Oct 27, 2020
स्पर्धा

तू तिथे मी

Read Later
तू तिथे मी

सकाळी ११ वाजे ची वेळ .....

विश्वास राव  ,"आशा ,ये अशा ,अग उठ ना ..काय झाले ..तुला काही होतंय का ?"- विश्वास राव अगदी काळजीच्या सुरात अशा ताईंना म्हणजे त्यांच्या बायकोला विचारता होते .... आशा काकू अचानक पडल्या  ...त्यांना दर दारुण  घाम फुटला होता .विश्वास राव ना  काहीच कळत नव्हते ; त्यांना  आता  काळजी वाटू लागली होती. घरात ते दोघेच राहत होते ....

"थांब तू धीर सोडू नकोस आपण डॉक्टरांकडे जाऊ ...मी आलो "-विश्वास राव .असं बोलून समोरच्या घरात राहणाऱ्या समीर ला बोलवायला गेले .समीर आला त्याने अशा काकूंना उचलले .कस बस लिफ्ट मधून ते दोघे खाली आले आणि समीर  त्यांना घेऊन डॉक्टर कडे गेला ...  डॉक्टरांनी अशा काकूंना ऍडमिट केले .आणि तपासणी सुरु केली 

"काका, काही काळजी करू नका , काही नाही होणार काकूंना ...मी पाणी आणतो तुमच्यासाठी ..."-समीर 

समीर काकांना धीर देत होता पण काका  आतून घाबरले होते ..आता त्यांचं वयही तसंच होत ..डॉक्टरां चे  उपचार सुरूच होते ,तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात .

"हे बघा ,देशमुख साहेब  आम्ही त्यांची प्राथमिक तपासणी  केली आहे . त्यांना ह्या आधी असा त्रास कधी झाला होता का ?"-डॉक्टर 

"नाही ,असं कधी झालं नाही ..अगदी काल पर्यंत ती चांगली होती पण आज अचानक ती अशी .."-विश्वास राव 

"ठीक आहे ,आम्ही चाचण्या करत आहोत ,सध्या काही औषध दिली आहेत त्यांना ....."-डॉक्टर 

"मी भेटू शकतो का तिला ?"-विश्वास राव 

"नाही आत्ता नाही भेटता येणार ....तुम्ही बसा  इथे ..."-डॉक्टर 

डॉक्टर परत जाण्यास निघतात तेव्हा समीर त्यांच्या  जवळ जातो आणि विचारतो,"काही घाबरण्यासारखं तर नाही ना .."-समीर 

"तुम्ही कोण ?त्या तुमच्या आई आहेत का ?"-डॉक्टर 

"नाही ,मी त्यांच्या शेजारी राहतो ...."-समीर 

"ओह ,आता तस काही सांगता  येत नाही ,काही रिपोर्ट्स येतीलच मग कळेल ...त्यांना अजून कोणी नाही का ?घरचे इथे असतील तर बरे होईल ..दोघांसाठी .."-डॉक्टर 

समीर काकांजवळ येऊन बसतो आणि म्हणतो ,"काका ,काकू बऱ्या होतील काळजी करू नका ..आपण नीता  ताई ना बोलावून घेऊ  आणि राजेश ला पण कॉल लावून कळवायचे का ? "-

"ठीक आहे ,"असं म्हणून काका  नीता चा म्हणजे त्यांच्या मुलीचा नंबर देतात .. समीर त्यानं फोन लावून कळवतो आणि हॉस्पिटलला यायला सांगतो ... समीर राजेश ला हि मेसेज  करून ठेवतो .

विश्वास देशमुख आणि सौ .आशा देशमुख हे शांती निकेतन सोसायटी मध्ये गेली १० -१२ वर्षांपासून राहत होते .. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असं परिवार होता .मुलीचे लग्न झाले होते आणि ती जवळच्याच म्हणजे पुण्या  पासून जवळ असणाऱ्या गावात राहत होती . मुलगा मात्र भारता बाहेर होता . सुखी समाधानी कुटुंब होत .विश्वास राव आणि आशा बाई हे दोघेच आता तिथे राहत होते .त्यांची सोसायटी लहान होती जेमतेम २० फ्लॅट्स ची पण हे काका  काकू  मात्र सगळ्यांशी नातं जोडून होते ... त्यांचा कधीच कोणाला त्रास नसे ...ते कधी कोणाच्या अधे मध्ये हि नसत  ....आज अचानकच सकाळी आशा बाई ना त्रास होऊ लागला .. त्या सगळं आवरून किचेन  च्या बाहेर आल्या .काका  नेमकेच पूजा ते सगळं आवरून बाथरूम मधून कपडे ते बदलून बाहेर आले होते आणि त्यांनी बघितले कि आशा बाई ना अस्वस्थ वाटत आहे .  अचानक आशा बाईंना चक्कर आल्यासारखी झाली,डोळ्या समोर अंधार झाला आणि त्या पडल्या  , तेच बघून काकांनी समीर ला बोलावले आणि आता इथे आणून ऍडमिट केले ........

थोड्यावेळात डॉक्टर आले "काका या जरा बोलूयात .."-

काका  आणि समीर दोघेही डॉक्टरांच्या केबिन मध्ये  गेले ."काका ,आम्ही चाचण्या केल्या ...त्यात आम्हला असं दिसतंय कि त्यांचं ब्लड प्रेशर  high  झालं आहे .  ....त्यानं या आधी असं काही काही त्रास किंवा कोणताही दुसरा त्रास झालंय का ?"-डॉक्टर 

"नाही डॉक्टर ,मला तर असं आठवत नाही ..."-काक 

"गेल्या काही दिवसांपासून चक्कर येन ,थकवा येन असं कधी झालंय का ?"-डॉक्टर 

"हो ,म्हणजे आज काल तिला दमल्यासारखं जरा जास्तच वाटत होत . चक्कर येत होती अधून मधून पण असं वाटलं कि दमली असेल किंवा काहीतरी विकनेस असेल म्हणून ..."-काका 

"काका तुम्ही तुमचा बॉडी चेक उप करून किती दिवस झाले ?"--डॉक्टर 

"नाही तस आम्ही काही केलं नाही बरेच दिवस ..सगळं छान आहे तर कशाला करा ना चेक उप ...असं ती म्हणायची ..."-काका 

"हेच तर चुकता ना ....आपल्या पैकी बरेच जण फक्त काही झाले तरच डॉक्टर कडे जातात पण वर्षातून एकदा का होईना बॉडी चेक उप करायला हवा ...आम्ही काकूंच्या काही टेस्ट करतोय ..... त्यांना अजून काही आजार ,म्हणजे डायबेटीस ,ब्लड प्रेशर  वैगैरे ?"-डॉक्टर 

"नाही तस अजून तरी काही नाही ..पण हो मागच्या काही महिन्यापासून डोकं दुखत तीच .....बऱ्याचदा खूप तीव्र वेदना होतात ..आम्ही एकदा एका डॉक्टर ला विचारले होते त्याने पेन किलर दिले ते घेतले कि तिला बरे वाटले होते ...मग जेव्हा पण दुखायचे तेव्हा ती तेच घ्यायची ....मी बरेचदा तिला सांगितले कि चाल आपण जाऊ पण ती तयार  नव्हती दाखवायला .."-काका 

"डोकं दुखायचं म्हणजे नेमकं काय व्हायचं "?=डॉक्टर 

"म्हणजे तिला अतिशय वेदना होत होत्या ..तिला गोळी घेऊन झोपल्यावरच बरे वाटायचे ...कधी कधी खूप थकवा येत असे ..."-काका 

"ठीक आहे काका ,बघू आपण ....बस तुम्ही .."-डॉक्टर 

ह्या सगळ्या मध्ये खूप वेळ जात होता ...

"समीर तू जा ,मी आहे इथे .."-काका 

"नाही काका ठीक आहे मी थांबतो ..."-समीर 

काकूंचा असं कळल्यावर सोसायटी मधील अजून एक दोन शेजारी आले होते हॉस्पिटलला भेटायला आणि विचारायला .काकू अजून उठल्या नव्हत्या ..काकांचा जीव कासावीस होत होता ..त्यांचे चुलत भाऊ त्याच शहरात होते म्हणून ते आले एक तासाभरात .....तेव्हा कुठे बाहेरचे लोक गेले ....आता हॉस्पिटल मध्ये काका आणि त्यांचे भाऊ होते .नीता हि निघाली होती  आणि एका तासात पोहचणार होती .राजेश चा अजून काही फोन नव्हता ...विश्वास राव काकूंच्या  रूम बाहेर बसून होते ...त्यांच्या चेहऱ्यावर चिंता साफ दिसून येत होती ... 

 

 

हि एक काल्पनिक कथा आहे . कोणत्याही व्यक्ती शी ,प्रसंगाशी किंवा नावाशी साम्य आढळ्यास योगायोग समजावा ...)

# स्पर्धा -लग्नानंतरचे प्रेम 

 

Circle Image

Anuradha Pushkar Shaha

Writer ,former lecturer ,Home maker

I like reading stories ,inspirational books . i love visiting new places ....