळावी असेच मधुरा ला आज वाटत होते . एकही गोष्ट माझ्या मनासारखी हे लोक करत नाहीत .. जरा सुद्धा कवडी इतका सुद्धा माझा विचार करता नाहीत .. का ? एवढी मी नकोशी का ? मी काय कोणाचा गुन्हा केलाय . माझ्या स्वाभिमानाला ठेच पोचवून यांनी काय मिळते .. मी लहान आहे  याचा अर्थ मी कधीच कोणाला काहीच बोलायचे नाही का ? आणि या उलट लहान आहे म्हणून माझे लाड करायचे राहिले बाजूला तुम्ही लोक माझा कामापुरता उपयोग करून घेता आणि नंतर कागद चुरगळून कचरा पेटिट फेकावा तसा  फेकून देता .. मला पण भावना आहेत .. "

असे अनेक विचार मनात करत करत मधुरा राग- रागात भरा भरा पाऊले टाकीत रस्त्यावर चालत होती .. कुणीकडे जायचंय माहित नाही ? कुठल्या दिशेला जायचंय माहित नाही ? खरं त्याच गावात तिचे अनेक नातेवाईक होते , मित्र मैत्रिणी होते पण आज तिला कोणाकडेच जावेसे वाटेना .. मनातून तिला मी या जगात एकटी आहे आणि माझ्यावर कोणाचं प्रेम नाही .. माझी कोणाला गरज नाहीये .. तरी मी इथे का आहे ? मी इतकी लोचट आहे का ? या लोकांना मी नकोय तराही मी इथे काय करतेय ? का ? असे अनेक प्रश्न आज तिच्या मनात घोंगावत होते .. तिला आत्ताच्या आता आपले हे जीवन इथेच संपवून टाकावे असे वाटत होते .. काय करू मी कशी मरू ? मुद्दामून ट्रक खाली येऊ का ? नदीत उडी मारू का ? रेल्वे च्या रुळावर जाऊन बसते .. सगळ्याच त्रासातून मुक्तता होईल एकदाची .. डोळ्यातून अश्रूंच्या धारा थांबताच नव्हत्या .. मन ... मंनच रडत होते तीचे .. ज्या  लोकांवर मी सर्वात जास्त प्रेम केले त्याच  लोकांनी माझ्या प्रेमाचा असा अपमान केला .. हे तिच्या मनाला सहनच होत नव्हते ..

ज्या लोकांनी तिला त्रास दिलाय त्या लोकांचा राग आणि त्यांचा बदला कसा घ्यावा किंवा स्वतःवर झालेल्या  अन्यायाचा बदला कसा घ्यावा या साठी तिचा आत्मा तळमळत होता ..आणि या त्रासातून मुक्ती मिळाल्या शिवाय ती मोकळा श्वास घेऊ शकत नव्हती .

 तिला असे वाटत होते कि मी ज्या तथाकथित माणसांना माझी माणसे  म्हणते त्यांना न सांगता नुसते माझ्या चेहऱ्याकडे बघून हे कळले पाहिजे कि मी दु:खी आहे .. ते हि होत नव्हते .. उलट तीच माणसे तिच्या वागण्यातला चुका दाखवत आहेत .. याचा तिला आणखी त्रास होयचा  .

तर अशी हि आपली मधुरा तिची मानसिक अवस्था फार नाजूक होती आणि त्याहि पेक्षा स्वतः कडे दुर्लक्ष केल्यामुळे शारीरिक अवस्था पण फार काही चांगली नव्हती .. डोळ्यांभोवती मोठं मोठी काळी  वर्तुळे , डोळे आत खोल गेलेली , चेहऱ्यावर सुद्धा मांस नाही .. गालाची  सुद्धा हाडे दिसत होती .. हे कसले जगणे या जगण्याला रोजचे मरणे म्हणतात.

एक दिवस अचानक तिला तिच्या बेस्ट फ्रेंड देवयानीच्या चा फोन आला .. तिने तिला सांगितले कि ती २ दिवस तिच्या शहरात आलीय .. तर वेळ मिळेल तेव्हा मला येऊन भेट ..

मधुराने तिच्या फॅमिलीला घरीच जेवायला बोलावले पण देवयानी म्हणाली मला तुला भेटायचेय .. घरी आले तर तुझ्याशी छान गप्पा मारता येणार नाही त्यापेक्षा तूच बाहेर भेट निदान थोडा वेळ तरी .. शेवटी मधुरा तिला बाहेर भेटायला तयार झाली .

आज बऱ्याच  दिवसांनी तिने छान स्वतःला आरशात पहिले होते .. आज मैत्रिणी समोर ती “ मी खूप सुखात आहे हा मुखवटा घालून जायचे होते. कसे सगळे माझी काळजी घेतात .. कसे सगळे माझ्यावर जीवापाड प्रेम करतात हे” असे खोटे खोटे बोलायचे होते.. आज बऱ्याच दिवसांनी मधुराने तिच्या आवडीचे कपडे घातले तिला आवडते तशी हेअर स्टाईल केली . थोडा सा  मेक अप केला .. आणि मस्त तयार होऊन बाहेर निघाली ..

 

मधुरा आणि देवयानी लहानपणापासूनच्या संख्या मैत्रिणी.. एकही दिवस त्या एकमेकींना भेटल्या नाहीत असे होत नसे  .. देवयानी आणि मधुरा भेटल्या एकत्र गप्पा मारल्या .. तू काय करतेस , मी काय करतेस .. माझ्या घरी कसे, तुझ्या घरी कसे अश्या नॉर्मल गप्पा मारल्या .. थोड्या वेळा नंतर मधुरा म्हणाली मला आता घरी गेले पाहिजे ..

 

देवयानी पण म्हणाली .. ठीक आहे .. आणि उठली आणि तिला एक घट्ट मिठी मारली आणि म्हणाली

देवयानी " मधुरा .. तू ठीक आहेस ना .. तुझ्या तब्बेतीकडे बघून तू ठीक आहेस असे वाटत नाही .. मला माहितेय तू मला हे सांगू इच्छित नाहीस जर सांगायचे असते तर इतका वेळ तू बोलली असतीस हे नक्की .. मधुरा तू जरा स्वतःकडे बघ .. काळजी घे .... "

मधुरा च्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू  लागल्या .. आज बऱ्याच दिवसांनि मधुरा ची चौकशी कोणीतरी केली होती

मधुरा " हो नक्की ,, जरा हेअल्थ ईशूज आहेत म्हणून तुला असे वाटतंय .. आणि तिला बाय करून निघाली

जाता जाता देवयानी ने मधुरा साठी एक गिफ्ट आणली होती ती दिली आणि मधुरा घरी निघाली

मधुरा घरी आली कपडे बदलून कामाला लागली .. रात्री झोपताना तिने देवयानी ने दिलेले गिफ्ट ओपन केले .. त्या मध्ये एक फोटो अल्बम होता ..देवयानीने त्यांच्या दोघींचे लहान पाणीपासूनचे कॉलेज पर्यंत चे वेगवेगळे फोटोस होते .. मधुरा साठी त्यातला प्रत्येक फोटो खास होता . काही फोटोमध्ये मधुरा हातात ट्रॉफी घेतलेली होती .. प्रत्येक फोटो मध्ये मधुरा कशी टवटवीत दिसत होती .. अ गर्ल विथ अ  अम्बिशन " दिसत होती .. आजची मधुरा आणि फोटोतील मधुरा यात जमीन आसमान चा फरक होता ..

तितक्यात  मोबाइल वर देवयानी चा मेसेज आला होता  .. मॅडम गिफ्ट आवडले का ? नेक्स्ट टाईम मला माझी मधुरा हवीय ..त्या फोटोत जशी आहे ना तशी .. काय कळले का ?

त्या रात्री मधुरा पूर्ण रात्र झोपली नाही ..  तिचे स्वतःचे फोटो आणि फोटोतली मधुरा किती सुखी होती, आनंदी होती . ती ला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे होते , काहीतरी बनायचं होते ... बाकीचे मुले मुली तिचा आदर्श घ्यायचे .. तिच्या कडून मोटिवेशन मिळायचे बाकीच्या मैत्रिणींना .. आज मी अशी का? माझे काय चुकले ?मी का अशी झाले माझ्या बरोबरच्या मैत्रिणी फार पुढे निघून गेल्या मी मात्र स्वतःला बंधने घालून घेतली , माझी स्वतः चे पंख छाटून घेतले .. ते काही नाही

मी बदललेय .. हि जी मी आहे ती मी नाहीच आहे .. मला माझ्या स्वतःच्या मूळ स्वरूपात यायला पाहिजे .. तिच्या मनाने आज  बंड पुकारला होता " उठ, तू हरू नकोस .. तुझे अस्तित्व तू निर्माण कर ..दुसरा कोणीतरी तू कोण आहेस , काय आहेस हे ठरवू शकत नाही .. तू कोण आहेस हे तुच ठरवआणि जगाला दाखवून दे मी हि आहे .. जगासाठी नाही स्वतःसाठी तरी उभी रहा .. स्वतःला स्वतः चा अभिमान वाटलं पाहिजे .. स्वतःवर प्रेम करायला पाहिजे .. आनंदी राहण्याचा हक्क मला हि आहे ..

 

दुसऱ्या दिवशी जी मधुरा उठली ती वेगळीच मधुरा होती ..

सकाळी उठून ती चक्क बाहेर वॉकिंग ला गेली .. चांगली अर्धा तास तिने मॉर्निंग वॉक घेतला .. मग घरातील सर्व जवाबदाऱ्या पार पडून ११ वाजे पर्यंत कामे उरकली .. जेवण करून ठेवले आणि चक्क ११ वाजता घरातून बाहेर पडायचे ठरवले तिने .. ज्याला भूक लागेल त्याने वाढून घ्या .. असे सांगून .. हेच काम करायाला तिला दुपारचे  ३ वाजायचे. कोणी आले कि त्याला जेवायला वाढ .. त्याला/तिला काय हवे नको ते विचार ..

तिने आता स्वतः साठी चे रुल्स बनवले .. १२ वाजता जेवायला आलात तर मी वाढायला असेल नाहीतर तुमच्या वेळेनुर तुम्ही केव्हाही खाऊ शकता ..

बाकीची कामे जी कि बाकीचे लोक सहज करू शकता त ते त्यांना करायला सांगितली जसे कि .. बूट पोलिश , आपले कपडे आपण रात्री काढून ठेवणे ,, पाण्याच्या बाटल्या भरणे .. अशी छोटी कामे वाटून दिली .. त्यामुळॆ तिच्या वरचा कामाचा लोड कमी झाला .. नको ती  फालतू कामे दुसऱ्याची आपण करून आपण स्वतःचे तर नुकसान करतोच पण दुसऱ्याचे पण नुकसान करतअसतो .. समोरच्या व्यक्ती ला परावलंबी बनवत असतो . शिवाय हे काम इतके नगण्य असते कि त्या व्यक्तीला त्याची किंमत पण राहत नाही . आपण केलेल्या कामाची जर समोरच्याला किंमत नसेल तर तुम्ही केलेल्या कामाचा काय उपयोग ?मग तो व्यक्ती लहान अ सो व मोठी .. काही प्रमाणात  त्यांची कामे त्यांनीच   केलीच पाहिजेत .

याचा फायदा असा आला कि तिला थोडा रिकामा वेळ मिळू लागला . तो वेळ ती स्वतःसाठी काढू शकली .. छोट्या छोट्या आवडी निवडी जपू लागली .. बुक्स वाचणे , गाणी ऐकणे .. ह्या अश्या सध्या गोष्टीन साठी सुद्धा तिला वेळ मिळत नव्हता .. तो वेळ आता तिला मिळू लागला .. तिला मैत्रिणींना कॉल करायला वेळ मिळू लागला ..

रोज संध्याकाळी अर्धा तास तरी बाहेर पडायचेच .. असाही नित्य नियम तिने केला .. त्यामुळे आपोआपच बाहेर जायचे म्हणून स्वतःला आवरणे .. चांगले कपडे घातले .. त्यामुळे मनाला पण छान वाटू लागले .. हळू हळू तिचे छान रुटीन बस वले ..सुरुवातीला घरातील मंडळींनी मान्य केले नाही पण तिने आता ठरवले होते .. सॉरी वाईट वाटले तरी चालेल ..अशा वागण्याने मला बरे वाटतंय ना हे महत्वाचे .. तसेहि तुमच्या लेखी मी काही कामाची नाहीये .. तर मी असले काय नसले काय तुम्हाला काही फरक पडला नाही पाहिजे .. आणि पडत असेल तर मान्य करा कि मी जे प्रेमापोटी करत होते त्या चा अपमान तुम्ही  केलाय त्या बद्दल आधी माफी मागा .

 

तिच्या संपर्कात असलेल्या घरातील आणि घरातल्या बाहेच्या लोकांना तिच्यातला बदल सगळ्यांना जाणवला होता .. हल्ली ती काहीपण कोणीही बोलले तर ऐकून घेत नव्हती ..येत जात कोणीही आपल्याला टपली मारून जात होते हे तिला आधी कळत होते तरीही ती मान खाली घालून सहन करायची कारण मी जर बोलले तर ते उलट बोलले असे होईल या भीतीने ती गप्प राहायची .. तिला वाटायचे कि हे पण सहन केले तर आज ना उद्या माझ्या चांगली वागण्याची किंमत ह्या लोकांना कळेल .. हे जे ती ऐकून घ्यायची हा ती स्वतःवर अन्याय करत होती आणि तिचा सतत होणार अपमान गिळून ती तिच्या मनाला दुखावत  होती .

स्वाभिमान आणि अभिमान यात फरक असतो .आपला स्वाभिमान जर आपण जपला नाही तर आत्मविश्वास पण निघून जातो .. हे एक दुष्ट चक्र आहे .. माणसाने अभिमान येऊ नाही द्यायचा पण स्वाभिमान जर जपालाच पाहिजे .. मनाला ताठ उभी राहायला तोच मदत करत असतो .. मधुरा चा स्वाभीमान  आता जागृत झाला होता. तिने सर्वांना सांगून टाकले " गिव्ह रेस्पक्ट अँड टेक रिस्पेक्ट " तुम्ही माझ्याशी नीट वागला तरच मी तुमच्याशी नीट वागेल .. या सगळ्या तिच्या आजूबाजूच्या लोकांना, नातेवाईक  यांना तिला गर्व आलाय .. तीला माज आलाय , ती उद्धट झालीय अशी दूषणे देऊ लागले .. हे ऐकून तिला त्रास होयचा .. पण तिने काय केले तिने तिचे कान बंद केले .. तुम्ही जे बोलाल ते तुमच्याकडेच ठेवा ..

 

समोरच्याला जेव्हा कळते ना कि ह्या व्यक्तीला मी  बोलण्याने काहीही फरक पडत नाही तेव्हा हळू हळू तेही तुमच्या वाटेल जायचे थांबतात .

 

मनातून तिला एकटे आधीच वाटत होते .. नाती जपण्यासाठी ती समोरच्या चे फालतू बोलणे , टोमणे ऐकून घेत होती ... तरीही तिची किंमत केली गेली नव्हती मग त्याच लोकांसाठी नाती तुटायची भीती आता तिची गेली होती .. एकटी तर एकटी पण मी ताठ मानेन जगणार हे आता तीन पक्के ठरवले होते . ज्या लोकांना माझी गरज नाही त्या लोकांची मला पण गरज नाहीये हे तिने आधी मनातून ठरवले ..

 

तिने तिचे रुटीन छान चालू ठेवले .. स्वतःकडे लक्ष देऊ लागली , व्यायाम करू लागली , योग क्लास करू लागली , पार्लर ला जाऊ लागली ,छान पुस्तके वाचू लागली .. ज्या अत्याधुनिक गोष्टी कळत नाहीत त्याचा अभ्यास करू कलागली .. इंटरनेट , बँकिंग  ,वर  वावरू लागली , हळू हळू तिच्या डोळ्याखालची काली वर्तुळे कमी होऊ लागली .. व्यायाम केल्यामुळे भूख लागू लागली ... छान पुस्तके वाचल्या मुळे मनात पण चांगले विचार येऊ लागले .. म्हणतात ना empty mind is devils home तसेच नुसतेच रिकामे राहिल्यामुळे मनात निगेटिव्ह विचार यायचे आता तिला रिकामे बसायला वेळच नव्हता .. वेळ मिळाला कि गाणी ऐक , किंवा पुस्तके वाच त्यामुळे मनात फालतू विचारांना थारा नव्हता ..

 

चांगल्या विचारामुळे मेंदूला पण चालना मिळाली.. तिला आता एखादा जॉब करावा किंवा स्वतःच्या पायावर उभे राहावे असे वाटू लागले .. जेव्हा ती घरातून बाहेर पडणार म्हटल्यावर घरातल्यांची धाबे दानानंले .. २४ तास आपल्या भोवती वावरणारा रामा गडी घरातुन बाहेर पडणार हे कळल्यावर सर्वांना जरा भीती वाटली .. आपल्याला पैशांची काय कमी आहे ? तुला काय पडतंय तर तू जॉब ला जाणार आहेस ? तिने सांगितले पैशासाठी पण स्वतःसाठी मला जॉब ला जायचाय .. जे काम मी घरात थांबून करते ते काम एक बाई घरात ठेवली तर ती करेल .. बिचारी तिला पण चार पैसे मिळतील .. आणि मी जरा मोकळी होईन .. काय सारखे तुमच्या सर्वांच्या वेळा पळत बसायचे .. बाई सकाळी जेवण करून जाईल ..घर आवरून जाईल .. तसेही मी जे करते ते काही महत्वाचे काम नाहीये असेच तुम्हा सगळ्यांना वाटते .. मग ते काम एखादि बाई लावली तर आनंदात करेल .. मी घरी रिकामी बसायचे तर मला जॉब पण मिळेल .. समोरच एक शाळा आहे तिकडे ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट मध्ये vacancy आहे .. पगार पण चांगला देणार आहेत ..

माझा निर्णय झालाय .. मी या महिन्याच्या एक तारखेपासून मी जॉब ला जाणार आहे ..

जेव्हा एक स्त्री बंड पुकारते तोही स्वतःच्या आत्मसन्मासाठी   तेव्हा तिच्या पुढे कोणीही काहीही करू शकत नाही आणि मधुराने जॉब सुरु केला ..

पहिल्या पगारात तिने घरातल्यांना हॉटेल मध्ये पार्टी दिली .. आणि मोठया स्वाभिमानाने हॉटेल चे बिल पे केले . काय तो आनंद होता हे बिल देताना .. उंच आकाशात उडी मारावी असेच तिला वाटत होते .. आज मै उपर असमान नीचे असाच तोही क्षण होता ..

 

हळू हळू घरातले , माहेरचे , सासरचे , लहान, मोठे , शेजारचे , ऑफिस मधले सर्वच जण मधुराला रिस्पेक्ट देऊ लागले .. आणि मॅडम ची तब्बेत पण सुधारली .

म्हणून तर म्हटले आहे “तूच आहेस तुझ्या जीवनाचा  शिल्पकार ”.. एक वेळ अशी येते  कि आपली मदत हि आपणच करायची असते .. हि मधुरा तुमच्या माझ्यात , लहान मोठ्यात किंवा पुरुषांमध्ये सुद्धा असते ..नैराश्य हे कोणाला हि येऊ शकते .. त्यातून बाहेर येण्यासाठी स्वतः लाच  प्रयन्त करावे लागतात .. मधुराला तिच्या मैत्रिणी ने तिचेच जुने फोटो दाखवले आणि त्याच जुन्या फोटो मधून तिला इन्स्पिरेशन मिळाले .. भूतकाळातील मधुराने वर्तमानातल्या मधुराला भविष्यकाळ सुधारण्यासाठी मदत केली होती .

स्वतः भोवती आपणच एक रिंगण घालून घेतो आणि त्या रिंगणातून बाहेर पडत येत नाही .. आणि मग तेच रिंगण आपल्या साठी चक्रव्यूह बनते . त्या तुन जर वेळेत बाहेर पडता आले नाही तर मानसिक त्रास  आणि त्यातून येणारे नैराश्य हे जीव घेणा आजरच आहे .

मधुरा एक स्वतंत्र विचारांची आणि स्वाभिमान जपणारी एक स्त्री बनायला तयार झाली .. माणूस मरे पर्यंत शिकत असतो .. चुका झाल्या तर झाले गेले सोडून द्या उद्याचा दिवस हा नवा आहे आणि नवा दिवस नवा विचार घेऊन येतो ...

. "तूच आहेस तुझा रक्षक" .. मनातील येणाऱ्या वाईट विचारांवर विजय मिळवता आला पाहिजे .. वेळ अली तर नामःस्मरण करा .. दासबोधात सांगितले आहे कि मनातल्या विचारांवर विजय मिळवण्यासाठी देवाचे नामःस्मरण करा ..सगळे वाईट विचार पळून जातील.

आपले मन हे लहान मुलासारखे असते त्याला नेहमी कशात तरी गुंतवून ठेवावे लागते .. तसे नाही केले तर जी पोकळी निर्माण होते त्या पोकळीत राग ,द्वेष , मत्सर अशा निगेटिव्ह  विचारांना थारा मिळत जातो .. तेच जर मन खळखळत्या झऱ्या सारखे ठेवले तर घाण पाणी साचून च नाही दिले तर विचार पण फ्रेश येतात .माणूस स्वतः वर प्रेम करू लागतो कारण त्याला कळते माझ्यामध्ये पण चांगल्या qualities आहेत .. नाही कोणाला दिसल्या तरी माझ्या मला माहित आहेत त्याने  मनाला उभारी येते.

आज मधुराला हे नक्कीच कळले होते कि कितीही झाले तरी माझे जगणे हे इतके फालतू नक्कीच नाहीये कि दुसऱ्या ने मला त्रास दिला म्हणून मी संपवून टाकावे . ते कसे जगावे हा माझा आणि फक्त माझाच निर्णय असला पाहिजे .. रडत जगायचे कि हसत .. जर हसत जगायचे असेल तर मनाला आनंद वाटेल असेच काम करेन आणि माझ्या मनाने ते काम मी केलय तर त्याचे जे काही बरे वाईट परिणाम होतील ते नक्कीच मीच सहन करेन तेही आनंदाने  . रडत कुढत आयुष्य जगण्यापेक्षा  चांगलं आयुष्य जगण्याकरता आपल्या या अवस्थेला आपणच जवाबदार असतो .. प्रत्येक जण ज्याला जे पटेल तेच वागत असतो .. दुसऱ्याला दोष न देता आपणच प्रयत्न “केल्याने होतं आहे रे आधी केलेच पाहिजे..” हे नक्कीच मधुराला समजले होते.