Jan 29, 2022
नारीवादी

तू विधवा आहेस

Read Later
तू विधवा आहेस

"अगं तू इतकी का आवरली आहेस.. तुला हे शोभत का? जा बघू साधं आवरून ये जा.."

"अग तू इतकी डार्क साडी का नेसली आहेस? तुला कोण बघणार आहे? साधी साडी नेसून ये जा बघू.."

"असे पुरुषांशी बोललेलं तुला शोभतं का? जरा मर्यादित राहायला शिक.."

"हिरवी साडी तू का नेसली आहेस? सुहासीनी बाईने नेसायची असते.. तू हिरवी साडी नेसत जाऊ नकोस.."

असे एक ना अनेक बोल तिला कायम ऐकायला लागत असे.. त्यामुळे तिला याची सवयच झाली होती.. ती प्रत्येक गोष्टीत कोणी काही बोलेल का? कोणी काही म्हणेल का? याचाच विचार करत होती आणि स्वतःसाठी जगायचे तिचे राहूनच गेले..

सुमन अगदी तारुण्यातच तिच्यावर वैधव्य आले होते.. तिचा नवरा एका एक्सीडेंट मध्ये तिला सोडून गेला होता.. तिला एक लहान मुलगी होती आणि ते एकत्र कुटुंबात राहत होती.. कुठेही चालले काहीही केले तरी असे बोल ऐकायला मिळत होते..

आता सुमनची मुलगी मोठी झाली होती.. पण सुमनला ते बोल कायम तिच्या कानात घुमत होते.. एक दिवस तिची मुलगी ऑफिसमधून घरी आली ती तणतणच आली.. तशी ती नवीनच जॉईन झाली होती..

" काय झालं बाळा तुला.." सुमन

"आई बघ ना.. ती कसले कपडे घालून येते.. जीन्स काय? ड्रेस काय? टी-शर्ट काय?" सुमनची मुलगी

"अग त्यात काय एवढे.. तू पण घालतीसच ना.." सुमन

"अगं पण मी मुलगी आहे.. आणि ती एक विधवा बाई आहे.. पण ती नीट कपडे घालायचे.." सुमनची मुलगी

"नीट म्हणजे कसले ग??" सुमन

"साडी किंवा पंजाबी ड्रेस.." सुमनची मुलगी

"का? ती एक विधवा आहे म्हणून.. तिला कोणताही अधिकार नाही का? ती तिच्या मनाप्रमाणे जगू शकत नाही का? तिचा नवरा गेला हे दुःख उराशी असतं तिच्या.. पण यातून तुम्ही समाज सगळे काहीबाही बोलून आणखीनच दुःख, त्रास देत असता.. तिने असले कपडे घालते तर बिघडले कुठे?" सुमन

"अगं आई, पण तू कशी असतेस? आणि ती कशी आहे? तू असतीस ना व्यवस्थित.. साडी नेसलेली असतीस, खांद्यावर पदर असतो.. मग तिला पण असे राहायला नको का?" सुमनची मुलगी

"मी समाजाला घाबरून राहिले.. आपल्या घरात असले चालत नव्हते.. मनाविरुद्ध जगायला शिकले.. तुमच्या सर्वांसाठी.. पण काय उपयोग? मन मारून जगण्यात काहीच उपयोग नाही.. प्रत्येकाला मनाप्रमाणे जगायला यायला हवं.." सुमन

"काय? म्हणजे तू इतकी वर्षे तुझ्या मनाविरुद्ध राहात होतीस.." सुमनची मुलगी

"हो.. सुरुवातीला मीही मनाप्रमाणे करायचे.. पण प्रत्येक गोष्टीत हे असे नको, ते तसे नको असे बोल येऊ लागले.. म्हणून मी मनाप्रमाणे जगायचे सोडून दिले.. पण आता कुठे तरी ती खंत वाटते? की कदाचित मी सर्वांचा विरोध करून मनाप्रमाणे जगायला हवे होते.. आतापर्यंत जगले आहे पण फक्त पाषाणच.. एखाद्या विधवेला विधवा म्हणून कधी दाखवून देऊ नका.. तिचे दुःख तिच्या उराशी असतेच त्यात तसे बोलणे ऐकून तिचे मन दुखत राहते.. ती जखम कधीच भरून निघत नाही.." सुमन

"सॉरी आई, माझं चुकलं.. मी तुझ्यावरून तिची परीक्षा करायला गेले.. पण आता मला समजले की एखाद्या विधवा स्त्रीला तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा पूर्ण हक्क आहे.." सुमनची मुलगी
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..
धन्यवाद 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..