A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session0ed22047967e0928a379305b4721314c384b8ced7732d4d3524b5648072fb4de551f0b34): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

tu tithe mi 5
Oct 29, 2020
स्पर्धा

तू तिथे मी 5 (अंतिम )

Read Later
तू तिथे मी 5 (अंतिम )

https://www.irablogging.com/blog/tu-tithe-mi-4

सगळेच एकदम बदलून गेले ..तिकडून डॉक्टर राऊंड वर निघाले असताना ..त्यांना बघून विश्वास रावांनी विचारले ,

"तुम्ही तर म्हणाला होता कि ,सगळं व्यवस्थित आहे ..मग हे असं कस झालं ?   "-विश्वास देशमुख 

"हे बघा काका,शांत व्हा ! सगळं होईल व्यवस्थित ...धीर धरा..ब्रेन च operation  एवढं सोप्प नसतं ..कधी कधी असं होऊ शकत ..त्यांचं ब्लड  प्रेशर नॉर्मल येन गरजेच आहे ...operation  is  successful  !.."-डॉक्टर 

राजेश आणि नीता ने विश्वास रावांना सांभाळले ..डॉक्टर निघून गेले .विश्वास राव बसले ...त्यांनी डोळे मिटून घेतले .

"बाबा,काळजी करू नका .."-नीता 

"बाबा ,सगळं व्यवस्थित होईल ..घाबरू नका ..मी आहे ना  ,मी आलोय आता आपण आईला घरी घेऊनच जाऊ ..."-राजेश 

तस विश्वास रावांनी डोळे उघडले आणि राजेश कडे बघून बोलू लागले ,

"तू आलास ...कशाला आलास .....? तुझा  असून काय उपयोग? "- विश्वास राव एकदम बोलून गेले .राजेश बघतच राहिला ..

"बाब,हे काय बोलताय ?"-नीता 

"काय बोलू  मग मी .....तूच सांग काय उपयोग ह्याचा आम्हाला ....अरे आई ला हॉस्पिटल  ला नेण्यासाठी सुद्धा समोरचा माणूस कामाला आला हा नाही .........आणि कशाची वाट बघतोय ..ती बरी होण्याची ..कशासाठी ?परत सोडून जाण्यासाठी ..?"-विश्वास राव 

राजेश ऐकत होता ...त्याला खूप वाईट वाटत  होते ....पण आत्ता तो उत्तर देऊ इच्छित नव्हता ..

"बाबा,दादा ला हि तुमची काळजी आहे ....आला ना तो लगेच धावतपळत ....."-नीता 

"हो ग ,हो ..आला ना ..सगळं संपलं तेव्हा आला ..जेव्हा गरज असते तेव्हा नाही आला...तुझ्या आईला ह्याच्या आठवणीत डोळे पुसताना मी पाहिलंय ....आपल्या नातीशी खेळण्याची तिची इच्छा ती दुसऱ्यांच्या मुलांना शी खेळून पूर्ण करते ... ह्याच साठी इतकी मेहनत घेऊन आम्ही मुलांना मोठे करतो कि एक दिवस त्यांनी भुरकून उडून जावे आणि परत कधीही मागे वळून बघू नये ..हो ना ..?"-विश्वास राव 

"बाबा,तस नाहीये ..आम्हला पण तुमची खूप आठवण येते ....तुम्हाला सोडून आम्ही मजेत नसतो ....पण मनात येईल तेव्हा लगेचच आम्ही येऊ नाही शकत ....म्हणूनच मी तुम्हाला बोलावत होतो कि तुमची आणि माझी भेट व्हावी ..तुम्हाला थोडी विश्रांती मिळावी ,आर्या  ला तुमचा सहवास मिळावा .....पण तुम्ही आलाच नाही .."-राजेश .

"बरोबर आहे मुला,आमचाच चुकलं ....आम्ही झालो म्हातारे ...छोट्या छोट्या गोष्टीत गुंतून पडणारे ..जग बदललंय ...काय करणार  कळलं नाही आम्हला .... तरी तुझी आई मला नेहमी म्हणत असे कि, आपण त्यांच्या मध्ये  पडू नये,त्यांच्या कडून अपेक्षा ठेवू नये ...पण काय करणार तिच्यासाठी वाईट वाटत च असते  ..मला तिच्यासाठी आणि तिला माझ्यासाठी वाईट वाटणारच ..शेवटी आम्हीच आमचे दोघे एकमेकांनसाठी.....पण आता ..पण आता तिला जर काही झालं तर ....."-विश्वास राव 

विश्वास रावांचा  कंठ दाटून आला ..त्यांना पुढे बोलवेना ..डोळ्यात पाणी तरळले ...आणि ते खाली मान घालून बसले ....राजेश हि तसाच बसला त्याला हि खूप वाईट वाटत होते ...त्याला आपले आई बाबा  एकटे आहे ह्याची जाणीव होती पण तोही निर्णय घेऊ शकत नव्हता ...ज्यांनी कष्टाने वाढवलं त्यांना चार सुखाचे   दिवस    दिसावे आणि आनंद मिळावा म्हणून तो हि मेहनत घेत होता ....आणि विश्वास राव हि त्यांच्या जागेवर बरोबर होते .

वेळ तसाच  पुढे पुढे जात होता ..विश्वास रावांची तगमग वाढत होती ..आशा बाई अजूनही स्थिर झाल्या नव्हत्या....शुद्धीवर आल्या नव्हत्या ..काय करावे ?कोणालाच कळत नव्हते  ....

तेव्हड्यात मनाशी काहीतरी विचार करून विश्वास राव पुढे झाले ..आणि थेट आशा बाईंच्या कॉट जवळ बसले ...त्यांनी आपल्या बायकोचा हात हातात घेतला आणि तसेच तिच्याकडे  एकटक बघत राहिले जणूकाही ते मनातल्या मनात आशा बाईंशी बोलत होते ,

"आशा ,ये आशा काय हे ?लवकर डोळे उघड ....  अग, रोजचा तुझा मोगरा तुझी वाट बघतोय ...मुलं पण  बाहेर  उदास बसलीआहेत . तूच सांगते ना खंबीर राहायचा ,लढायचं मग चाल उठ ..आपली लढाई अजून चालूच आहे ......आपल्याला अजून कितीतरी गोष्टी करायच्या आहेत सोबत ....मला तुझ्याशिवाय करमत नाही .मी तुझ्याविना राहू शकत नाही ...आपल्याला अजून चारधाम यात्रा  करायची म्हणत होतीस ना ...मग अशी झोपून राहिली तर  कशी तयारी होईल ? हे बघ आशा.. मी आणि तू वेगळे नाही ,तुला चांगलंच माहित आहे कि तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला काहीच अर्थ आंही ....इतक्या  वर्षांचा संसार आपला तूझ्या साथीनेच पार पडला आणि अजूनही मला तुझी साथ हवीच आहे ...मी तुला असं जाऊ नाही देणार ......तुला जर काही झालं तर मला हि तुझयासोबतच यावं लागेल आणि मला तर अजून जगायचं आहे ..तुझ्यासोबत ...शेवटी 'तू तिथे मी' .....   " विश्वास  राव आशा बाईंच्या हातावर डोकं ठेवून म्हणाले .....

तस आशाबाईंच्या त्या लावलेल्या मॉनिटर वर थोडी जास्तच हालचाल दिसू लागली ..नर्स ने बघितले ,

"काका, थांबा मला चेक करू द्या ..तुम्ही बाहेर बसा प्लिज ...."-नर्स 

विश्वास राव बाहेर बसले ....आणि डॉक्टरांची हालचाल सुरु झाली .....आशा बाईंनी डोळे उघडले आणि परत पटकन बंद झाले त्यांचे डोळे .

बाहेरच्या काचेतून राजेश ,नीता हे सगळं बघत होते ...विश्वास राव खाली मान घालून बसले होते त्यांच्या डोळ्यात अश्रू होते .....आणि सतत देवाचा धाव करत होते ...

डॉक्टर बाहेर  आले विश्वास रावांच्या जवळ बसले आणि खांद्यावर   हात ठेवला .विश्वास राव त्यांच्या डोळ्यात बघू लागले .

"काका ,काळजी करू नका .काकू ना आत धोका नाही ..त्यांना ग्लानी आहे ...त्या  एक तासाभरात पूर्ण शुद्धीवर येतील ....."-डॉक्टर 

विश्वस राव डॉक्टरांचा हात हातात घेऊन रडू लागले ."धन्यवाद डॉक्टर , तुम्ही खरंच देव आहेत .."-विश्वास राव 

राजेश आणि नीता हि आता आई च्या डोळे उघडण्याची वाट बघत होते ...थोड्यावेळाने आशा बाई शुद्धी वर आल्या .....राजेश आणि नीता त्यानं भेटले ....आशा बाईंची नजर विश्वास रावांना शोधत होती .त्यांना एक रात्र  I .C .U  मध्येच ठेवणार होते आणि मग दुसऱ्या दिवशी रूम मध्ये शिफ्ट करणार होते ....तेवढ्यात विश्वास राव मध्ये आले ...त्यांची आणि आशा बाईंची नजरानजर झाली आणि एकमेकांना सगळं कळलं ...आता त्यांची तब्बेत बरीच सुधारत होती ....रूम मध्ये शिफ्ट झाल्यावर  विश्वास राव आणि आशा बाई बसले होते .

"काय म्हणते ?कशी  आहे तब्बेत आज ?"-विश्वास राव 

"बरी आहे , तुम्ही सोबत असल्यावर मला काही होणार नाही ....मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही .....काळजी करू नका .....मी सुद्धा तुमच्या शिवाय राहू शकत नाही .... शेवटी "तू तिथे मी .." हेच खरं.............."-आशाबाई 

आणि दोघेही हसले .......... !

 

 

my  point    of  view  ;- कस आहे ना ,आपल्या आधीच्यापिढीने घेतलेल्या कष्टानमुळेच आपण आपले भविष्य बनवू  शकतो .त्यांच्या काळात एक मेकांशी बोलायचे ,संवाद साधायचा असं फार कमी व्हाच्याच ..आज जरी आपण आपले प्रेम शब्दातून व्यक्त करू शकत असलो तरी ते लोक करू शकत नव्हते ...आज सर्रास आपण   नवऱ्याचं नाव घेतो पण तेव्हा बायका नाव घेत नव्हत्या आणि म्हणूनच उखाणा घायला हि वेगळी मज्जा  असायची ..........असो ! ह्या कथेतून मला फक्त उतारवयातील प्रेमाची झलक दाखवायची होती ...त्यांच नातं हे खूप घट्ट असतं. त्यांचा एकमेकांशी  संवाद हा मनातून  होत असतो . ह्या वयात जर दोघांपैकी कोणी एक राहिला आणि दुसरा गेला तर आयुष्य  खूप अवघड होऊन जात अन त्यातही स्त्रियांकडे  सहन शक्ती थोडी  जास्त असते ,त्यांचा वेळ कसाही घरातल्या कामांमध्ये निघून जातो  पण जर बायको गेली आणि नवरा मागे राहिला तर त्याच जगणं खूप अवघड होऊन जात .  तात्पर्य काय तर  वयाच्या चाळीशी नंतर जेव्हा आपली मुलं सगळीकडे सेट होतात तेव्हा एका नव्या पद्धतीने आयुष्य जगायला सुरवात होते .......आणि त्यात आपल्या जोडीदाराची साथ महत्वाची असते !

 

 

Circle Image

Anuradha Pushkar Shaha

Writer ,former lecturer ,Home maker

I like reading stories ,inspirational books . i love visiting new places ....