आपण मागील भागात पाहिले की, रमा खूप दमलेली होती.. ऑफिसची सगळी काम करून तिला खूप त्रास होत होता आणि इतकं सगळं करून वर टोमणे ऐकावे लागत होते.. आता पुढे..
रमाचा नवरा रोहन रमासाठी ताट घेऊन येतो.. ते बघून रमा तोंड फिरवते.. तेव्हा रोहन, "का झोपलीस?? खाऊन घे बघू.."
"आत्ता आठवण आली का तुला बायकोची?? किती उशीर झाला मला त्रास होत आहे ते तुला जाणवलेच नाही का?? इतकं सगळं मी करते.. त्याचं कुणालाच काही नाही.. वर सासुबाईंचे टोमणे ऐकावे लागतात.." रमा
"अगं तू घरासाठी किती करतेस सगळं माहिती आहे आम्हाला.. असं का म्हणतेस बरं??" रोहन
"मग मी ऑफिसला जाऊ नये असं सासूबाईंना का वाटावं??" रमा
"तसं काही नाही ग.. तुझी काळजी वाटते तिला.. तुझी दगदग जाणवते तिला आणि तू तिच्या सोबतीला असावेस असं तिला वाटत असेल.. घरात बिचारी एकटी कंटाळत असेल.." रोहन
"तसं काही असेल तर आधी सांगायचं ना मग.. आणि मी काय घरात बसू?? इतकी शिकलेली आहे जॉब करायचाच नाही का?? काय आहे तुझा विचार आणि मी काय करायचं??" रमा
"अगं दिवसभर ती एकटीच असते आणि आपला पार्थ असतो.. त्याच्या मागे फिरता-फिरता तिची नाकीनऊ होते.. तिचं वय होत आलेल आहे.. दिवसभर बसून बसून तिची कंबर आखडते आणि रात्री झोप लागत नाही.. त्यामुळे तिलाही त्रास होतोच ना.. आपण या वयात तिचाही विचार करायला हवा ना थोडा.." रोहन
"म्हणजे मी नोकरी सोडायची का??" रमा
"मी कुठं सोड म्हणतोय?? आपण यातून काहीतरी मार्ग काढू या इतकच म्हणत आहे मी.." रोहन
"कसा काढणार मार्ग??" रमा
"आपण ऑफिसची वेळ बदलूया.. तू सकाळची शिफ्ट घे.. मी दुपारची घेतो.. दोघेही घरामध्ये वेळ देऊया म्हणजे सगळ्यांना सोयीस्कर पडेल.." रोहन
"बर चालेल मी आठ ते दोन पर्यंतची शिफ्ट घेते.." रमा
"मग मी 12 ते 7 पर्यंत घेतो म्हणजे दोघांनाही बरं पडेल.. शिवाय आईला थोडा आराम करता येईल.. तुला ही दुपारचा थोडा आराम मिळेल.. चिडचिड होणार नाही.." रोहन
"हो मी थोडं लवकर उठून स्वयंपाक वगैरे करून जाईन उरलेली काम मी आल्यावर करीन.. ते बरं पडेल.." रमा
"मला करण्यासारखी असतील ती कामे मी करेन.. म्हणजे तुला जास्त लोड होणार नाही.. संसार दोघांचा आहे दोघांनीही करायला हवा.." रोहन
यानुसार दोघेही आपापल्या शिफ्ट नुसार ऑफिसला जाऊ लागले.. आता सगळ्यांची सोय होऊ लागली.. कुणाची चिडचिड होईना.. रमा सुद्धा सकाळी गेली की दुपारी आल्यावर तिला थोडी विश्रांती मिळत होती आणि नंतर वेळ संध्याकाळची कामे चालू करत होती.. थोडे जास्तीचे कामही करायला मिळत होते.. त्यामुळे ती सुद्धा आनंदी होती..
रमा घरात असल्यामुळे सासूबाईंची थोडी चिडचिड कमी झाली.. आणि त्यांना सुद्धा दुपारी थोडी विश्रांती मिळू लागली.. त्या सुद्धा आता थोड्याफार मदत करू लागल्या.. भाजी निवडणे अशी थोडी फार काम करू लागल्या.. रमाच्या सासुबाईंना गुडघेदुखीचा त्रास होता.. त्यामुळे त्यांना फार काही करायला जमत नव्हते आणि दिवसभर मुलाच्या मागे लागून त्याही थोड्या कंटाळल्या होत्या.. त्यांची चिडचिड होत होती.. पण आता त्यांची चिडचिड थोडी कमी झाली..
आज लक्ष्मीपूजन.. रमाने लक्ष्मीची छान पूजा केली आणि आरतीसाठी सासूबाईंना बोलावले.. सासूबाईंनी रमाने केलेली पूजा बघून त्यांना खूप आनंद झाला आणि त्या म्हणाल्या, "आज खऱ्या अर्थाने माझ्या घरी लक्ष्मी आली, तूच माझी खरी लक्ष्मी आहेस.. संसार आणि काम मेहनतीने सगळं निभावून घेतेस.."
तडजोड केल्याने नात्यात ओलावा निर्माण होतो.. मग सगळे सोपे होते.. आयुष्य एक तडजोड आहे.. सुखी राहण्यासाठी गरजेचे आहे.. आयुष्य खूप सुंदर आहे.. फक्त जगता यायला हवं..
धन्यवाद..
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..
पोस्ट करायला थोडा उशीर झाल्यामुळे क्षमस्व..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा