तू तिथे मी 4

aasha and vishwas shares strong bond ....they know each other very well

https://www.irablogging.com/blog/tu-tithe-mi-3

"काका , काळजी करू नका ,होईल सगळं ठीक ,"-नर्स ने विश्वास रावांना  धीर देत म्हंटले आणि अशा बाई ना ऑपेरेशन रूम  मध्ये नेण्यास सुरवात  केली .

विश्वास रावांच्या   हातातून आशाबाईंचा हात निसटला होता ..खाली मान  घालून विश्वास राव बेंच  वर  बसले .

"बाबा ,तुम्ही थोडस खाऊन घेता का ? "- नीता

"नाही ,मला भूक नाही ,मला आग्रह करू नका ..."-विश्वास राव .

ओपेरेशन ची  सुरवात झाली होती ..साधारण ११ वाजता सुरु झालेलं ओपेरेशन बराच वेळ सुरु होत .इकडे विश्वास राव मनातून देवाकडे सगळं ठीक व्हावं म्हणून प्रार्थना करत होते ....त्यांना राहून राहून आशा बाईन  सोबत घालवलेला काळ  आठवत होता ... त्यांची नातं त्यांच्या जवळ येऊन बसली .

"आजोबा ,तुम्ही का काळजी करताय ?आम्ही आहोत ना सगळे इथे  ..आज्जीला काही नाही होणार ...आजकाल सगळं सोप्पं झालं आहे ..."-सायली (नीता ची मुलगी ).

"नाही ग बाळा काही नाही .....तू घरी थांबायचं ना ...इथे कशाला आली ..?"-विश्वास राव 

"तुमच्या शी बोलायला ..मला माहित आहे कि ,तुम्ही काही कोणाशी बोलणार नाही .... आणि तुम्ही काही खाल्लेलं हि नाही ..आजी म्हणायची तुझे आजोबा जास्त कोणाशी बोलत नाही ....हट्टी आहेत ... कोणाचं ऐकत नाही म्हणून ..."-सायली 

"हो का ,अजून काय काय म्हणायची आज्जी  तुला ..?"-विश्वास राव 

"ती म्हणायची कि तुम्हाला तूप गुळ रोटी खूप आवडते म्हणून ...हे बघा तेच आणले आहे .."-सायली 

"नको ग सयु,...आत्ता भूक नाहीये ग .."-विश्वास राव 

"ते काही नाही आजोबा ...हे खाल्लं नाही तर आज्जी ला बर नाही वाटणार ...ती तुम्हाला असं उपाशी  कधी ठेवते का ? आणि मग नंतर औषध पण घायचा आहे ना ..."-सायली 

सायलीने खूपच सांगितल्यावर आणि आशा बाई आठवल्यावर विश्वास रावांनी थोडं फार खाल्लं होत ..ती आजोबांशी गप्पा मारत होती जेणेकरून विश्वास राव थोडे विचारातून बाहेर येतील .......

"तुम्हाला माहित आहे का आजोबा ...मामा येणार आहे आहे आता ....."-सायली 

विश्वास रावांनी ऐकून घेतला फक्त ..राजेश आणि विश्वास राव एकमेकांशी जरा कमीच बोलत होते . जेव्हा पासून तो परदेशी लग्न करून गेला होता तेव्हापासून त्याचे बोलणे आईशी जास्त आणि बाबानशी कमी होत असे ..ओपेरेशन  बराच वेळ चालू होत ..सगळ्यांची आत चिंता वाढू लागली होती ...विश्वास राव येरझाऱ्या मारत होते ..तेवढ्यात एक नर्स बाहेर अली 

"काय झालं नर्स ..सगळं ठीक आहे ना .."-नीता

"हो हो ,,"-नर्स .एवढा बोलून ती निघून गेली ...थोड्याच वेळात डॉक्टर आले .सगळे डॉक्टरांकडे जमले 

"काय झालं डॉक्टर कशी आहे ती ?"-विश्वास  राव 

"ओपेरेशन  झालंय,त्या एकदा शुद्धीत  आल्या कि सगळं नॉर्मल होईल ..आम्ही त्यांना सध्या I .C .U  मध्ये ठेवणार आहोत .त्यांचा ब्लड प्रेशर मॉनिटर करतोय .... त्यांना येणाऱ्या ६ तासात शुद्ध यायला हवी ...."-डॉक्टर 

सगळ्यांनी देवाचे आभार मानले ....विजय तिथेच थांबून होता ..विश्वास रावांचे चुलत भाऊ विश्वास रावांना घरी घेऊन गेले ,हॉस्पिटलपासून त्यांचे घर जवळ होते ...विश्वास रावांना खर तर जाण्याची इच्छा नव्हती पण नीता ने आणि विजय ने त्यांना आणि सायलीला काकांकडे पाठवले ..आशाबाईं  ना तसही ५-६ तास लागणार होते शुद्धीत यायला ... विश्वास रावांनी चहा पाणी घेतला आणि सोफ्यावर बसले .  

"अहो ,अहो काय हे तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला    हवी .... मी नाही म्हणून बसून का राहणार नुसते ?"- आशाबाई 

"तू ,तू कशी आहेस ? मला किती टेन्शन आलं होत सांगू ?बरी आहेस ना ?"-विश्वास राव 

"हो तर मी बरी आहे .   पण तुम्ही काळजी घ्या ...हे बघा आता वय झालं आपला ...तुम्हाला खंबीर  व्हाव्हच लागेल ....हातपाय गाळून बसू नका ."-आशाबाई ..एवढा बोलत बोलत त्यांना धाप लागली ...आणि सगळे डॉक्टर धावपळ करू लागले ..विश्वास रावांना बाहेर जायला सांगितले ..तेवढ्यात ते अशा म्हणून ओरडले ..आणि त्यांना जाग आली ..

खर म्हणजे विश्वास रावांचा डोळा लागला होता आणि ते स्वप्नात अशा बाईन शी  बोलत होते ..त्यांचा जीव  एकदम खाली वर होत होता  एव्हाना ४ -५ तास निघून गेले होते .

"अरे विश्वास ,काय झालं ?"- भाऊ 

"काही नाही मला जायला हवं ...आशा  ला भेटायचंय .."-विश्वास राव 

"हो हो जाऊ आपण ...थांब "-भाऊ

ते दोघे हॉस्पिटल ला  आले ...राजेश आला  होता ..

"नीता ,तुझी आई कशी आहे ?"-विश्वास राव 

"हो बरी आहे .... तुम्ही बसा  आधी ..दादा बोलतोय डॉक्टरांशी ."-नीता 

"हि धावपळ कसली ......"?-विश्वास राव 

"काही  नाही बाबा ,दादा बोलतोय डॉक्टरांशी  कळलेच एवढ्यात ..."-नीता 

तेवढ्यात राजेश येतो ..राजेश हा विश्वास राव भाऊंकडे गेल्यावर तिथे पोहचलेले असतो ......राजेश ची आणि विश्वास रावांची नजरनजर होते 

"आई ,कशी आहे ?..काय झालं ? दादा बोल ना ..डॉक्टर काय म्हणाले ?"-नीता 

राजेश त्याच्या बाबांचा हात हातात घेतो ...आणि बसतो ..विश्वास राव त्याच्याकडे बघतात ,

"काय म्हणाले डॉक्टर ?"-विश्वास राव

"काही नाही ,बरी होईल ती .....काळजी करू नका .."-राजेश 

"माझ्या पासून लपवू नका ..मी खंबीर आहे ..काय झालं सांग ..शेवटी सगळं मलाच बघायचं आहे ......मी अजून हि एकट्याने सगळं सांभाळू शकतो .."-विश्वास राव .त्यांच्या सुरात  अजूनही कसलीतरी  नाराजगी होती. 

"तीच ब्लड प्रेशर स्थिर नाहीये ..आत वाढलं होत ..पुढचे ३ तास क्रिटीकल आहे .....काही हि होऊ शकता ...डॉक्टर म्हणाले कि ३ तासात जर शुद्ध नाही अली आणि ब्लड प्रेशर नॉर्मल नाही झालं तर अवघड आहे .."-राजेश ...

हे सगळं ऐकून नीता एकदम खाली बसली ..   विश्वास राव  सुन्न झाले .....राजेश ला हि काय करावं ते कळत नव्हते ..आता वाट बघण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हते कोणी ... ...

🎭 Series Post

View all