तूच तुझा भाग्यविधाता

We are the architect Of Our life
कवितेचे शीर्षक :- तूच तुझा भाग्यविधाता
कवितेचा विषय :-मीच माझा शिल्पकार
उपविषय :- राज्यस्तरीय कविता स्पर्धा फेरी 2
टीम :-अमरावती



लढवय्याची जात ही माझी
माणूस म्हणती मला
डोंगर कोरू,सागर लांघू
भिती मुळी ना मला
क्षणांत होईल आनंदाने
वा-यावरती स्वार
अवतीभवती सुखे पेरतो
मीच माझा शिल्पकार....


टक्कर असते अटीतटीची
फिकीर नाहीच मला
शौर्य,धैर्य अन् विश्वासाची
शस्त्रे सोबती मला
वाजेल घंटा विजयाची ती
गगनाच्याही पार
निर्धाराचा पुतळा होतो
मीच माझा शिल्पकार.....

कधी लेखणी,कधी समशेरी
मोहवत असती मला
धरा रक्षण्या बांधिल मीही
भान सदैवच मला
जात,धर्म,भाषा ऐशा
भेदावर करतो वार
माणुसकीची मशाल होतो
मीच माझा शिल्पकार...


©®रोशनी निलेश कडू,
टीम - अमरावती