Jan 26, 2022
नारीवादी

तू याद रख

Read Later
तू याद रख

तू याद रख

 

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:


यत्रैतास्तु पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:

जिथे नारीची म्हणजेच स्त्रीची पूजा केली जाते तिथे देव रमतात .. किंवा राहतात

आणि या उलट जिथे नारीची पूजा होत नाही तिथल्या  कोणत्याही कामाचे फळ मिळत नाही .. पुराणा  पासून घरातल्या स्त्री ला लक्ष्मी चे रूप मानले आहे .

जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती जगाला उद्धारी।

छत्रपती शिवाजी राजांना घडवणारी पण एक स्त्रीच होती .. प्रभू श्री रामाला जन्म देणारी हि स्त्रीच होती .. प्रत्यक्ष भगवंताचे अवतार सुद्धा स्त्री च्या उदरातून  जन्म घेऊन बाहेर यावे लागले . आज अनेक महत्पुरुष होऊन गेले आणि  अनेक अजून जन्माला येतीलही. पण त्यांना घडवणारी आणि जन्म देणारी एक स्त्रीच असते. मातृत्व हे  स्त्री ला मिळालेलं वरदान आहे ... त्यामुळे तिच्या अस्तित्वाला अनन्य साधारण महत्व आहे ..

काळ कितीही बदलला तरी स्त्रीचा आदर हा झालाच पाहिजे .. प्रत्येकाने तो केलाच पाहिजे . आपल्या घरातील लहान मुलांना सुद्धा समाजात वावरताना स्त्रियांची कसे वागावे याचे धडे आणि संस्कार लहानपणा पासूनच रुजवले पाहिजेत .

जगत जननी.. उद्धारकरणी अश्या  अनेक नावाने स्त्री चे  पुराणात वर्णन केलेले दिसते . अनेक संतांनी त्यांच्या अभांगातून स्त्रियांविषयी लिहले आहे .. त्या काळीसुद्धा त्यांच्या कीर्तनातून ते असे अभंग बोलत असत ...

छत्रपती शिवजी महाराजांची पर स्त्री माता हि शिकवण होती .

हे सर्व आपल्या सर्वांना माहित आहेच पण तरीही समाजात स्त्रियांवर अत्याचार होताना दिसतात . अन्याय होताना दिसतो, समान वागणूक दिली जात नाही.. हे सगळे लक्षात घेता स्त्री काळाच्या ओघात मागे पडत गेली .  एक प्रकारे स्त्रियांच्या सबलीकरणाकरता .. महिलांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी, स्त्रियांच्या अधिकाराकरता स्त्रियांनाच आवाज उठवायला लागला आणि तो दिवस होता ८ मार्च .. म्हणूनच हा दिवस जागतिक महिना दिन म्हणौन साजरा केला जातो .

सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक , मानसिक अशा अनेक स्थरावर साथ देणे , हाथ देणे तिचे निर्णय तिने घेण्याचे  स्वातंत्र मिळवून देण्यासाठी  प्रयत्न होऊ लागले . मग वूमन एम्पॉवरमेंट . जेण्डर इक्वॅलिटी , असे शब्द बाहेर पडू लागले . जॉब च्या ठिकाणी ५० टक्के आरक्षण देण्यात येऊ लागले .आता स्त्री ने प्रत्येक क्षेत्रात तिचे पाऊल टाकले आहे .. आणि तिचा ठसा उमटवला आहे . मिळालेल्या संधीचे सोने स्त्रिया आज करत आहेत आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत . ते हि सांसारिक जवाबदाऱ्या .. पालकत्व ,, ममता .. या सगळ्या गोष्टी सांभाळून ती काम करते ..

खऱ्या अर्थाने स्त्री सक्षम झाली आहे . नवीन आव्हाने पेलायला ती तयार झालेली आहे .. एक स्त्री .. एक आई , एक बहीण , एक मुलगी , एक सून , एक मैत्रीण आणि एक बायको अश्या अनेक रूपात आपल्या अवती भोवती वावरत असते .   

तिची लढाई हि तुमच्याशी नसून तिचे स्वतःचे  अस्तित्व निर्माण कारण्यासाठी असते . एकदा नक्की तिचे काय म्हणणे आहे हे ऐकून तर घ्या .. एकदा तिच्या पंखांना बळ देऊन तर बघा .. एकदा तिने उघड्या  ड़ोळ्यांनी बघितलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी हातपाय मारायची संधी तरी द्या .. आणि मग बघा तुमच्या सगळ्या  अपेक्षा पूर्ण करून ती कशी उंच गगनभरारी घेईल .. मग तुमचाच उर भरून येईल . नजर नका नजरिया बदला .. फरक तुमचाच तुम्हाला जाणवेल .

आणि एक आज जागतिक महिला दिन आहे म्हणून त्याचे औचित्य साधून मी लिहत आहे हे जरी खरे असले तरी हा बदललेला नज्ररिया कायम असुद्या . नुसता एका दिवस पुरता उत्सव साजरा  करून काहीही उपयोग नाही .

मानसिक , शारीरक कोणत्याही प्रकारचा  तिच्या वर होणारा अत्याचार हा थांबलाच पाहिजे .. कायद्याने त्यांना शिक्षा होईल तेव्हा होईल पण आपण समाजात वावरत असताना आपल्या आई बहिणीवर असा अत्याचार होतच कसा ? यावर थोडा विचार  केला पाहिजे..

स्त्रियांना पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटते .. कुठं पर्यंत सहन करायचे याला पण काही एक मर्यादा आहे कि नाही ?.. अन्याय करू नका आणि अन्याय सहन पण करू नका .. योग्य वेळी योग्य ते पाऊल उचलले पाहिजे .

स्त्री च्या अस्तित्वाला गर्भातच धोका आहे हि अत्यन्त खेदजनक बाब आहे .त्या चिमुकल्या जीवाचा काय दोष आहे ?  हा सगळा विचार आपल्या पारंपरिक विचार सरणींवर विचार कारण्यासाखा आहे .. मुलगी झाली म्हणजे तिचे लग्न लावून दिले पाहिजे .. तिला  दाग  दागिने दिले पाहिजेत .. हुंडा दिला पाहिजे .. किंवा माता पित्याला जर स्वर्गात स्थान मिळवायचे असेल तर मुलाच्या हातूनच अंतिम संस्कार केला पाहिजे अशा रूढी आणि असे विचार तिला गर्भातच संपवण्याच्या विचाराला एक प्रकारे  दुजोरा देत असतात . तेव्हा बदल हा ह्या असल्या विचारांमध्ये झाला पाहिजे ..

स्त्री -पुरुष समानता हा साधा विचार एकदम मनात रुळला पाहिजे .

बाहेरच्या देशात काही ठिकाणी हे नक्कीच पाहायला मिळते . बाहेरच्या देशात रात्री टोल नाक्यावर च्या काउंटर वर स्त्री बसलेली मी पहिली आहे . मोठे ट्रक , मोठ्या बस .. चालवताना पण स्त्रिया दिसतात .. आपल्याकडे हे दृश्य कधी दिसेल ? स्त्रीने कोणते काम करायचे हा तिचा निर्णय असेल पण रात्री टोल  नाक्यावर एकटी स्त्री आरामात बसेल इतकी सेफ्टी आज आपल्या देशांत आहे का ? आणि नाहीये तर का नाहीये ?

असो मुद्दे खूप आहेत .. आपण सर्व सामान्य  लोक काय करू शकतो तर इतकेच करू शकतो .. आपल्या आजू बाजूला असलेल्या महिलेला ताठ मानेने जगायला मदत तर नक्कीच करू शकतो .. तीचा  आदर तर नक्कीच करू  शकतो .. एक पाऊल टाकत टाकतच बाळ पुढे झपाझप मोठी पाऊले टाकायला लागते आणि मग कधी धावतो त्याचे त्याला कळत नाही .. ...

जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

तू याद रख

ए नारी तू रुक मत

ए नारी तू थक मत

तू हि शक्ती , तू हि भक्ती

ए नारी तू याद रख

 

भरले उडान , चढ ले चट्टान

अपने पंख , तू  काट मत

 ए नारी तू डर मत

पैरो में बंधन , बांध मत

 

ए नारी तू रुक मत

ए नारी तू थक मत

 

नया  सवेरा  , नयी  मंजिले

जिले 'तेरी हजार ख्वाहिशें

जो करना  है ठान  ले

तू भी कम नही , ये जान ले

 

ए नारी तू रुक मत

ए नारी तू थक मत

 

 देख खुली आँखोंसे सपने

साथ देंगे तेरे अपने

एक कदम विश्वाससे , तू आगे बढ

कर तेरे हौसले बुलंद

 

 ए नारी तू रुक मत

ए नारी तू थक मत

तू हि शक्ती , तू हि भक्ती

ए नारी तू याद रख

समाप्त!!

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now