Oct 30, 2020
स्पर्धा

तूच दुर्गा तू भवानी

Read Later
तूच दुर्गा तू भवानी

मनू म्हणजेच मनस्वी आई-बाबांची एकुलती एक मुलगी होती. एकदा ती शाळेला जात असताना तिच्या शेजारी राहणारी तिची आशु ताई दिसली. त्या ताई वर काही टवाळक्या मुलांनी ऍसिडचा हल्ला केला होता. ती ताई तडफडत होती. मनू तर पूर्णपणे घाबरून गेली. तिथे बघ्यांची गर्दी भरपूर होती, पण कोणीही त्या ताईला दवाखान्यात घेऊन गेले नाही. मनू रडतच घरी आली. तिच्या बाबांनी तिला रडण्याचे कारण विचारले. तिने स्टॅन्ड वर घडलेली सगळी हकीकत बाबांना सांगितली. अशी ही आशु ताई एकदा कॉलेजला जात असताना काही टवाळक्या मुलांनी तिची छेड काढली होती. तिने त्याला प्रत्युत्तर दिले होते. त्याचाच बदला म्हणून त्यांनी तिच्यावर हल्ला केला होता. ताईला एका सज्जन माणसाने दवाखान्यात नेले. दवाखान्यात तिच्यावर उपचार झाले आणि ती घरी आली. घरी आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर गुंडाळलेली पट्टी काढण्यात आली आणि पट्टी काढल्यानंतर आरशात बघून आशु ताई रडू लागली. मनूला खूप वाईट वाटले म्हणून मनूसुद्धा खूप रडू लागली. तिच्या बाबांनी तिची खूप समजूत घातली. तरीही मनूला खूप रडू येत होते. तेव्हा पासून ती शाळेला जाईना, घराबाहेर जाईना. तिच्या मनात खूप भीती होती. मग तिच्या बाबांनी ते सर्व ओळखून तिला डान्स क्लासला किंवा गाण्याच्या क्लासला न घालता कराटे क्लासला घातले. मनू आता पूर्णपणे सक्षम झाली होती. जर का एखाद्या मुलाने मुलीची छेड काढले किंवा तिचे नाव काढले तर तिला खूप त्रास होई आणि ती त्या मुलांशी लढायला जाई. एकदा मनू शाळेला जाताना त्या टवाळक्या मुलांनी दुसऱ्या मुलीची छेड काढत असताना तिने पहिले. त्या मुलीनेही प्रत्युत्तर दिले पण ती मुले तिला काही ऐकेनात. तिच्यावर अॅसिडचा हल्ला करणार.. इतक्यात मनू तेथे गेली आणि ती अॅसिडची बाटली आपल्या पायाने भिरकावून त्याच मुलाच्या हातावर पडली. तो मुलगा वेदनेने तडफडू लागला. मनू म्हणाली, “एखाद्या मुलीला मुलीवर ॲसिड हल्ला करताना तिला किती वेदना होतात याची जाणीव झाली का?” तुमच्या आजूबाजूला अशा कितीतरी आशूसारख्या मुली आहेत ज्यांच्यावर ॲसिड हल्ला झाला आहे तर अशा मुलींसाठी लढले पाहिजे. मनू सारख्या मुलींना टिपिकल गाणे डान्स वगैरे न शिकवता सक्षमतेचे धडे शिकवायला पाहिजेत. मुलींना कणखर बनवले पाहिजे आणि मुलांनाही शिकवले पाहिजे की महिला दिन हा एक दिवसापुरता नसून कायमच महिलांचा आदर केला पाहिजे.
मुलगी जशी घरची लक्ष्मी आहे तशीच ती कधीकधी दुर्गा आणि भवानी सुध्दा होऊ शकते. त्यामुळे स्त्रीचा आदर करा. तिला सन्मान द्या.
नवरात्रीमध्ये देवीची पूजा आराधना करण्यामागे हाच उद्देश असतो की स्त्रीचा आदर करा. किंवा स्त्रीने कठीण प्रसंगात दुर्गा बनून नराधमांना चांगलाच धडा शिकवायला हवा.
स्त्री तुला कठीण प्रसंगांना सामोरे जायला हवे. अशी मुळूमुळू करून रडत बसण्यात काहीच अर्थ नाही. तू आदीशक्ती आहेस. तू लढू शकतेस. वेळ पडल्यास तूच दुर्गा आणि तूच भवानी हो आणि नराधमांचा संहार कर.

©®प्रियांका अभिनंदन पाटील.


Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मी काही प्रोफ़ेशनल लेखिका नाही.. मनात जे काही येतं ते लिहिते..