तू तर चाफेकळी - भाग 2

Love story

तू तर चाफेकळी - भाग 2 

रात्रीच्या त्या शांत वातावरणात मधुनच एखादी येणारी वाऱ्याची झुळूक अंगावर शहारा आणत होती. अमेय आणि मीरा रेस्टॉरंटला पोहोचले. अमेयने टेबल आधीच बुक करून ठेवलं होतं. त्यामुळे त्यांना फार वाट पहावी लागली नाही. एका छोट्या हटसारख्या शेडखाली त्यांचं टेबल रेडी होतं. त्याने खास तिच्यासाठी कँडल लाईट डिनर अरेंज केलं होतं. बाजूने असणाऱ्या खांबावर पडदे सोडले होते...त्यांच्या बाजूने मस्त लायटिंग केलेलं... समोरचं एक बाजूला छोटंसं तळं आणि त्यात फुललेली कमळं.... सायलेंट म्युझिक वाजत होतं. हे सगळं बघुन मीरा भारावुन गेली. अमेयने खुर्ची ओढून तिला नजरेनेच बसायला सांगितलं. मग तोही तिच्या समोर जाऊन बसला. 

" आवडलं का रेस्टॉरंट...? " त्याने विचारलं

" हो , छान आहे.. शांत वाटतंय.... कोणाचा डिस्टरबन्स नाही.... " ती आजूबाजूला सगळं न्याहाळत म्हणाली. 

" म्हणूनच तर बुक केलंय....." त्याने तिच्याकडे बघून डोळा मारला. तशी तिने लाजुन नजर दुसरीकडे वळवली. 

" मला खूप भूक लागलेय. तुला बघुन पोट नाही भरणारे माझं. मागव काहीतरी लवकर.. " मीरा 

" हो , मागवतो. या बाबतीत तू नि अंजु अगदी सेम आहात. दोघींना पण भूक आवरत नाही अजिबात. जरा दम धर..." अमेय म्हणाला.

" हो असुदे. लागते भूक आम्हाला. माणसं बघुन पोट भरायला माणसं समोर असावी लागतात... " असं म्हणून तिने नजर दुसरीकडे वळवली. तिचा टोमणा त्याच्या लक्षात आला. त्याने अलगद तिच्या हातांवर आपला हात ठेवला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. 

" तुला चांगलं माहितेय अमेय , मी फक्त अंजुला भेटायला आले नाहीये इथे. तुझ्यासाठी ही आलेय. " मीरा त्याच्याकडे बघत म्हणाली.

" मला माहितेय ग राणी. पण काय करू. कामामुळे वेळच नाही मिळत.. प्लिज समजुन घे.. " तो म्हणाला

" दरवेळी मीच किती समजुन घेऊ. तुझ्यासाठी म्हणून दोन दिवस सुट्टी टाकून आले. तुला थोडा वेळ नाही माझ्यासाठी... " तिने गाल फुगवले. त्याला तिच्या रुसव्याच हसू आलं. 

" मीरा.. नको ना चिडू.. आता वेळ मिळालाय ना आपल्याला..मग त्यात ही तू अशी रागावून राहणारेस का..?? बोल की..सॉरी ना....." असं म्हणुन त्याने तिच्यासमोर तिची आवडती डेरी मिल्क ठेवली. तशी तीही वितळली. हसतच तिने त्याच्या कडून कॅडबरी घेतली. 

दोघांनीही जेवण ऑर्डर केलं. गप्पा मारत त्यांनी जेवण केलं आणि तिथून निघाले. अमेयने घराच्या थोडं अलीकडेच गाडी उभी केली.

" इथे का थांबवली गाडी...? घर तर पुढे आहे ना...? " मीराला काहीच न कळून तिने विचारलं. 

" घर पुढे आहे. पण आत्ता तू आहेस ना माझ्या समोर... " त्याने तिचा हात धरून हळूच आपल्याकडे खेचलं..

" अमू काय करतोयस हे..... सोड ना... " ती लाजली

" मी कुठे काय केलंय. फक्त हातच तर धरलाय तुझा..तुझ्या मनात काही वेगळं आलं का....?? " त्याने मिश्किल हसत विचारलं. 

" नाही...... ते.......  इश्श...... " लाजुन ती गाडीचा दरवाजा उघडून बाहेर आली. तसा तोही मग गाडीतुन खाली उतरला. 

" अहहह..... बघू तरी माझी होणारी बायको किती गोड लाजते ते... " त्याने तिच्या समोर येत म्हटलं. हलकेच त्याने तिचा चेहरा ओंजळीत धरला. 

" अमेय अजून किती दिवस असं लांब राहायचंय आपण एकमेकांपासून....." ती म्हणाली

" मी जवळच तर आहे...... " तो म्हणाला आणि तिच्या हृदयाची धडधड वाढली..

" तसं नाही रे.. घरी कधी सांगणार आहेस आपल्याबद्दल...?? निदान अंजुला तरी सांग..." ती त्याच्यापासून जरा बाजूला झाली. 

" हो सांगुया. ती तर काय उडयाच मारेल. पण त्या आधी मोठ्ठा फुगा येईल तिच्या गालावर मला का नाही सांगितलं म्हणुन.... " अंजुचा चेहरा इमॅजिन करून तो स्वतःशीच हसला. एव्हाना मीराने जवळजवळ सगळी कॅडबरी संपवली होती. त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं तर लहान मुलांचं तोंड चॉकलेटने माखतं तसं तिचं झालं होतं. 

" मला ठेवली नाहीस ना कॅडबरी अजिबात....? " त्याने लटक्या रागाने विचारलं. 

" हा हा......  तुला नाहीच ... " ती त्याला वाकुल्या दाखवत म्हणाली. 

" अस्स..... बघतो ना मी पण कशी एकटी खातेस ते...." त्याने पटकन तिला आपल्या जवळ ओढलं आणि गाडीला टेकून उभं केलं. तिचं हृदय धडधडू लागलं. हाताला चॉकलेट लागल्यामुळे ती त्याला बाजूला पण करू शकत नव्हती. 

" अमु.... प्लिज सोड. बघेल कोणीतरी... " 

" कोणीही नाही इथे...... " असं म्हणून तिला कळायच्या आतच त्याने पटकन तिच्या ओठांच्या बाजूला लागलेलं चॉकलेट आपल्या ओठांनी हळूच टिपून घेतलं. ती तर ब्लँकच झाली. 

" निघायचं ना......" तो तिच्यापासून बाजूला होत म्हणाला. ती अजूनही तंद्रीतच होती... तिने फक्त मान डोलावली आणि ती गाडीत जाऊन बसली. ते दोघे घरी पोहोचले तोपर्यंत घरातली सगळी झोपली होती. 

...........................................

दुसऱ्या दिवशी अंजली वेळेत उठली. आवरून ती ऑफिसला गेली. कालपासून अबिरला कसा धडा शिकवता येईल याचाच विचार तिच्या डोक्यात घोळत होता. ती ऑफिसमध्ये गेली तेव्हा मितू आणि सीमा कॉफी पित होत्या. 

" हाय..... " सीमा 

" हाय......... " ती कसनुस म्हणाली.

" का ग अंजु बरं नाही का.....? " चेहरा का उतरलेला तुझा...? " सीमाने विचारलं. 

" नाही ग.. सहजच. नीट झोप नाही झाली काल. " 

" का गं.... किसके खयालों में......." सीमा तिला चिडवत म्हणाली. 

" तिचं माहीत नाही. पण मैं तो अबिर जी खयलो में ही थी..!!! " मितू दोन्ही हात थव्यासारखे उडवत म्हणाली.

" हो का.... मॅडम कामाला लागा आता. तुमचा अबिर सिंग नाही येणारे तुमची कामं करायला. " सीमाने तिच्या डोक्यात टपली मारली. 

" हो ना....चला कामाला लागू.... " तिघी कॉफी संपवून बाहेर डेस्कजवळ यायला नि समोरून अबिर यायला एकच गाठ पडली. 

आज त्याने ब्लॅक कलरचा शर्ट आणि ब्लु जीन्स घातली होती आणि त्यात तो कमालीचा हँडसम दिसत होता. मितू तर त्याला बघून कधीच फ्लॅट झाली पण मागून येणारी अंजु पण दोन क्षण त्याला बघतच राहिली. 

" हे अबिर.... Looking so handsome...  " मितू त्याच्याजवळ जात म्हणाली. 

" ओह..  थँक्स मिताली... " एवढं बोलून तो त्याच्या डेस्क वरती गेला. 

" ओ मॅडम .... जाग्या व्हा नि कामं करा. सर येतीलच इतक्यात... " सीमा ओढतच मितूला घेऊन गेली. पाठोपाठ अंजु देखील. 

......................................

सगळे आपापल्या कामात बिझी होते. काम करताना पण राकेश , यश , सीमा यांची थट्टा मस्करी चालू होती. पण अंजुचा आज मूड नव्हता. थोड्या वेळाने सरांनी तिला आत बोलावलं. 

" सर तुम्ही बोलावलत.....?? " ती सरांच्या केबिनच दार नॉक करून आत आली.

" या मिस अंजली... तुम्हाला तर माहितीच आहे की सध्या आपली कंपनी लॉस मध्ये आहे. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रोजेक्ट मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत... " 

" हो सर...... " अंजु

" तर आपल्या जुन्या क्लाएंट्सची एक लिस्ट काढा आणि मला आणून द्या.. आणि आपल्या कंपनीचे मेहेता ग्रुप सोबत चांगले संबंध होते आता सध्या त्यांच्या कंपनीकडून आपल्याला कोणताच प्रोजेक्ट मिळाला नाहीये. तर तुम्ही त्याबाबत चौकशी करा आणि त्यांच्यासाठी एक चांगल प्रेझेंटेशन तयार करा..."  मॅनेजर सर म्हणाले.

" येस सर.. मी आजच तयार करते. तुम्हाला मी दोन दिवसात प्रेझेंटेशन मेल करते. मेहता कंपनीचे आधीचे रेकॉर्ड पण चेक करावे लागतील.. " ती बोलली.  

" ok. No problem.. वाटल्यास तुम्ही मिस्टर अबिरना तुमच्या सोबत घ्या आणि तुम्ही दोघांनी मिळून प्रेझेंटेशन बनवा. पण त्या आधी एकदा त्यांच्या प्रोजेक्ट मॅनेजरला भेटून घ्या... " 

" हो सर.... " 

सरांकडून आणखी काही डिटेल्स घेऊन अंजु केबिन मधून बाहेर आली. सरांनी तिला अबिर सोबत काम करायला सांगितलं होतं त्यामुळे तिचा तर मुडच गेला. 

" या खडूस सोबत काम करावं लागणारे... अरे देवा.." ती असं बडबडत असतानाच तिच्या डोक्यात एकदम ट्यूब पेटली आणि अबिर वरचा सगळा राग काढण्यासाठी एक आयतीच संधी तिला मिळाली. 

तिने मग आपल्या हातात मेहता कंपनीची फाईल घेतली आणि ती अबिरच्या डेस्कजवळ आली. तो आपल्या कामात इतका गढून गेला होता की ती बाजूला येऊन उभी राहिली तरी त्याचं लक्ष नव्हतं. 

" हम्मम हम्मम्म्म....... " तिने जरा घसा खाकरला. तसं त्याने चमकून वरती पाहिलं. 

" किती ती नाटकं करावी खूप काम करत असल्याची...." ती इकडे तिकडे बघत हळूच पुटपुटली. 

" आ...? काही म्हणालीस का...? " अबिर 

" नाही काही.. बरं आपले जुने क्लाएंट आहेत मेहता म्हणुन. पण सध्या त्यांचे प्रोजेक्ट्स ते आपल्याला देत नाहीयेत. तर त्या संदर्भात सरांनी आपल्याला काम करायला सांगितलं आहे. त्यांच्या कंपनीसाठी एक प्रेझेंटेशन पण बनवायचं आहे. पण त्या आधी त्यांच्या प्रोजेक्ट मॅनेजर सोबत बोलायचं आहे. त्यांचे नवीन रुल्स किंवा त्यांच्या काही डिमांड असतील तर विचारायच्या आहेत..." ती बोलत होती आणि तो कान देऊन ऐकत होता. 

" ok... मग प्रेझेंटेशन करायला कधी सुरवात करायची...? " त्याने विचारलं. 

" सध्या मला एका प्रोजेक्टच काम आहे. तर तू आधी मेहतांच्या ऑफिसला जाऊन त्यांच्या प्रोजेक्ट हेडशी बोलशील का...? ही त्यांची फाईल. आतापर्यंत त्यांनी आपल्यासोबत केलेल्या प्रोजेक्ट्सचे सगळे डिटेल्स आहेत यात.." ती फाईल त्याच्याकडे देत म्हणाली. 

" Well. No problem.... उद्या जाईन मग मी..." अबिर 

" नाही नको. आजच जा. लंच नंतर गेलास तरी चालेल मी सांगते सरांना. नि तिकडूनच मग तू घरी जा पुन्हा ऑफिसला येऊ नको.. " अंजली. 

" ok.... " तो फाईल चेक करत बोलला. ती आपल्या डेस्ककडे जायला वळली. 

" ऍड्रेस......?? " त्याने हाक मारली. तिने मग त्याला ऑफिसचा पत्ता कागदावर लिहून दिला.

" मला फारसं माहीत नाही इथलं... पण मी विचारून जाईन. " त्याने पत्त्यावर एक नजर टाकली.

तिने मग त्याला पत्ता व्यवस्थित समजून सांगितला. तिथल्या आसपासच्या खुणा देखील सांगितल्या आणि ती आपल्या डेस्कवर येऊन बसली. 

लंच नंतर अबिर लगेचच मेहतांच्या ऑफिसला जाण्यासाठी निघाला. तो बाहेर पडला तेव्हा अंजु त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून हसत होती...' बच्चू.... अब आएगा मजा...! आता तुला कळेल कोणाच्या डोक्यात अक्कल आहे नि कोणाच्या डोक्यात कांदे बटाटे....' 

क्रमशः.....

वाचक मित्रांनो , पहिल्या भागाच्या कमेंट्स वाचून किती किती बरं वाटलं सांगू....!!!! खूप भारी वाटलं. खूप जण बंध रेशमाचे चे भाग मिस करत आहेत. तर तुमच्यासाठी त्याच्या 2 ऱ्या पर्वाचे भाग लिहत आहे. तब्येत बरी नव्हती त्यामुळे त्याचं लिखाण थांबवलं होतं. जवळजवळ चार ते पाच महिन्यांनी मी लिहायला सुरुवात केली आहे. मधल्या वेळात ह्या नवीन कथेची कल्पना डोक्यात आली त्यामुळे त्याचा भाग आधी लिहिला. पण बंध रेशमाचे चे 2 पर्व लवकरच पोस्ट करेन.. थोडासा सब्र करो...!! 

कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथा कोणीही कॉपी पेस्ट करू नये. कथा आवडल्यास नावसहित शेअर करावी. ही विनंती.

© ® सायली विवेक 

🎭 Series Post

View all