Oct 27, 2020
स्पर्धा

तू तिथे मी 3

Read Later
तू तिथे मी 3

https://www.irablogging.com/blog/tu-tithe-mi-2

नीता  ने सगळं काही राजेशला सांगितलं ..आता  तो हि आईकडे येण्यासाठी निघाला होता ..राजेश एक इंजिनीर होता.त्याला एक मुलगी होती .तो ,त्याची मुलगी आणि बायको सगळे घरी येण्यास निघाले ....नोकरी साठी देशाबाहेर गेलेला राजेश लग्नासाठी आला होता आणि मग परत   गेला होता .त्याने बऱ्याचदा आई बाबाना बोलावले होते तिकडे राहायला पण विश्वास राव आणि आशा बाई काही गेल्या नाहीत  .अशा बाईंनी "आपलं घर भलं आणि आपण भलं "असं म्हणत जाण्यासाठी नकार दिला होता .इकडे नीता ला दोन मुलं होती .एक मुलगी जी १२ वर्षांची असेल तर मुलगा ६ वर्षांचा असेल .ती दिल्या घरी सुखी होती ...काही तक्रार नाही .एकूणच काय तर अशा बाई आणि विश्वास राव दोघे हि जबाबदारीतून मूक्त होऊन आपलं आयुष्य एकमेकां च्या सोबतीने घालवत होते .रात्री विश्वास राव तिथेच थांबले .त्यांच्या जोडीला नीता चा नवरा (विजय ) होता . हि रात्र  विश्वास रावांसाठी खूप मोठ्ठी होती .त्यांना सगळ्या जुन्या गोष्टी आठवत होत्या ..ते अजूनही अशा बाईन भेटू नव्हते शकले ...

डोळे बंद केले कि आशा बाईंचा आवाज ,त्यांचं हास्य आठवायचं त्यांना ...बेंच वर बसल्या बसल्या ते परत आठवणीत रमून गेले .त्यांना आठवलं तो दिवस जेव्हा त्यांचा अपघात झाला होता .एकदा असाच विश्वास  राव  घरी येत असताना  त्यांच्या रिक्षाचा अपघात झाला होता .. घरी अशा बाई ,मुलं घेऊन राहत होत्या ...त्यांच्या घरी अपघातच फोन आला आणि त्या तडक विश्वास राव ज्या हॉस्पिटल मध्ये होते तिथे गेल्या ....बेशुद्ध असलेल्या विश्वास रावांना शुद्ध तेव्हा आली जेव्हा अशा बाईंनी त्यांचा हात हातात घेतला होता ....जवळ जवळ महिना भर घरीच होते विश्वास राव ....त्या अपघातामुळे घरी असलेल्या विश्वास रावांना आशा बाईंचं रोजच नवं रूप बघायला मिळत होत ...ते परत एकदा त्यांच्या प्रेमात गुंतत चालले होते .

"आशा ,बस ना इथे ..."-विश्वास राव 

"नको हो ,खूप काम आहे ..तुम्हाला काही हवं आहे का ?"-आशा बाई 

"हो ,तू हवी आहेस .."-विश्वास राव मिश्किल पणे .

"इश्श ,,काही काय ?मुलं मोठी होत आहेत माहित आहे ना ..   बेड वर पडल्या  पडल्या बर सुचतंय काहीही ह्या वयात  तुम्हाला ..."-आशा बाई 

"त्यात काय झालं ,रोज इतकी धावपळ असते कि मी तुझ्याशी नीट बोलू हि शकत नाही ..मग म्हंटल बोलू आज ..."-विश्वास राव 

"हम्म, हो का ..असं आहे तर .....बोला काय बोलायचं ..."-आशा बाई पण बसल्या 

"असंच ,खास काही नाही ..मी तुला फार काही देऊ शकलो नाही ...म्हणजे बघ ना ...बाकीचे लोक कसे बाहेर जातात ,फिरतात मी तस काही करू शकलो  नाही ..सारखं आपलं काम .."-विश्वास राव 

"अहो हे सगळं तुम्ही आपल्या साठीच करताय ना .....आपल्या मुलानं चांगला शिक्षण मिळावं ,आपलं म्हातारपण सुखात जावं त्यासाठी थोडे कष्ट   घ्यावेच लागतील आपल्याला ..."-आशा 

"हो ना ,खरं सांगू ..तू सोबत आहेस म्हणून हे सगळं जमतंय ..नाहीतर अवघड होत सगळं ....."-विश्वास राव 

"चला काहीतरीच ,असं काही नाही ..जे व्हायचं  असत ते होत ...आणि तसं हि 'तू तिथे मी ' ह्या जन्मात तरी मी तुम्हाला सोडणार नाही ."-आशाबाई .

विश्वास रावांना ते सगळं आठवून डोळ्यात पाणी आलं ....आज त्यांना आशाबाई ना ह्या अवस्थेत पाहवत नव्हतं .. त्यांची सगळी रात्र अशीच सरली ....

दुसऱ्या दिवशी सकाळीच नीता हॉस्पिटल ला  आली ....डॉक्टरांनी ऑपेरेशन  ची तयारी सुरु केली .विश्वास  रावांचा जीव खालीवर होऊ लागला .

"काळजी करू नका काका ,आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करू. त्या बऱ्या होतील ....."-डॉक्टर 

"मला फक्त एकदाच तिला भेटू द्या ,प्लिज "-विश्वास राव 

"ठीक आहे ...या तुम्ही आत "-डॉक्टर 

विश्वास राव आशा बाईन कडे बघू लागले .त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले ....त्यांनी आशा बाईंना चा हात हातात घेतला आणि ते तसेच एकटक त्यांच्या कडे बघत राहिले .जणू काही त्या  शांततेत  सुद्धा त्या दोघांचा  संवाद सुरु होता .... त्यांची मन  बोलत होती.विश्वास राव आशा बाईंना धीर देत होते काही हि न बोलता ............. 

 

 

 

Circle Image

Anuradha Pushkar Shaha

Writer ,former lecturer ,Home maker

I like reading stories ,inspirational books . i love visiting new places ....